उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका
गणा मास्तर
November 6, 2008 - 7:21 am
शरद सरांची शिकवणी मिळुनही अभ्यास न करता काढलेले एक छायाचित्र डकवत आहे. कसे वाटले ते सांगावे?
अवांतर :'Good Morning Myouden' हे मी पेन्ट वापरुन टाकले आहे. 'म्योदेन' हे त्या रेल्वेस्टेशनचे नाव आहे.
दुवे:
Comments
सुंदर
तुमची ब्लॅक अँड व्हाईट चित्रे सुंदर असतात....
पण ह्या चित्रात तुम्ही उजवी कडचा ट्रॅकही पूर्ण अलिकडे येईपर्यंत फ्रेममध्ये घेतला असतात तर् चित्र (मला)अजून चांगले वाटले असते.
थोडक्यात लॅंडस्केप फोटो काढताना पोर्ट्रेट् फ्रेम वापरल्याचा आभास होत आहे. किंवा उभं काँप्रेस केल्यासारखा.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
धन्यवाद
अभिजीत धन्यवाद.
फोटो काढल्यापासुन चांगला आला आहे , पण् काहितरी कमी आहे असे वाटत होते.
तुमच्या प्रतिक्रियेमुळे काय कमी आहे ते समजले.
माझ्या मते..
माझ्या मते..
चित्र छान आहे पण..
चित्रातला जो बिंदू जेथे सर्व समांतर रेषा एकत्र येऊन खोलीचा अंदाज येतो, तो बिंदू डाविकडे भिंतीच्या अगदी जवळ आला आहे आणि त्यामुळे निटसा मनावर ठसत नाहिये. तोच बिंदू हा चित्रातला महत्वाचा प्रेक्षणिय बिंदु आहे. तो बिंदु थोडा स्पष्टपणे उजवीकडे असता तर रुळ लांब जात आहेत ते मनावर ठसले असते.
हा फोटो उभा आहे हेच बरोबर आहे असे मला वाटते. त्यामुळे लांब जाणारे रुळ मनावर ठसत आहेत.
रेल्वेस्थानकाचे छत फोटोला समांतर नाही असे वाटते.त्यामुळे फोटो डाविकडे कलला आहे असे मला वाटले.
--लिखाळ.
धन्यवाद
मौल्यवान सल्ला लिखाळसाहेब
छान चित्र
सकाळच्या वेळेला रेल्वे स्टेशनवरचे चित्र मस्त आले आहे. कृष्णधवल माध्यमाचा छान वापर केला आहे.
किंचीत सुधारणा:
१)हे चित्र अजुन एक दोन पाउले पुढे जाउन डावीकडचा भाग अधिक आणि उजवीकडचा थोडा कमी अश्या पद्धतीने काढले असते तर डावीकडचे खांब आणखी फ्रेम मध्ये आले असते आणि चित्रात फलाटावर उभा असणार्या माणसाला आणखी प्राधान्य मिळाले असते. तसेच चित्राची खालची बाजू व्यापणारा फलाटाचा भाग कमी करता आला असता
२) लिखाळ म्हणतात तसे फोटो काहीसा डावीकडे कललेला आहे (फलाट क्र.३ ची पाटीचा संदर्भ घेउन सरळ काढायला हवे होते)
आवडला
हे चित्र कृष्णधवल जितके चांगले दिसते, तितके रंगीत चांगले दिसले नसते. कृष्णधवल ठेवण्याचा निर्णय उत्तम.
उभा फोटोच मला योग्य वाटतो - या बाबतीत अभिजित यांच्याशी असहमत.
उभे-आडवे वाकडे झाल्याचा भास मलाही झाला - लिखाळ यांच्याशी सहमत. पण हा प्रकार भलताच कठिण आहे. इतका वाईड-अँगल फोटो घेतला तर सर्व उभ्या रेषा उभ्या येऊ शकत नाहीत. कुठली रेषा "सर्वात उभी" यावी हा निर्णय करावा लागतो.
फोकस बदलून प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग तरी आऊट-ऑफ-फोकस केला असता तर बरे झाले असते, असे मला वाटते. माझ्या मते तरी धुक्यात नाहिसे होणारे रूळ, आणि विजेच्या खांबांच्या कमानी-बोगद्याच्या शेवटी असलेला प्रकाशाचा ठिपका, या गोष्टी चित्राचे मुख्य आकर्षण आहे. प्लॅटफॉर्मवरचे तपशील आऊट-ऑफ-फोकस झाले तर चांगलेच आहे - शिवाय छत जमिनीला समांतर आहे की नाही हे लक्षात येणार नाही.
खरंय
उभा फोटोच मला योग्य वाटतो - या बाबतीत अभिजित यांच्याशी असहमत.
बरोबर आहे..पण मग त्यासाठी कंपोजिशन थोडं बदलायला हवं होतं.
नेमका काय बदल करावा हे तुम्ही लिहिलेलं आहेच.
फोकस बदलून प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग तरी आऊट-ऑफ-फोकस केला असता तर बरे झाले असते, असे मला वाटते. माझ्या मते तरी धुक्यात नाहिसे होणारे रूळ, आणि विजेच्या खांबांच्या कमानी-बोगद्याच्या शेवटी असलेला प्रकाशाचा ठिपका, या गोष्टी चित्राचे मुख्य आकर्षण आहे.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
छान
चित्र आवडले. कृष्णधवलचा निर्णयही उत्तम. सुधारणा उस्ताद लोकांनी सुचवल्या आहेतच.
----
मस्त
चित्र आवडले. मला तरी हे कृष्णधवल वाटत नाहीये. थोडसं सिपीया असल्यासारखं वाटतय. काहीही असो, मला चित्रातल्या छटा आवडल्या.
चित्र थोड लांबुन झूम केले असते, तर छताजवळचा भाग छायाचित्रात कमी आला असता. बाकी चित्र आवडले.
-
ध्रुव
सुरेख...
चित्राची भट्टी छान जमली आहे. काहीच सुचवण्या नाहीत. ;-)
वरचे छत जरा डावीकडे कलले आहे पण प्लॅटफॉर्म जिथे संपतो ती आणि जिथे सुरु होतो त्या रेषा जवळजवळ समांतर आहेतच. त्यामुळे कलणे खपून जात आहे असे वाटते.
जपानवरची तुमची एखादी छायाचित्र मालिका यावी असे वाटते. प्रवासवर्णन आले तर मग मजाच. :-)
-सौरभ.
================
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
धन्यवाद
सर्व उस्ताद लोकांनी सुचवलेल्या सुचनांबद्दल धन्यवाद.
ध्रुव तुझे म्हणने बरोबर आहे चित्र कृष्णधवल नाही. कलर असेन्ट् मोडमध्ये रुळावरच्या खडीचा रंग सेट करुन काढलेले चित्र आहे.
सौरभदा मला लिहिणे जमत नाही म्हणुन तर फक्त फोटो डकवत असतो.