छायाचित्र टीका: मासेमारी

नमस्कार,

परत एकदा कवडी या ठिकाणचे एक छायाचित्र. कवडीला अनेक वेळा मासेमारी करायला लोक येतात. अश्याच एका प्रसन्न सकाळी काढलेले हे चित्र. हे चित्र जसेच्या तसे काढले आहे. चित्रात कोणताही (छोटादेखील) बदल केला गेला नाहीये.

तांत्रिक माहिती:
Camera: Nikon D40
Exposure: 0.004 sec (1/250)
Aperture: f/3.5
Focal Length: 18 mm
Metering Mode: Pattern
White Balance: AUTO
ISO Speed: 200

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

फारच सुंदर चित्र. निळ्या रंगाच्या छटा मस्त दिसताहेत. त्यासोबत होडी आणि मासेमार्‍यांची रंगसंगती सुद्धा खुलुन दिसते आहे.

असेच

म्हणतो. सुंदर चित्र. यातला मूड फारच भावला.

----

असेच

निळ्या रंगाच्या छटा अतिशय सुरेख पकडल्या आहेत.

सुंदर

काय भारी फोटो काढलाय !

प्रचंड आवडला

प्रचंड प्रचंड प्रचंड आवडला...
अतिशय भारी फोटो.. अजून येऊ दे

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

क्या बात है!

काय भन्नाट फोटो काढतो हा माणूस! ;-) फ्लिकरवरचे त्यांचे प्रोफाईल गरजूंनी बघावे, म्हणजे मी काय म्हणतो ते समजेल.
हे चित्रही झकासच आले आहे. खूप आवडले. जियो.
पण एकंदर तुम्ही जरा लुच्चे आहात असे दिसते. ;-) या फोटोच्याच पुढचा जाळं फेकतानाचा फोटो तुमच्याकडे असलाच पाहिजे. तो मात्र तुम्ही दडवून ठेवला आहे. तो देखील सदस्यांना पहायला मिळावा अशी माझी विनंती आहे.

(नवशिका)सौरभ.

==============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

मस्त..

धृवा, मस्तच चित्र आहे रे!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सहमत

ध्रुवा, मस्तच चित्र आहे रे!

आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर् फोटो.

फोटो आवडला आणि त्याबरोबरची तांत्रिक माहीतीही.

अप्रतिम

ध्रुव तुम्ही आणि इथल्या काही मंडळींनी प्रदर्शन भरवण्याचा विचार कधी केला आहे काय? अप्रतिम कारिगिरी आहे.

- राजीव.

परफेक्ट

पिक्चर की पिक्चर परफेक्ट?! तसंच कायसं!!
रंगचित्रातून नि:शब्द शांतताही 'ऐकू' येतेय ... :)

अप्रतिम छायाचित्र

पाण्यावरच्या तरंगांनी छान पोत तयार झाला आहे.
जयेश

मस्त फोटो

मस्त फोटो ध्रुव! फोटो इतका छान दिसतो आहे की आणखी काही क्षणांनी ते जाळे टाकता किती छान येईल याची कल्पना करतोय :)

सर्वांना धन्यवाद

सर्वांना धन्यवाद. चित्र मला ही आवडले आहे, पण तरीही काहीतरी कमी आहे असे वाटतेय.
स्सौरभदा, कोलबेर,
दुर्दैवाने या माणसाने जाळे टाकेल् तो फोटो मी घेऊ शकलो नाही. इथेच दुसर्‍या एका माणसाने जाळे टाकताना मला एक छायाचित्र मिळाले, ते हे:

-
ध्रुव

गोडी अपूर्णतेची....

जाळे टाकतानाचा फोटो कदाचित मला आवडला नसता. तो एक ठोकळेबाज फोटो वाटला असता.

या फोटोत कोळयाची एकाग्रता स्पष्ट जाणवते आहे. तो काही क्षणात जाळे टाकणार आहे हे समजते. 'जाळे टाकणे' या प्रत्यक्ष क्रियेपेक्षा या क्षणातली पोटेन्शियल्स (मराठी - या क्षणाच्या गर्भात दडलेल्या शक्यता) खूप आहेत. उत्सुकता आहे. कोळाच्या मनात या क्षणी काय चालले आहे? कदाचित काहीच नसेल. पण हा क्षण काव्यमय आहे.
"स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा ..." असा काहीसा!

सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे - शांतता!
दोन्ही वल्ही पाण्याच्या वर आहेत. पाण्याचा 'चुबुळुक' आवाज एका क्षणासाठी थांबला आहे. केवळ क्यामेर्‍याच्या शटरचा आवाजही किती कठोर वाटला असेल.

ही दाद तुमच्या प्रतिसादाला

एखादी गोष्ट आवडते म्हणजे असे नेमके काय त्यात असते. असा कुणी जर प्रश्न विचारला तर उत्तर देणे बर्‍याचदा अवघड असते. विसुनाना तुम्ही या प्रश्नाचे छान उत्तर दिले आहे. चित्रावर इतकी सुंदर काव्यात्मक टीका करुन आपण या चित्राच्या सौंदर्यामध्ये अधिक रंग भरले आहेत.
जयेश

असेच

म्हणतो.

-सौरभ.

==========

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

+१

चित्रावर इतकी सुंदर काव्यात्मक टीका करुन आपण या चित्राच्या सौंदर्यामध्ये अधिक रंग भरले आहेत. +१

-
ध्रुव

असेच

सुरेखच छायाचित्रे. रंग तर खूपच छान दिसत आहेत.

फारच सुंदर

रंगसंगती आणि मांडणी सुरेख.

विसुनानांनी सांगितल्याप्रमाणे अमूर्त शक्यता ही मनात येणारी चित्रकथा. विसुनानांच्या शब्दचित्राला मनःपूर्वक दाद. खरे म्हणजे माझ्या मनात येते कार्याआधीचे मनन. टाकलेल्या जाणार्‍या जाळ्याच्या फोटोतही "अजून न पकडलेले मासे" ही अमूर्त शक्यता छायाचित्रकाराच्या कौशल्याने पकडता येते.

बास्केटबॉल टाकण्यापूर्वी हातात धरून एकाग्रचित्ताने वर बघणारा खेळाडू, आणि बास्केटबॉल टाकतानाचा ऍक्शन-शॉट दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रभावी असतात.

सुंदर !!

निळ्याशार पाण्याची रंगसंगती व बदलत्या छटा यांनी हे छायाचित्र सजले आहे.
अशीच सुंदर छायाचित्रे येऊदेत.

धागा उडवावा.

संपादकांनी हा धागा उडवावा असे म्हणतो.
ज्या फोटोवरून हा सुरू झाला तोच दिसत नाही. सबब, निरर्थक.

 
^ वर