उपक्रम दिवाळी अंक २००८

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments

अभिनंदन

अभिनंदन आणि दिवाळी शुभेच्छा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

व्व्वा !!!

अभिनंदन !!! मुखपृष्ठ आणि लेखनाची सजावट झकास.
अंकबांधणी करणा-यांचे पुन्हा एकवार अभिनंदन !!!

लेखन निवांत वाचू आता :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन..

अतिशय सुंदर दिवाळी अंक...

उपक्रम आणि दिवाळी अंकाच्या सर्व टीमचे मन:पूर्वक् अभिनंदन...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अतिशय देखणा

दिवाळी अंक अतिशय देखणा झाला आहे. सर्व सहभागी उपक्रमींचे अभिनंदन. अंक वरवर चाळला , आवडला.
(अधिक वाचनानंतर सविस्तर लिहिणार आहे.)

खतरनाक..

बापरे काय फाकडू अंक काढला आहे राव! आश्चर्य, आनंद, विस्मय, दिड्मूढ(?) वगैरे सगळं एकदम झालो. अंकाचे मुखपृष्ठ, मांडणी अफलातून वाटली. आत्तातरी छायाचित्रे विभागच पाहिलेला आहे. एकदम बाप छायाचित्रे आहेत राव! राखून ठेवलेली छायाचित्रे अंकासाठी बाहेर आलेली दिसतात. ;-)
मुखपृष्ठासाठी फोटोची निवड झाल्याने ध्रुव यांचे विशेष अभिनंदन! तसेच अंकात लेख समाविष्ट झालेल्या सर्वांचे अभिनंदन. सविस्तर प्रतिसाद लेख वाचून झाल्यावर!

(आनंदी)सौरभ.

वेळ

उशिर न करता वेळेवर अंक प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

-सौरभ.

उत्तम

अंक देखणा झाला आहे. सर्व संपादक मंडळाचे आणि सहभागी उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन!

----

+१

हेच म्हणतो ! निवांतपणे वाचून प्रतिक्रिया देतो. तूर्तास सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन !

+१

सहमत!!

अभिनंदन

वा! अतिशय सुंदर मांडणी, अप्रतिम रंग योजना, जालावरील अंक या अर्थाने वेगळेपणा जपत झक्कास मांडणी असलेला हा पहिला दिवाळी अंक खूपच आवडला.
मुखपृष्ठाच्या देखणेपणाला तर १००/१०० :) प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया जस-जसं वाचेन तेव्हा देईनच.
शिवाय चित्र मोठे करण्यासाठी क्लिक करा वाचून क्लिक केले.. व चित्र झुम इन् झाले, ते जे काहि सहज झूम-इन् आहे त्याला तोड नाहि.. "जालावरील" अंक हा छापिल अंकापेक्षा वेगळा वाटातोय तो या अश्या छोट्या छोट्या तांत्रिक मेहनतीमुळेदेखील :)

या मस्त अंकाबद्दल उपक्रमपंताचे, दिवाळी अंकामागील कलाकारांचे-तंत्रज्ञांचे आणि लेखक-वाचकांचे मनःपुर्वक अभिनंदन! आणि शतशः आभार

ऋषिकेश

अभिनंदन!

मराठीत आणखी एका दर्जेदार अंकाची सुरुवात झाल्याबद्दल अभिनंदन. हा उपक्रम दरवर्षी सुरु रहावा आणि पुढील वर्षी याहीपेक्षा दर्जेदार अंक निघावा हीच सदिच्छा!

अभिनंदन

उपक्रमाच्या पहिल्या दिवाळी अंकाची निर्मिती आणि प्रकाशन याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन. अंक सुरेख आहे. सध्या नुसता वरवर चाळला आहे. सवडीने वाचून त्या त्या लिखाणावर प्रतिक्रिया देईन.

-मीरा फाटक

अभिनंदन!

देखणा आणि विविध माहीतीने, छायाचित्राने नटलेला अंक वेळेत प्रकाशित करून सादर केल्याबद्दल अभिनंदन!

हा उपक्रम आता असाच चालत राहोत!

फलज्योतिष

प्रकाश घाटपांडे यांचे फलज्योतिष विषयक दोन्ही लेख फार आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

देखणा अंक

अभिनंदन!

सुंदर अंक!

निटनेटकी मांडणी, नेमकी सजावट सुंदर अंक. सवडीने लेख वाचुन प्रतिक्रिया देइनच.
'उपक्रम' आवडला! अनेक शुभेच्छा!!

अभिनंदन

देखण्या दिवा़ळी अंकाबद्दल उपक्रमींचे अभिनंदन. लेखांवर प्रतिक्रिया सावकाश देईनच.

एक शंका

त्या त्या लेखाच्या खाली प्रतिक्रिया द्यायला गेलो तेव्हा युनिकोड तेथे चालत नसल्याचे दिसले. (आय् ई. मधे तरी). याबाबत थोडे स्पष्टीकरण देता येईल का ?

देता येत आहे

प्रतिसाद देता येत आहे. उदा. हे पाहा.

अडचण आय ई मध्ये येत आहे असे दिसते. फा.फॉ. मध्ये नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अभिनंदन

पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने उपक्रमाचे आणि उपक्रमींचे अभिनंदन.
अंकाची मांडणी खूपच सुबक आहे. उत्तरोत्तर उपक्रमाची अशीच प्रगती होत राहो अशा दिवाळी निमित्त शुभेच्छा!

अंक

अंक आवडला. लेखांचे संकलन छान आहे.
उपक्रमरावांचे आणी अंकाच्या संपादकांचे कौतुक करावेसे वाटत आहे.

न्यू मेक्सिको

लेखातील चित्रे बघून 'यू टर्न' या चित्रपटाची आठवण झाली. सुरेख लेख.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रशंसनीय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उपक्रमकर्त्यांनी दिवाळी अंक (२००८) प्रसिद्ध केला हे प्रशंसनीय आहे.छायाचित्राचे-- (कांहीजण 'प्रकाशचित्र'म्हणतात.अधिक समर्पक शब्द कोणता?)--रसग्रहण कसे करतात याचे काहीच ज्ञान नसल्याने चित्रे चांगली आहेत एव्हढेच म्हणू शकतो.लेख अजून वाचायचे आहेत.
* अंकाचे मुद्रितशोधन उत्तम झाले आहे. अद्यापि एकही मुद्रण दोष दृष्टीस पडला नाही.
* पानपूरके(किस्से,विनोद,व्यंगचित्रे इ.) अधिक प्रमाणात असती तर अंकाची वाचनीयता वाढली असती असे वाटते.
*पृष्ठाची रुंदी मोठी वाटते. पडद्यावर पूर्ण रुंदी मावत नाही. सारखे डावीकडे उजवीकडे सरकवावे लागते. त्यामुळे वाचनाची गती मंदावते.मुद्रित मासिकाप्रमाणे पृष्ठ दोन कॉलमी असते तर सोईचे झाले असते.(माझेच काही चुकते आहे की काय नकळे.)
* लेखांच्या शीर्षकांवरून त्यांचे स्वरूप जरा अधिकच गंभीर असावे असे वाटते.
असो. दिवाळी अंक यशस्वीपणे प्रसिद्ध झाला, त्याप्रीत्यर्थ अभिनंदन !

अत्यंत सुबक आणि वाचनीय

पहिलाच दिवाळी अंक इतका सुंदर काढल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन!
त्या त्या लेखाच्या खाली प्रतिक्रिया द्यायला गेलो तेव्हा युनिकोड तेथे चालत नसल्याचे दिसले. (आय् ई. मधे तरी). याबाबत थोडे स्पष्टीकरण देता येईल का ? आय.ई. मध्ये डबे येत आहेत.
तरीही इथे टाईप करून तिथे चिकटवून प्रतिसाद देईनच. :)

डब्या-डुब्यांची अडचण :-)

मला आयई मध्ये घरी अशी अडचण येत नाही परंतु ऑफिसमधून प्रतिसाद देतान सगळे डब्बे दिसू लागतात.

घरचे वर्जनः आय्ई ७.०
ऑफिसातील वर्जनः आय्ई ६.०

का.टा.

प्र.का.टा.आ.

अत्यंत सुबक आणि वाचनीय

दिवाळी अंकाला स्वतंत्र लॉगिन आहे का? प्रतिसादात स्वतःचे सदस्यनाव लिहावे लागते असे दिसते. (खाली म्हटल्याप्रमाणे अनॉनिमस लॉग)
बाकी प्र.का.टा.आ.

शंका

दिवाळी अंकाला प्रतिसाद देताना प्रवेश केलेला असूनही प्रतिसाद ऍनॉनिमस असाच दिसतो. याचे कारण काय असावे?

----

छान

उपक्रमाचा पहिला वहिला अंक छानच झाला आहे!
राधिका

सुंदर अंक

मुखपृष्ठ आवडले. आतील लेखही वाचनीय दिसतात. वेळ काढून वाचायला हवेत.

-राजीव

प्रतिसाद द्यायचे आहेत

दिवाळी अंकातील लिखाणाला मला प्रतिसाद का बरे देता येत नसावे? नुसते डबे दिसताहेत :)
आणि इथून चिकटवल्यावर कलेन्शन गायब होते.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

ठोकळे/डबे

ठोकळे/डबे अजूनही दिसत आहेत का याची कृपया चाचणी करावी.

अडचण निवारण

अडचणीचे निवारण झाले आहे. आता अक्षरे स्पष्ट दिसतात.

धन्यवाद.

आधी पान रिफ्रेश करावे

आधी एकदा प्रतिसाद देण्याचे पान रिफ्रेश करावे.

उत्स्फूर्त वाखाणणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एक परिचित आमच्या घरी आले होते. त्यांना "उपक्रम दिवाळी २००८" अंक दाखविला. राधिका यांचा "कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास" हा लेख वाचल्यावर त्यांनी या दिवाळी अंकाच्या दर्जाची मुक्तकंठाने वाखाणणी केली,ती केवळ तोंड देखली नव्हे तर अगदी उत्स्फूर्तपणे.
संगीताची आवड असल्याने त्यांनी "रंग आणि संगीत" (किरण देशपांडे) हा लेख वाचला.तो त्यांना नावीन्यपूर्ण आणि विचारप्रवर्तक वाटला."पुस्तक परिचय" (प्रकाश घाटपांडे), "दुरिताचें तिमिर जावो"(विकास) हे लेख त्यानी भराभर वाचून काढले (मला अंकाचे पृष्ठ सारखे डावीकडून उजवीकडे आणि परत सारखे सरकवावे लागत होते.); आणि मनापासून आवडल्याचे सांगितले.इतर लेखही (विशेषतः विज्ञान-तत्त्वज्ञान--धनंजय) त्यांना वाचायचे होते पण वेळे अभावी वाचू शकले नाहीत म्हणून खंत व्यक्त करून निघून गेले.त्यांच्याकडे संगणक नसल्याने आणि त्यविषयी काही माहिती नसल्याने ते उर्वरित अंक वाचतील हे संभवत नाही. ("तुम्ही लिहिलेले ते तर्कक्रीडा काय आहे बघू,बघू" असे ते दोनदा म्हणाले. पण ती कोडी दाखवायचे मी हेतुतः टाळले.)

वाह

खरं आहे..

उपक्रमचा दिवाळी अंक नक्कीच त्याच्या उद्देशांना साजेसा आहे. ज्या गांभीर्याने हे संकेतस्थळ सुरु झाले होते तोच दृष्टीकोन दिवाळी अंकातही प्रतिबिंबित झाला आहे.

माझ्या अनेक मित्रांना मी उपक्रम दिवाळी अंकाची लिंक पाठवली आहे..त्यांचे अभिप्रायही वाटेत आहेत. :-)

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

अगदी

ज्या गांभीर्याने हे संकेतस्थळ सुरु झाले होते तोच दृष्टीकोन दिवाळी अंकातही प्रतिबिंबित झाला आहे.

सहमत आहे.

आपला,
(गंभीर) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उशीर झाला आहे

तरीही दाद दिल्यावाचून राहिले नाही. डोळ्यांना सुखावह वाटेल असा आणि विचारांना पूरक ठरेल, असा हा अंक आहे. उपक्रमच्या स्वभावाला साजेसाच असल्याने त्याची खुमारी वाढली आहे. यनावाला यांनी म्हटल्याप्रमाणे अंकात व्यंगचित्रे असती तर खूप चांगले झाले असते. आजच सकाळच्या बातमीत अंकाची दखल घेतली आहे. छापील अंकांमध्ये त्याच त्या लेखकांची गर्दी झालेली असते. त्यामानाने अगदी नव्या दमाच्या लेखकांचे येथील लेख, माध्यम जगतात काम करणाऱया माझ्यासारख्याला सुखावून गेले. (मला वगळून बोलत आहे) प्रकाश घाटपांडे यांचे दोन लेख हे त्यांनी या विषयावर घेतलेल्या मेहनतीचे फळच आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन. दिवाळी अंक आवर्जून वाचणे मी केव्हाच सोडले आहे मात्र गेले तीन दिवस निरनिराळे ऑनलाईन अंक वाचण्यातच माझा वेळ जात आहे. पुढच्या वर्षीच्या अंकाची मी आताच आगाऊ नोंदणी करतो.

उशीर झाला आहे

तरीही दाद दिल्यावाचून राहिले नाही. डोळ्यांना सुखावह वाटेल असा आणि विचारांना पूरक ठरेल, असा हा अंक आहे. उपक्रमच्या स्वभावाला साजेसाच असल्याने त्याची खुमारी वाढली आहे. यनावाला यांनी म्हटल्याप्रमाणे अंकात व्यंगचित्रे असती तर खूप चांगले झाले असते. आजच सकाळच्या बातमीत अंकाची दखल घेतली आहे. छापील अंकांमध्ये त्याच त्या लेखकांची गर्दी झालेली असते. त्यामानाने अगदी नव्या दमाच्या लेखकांचे येथील लेख, माध्यम जगतात काम करणाऱया माझ्यासारख्याला सुखावून गेले. (मला वगळून बोलत आहे) प्रकाश घाटपांडे यांचे दोन लेख हे त्यांनी या विषयावर घेतलेल्या मेहनतीचे फळच आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन. दिवाळी अंक आवर्जून वाचणे मी केव्हाच सोडले आहे मात्र गेले तीन दिवस निरनिराळे ऑनलाईन अंक वाचण्यातच माझा वेळ जात आहे. पुढच्या वर्षीच्या अंकाची मी आताच आगाऊ नोंदणी करतो.

मेहनतीचे फळ

ज्योतिष या विषयाचा खरे म्हणजे मला फार तिटकारा आहे. पण प्रकाशकाकांचे दोन्ही लेख (मुद्रितशोधनाच्या निमित्ताने) आणि नंतरही आवर्जून वाचले. अतिशय रंजक भाषेत त्यांनी लिहिले आहे.

या अंकातील मला न कळलेला लेख म्हणजे धनंजय यांचा. त्यांनी या लेखावर पुरवणी टिप्पणी करावी असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ज्योतिषविषयक लेख

घाटपांड्यांचे लेख उत्तम आहेतच तसेच मनोगतावरचा त्यांचा लेखही अतिशय आवडला.

 
^ वर