मराठी व्यवहारात इंग्रजीचा वापर
सध्या मराठी भाषा आणि भाषाशुद्धी, तसेच पर्यायी शब्दांची गरज यावरून बरेच लिहीले गेले आहे. यातून एक समान विचार पुढे आलेला दिसतो तो म्हणजे मराठी ही भाषा आपली मातृभाषा म्हणून आपल्याला प्रिय आहे. एक असाही विचार दिसला की भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. पण तसे असल्यास एक धोका संभवतो तो म्हणजे पूर्वसुरींचे काही न कळणे. आज ज्ञानेश्वरांची मराठी ही मराठी शब्दकोश आणि तज्ञांची उपयुक्त पुस्तके बघून समजून घ्यावी लागते. कारण मराठीचे स्वरूप बदलले आहे.
काही अंशी सर्वच मान्य करतील की कालपरत्वे मराठी भाषा बदलणार आहे. परंतु आक्षेप खर्या अर्थाने घेतला जातो तो मटासारख्या वर्तमानपत्रांमध्ये जी मराठी वापरली जाते त्यावरून. मराठीचे हे रूप समजले तरी तिचे मूळ रूप कळतही नाही.पण तरीही मटाला नावे ठेवण्याआधी, मला असे वाटले की आपण नक्की किती इंग्रजी शब्द (ज्यांना मराठीत पर्याय आहेत) दैनंदिन व्यवहारात बोलतो त्याचा थोडा आढावा/कौल घ्यावा. यातून आपण शब्दसंपत्ती आणि तिच्या संबंधाने आपले विचार यादृष्टीने नक्की कोठे आहोत हे समजू शकेल आणि विचार अधिक स्पष्ट व्हायला मदत होऊ शकते असे वाटले.
खाली २५० इंग्रजी शब्दांची यादी दिली आहे. यातील तुम्ही साधारणपणे किती शब्द दैनंदिन व्यवहारात वापरता (दुसर्या मराठी व्यक्तीशी बोलताना) ते लिहा. जर यापैकी काही शब्द तुम्ही वापरीत नसलात आणि त्यांना पर्यायी मराठी शब्दच केवळ वापरीत असलात तर ते कोणते तेही शक्य असल्यास द्या.
प्रसाधनासंबंधीचे
toothpaste, toothbrush, toilet , bathroom ,bucket,
tub, geyser, flush, shower, shower-cap,
bottle, powder, comb, oil, perfume (scent),
nail- paint, lipstick, pants, shirt, blouse,
ring, earrings, necklace, clothes, soap,
water, brush, color (white, black, red), tie, shoes,
boots, socks, shoelaces, skirt, jeans,
T-shirt, leggings, thermals (38)
"फॅशन" बद्दल
youthful, formal, casual, stylish, trendy,
typical, common ( हे अगदी "कॉमन" झालंय), collection, wardrobe, jewelry,
design, diamond set, pearl set(13)
घराबद्दल -
building, farmhouse, farm, garden, living room,
dining room, bathroom, dining table, wall, ceiling,
flooring, tiles, sink/basin, apartment, flat,
door, window, curtains, picture frames, paintings,
center table, side table, table lamp, garden hose, selection,
furniture, fabric, accessories, desk (29)
संपर्काबद्दल बोलताना-
mobile, telephone, cellphone, call (मला "कॉल" कर, "मिस्ड" कॉल दे अशा प्रकारे), email,
ping, SMS (7)
व्यायामासंबंधीचे
morning walk, jogging, running, hula hoops, jump rope,
Yoga (मी रोज "योगा" करते, अशा प्रकारे), Yoga mat, breathing, (8)
प्रवासासंबंधीचे
train, rickshaw, two-"seater", seat ("ट्रेन"मध्ये "सीट" धर, जागा पकड अशा अर्थाने), run! (पळ, अशा आज्ञार्थी शब्दाप्रमाणे),
ticket (तिकीट हा उच्चार न करता इतर काही उच्चार करीत असल्यास),station, platform, platform number, indicator,
up/down train (मुंबईकरांना कळेल, बाकीच्यांसाठी अप म्हणजे मुंबई स्थानकाकडे जाणारी, डाउन म्हणजे मुंबईपासून बाहेर जाणारी),car,wheel, drive (इथनं दीड तासाचा ड्राईव आहे अशा प्रकारे), reverse, gear, clutch, transmission, brake,
automobile (किंवा ऑटो), engine, driver, wipers (23)
कामासंबंधीचे
income tax, report, office, group, project,
officer, project manager, project personnel, HR, check,
balances, balance sheet, payment, bill, charge,
fees, conference, video-conference, teleconference, objectives,
treatment, options, target, goal, achieve,
subject, letter, type/typing, reimbursement (29)
कोणाबद्दल बोलताना -
cute, sweet, beautiful, handsome, lovely,
nice, mad, ugly, idiot, stupid,
intelligent, cool, modern, smart, ideal,
idealistic (16)
नातेवाईकांबद्दलचे
aunt, aunty, uncle, grandma, grandpa,
mama (mom, mommy), daddy (Dad), cousin, brother, sister,
sister-in-law, brother-in-law (12)
जेवणासंबंधीचे
breakfast, lunch, dinner, "glass", cup,
saucer, plates, lunch box, pot, pan,
can, jar, bottle, griddle, knife,
casseroles, wok, cutting board, bake, saute,
ladle, spoon, fork, tongs, trivet,
grate (__ ग्रेट करून घ्या), cook ( कुक करून घ्या), salt, sugar, sea food,
fish, onions, vegetables, carrots, capsicum,
potatoes, rice, wheat flour, cookies, biscuits,
cereals, apple, orange, juice, drinks (45)
वर्णनात्मक
impossible, emotional, sad, happy, amazing,
easy, hard, difficult, horrible, unhappy,
enjoyable,exhausting, frightening, threatening, deplorable (15)
खालचे काही शब्द मुख्यत्वे स्त्रिया "ब्यूटीपार्लर"मध्ये सूचना देण्यासाठी वापरतात.
shoulder length, haircut, steps, straight, curl,
barber, salon, eyebrows ("आयब्रोज"चे किती होतील अशा प्रकारे), manicure, pedicure, cuticles, nail-polish remover, facial, waxing, charges (15)
यापैकी जर समजा ६०% हून अधिक इंग्रजी शब्द आपण किंवा आपल्या जवळचे मराठी लोक दैनंदिन व्यवहारात वापरत असलो तर कदाचित असे निष्कर्ष निघू शकतात की (१) आपल्याला पर्यायी मराठी शब्द माहिती नाहीत, किंवा (२) पर्यायी शब्द माहिती असतानाही आपल्याला इंग्रजी शब्द बोलणे अंगवळणी पडले आहे किंवा, (३) तसे केल्याने आपला आर्थिक/सामाजिक दर्जा उंचावणार आहे अशी आपल्याला खात्री झालेली आहे. पहिले किंवा दुसरे कारण असल्यास एका अर्थाने सोपे आहे- आपण नवीन मराठी शब्द तयार करू शकतो. आणि अंगवळणी काय आपण मराठी शब्दही पाडू शकतो - अर्थात तेवढी मनाची तयारी असल्यास आणि त्यासंबंधी पुढील चर्चा करता येऊ शकते (शब्द कसे तयार करावेत किंवा कुठचे शब्द अधिक यशस्वी ठरू शकतात अशा पद्धतीने). तिसरे कारण असल्यास थोडे अवघड आहे - पण तरी यासंबंधी मराठी बोलत असताना इंग्रजी शब्दांची पखरण करण्याने आर्थिक नाही तरी सामाजिक दर्जा कसा वाढतो यावरून प्रामाणिकपणे विचार व्हावा. आणि वरीलपैकी कारण काहीच नसले तर आपली भाषाविषयक अनास्था आहे असे समजून मराठीचे मटाप्रमाणे असलेले नवे रूप स्विकारले पाहिजे आणि ज्यांना मराठीसंबंधाने काही प्रयत्न करायचे आहेत त्यांना ते करू द्यावेत असे वाटते.
टीप - मी वरीलपैकी साधारणपणे ६०% इंग्रजी शब्द बोलत असते. आणि कारण पहिले आणि दुसरे. उदा. transmission ला पर्यायी मराठी शब्द मला तरी माहिती नाही.
भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच. भाषा बदलली तरी जोवर मराठी माणसे जगात आहेत तोवर मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात राहीलच.
Comments
अंगवळणी
माझ्याकडून मराठी बोलताना इंग्लिश शब्द वापरली जाण्याची कारणे
१. पर्यायी शब्द माहीत असताना ही बर्याचदा समोरच्या मराठी माणसाला तो समजणार नाही म्हणून तो रुढ इंग्लिशमध्ये बोलावा लागतो. (कधी कधी हिंदी बोलताना शुद्ध हिंदी शब्द मला माहित असतो पण समोरच्या हिंदी माणसाला तो समजणार नाही म्हणून तो इंग्लिशमध्ये सांगावा लागतो.)
२. कधी कधी इंग्लिश शब्द एवढे रुळलेले आहेत की त्यासाठी मराठी शब्द उगाचच वापरत बसत नाही.
अंगवळणी हे आपोआप पडते..कोणी पाडू शकत नाही. आपण वेगवेगळ्या समूहातील लोकांशी बोलताना वेगवेगळे शब्द वापरतो. भाषेचा बाजही बदलतो. समोरच्या माणसाची मराठी समजण्याची कुवत किती आहे हे ही आजकाल लक्षात घेतले पाहिजे.
बाय द वे.. transmission ला पारेषण असा शब्द आपलं वीज मंडळ वापरत आहे. (Maharashtra State Electricity Transmission Company (Mahapareshan)अरेच्च्या हे महा परेशान असंही वाचता येतंय.)
अवांतरः काल एक मुंबईची मैत्रिण म्हणत होती आजकाल कोणीच संपर्कात नाही (मी सोडूनः-)). कसल्याही प्रकारे मराठी प्रमाणी/शुद्धीकरणाचं वारं न लागलेली ती काँटॅक्टमध्ये नसणेला सहजपणे संपर्कात नसणे म्हणत होती. आणि मी चकीत होत होतो.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
काही स्पष्टीकरण
तुम्ही दिलेले कारणही ग्राह्य आहेच, पण असेच अनुभव अजूनही काही लोकांनी लिहील्यास ते सध्याचे एक सबळ कारण आहे असे मान्य करता येईल - माझा असा अनुभव नाही. मी तरी पाहिले आहे, की तांत्रिकी शब्द सोडल्यास बरेचसे पर्यायी मराठी शब्द माहिती असल्यास ते वापरले तर लोकांना समजतात. त्यांची कुवत इतकीही कमी समजण्याची गरज नसते.
काँन्व्हेंट/इंग्लिश माध्यमाच्या शाळेत गेलेली माझी काही भावंडे व्यवस्थित मराठी बोलतात, याचे कारण ती घरी तसेच चांगले मराठी ऐकत आली आहेत. माझ्या घरच्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतच संभाषण सुरू ठेवले असते तर मराठीचा गंध त्यांना महाराष्ट्रात राहूनही लागला नसता (अशीही उदाहरणेही पाहिली आहेत - त्यांच्यासारखे लोक संपर्कात आल्यास तुम्ही म्हणता ते मान्य आहे, पण सगळेच असे नसतात. अगदी शहरातलेही).
अंगवळणी "पाडता" येत नाही हे मान्य. पण मला म्हणायचे असे आहे की विशिष्ट प्रयत्न केल्याशिवाय बोलायला/लिहायला कसे जमणार? आणि मराठीसंबंधी आपण असे करीत असलो तर असे करण्याची गरज नाही, कारण ती मातृभाषा आहे.
पारेषण या शब्दाबद्दल आभार. (वीज मंडळाचा हा शब्द विशेष आवडला नाही:) )
प्रसारण
वहन, प्रसारण, प्रारण.
(उदा.दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे प्रसारण)
संभ्रम
प्रसारण खरे तर कन्वेक्शन. ट्रान्स्मिशन म्हणजे नक्की काय याबद्दल (त्याच्या मनात) 'वीज' कशी वाहते इतकाच संभ्रम आहे (त्यात पुन्हा एसी कशी व डीसी कशी). वीज कंडक्ट होत असल्याने 'वहन' न म्हणता पारेषणात जाण्याची गरज काय?
ट्रास्मिशन फोटॉनस् चे देखील होत असल्याने ती 'सामायिक संज्ञा' ;) वाटते.
प्रक्षेपण!
म्हणजेही ट्रान्समीशन. मग ते ध्वनिलहरी,रेडिओलहरी अथवा एखाद्या अस्त्राचे असो.
तसेच अवकाशात सोडण्याच्या अग्नीबाणाच्या बाबतीतही तेच म्हणता येईल.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
प्रारण्?
ट्रान्स्मिशन साठी प्रारण कसा काय? प्रारण म्हणजे रेडिएशन. कन्वेक्शन म्हणजे प्रक्रमण. प्रमोद देवांचा प्रक्षेपण हा शब्द ट्रान्समिशनसाठी सगळ्यात योग्य वाटला.
पारेषण हा शब्द हिंदी असावा (मराठी नसावा?) असे वाटते.
प्रारण इत्यादी
कंडक्शन = वहन, कन्व्हेक्शन = प्रक्रमण, एमिशन = उत्सर्जन, रेडिएशन = प्रारण, ट्रन्स्मिट = पारेषित करणे.
इति - सरस्वती ग्रंथ भांडारप्रकाशित इंग्रजी-मराठी शब्दकोष.
कन्व्हेक्शन
शालेय पुस्तकात कन्व्हेक्शनला 'अभिसरण' हा शब्द वापरतात बहुधा.
मिहिर कुलकर्णी
बरं बरं.
हो का? बरं बरं. ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लेखी भाषा आणि बोली भाषा
माणसाची लेखी भाषा आणि बोलीभाषा यांत फरक पडतो आहे असे मला बदलती मराठी आणि त्या अनुषंगाने आलेल्या चर्चा पाहून जाणवले. (तसे, म.टा. वाचले की लगेच हा फरक खोटा आहे याची प्रचीतीही येते. ;-))
बोलीभाषा आणि त्यातील शब्द यांवर स्थळ, काळ, समाज, काम इ. सर्वांचा प्रभाव पडतो. जसे, गेल्या चर्चेत राजेंद्रने म्हटले की तेंडुलकर चेंडूफळी, यष्टीरक्षण, यष्टीचीत असे शब्द वापरू लागला तर गांगुली (तो झाला बिचारा चीत), द्रविड आणि इतर भाषक खेळाडू हे शब्द समजू शकणार नाहीत आणि तेंडुलकरचा अधिक वेळ जर मैदानात जात असेल तर इंग्रजी शब्द त्याच्या बोलीभाषेत रुळणे स्वाभावीक आहे आणि जे शब्द रुळतात ते सर्वत्र वापरले जातात. एखाद्याने निकराने प्रयत्न करून ते न वापरण्याचे ठरवले तर ठीक आहे परंतु तेवढा वेळ आणि सहनशीलता (पेशन्स) लोकांकडे असणे थोडे कठिण आहे. एकाच माणसाला एकाच वेळी दोन-तीन वेगळ्या भाषांत बोलायला सांगितले तर तो बोली बदलत राहण्यापेक्षा सर्वांना समजेल अशा एकाच बोलीचा वापर करेल असे वाटते. उत्तम उदाहरण - बंबय्या हिंदी.
माणूस भाषा ही नेहमी दुसर्यांसाठी बोलतो. दुसर्यांना आपले विचार कळावेत, ते दुसर्यांपर्यंत पोहाचावेत या हेतूने. त्यामुळे तो आपल्याला हवेत तसे शब्द निवडू शकत नाही. ते करण्यासाठी त्याला समविचारी आणि समआचारी माणसांची गरज असते. अशी माणसे मिळाली तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने शब्द रुळू शकतात आणि अशी माणसे नाही मिळाली तर सर्वसंमत शब्द तोंडी रुळवावे लागतात. लेखी भाषा ही फक्त त्या समाजाच्या लोकांसाठी असते. त्यामुळे लेखी भाषेत प्रमाणशब्द टिकून राहणे शक्य वाटते.
जेव्हा माणसाने आपला समाज, प्रदेश, माणसे सोडून बाहेर जाण्याचे आणि इतर संस्कृती, देशांशी मिळवून घ्यायचे ठरवले तेव्हा त्याला संकुचित शब्दसंपदा बाळगणे कठिण गेले असावे. नव-नवे शोध, मानवी जीवनातील उत्क्रांती हे आपल्या समाजात न घडता बाहेरुन आयात होणे हे आणखी एक कारण.
क्रमांक १,२
लेखाचा उद्देश स्तुत्य आहे. कौल घेतल्याने चर्चेला थोडाफार सांख्यिक पुरावा मिळेल असे वाटते. (यातील बरेच शब्द मराठी आहेत, त्यांचे मूळ परकीय आहे असे माझे मत आहे, उदा रिक्षा. पण चर्चेखातर मोजणी केली असता माझे प्रमाण ४५% आले.) कारणे अर्थातच १ आणि २. इंग्रजी (किंवा कुठलीही इतर भाषा) बोलल्याने दर्जा उंचावतो यावर माझा विश्वास नाही.
ज्यांना प्रतिशब्द तयार करायचे आहेत त्यांना अर्थातच ते स्वातंत्र्य आहे. फक्त ते सर्वांनी वापरलेच पाहिजेत असे बंधन घालू नये. (उलट प्रतिशब्द आवडला तर लोक न सांगता वापरतील. उदा. विके़डला विकांत हा प्रतिशब्द मला लई आवडला.*) इथे प्रतिशब्द वापरात का येत नाहीत/येणार नाहीत त्यामागचे एक कारण लक्षात घ्यायला हवे. मराठीतील सर्व संकेतस्थळांच्या सदस्यांची संख्या मराठी वापरणार्यांच्या तुलनेत किती आहे? यातील तफावतीमुळे जरी इथे आपण ते शब्द वापरले तरी बाहेरचे कितीतरी जास्त लोक त्यांना आवडतील, रूचतील तेच शब्द वापरणार. आणि शब्द रूढ होण्यात जनमताचा रेटा ही सर्वात महत्वाची बाब आहे. गुगलणे किंवा गुगलून काढणे हे एक उदाहरण. इथे गांधी चित्रपटातील एक वाक्य आठवते. "भारत का मतलब है खेत में काम करनेवाला हर एक किसान. न कि बंबई और दिल्ली के कुछ गिने चुने वकील." (जसे आठवले तसे चूभूद्याघ्या) त्यामुळे संकेतस्थळांवर शब्द रुळणे आणि मराठी समाजात ते रूढ होणे यामध्ये बरेच अंतर आहे.
सावरकरांचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये बराच फरक आहे. आता गोष्टी किमान दसपट वेगाने तरी बदलत असाव्यात. वेगवेगळ्या संस्कृतींचा एकमेकांवर प्रभाव पडणे अपरिहार्य आहे. जिथे इंग्रजी, फ्रेंच यासारख्या भाषांना आपल्या भवितव्याची काळजी लागली आहे तिथे आपली काय कथा? दुसरे म्हणजे हे सर्वकाळी होत आलेले आहे आणि होत रहाणार. इंग्रजी शब्द रूढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या भाषेचा वावर अधिक असल्याने तिचे अनुभवविश्व अधिक समृद्ध आहे. बर्याच भावना, भावनांच्या छटा यांना इंग्रजीत नेमके शब्द आहेत. इंग्रजीत प्रकाशित झालेल्या आणि होणार्या साहित्याचे प्रमाण प्रचंड आहे. अशा वेळी बरेचदा इंग्रजीकडे ओढा वळणे साहजिक आहे. मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे बरेच लोक (त्यात मीही आलो) बरेचदा इंग्रजीतून विचार करतात.
या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. भाषाशुद्धी करणार्यांच्या मूळ हेतूबद्दल अजिबात शंका नाही. फक्त भाषाशुद्धी करणारेच नव्हे, तर याकरता आणि मराठीच्या संवर्धनाकरता पदरचा पैसा, वेळ, परिश्रम घालून मराठी संकेतस्थळे काढणारे, मराठीत तंत्रज्ञानविषयक लेख लिहीणारे आणि शेवटी आमच्यासारखे सर्व विषयांवर कडाडून चर्चा करणारे, या सर्वांच्या मनात आपल्या भाषेविषयी प्रेम म्हणा, अनुराग म्हणा अशीच भावना आहे. आणि या भावनेचा आदरच आहे. फक्त इतकेच सुचवावेसे वाटते की ज्या झपाट्याने समाज बदलतो आहे त्यात असे प्रयत्न/परिश्रम व्यर्थ तर जात नाहीत ना हे पाहिले पाहिजे.
*बरेचदा बोली भाषेतील शब्द भावना अधिक चांगल्या रीतीने व्यक्त करतात. उदा. मला शकिरा लई आवडते यात जी उत्कट भावना आहे ती खूप किंवा फार आवडते मध्ये कधीच येणे नाही. अशा वेळी हा शब्द ग्रामीण या कारणासाठी न वापरणे मला तरी पटत नाही.
----
व्यर्थ परिश्रम
केवळ इतकेच नाही. समाजाची पुढील पिढी मराठीतून शिक्षण घेण्यास अनुत्सुक आहे. मराठी शाळांत मुलांना पाठवा असा धोशा लावून काम भागणार नाही कारण मराठी शाळा या इंग्रजी शाळांप्रमाणे सुविधा, शिक्षण, सोयी देण्यांत कोठेतरी मागे पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. समाज चंगळवादाकडे वळतो आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. (यांत मला चांगले-वाईट असे म्हणायचे नाही) जरी परिस्थिती बदलली तरी ती लगेच बदलणार नाही. लोकांची मानसिकता बदलायला ५० वर्षांचा काळ लागतो असे अंदाजाने पकडू. यासाठी अथक परिश्रम करावे लागतील. स्वेच्छेने परिश्रम करण्यासाठी तळागाळांतून लोक यावे लागतील आणि हे सर्व होईपर्यंत जी वाढणारी/ वाढलेली पिढी आहे तिला प्रवाहात सामील कसे करता येईल हा एक गहन प्रश्न आहे. त्या पिढीला आपलेसे वाटतील, आकलन होईल, वापरता येतील असे शब्द जर भाषेत नसतील तर ही पिढी भाषेकडे वळणार नाही आणि वळत नाही हे सत्य आहे.
केवळ चारजणांचा अभिमान, भाषेविषयी कृतज्ञता आणि प्रेम हे भाषेतील बदल थांबवण्यास पुरेसे नाही.
जर, नव्या पिढीला सामील करून घ्यायचे असेल तर त्यांना चुचकारत पुढे जाणे इष्ट वाटते.
"फजिती"
इंग्रजी शब्द रूढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या भाषेचा वावर अधिक असल्याने तिचे अनुभवविश्व अधिक समृद्ध आहे. बर्याच भावना, भावनांच्या छटा यांना इंग्रजीत नेमके शब्द आहेत.
या संदर्भातली एक जुनी आठवणः बर्याच वर्षांपूर्वी एकाने "फजिती" याला अचूक इंग्रजी प्रतिशब्द विचारला होता - तो मला अजूनपर्यंत सापडलेला नाही (कदाचित् माझे भाषाज्ञान कमी पडत/पडले असेल).
यावरून माझी तरी अशी समजूत झाली आहे की एका भाषेतल्या एखाद्या शब्दाला दुसर्या भाषेत (ती कितीही समृद्ध असली तरी) प्रतिशब्द मिळेलच असे नाही.
विषयाला धरून बोलायचे तर आपले इंग्रजी ज्ञान आता वाढल्यामुळे आपण आता तशा पद्धतीने विचार करू लागलो आहोत व त्यामुळे इंटरेस्टिंग् , ऍप्रिशिएट् , इ. शब्दांना प्रतिशब्द शोधण्यापेक्षा थेट तेच शब्द वापरू लागलो आहोत असे वाटते. तसेही मराठीत अशा कित्येक शब्दांना चांगले प्रतिशब्द मिळणे व ते वापरात येणे कठीणच दिसते.
हे झाले अतांत्रिक शब्दांचे, मग तांत्रिक तर बघायलाच नको.
- दिगम्भा
पुल
या संदर्भात पुलंनी बर्याच आधी लिहीलेले आहे. "खरकटे", "श्राद्ध", "मंत्रपुष्पांजली" किंवा "गंपूच्या वेळेपासून किनई कस्ससच होतय" असे शब्द/वाक्ये अनुवादाच्या पलिकडे आहेत. आणखी एक उदा म्हणजे (हे आधीही दिलेले आहे, पुनरावृत्ती वाटल्यास माफी) इटालियनमध्ये पाने उलटताना जो आवाज होतो त्याला फ्रुशिओ म्हणतात.यालाही प्रतिशब्द शोधणे अशक्य वाटते.
यावरून माझी तरी अशी समजूत झाली आहे की एका भाषेतल्या एखाद्या शब्दाला दुसर्या भाषेत (ती कितीही समृद्ध असली तरी) प्रतिशब्द मिळेलच असे नाही.
बर्याच प्रमाणात सहमत. याला कारण प्रत्येक भाषेच्या निर्मितीमध्ये त्या त्या देशाच्या/भागाच्या संस्कृतीच्या खुणा दडलेल्या असतात. किंबहुना यामुळेच प्रत्येक भाषेचा बाज/लहजा वेगळा असतो. याउलट ज्या गोष्टी निरनिराळ्या संस्कृतीच्या सीमा ओलांडून सर्वांना सामाईक असतात त्यांच्यासाठी सर्व भाषेत शब्द असतात. उदा. राग, लोभ, विनोद, करूणा इ.
----
फजिती
फजिती किंवा तत्सम शब्दाना अचुक इंग्रजी शब्द सापडणे कठीण आहे कारण बर्याच शद्बांना एकच अर्थ नसुन अनेक अर्थछटा असतात. (ह्याचे एक टारगट उदाहरण संत ओशो ह्यांनी इंग्रजीतील फकारान्त शब्द घेउन दाखवले होते :)) दुसर्या भाषेमध्ये असणारा प्रतिशब्द समानार्थी असला तरी त्या शब्दाच्या सगळ्याच अर्थछटांना न्याय देइल असे नाही. फजितीला माझ्या मते इंग्रजीतील 'फियास्को' हा बर्यापैकी जवळचा शब्द वाटतो. अर्थातच तो सर्व अर्थछटांना न्याय देईलच असे नाही.
फजिती करणे व फजिती होणे
फजिती करणे व फजिती होणे हे दोन्ही भाग फजितीमध्ये असतात हे लक्षात असूदे
आणि वरील इंग्रजी शब्दांना मराठीत फजिती व्यतिरिक्त अन्य व अधिक अचूक पर्याय असू शकतील हे ही.
एकूण काय, कितीही समृद्ध भाषा असली व त्यात मानवी भावभावना अधिक बारकाईने व्यक्त करणे शक्य असले तरी तिचीही एखादवेळी फजिती (फियास्को नव्हे) होऊ शकते, एवढेच म्हणायचे होते.
उत्तम पर्याय म्हणजे "फजिती" हाच शब्द इंग्रजीत (नेहमीच्या रीतीने) वापरायला सुरुवात करून तिला आणखी थोडे समृद्ध करावे, कसं?
- दिगम्भा
चांगला उपक्रम
एखाद्या गोष्टीचे पोत आपण चाचपून पहातो . चित्रा बाईंनी दिलेली यादी आणि त्या यादीशी आपल्या वापराची केलेली तपासणी हा उपक्रम म्हणजे आपल्या वापरात असलेल्या भाषेचे पोत तपासून पहाण्याचाच एक प्रकार आहे. चित्राबाईंनी दिलेल्या शब्दांपैकी काही अपवाद वगळता सर्वच इंग्रजी शब्द मी वापरतो असे मला दिसले. त्या इंग्रजी शब्दांएइवजी केवळ ५-१०% मराठी शब्द मी वापरतो (उदा. सोप च्या ऐवजी साबण) एरवी अधिराज्य आहे इंग्रजीचे.
वर उल्लेखिलेली उदाहरणे तर सरळसरळ दैनंदिन वापरातली आहेत. परंतु जेव्हा मी संकल्पनांना , विचारांना , भाववभावनांना मराठी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आताशा मला असे जाणवते की, मला इंग्रजी शब्द सुचतात पण पटकन मराठी शब्द नाही सुचत. आणि ही गत आहे माझ्यासारख्या मराठी भाषेत १०वी पर्यंतचे गणित-विज्ञानादि विषयही शिकलेल्याची. या दृष्टीने "आपण कितपत शुद्ध मराठीत बोलतो - किंवा त्यापलिकडेही जाऊन मी किती शुद्ध मराठीत विचार करतो ?" हा मनातला खेळ (मेंटल् एक्सर्साईझ चे मराठी भाषांतर !) मला रोचक वाटला. ( इंटरेस्टींग हा शब्द आधी "सुचला" . रोचक हे आपले विचारपूर्वक केलेले भाषांतर.) एक छोटेसे उदाहरण द्यायचे तर मी अलिकडे मिसळपाव वर आपण आणि आपले "ठराविक साचे" हा लेख लिहिला. लिहीताना माझ्या मनात "स्टीरिओटाईप्स्" हा शब्द होता. त्याचा नेमका मराठी शब्द मला खूप विचाराअंती सुचला !
तर सांगण्याचा मुद्दा असा की, दैनंदिन वापरात इंग्रजीचा मोठा प्रभाव तर पडतोच, पण विचार करण्याच्या पद्धतीमधेही पडत जातो. याचे (माझ्यापुरते बोलायचे तर ) एक महत्त्वाचे कारण हेच , की वाचनात येणारी पुस्तके-वर्तमानपत्रे-इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरचे वाचन-श्रवण-दर्शन , दैनंदिन संपर्कात येणार्या व्यक्ती या सार्यांचा प्रभाव तुमच्यावर पडतो - तुमच्या विचार करण्याच्या भाषेवरही. आता परदेशात रहाण्याचा मुद्दा जर बाजूला ठेवला तर त्यातून केवळ "दैनंदिन संपर्कात येणार्या व्यक्ती " हा घटक केवळ वजा होतो. कदाचित भारतात असतो तर सीएनेन् - इ एस् पी एन् - एन् पी आर् वगैरे कमी आणि सह्याद्री वाहिनी/आकाशवाणी मुंबई ब/पुणे केंद्र थोडे जास्त ऐकले/पाहिले असते ; पण म्हणून विचार करण्याच्या भाषेतल्या संक्रमणाची प्रक्रिया बदलली नसती असे वाटते.
काही मराठी इंग्रजी शब्द
चित्रा बाईंनी दिलेल्या यादीला पुरवणी म्हणून अजून एक यादी जोडावीशी वाटली - मराठी इंग्रजी शब्दांची.म्हणजे असे इंग्रजी शब्द जे आपले भारतीय/मराठी लोक त्यांच्या मूळ अर्थापेक्षा प्रसंगी वेगळ्या अर्थाने वापरतात किंवा त्यांच्या अशुद्ध स्वरूपात वापरतात.
१. घासलेट/रॉकेल : हा कुठला मूळचा मराठी का इंग्रजी शब्द आहे का नाही ते मला माहीत नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे , रॉकेल = रॉक ऑइल आणि घासलेट = घास तेल. (केवळ अंदाज ! कसलाही आधार नाही.) पण हे दोन्ही शब्द आहेत केरोसीन करता.
२. पाना : स्पॅनरचा अपभ्रंश
३. गॅलन : आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर मीटर-किलो-सेकंद पद्धत येऊनही हा शब्द केरोसीन नेण्याच्या प्लास्टीकच्या डब्याला अगदी नेहमी वापरला जात होता.
४. ग्लोब : लाईट बल्बकरता वापरला जाणारा शब्द. "ग्लोफ्" हा असाच त्याच्यासारखा शब्द.
५. बोलट : बोल्ट्
६. झेरॉक्स् : फोटोप्रत
७. जंक्शन/जंक्शान : झकास !
८. टेशन : स्टेशन
९. बीडो साएब : ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर (बीडीओ)
१०. हाटेल/रेस्टॉरंट : रेस्तरॉं
असेच अनेक इतर निघतील. सांगायचा मुद्दा असा की, परभाषेतले शब्द वापरताना आपण त्या शब्दाना आपल्या भाषेची अंगडीटोपडी घालतो.
घासलेट = गॅस लाइट्
गॅसबत्तीसाठी घासलेट् वापरत असत.
- दिगम्भा
चांगली कल्पना आहे कौल घेणे
प्रसाधनासंबंधी : ६०% इंग्रजी (बादली, बाटली, साबण हे पोर्तुगीज शब्द...)
फॅशनबद्दल : ३३% इंग्रजी
घराबद्दल : ५०% इंग्रजी
संपर्कसाधनाबद्दल : १००% इंग्रजी
व्यायामासंबंधी : २५% इंग्रजी
कामासंबंधी : ८०% इंग्रजी
कोणासंबंधी बोलताना : २५% इंग्रजी
नातेवाइकांसंबंधी: ०% इंग्रजी
जेवणासंबंधी : २०% इंग्रजी
वर्णनात्मक : १०% इंग्रजी
(ब्यूटी पार्लर मधले बहुतेक शब्द मी जवळजवळ वापरतच नाही...)
शिवाय (४.) ते शब्द मराठी आहेत असे मला मनापासून वाटते.
पैकी माझ्या बाबतीत (१) आणि (४) हीच परिस्थिती बहुतेक शब्दांच्या बाबतीत आहे.
ज्या शब्दांच्या बाबतीत माझे मत (४) आहे, त्यांच्या बाबतीत मला वरील विवेचन अमान्य आहे. शिवाय "अंगवळणी पाडणे" सोपे आहे असे मला वाटत नाही - कधीकधी सोपे असते, कधीकधी नसते. मनाची तयारी करावी की नाही, याबद्दल मी साशंक आहे. तेवढा वेळ मी का घालवावा, याकरिता सबळ उर्मी लागेल. (प्रयत्न केल्यास बहुधा मी पॉप संगीतातली खूप गाणी पाठ करू शकेन - पण सध्या तरी ते मनावर घेईन असे वाटत नाही.) वरील यादीतील अनेक शब्द बदलायला पाहिजेत, हे मला पटलेले नाही. त्यांच्यापैकी अनेक शब्द मी मराठीच मानतो.
कारण (३) मानणारी व्यक्ती उपक्रम संकेतस्थळावर बहुधा सापडणार नाही :-)
नाही!!! इंग्रजीत मी शिकून सावरून अन्य भाषांतून आलेले शब्द वापरतो. ही इंग्रजीविषयी अनास्था मानू नये - उलट अतिशय आस्थाच मानावी. मराठीत "पाना" आणि "ट्रान्स्मिशन" शब्द रुळले असतील तर त्याच आस्थेने मी तेसुद्धा आत्मसात करतो आहे.
४०%
मी कटाक्षाने मराठीत बोलण्याचा आणि लिहीण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही कैक इंग्लीश शब्द आणि इतर भाषिक शब्दही आपल्या भाषेत इतके बेमालूम पणे मिसळले गेलेत की वरवर विचार केल्यास मी साधारणपणे ४०% शुद्ध मराठी बोलत असेन असे वाटते. लिहीतांना मात्र वेळेचे बंधन नसल्यामुळे साधारणपणे ६० ते ८०% मराठी लिहीतो असे ढोबळमानाने म्हणता येईल. इंग्लीश शब्द सहसा न वापरण्याची काळजी मी घेत असतो पण बोलताना मात्र तसे नक्कीच होत नाही. त्याचे वर काही जणांनी म्हटलेले कारण म्हणजे ज्याच्याशी संवाद साधत असतो त्याची भाषा,त्याचे शाब्दिक ज्ञान वगैरेचा अंदाज घेऊन बोलावे लागते. अर्थात हे सबळ कारण नाही पण संवादात अडथळा निर्माण होऊ नये ह्यासाठी असे करावे लागते.
एक उदाहरण देतो.....
कुठ बाहेर जायचे असल्यास रेल्वेने,बसने,रिक्षा टॅक्सीने जावे लागते(आले ना इंग्लीश शब्द). तसेच रेल्वेत तिकीट(हा ही इंग्लीशच) काढताना जर असे म्हटले की, "दादरहून परत".....तर तो तिकीट देणारा आपल्या तोंडाकडे पाहत राहतो. मग नाईलाजाने "दादरसे वापस किंवा दादर रिटर्न" असे म्हटल्यास चटकन काम होते.
मला असे वाटते की वाढते शहरीकरण,जागतिकीकरण, मराठी माध्यमांऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण,अनेक भाषिकांशी सततचा संपर्क वगैरे अशा अनेकविध कारणांमुळे आपली मराठी संमिश्र बनत चाललेय हे ढळढळीत सत्य आहे. ते नाकारता येणार नाही. म्हणूनच निदान आहे ती मराठी टिकवायची असेल तर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
धन्यवाद
सर्वप्रथम प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद, उत्तरे द्यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
थोडक्यात मला वाटते ते लिहीते -
हा लेख लिहीण्याचा हेतू थोड्या प्रमाणावर साध्य झाला आहे असे वाटते. हेतू राजेंद्र म्हणतात त्यामुळे (उपक्रमावर शक्य आहे तेवढा) सांख्यिकी विदा गोळा करण्याचा होता. तसेच दुसरा हेतू असा होता की आपण ज्या प्रकारे बोलतो त्याच प्रकारे का बोलतो त्याचा मनातल्या मनात तरी स्पष्ट विचार करावा. सावरकर आणि भाषा"शुद्धी" अशासारख्या विषयांमध्ये आपले विचार हे स्वतःपुरते न राहता आपल्या इतर भावभावनांचे विचारांवर परिणाम होतात. त्यामुळे केवळ स्वत:पुरता मराठी बोलण्यासंबंधी विचार करणे हाही हेतू होता. तोही थोड्या प्रमाणात साध्य झाला असे वाटते.
या स्वतःपुरत्या विचार करण्यातूनच अभिजित म्हणतात तेही पर्याय - दुसर्याला कळावे म्हणून इंग्रजी शब्द बोलणे आणि धनंजय म्हणतात तो पर्याय - मला हे शब्द मराठीच वाटतात - असे दोन पर्यायही - समोर आले. तत्वतः हेही पर्याय म्हणून मला ठीक वाटत असले तरी एक मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटते - मुद्दा खरे तर एवढाच आहे की सध्या वापरीत असलेल्या इंग्रजी शब्दांना पर्यायी असा मराठी शब्दांचा एक संच उपलब्ध असल्यास तो आपण वापरण्याचा प्रयत्न करू किंवा नाही? तर या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असे येईल असे उपक्रमींच्या प्रतिसादांवरून वाटते.
धनंजय म्हणतात की कारण (३) मानणारी व्यक्ती उपक्रम संकेतस्थळावर बहुधा सापडणार नाही.
कदाचित नसेल, कदाचित असेलही. पण मुख्य मुद्दा आहे तो पुढेच आहे - "इंग्रजीत मी शिकून सावरून अन्य भाषांतून आलेले शब्द वापरतो. ही इंग्रजीविषयी अनास्था मानू नये - उलट अतिशय आस्थाच मानावी."
हे धनंजय या एका विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत खरेच असेल, पण इतर अनेकांच्या बाबतीत हे आस्थेमुळे किंवा समजून उमजून घडते असे नाही असे माझे मत आहे. उलट अनेकदा लोक शब्दांचे वापर न समजता/ कमी तीव्र शब्दांचे पांघरूण घेऊन करीत असतात - धनंजय यांच्याच मागच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे नितंब आणि ढुंगण या दोन शब्दांमध्ये जसे सोवळेपणे लोक अनेकदा "नितंब" या शब्दाचा स्वीकार करतात, कारण जरी शरीराच्या एकाच भागासंबंधी बोलत असलो तरी नितंब हा शब्द त्यामानाने कमी "अंगावर येतो". तसेच गेल्या पिढीतील अनेक सुशिक्षित माणसे आता संडास/परसाकडे असे न म्हणता टॉयलेट असे म्हणतात, तर काही अजून त्याहीपुढे जाऊन "व्हिजिट" देऊन येतो असे म्हणतात. मराठीशी अधिक जवळून संबंध आल्याने तिच्यातील शब्दांची तीव्रता अधिक जाणवते. आणि अशाच लाजेमुळे अनेक इंग्रजी शब्द आपण स्विकारले आहेत असे मला वाटते. तरीदेखील ते सर्वच्या सर्व काढून टाकावे असे मला वाटते मी म्हटलेले नाही. म्हणायचे असले तर ते एवढेच आहे की थोडी इच्छा असल्यास मराठी शब्दांचे संच लिहीता बोलताना तयार होत असतात. ते लेखी/बोली भाषेत वापरल्यास भाषा वाढेल आणि इंग्रजी शब्दही स्विकारून अधिक सक्षम होईल. बाकी मतांतरे आहेत, आणि राहतीलही.
आता थोडी गंमत -
मुक्तसुनीत म्हणतात - परभाषेतले शब्द वापरताना आपण त्या शब्दाना आपल्या भाषेची अंगडीटोपडी घालतो. ते अंगड्याटोपड्यांचे माहिती नाही, पण मटामुळे साडीचे "महाराणी स्टाइल ड्रेपिंग" मात्र कळले..
"हिने ज्या पद्धतीने साडी नेसलीय त्याला महाराणी स्टाइल ड्रेपिंग असं संबोधलं जातं. अदितीसारख्या तरुण मुलींना महाराणी ड्रेपिंग गेसफूल दिसतंच. बाळंतपणामुळे किंवा वयोमानामुळे ज्या स्त्रियांना फिगर कॉन्शसनेस आलाय त्यांच्यासाठी हा लूक खूप कम्फटेर्बल आणि ग्रेसफूल आहे. पिंक अधिक फ्युशा टोन आणि महाराणी ड्रेपिंग इज बेस्ट कॉम्बिनेशन फॉर टिपीकल इंडियन वूमन. मग ती जाडी असो, बारीक असो, काळी असो किंवा गोरी; मोस्ट कम्फटेर्बल लूक ऑफ एव्हरी वूमन. "
वयोमान आणि बाळंतपण यांमुळे जरा फिगर कॉन्शसनेस आल्याने नेक्स्ट इंडिया ट्रिपमध्ये पिंक अधिक फ्युशा टोनची साडी घेण्याशिवाय आता मला ऑप्शन नाही असे लक्षात आले आहे.
अहो काय हे
त्यामुळे ह्या मराठवाड्यातील कोष्टी बांधवांन तुम्ही फुश्या ऐवजी पैठणी घेऊन फायदा होणार असेल, तर त्यांची अर्थिक स्थिती उंचावून ते लोक जी कोणती बोली भाषा बोलतात, त्याला जागतिक मन्यता मिळेल.
अहो सर्किट ब्रदर-इन-लॉ, फुश्या म्हणजे कलर असतो, साडीचा टाइप नाही काही. तुम्ही म्हणजे अगदीच ओल्ड फ्याशन्ड आहात हां. एवढे कसे जनरल नॉलेज नाही तुम्हाला?
पण काय हो, पैठणी फुश्या कलरमध्ये मिळत असेल का?
हाक
हल्ली बोलावताना / हाक मारताना सुद्धा आंग्ल शब्द जाणवतात. सर्वात जवळचे म्हणजे आईला ममा म्हणणे. अर्थात ममा = मराठी माणूस अश्या अर्थाने हाक मारत असतील तर आनंदच आहे :) :)
केवळ शब्दयोजना नव्हे, वाक्यरचना देखील आता इंग्रजीनुसार होताहेत
मराठी वाचवायची कशी? हा विचार करून मी(तरी) रोजच्या व्यवहारात बोलत नाही.
मी स्वतः माझ्या रोजच्या बोलचालीत भवतालची स्थिती व ज्यांच्याशी बोलायचे आहे ती व्यक्ती कोण आहे हे ध्यानात घेवूनच (हे तर सगळेच करतात..!) त्यानुसारच शब्दांचा वापर करतो.
पण...मी स्वतःला व स्वःहिताला वाचवण्यासाठी,
- 'मी स्वतः इतरांपासून दुखवला जायचो नाही',
तसेच माझ्या वाक्यरचनेतून समोरील कोणीही कारण नसताना, व माझी इच्छा नसताना 'दुखावले जायचे नाही'
हे भान बाळगण्याचा प्रयत्न करीत असतो. (त्यात कधी यशस्वी होतो, तर कधी अल्पयशी होतो.) अन् हे करताना मला इंग्रजी व्याकरणाचा (जे मला माझ्या वडिलांनी पट्या मारून मारून शिकवले) त्याचा चांगलाच उपयोग होतो. (मराठीचे लिखीत व्याकरण ह्याबाबतीत अगदीच कुचकामी आहे.)
व्यवहारात बोलताना मी केवळ इंग्रजी शब्दच बोलत नाही, तर मी इंग्रजी व्याकरणातील एक्टीव व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस ह्यांचा सजग-वापर देखील मराठीतून असो वा इतर भाशेतून बोलताना करीत असतो. कारण बर्याच बाबतीत वाक्यरचनेत चलाखीने पॅसिव्ह व्हॉईस वापरले तर समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोश्टीची, प्रसंगाची न बोचणारी बाब सांगून आपला कार्यभाग साधता येतो किंवा जेंव्हा गरज असते तेंव्हा बोचणारी बाबच कडवटपणा न येता ठळकपणे पण आडवळणाने मांडता येते.
कोणती मराठी?
मराठी व्यवहारात इंग्रजीची घुसखोरी वाढते आहे अन् ते चांगले नाही असा काहीसा सूर दिसतो आहे.
काहींनी क्लिष्ट प्रतिशब्द ही दिलेत.
पण,
आरागॉर्न यांनी म्हटल्या प्रमाणे,
>> (याला कारण) प्रत्येक भाषेच्या निर्मितीमध्ये त्या त्या देशाच्या/भागाच्या संस्कृतीच्या खुणा दडलेल्या असतात. किंबहुना यामुळेच प्रत्येक भाषेचा बाज/लहजा वेगळा असतो. >>
हे सत्य आहे. भाषा ही एकप्रकारे त्या त्या समाजाच्या / भाषासमूहाच्या व्यवहाराचे, दैनंदिन आयुष्याचे, भोवतालच्या भौगोलिक व इतर पर्यावरणाचे प्रतिबिंबच असते.
मग वरील यादीतल्या या सगळ्या शब्दांसकट आजची मराठी तयार होत असेल का? आजच्या संस्कृतीमध्ये, रोजच्या व्यवहारात, सामाजिक देवाणघेवाणीत बसतील असेच शब्द वापरात असणार आहेत ना? सगळ्यांनीच प्रमाण भाषेत बोलले पाहिजे का? किंवा सोप्या शब्दांना अट्टाहासाने किचकट् प्रतिशब्द कशाला हवा? बरेच संस्कृत, फारसी, इंग्रजी इ. इ. शब्द आजही प्रमाण मराठीत प्रचलित आहेतच की? मग शॉवर हा शब्दच मराठी कशावरून नाही?