प्रकाशचित्र : डुंबणे - एक स्वर्गीय अनुभव

परवाच रायगडावर गेलो होतो. माहितीपर वर्णन आणि प्रकाशचित्रे ओघाने येतीलच.
पण रायगडावर पहायला मिळण्यास दुर्मिळ असे एक वेगळे दृष्य येथे देत आहे.
कसे वाटते? ते सांगावे -

डुंबणे : एक स्वर्गीय अनुभव !!

कॅमेरा - ई.कोडॅक Z712IS
आय एस् ओ - ६४
एक्स्पोजर - १/५००
एपर्चर - f/3.2
फोकल लेन्ग्थ - ९.४ मिटर
फ्लॅश - नाही
वगैरे...

लेखनविषय: दुवे:

Comments

म्हैस :)

हिरवाईने नटलेला निसर्ग कायमच सुंदर दिसतो.
डुंबणार्‍या म्हशीच्या जरा जवळ जाऊन अथवा पाण्याच्या पातळीला जाऊन म्हशीच्या चेहर्‍यावरचे भाव टिपता आले असते तर जास्त लक्षणीय चित्र झाले असते.

-
ध्रुव

आ-कंठ

फोटो मस्त आहे. जाणकार अधिक भाष्य करतीलच, पण म्हैस शब्दश: आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थांनी आकंठ डुंबते आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

छान!

सुंदर आहे चित्र, आवडले. अजून वेगळ्या अँगलने काढलेली चित्रे आहेत का? बघायला आवडतील.

पण पावसाळ्यात सगळीकडे थंडगार वातावरण असताना म्हैस पाण्यात डुंबत असणे विचित्र वाटले. गोचिडींचा त्रास कमी करण्यासाठी डुंबत असावी.

-सौरभ.

रोज आंघोळ

पावसाळ्यात सगळीकडे थंडगार वातावरण असताना म्हैस पाण्यात डुंबत असणे विचित्र वाटले. गोचिडींचा त्रास कमी करण्यासाठी डुंबत असावी.

किंवा म्हशीला स्वच्छतेचे महत्त्व कळले असावे. ती रोज आंघोळ करत असावी. ह. घ्या. पण अद्याप पावसाळा कुठे आहे? ऑक्टोबरची गर्मी असावी.

प्रकाशिचित्र सुरेख आहे.

धुके...

धुके आणि हिरवाईमुळे पावसाळ्यासारखे वातावरण वाटत आहे.

-सौरभ.

हा हा

पण पावसाळ्यात सगळीकडे थंडगार वातावरण असताना म्हैस पाण्यात डुंबत असणे विचित्र वाटले. गोचिडींचा त्रास कमी करण्यासाठी डुंबत असावी.

:) अगदी असच काहि नहि ;) .. मलाहि पाण्यात कधीही डुंबायला आवडते :)
पाण्यात डुंबणे-पोहणे यासारखा आनंद विरळाच :)

बाकी हिरवाकंच फोटु अणि बाटली-प्लॅस्टीक विरहित तळं मस्तच..

-(डुंबणारा रेडा) ऋषिकेश

हेच म्हणतो.

पाण्यात डुंबणे-पोहणे यासारखा आनंद विरळाच :)

बाकी हिरवाकंच फोटु अणि बाटली-प्लॅस्टीक विरहित तळं मस्तच..

-(डुंबणारा रेडा) आजानुकर्ण


कर्ण म्हणे आता... उरलो अशुद्धलेखनापुरता...

छान

म्हैस आवडलीच ;) शिवाय तळ्याकडे यणारी छोटी पायवाटही आवडली.

----

असेच

मस्त फोटो.

सुंदर..

सुंदर फोटो..! :)

आपला,
(गवळी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

डुंबणे

वा वा भरदार अंग [शिंग], उघडी पाठ, सौंर्दय स्नान ह्या दृष्याने आजवरच्या चित्रकारांना नेहमीच भुरळ घातलीय. विसुनानांना हातात कॅमेरा असताना हा फोटो घ्यायचा मोह कसा बरे आवरेल? कारण वर सदस्य स्पष्ट म्हणाले आहेतच त्यांना [अशी ओलेती] चित्रनायीका आवडली. [कृ. ह. घ्या.]

मी विचार करत होतो की नेमका काय प्रतिसाद द्यावा? एकतर विसुनाना नाव दिसले की काहीतरी वाचनीय असते हा अनुभव. एकदा का फोटो पाहीला पहीले माझ्या मनात हिरवळ कुंद पावसाळी हवा, धुके, चहा, भजी हे विचार सर्वप्रथम आले. म्हैस बरेचदा कळपात असते. ही एकमेव म्हैस कशी काय आली? का वाट चुकली ? का तिच्याबरोबर त्या पाण्यात जायला इतर म्हशींनी नकार दिला :-)

असो डुंबणे - एक स्वर्गीय अनुभव! हे शब्द त्या चित्राला वेगळाच परिमाण करुन गेले. आता डुंबणे ह्या प्रक्रियाचा आपल्याला विचार करुन त्या अनुषंगाने ह्या चित्राकडे बघणे आले. म्हैस "मधे" आली. जर डुंबणे शब्दाचा उल्लेख आला नसता तर चित्राचा फोकल पॉइंट काय झाला असता. चित्र पहाता क्षणी काय विचार आले असते?

विसुनाना फोटो हिरवळ, डोंगर, देशातील ट्रेकिंगचीची सुखद आठवण जागवून गेला.

शीर्षक

-काय द्यावे? असा प्रश्न पडला होता.
****
रायगडावर पोचलो तेव्हा 'हमीअस्त'चा अनुभव येत होता.
त्यात हे दृष्य दिसले. दुरून तर 'चित्रनायिका' पाण्यातल्या एका पाषाणशिल्पाप्रमाणे भासत होती.
तिचे अर्धोन्मिलीत नेत्र (हुश्श्!) तिच्या अतीव सुखाची जाणीव करून देत होते.वगैरे...
चित्रनायक स्वर्गीय निसर्ग आणि कालीकमली नायिका दोघांना समान न्याय हवा होता.
म्हणून असे शीर्षक...

****
या धाग्यात मी बरेच 'वगैरे...' वापरले आहेत. ;) कारण हे सर्व स्पष्टीकरण त्या अनुभवासमोर वगैरे...च आहे.
हा क्षण मनात घोळवला तरी दीर्घ नि:श्वास!

छान

मस्तच आहे. कुंद हिरवळ, डुंबणारी म्हैस...

थोडा छिद्रान्वेष.

फक्त म्हैस ईशान्य १/३-१/३ बिंदूवर ठेवली असती, तर बरे झाले असते, असे वाटते. आता म्हशीवरून नजर पायवाटेवरून क्रमण करते, आणि ईशान्यकडच्या धुक्यात विसर्जित होते. पायवाटेवरून सुरुवात करून नजर म्हशीपर्यंत आली असती, तिथे स्थिर झाली असती, तर हेच सुंदर चित्र अधिक प्रभावकारी ठरले असते.

ईशान्य

तसे प्रकाशचित्र काढायचे तर पायवाटेच्या बाजूला जावे लागले असते. शिवाय त्या बाजूने आता चित्रात दिसणारा अकृत्रिम निसर्ग तसा दिसला नसता. माझ्या पाठीमागे काही इमारती होत्या. (एम.टी.डी.सी.च्या पडक्या खोल्या वगैरे...)

महत्त्वाचे म्हणजे चित्राच्या ईशान्य आणि पूर्व भागात जरा पुढे गेले की कडा आहे. उत्तरेला जंगल आहे हे दिसतेच!
कुटुंब बरोबर आल्याने एकवीस वर्षांचा होऊ शकलो नाही. :) ;)

च्यामारी

स्वर्गीय वातावरणात काय हा १/३चा छिद्रान्वेष?
गोष्टी तांत्रीकदृष्ट्या उत्कृष्ट असल्या पाहिजेत हा
हट्ट असल्याने काय साधते?

आपला
गुंडोपंत
"काही प्रश्न सोडवण्यापेक्षा सोडून दिल्यानेच सुटतात - विनोबा भावे"

नाही, हट्ट नाही

त्यांनी तांत्रिक मत विचारले, लोकांनी सांगितले... नाही सांगितले असते, तर त्यांचा अवमान झाला असता.

फोटो म्हणजे काय? डोळ्यांना जे नाहीतरी स्पष्ट दिसते, त्याचे कॅमेर्‍याच्या छिद्रातून अन्वेषण.

१/३

नियम हे सर्वार्थाने अनावश्यक नसतात. पण अगदीच काटेकोरपणे पाळावेत असे नाही. एखादा फोटो डोळ्यांना सुखद वाटत असेल आणि नियमात बसत नसेल तर वाईट असे नाही. नियमानुसार काढलेले सर्व फोटो अप्रतिम असतात असेही काही नाही. सुवर्णमध्य साधणे महत्त्वाचे आहे.

सराव महत्त्वाचा आहे. चित्राच्या कंपोझिशनमध्ये कोणत्या गोष्टी खटकत आहेत कोणत्या कशा असत्या तर फोटो अजून चांगला आला असता हे आपलेच फोटो पुन्हा पाहताना समजते. अशा वेळी एखाद्या जाणकाराची नजर आपल्या फोटोवरुन फिरली तर कदाचित फोटो काढण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यला समजू शकतो आणि पुढच्या वेळी हे सर्व लक्षात ठेवून फोटो काढला तर प्रगती होते.

बाकी डुंबण्यात मी आणि म्हैस स्पर्धा करू शकतो. फक्त वेगवेगळ्या डबक्यात. म्हैस हरली तर चिडून मारायची मला.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

अहाहा !!!

काय सुंदर चित्र काढले आहे, हेवा वाटला म्हशीचा :)

संपादकांना : सदरील चित्र मला माझ्या संगणकावर सेव्ह करायचे आहे.
( त्यावर कोणतीही कलाकुसर करायची नाही, हे नम्रपणे नमुद करतो.:) )
उपक्रमवरील विसुनानांनी डकवलेल्या चित्राचे मालक कोण ? आणि कोणाची परवानगी घ्यावी ?
उपक्रमचे चित्राबद्दल धोरण काय आहे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्राचे मालक

उपक्रमवरील विसुनानांनी डकवलेल्या चित्राचे मालक कोण ? आणि कोणाची परवानगी घ्यावी ?

वरील चित्राचे मालक विसुनानाच तेव्हा परवानगीही त्यांचीच घ्यावी. मला वाटतं उपक्रमावर प्रकाशित होणारे सर्व लेख, चित्रे, कोडी यांचे मालक त्यांचे लेखक असून उपक्रम त्यांच्या विचारांची जबाबदारी स्वीकारत नाही.

एखाद्या कलाकृतीवर प्रताधिकार नसल्यास ती कोणीही कुठेही वापरू शकतो हे अनेक लेखांच्या बाबतीत आपण पूर्वीही पाहिले आहेच. परंतु तसे करणे नैतिक मूल्यांना धरून असते असे वाटत नाही.

उपक्रमाची काही धोरेणे येथे आहेत.

धन्यवाद !!!

एखाद्या कलाकृतीवर प्रताधिकार नसल्यास ती कोणीही कुठेही वापरू शकतो हे अनेक लेखांच्या बाबतीत आपण पूर्वीही पाहिले आहेच.
:)

परंतु तसे करणे नैतिक मूल्यांना धरून असते असे वाटत नाही.

:(

हे चित्र प्रत-अधिकाराने सुरक्षित आहे

उपक्रमावर येऊन जरी हे चित्र आपण बघितले असेल, तरीही उपक्रमावर फक्त या चित्राचा "पिकासा" संकेतस्थळावरील पत्ता आहे. तुमचा न्याहाळक "पिकासा" संकेतस्थळावर जाऊन उपक्रमाच्या पानाच्या मध्ये "पिकासा"चा तेवढा भाग दाखवत आहे. (पुनश्च सांगणे - उपक्रमाच्या विदागारात ते चित्र नाही.)

पिकासा संकेतस्थळावर जाऊन बघता असे दिसते, की या चित्रावरचे पूर्ण हक्क कॉपिराईटने सुरक्षित आहेत.

उपक्रमावर "सी" खूण दिसत नाही, म्हणजे खरोखरच ते चित्र मुक्त आहे, असा विचार करू नये. उलट पक्षी एखादे चित्र प्रत-अधिकार-मुक्त आहे, असे दिसत नसेल, तर ते चित्र हक्कांच्या अधीन आहे, असे मानणेच शहाणपणाचे आहे.

विडंबनासाठी कुठलेही पाठ्य प्रत-अधिकारापासून मुक्त असते. पण ते विडंबन त्याच कलाकृतीचे हवे. समजा माझ्या "राणी व्हिक्टोरिया"चे विडंबन करायचे आहे, तिला मिशा काढायच्या आहेत, तर तुम्हाला तो हक्क आपोआप मिळतो. पण समजा तुम्हाला लोकसभेचे विडंबन करायचे आहे, आणि सोनिया यांच्या धडावर माझ्या राणी व्हिक्टोरियाचे मुंडके ठेवायचे आहे, तर ते माझ्या राणी व्हिक्टोरियाच्या चित्राचे विडंबन नव्हे. अशा परिस्थितीत, माझ्या व्हिक्टोरिया राणीच्या चित्राचा भाग वापरण्यासाठी तुम्हाला माझी अनुमती घ्यावी लागेल.

हल्लीच्याच घडामोडीशी संबंध लावता यावा.

या ठिकाणी म्हशीच्या जागी जिराफ चिकटवून विडंबन करायचे असेल तर तुम्हाला श्री. विसूनाना यांची अनुमती घ्यावी लागणार नाही. (वगैरे...) नाहीतर अनुमती घ्यावी लागेल.

विडंबन आणि विटंबना

विडंबन आणि विटंबना ह्या दोन्ही गोष्टीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. विडंबन हे सार्वजनिक शुचिता गृहित धरूनच केलेले असते.

ह्यावरून एक मजेदार गोष्ट आठवली. काही राष्ट्रीय विचाराची मंडळी रोज सायंकाळी एका उद्यानात एका विशिष्ट कोपर्‍यात जमून देशभक्तीपर चर्चा करीत असत. लाल तोंड्या माकडांना हे धगधगते विचार सहन झाले नाहीत. त्यांनी रोज सकाळी त्याजागी प्रातर्विधी करायला सुरुवात झाली. ह्या मंडळीनी प्रेमाने समजावून सांगितले पण लालभाईंचे म्हणणे की आम्ही आहोतच बेशरम. आम्ही असेच वागणार. मग ह्या राष्ट्रीय विचारांच्या मंडळींनी युक्ती काढली. ते पण एका सकाळी ह्या प्रातर्विधी
करणार्‍या मंडळींच्या शेजारी प्रातर्विधीच्या खोट्या मिषाने येऊन बसले आणि ह्या लालभाईंची पाण्याची टमरेले पळवली. लालभाईंना घरी जायची सोय उरली नाही.

आज जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकत आहेत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही दुधारी तलवार आहे हे ध्यानात घेतलेले बरे.
________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

काही मजकूर संपादित. कृपया सर्वांनी उपक्रमावर लेखन करताना व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी टाळावी.

प्रताधिकार वगैरे...

आहे माझ्याकडे! ;)
बिरुटेसाहेब, विचारलेत इतकेच खूप झाले. चित्र तुमचेच (म्हणजे तुमच्या मालकीचे हो) समजा. :)

चित्र आवडले

विसुनाना, चित्र आवडले. म्हैस फ्रेम मध्ये थोडी आणखी डाव्या बाजूला असती आणि ध्रुव म्हणातात तसे थोडे जवळ जाऊन काढले असते तर चित्र अजुन खुलले असते असे वाटते.

सुंदर

चित्र खूप आवडले. शीर्षकावरुन चित्रात कोण असेल याचा अंदाज आलाच होता. म्हैस,पायवाट, हिरवळ, धुके, निसर्ग सर्व काही चपखल.

 
^ वर