क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती.

आज ११ एप्रिल क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची १८० वी जयंती. त्यांना विनम्र अभिवादन.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रणाम

महात्मा फुले यांची निर्मिकाची कल्पना मला पूर्ण पटली आहे.

त्यांच्या स्मृतीस शतशः प्रणाम

आपला
आभिजित

अभिवादन

भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रबोधनाचे आद्य आणि खंदे प्रवर्तक म्हणजे म. ज्योतीबा फुले.
त्यांच्या काळात त्यांनी व्यक्तीशः आणि संस्थेच्या (संघटनेच्या) माध्यमातून उभे केलेले कार्य पुढील समस्त समाजसुधारकांना मार्गदर्शक राहिले.
त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेल्या सुरूवातीची व्याप्ती पाहिल्यावर बौध्दीक विद्रोह म्हणजे काय आणि बुध्दीप्रामाण्याचा आविष्कार म्हणजे काय ते लक्षात येतं.
तत्व आणि विचारांची स्पष्ट मांडणी , त्यासाठी प्रसंगी समस्त समाजाशी विरोध पत्करण्याची तयारी. आपल्याला ज्योतीबा फुले फक्त मुलींची पहिली शाळा सुरू करणारे म्हणून माहिती असतात. मात्र ज्योतीबांचे इतर क्षेत्रांतील कार्यही तेवढेच महत्वाचे आहे.

विधवा प्रश्न, त्यांचे केशवपन, त्यांची अनौरस संतती, अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, शिक्षणप्रसार, पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना करून सर्वत्र सत्य व बुध्दीवादाचा प्रचार केला. एवढं सारं करून चरितार्थासाठी ते बांधकाम व्यवसाय करित असत. त्याकाळात धरणाचं पाणी शेतीला द्यायला शेतकर्‍यांचा विरोध असे, ते त्या पाण्याला अंधश्रध्देने मेलेलं पाणी असं संबोधायचे त्याच काळात ज्योतीबांनी धरणाच्या पाण्याचा वापर करून भरपुर उत्पन्न घेऊन लोकांना सत्य पटवून दिले.
भारतातील पहिली कामगार संघटना श्री नारायण मेधाची लोखंडे यांनी मुंबईत काढली , ते ज्योतीबांचे शिष्य होते, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधु पुढे याच ना. मे. लोखंडे यांनी मुंबईहून प्रकाशित केले.

आजच्या काळात ही कामे कदाचीत खुप वाटनार नाहितही. पण ज्योतीबांच्या काळात , जेव्हा महाराष्ट्र अधारात होता. कर्मकांडांचे आणि अस्पृश्यतेचे स्तोम माजलेल्या त्या काळात ही कामे म्हणजे समाजद्रोहच होता. अगदी ज्योतीबांवर मारेकरी सुध्दा घालण्यात आले होते.
अश्या या समाजनिर्मात्याला आजच्या दिवसाला विनम्र अभिवादन.

महाराष्ट्राच्या सामाजीक व्यवस्थेला महत्वाचे वळण देणार्‍या दोन व्यक्तींचे (फुले आणि आंबेडकर)जन्मदिवस असे जवळ जवळ यावे याचा आनंद आहे.

नीलकांत

 
^ वर