प्रचार आणि प्रसार मधील फरक काय?

बरयाचदा वाचनामध्ये 'प्रचार आणि प्रसार' हे शब्द येतात.
एखाद्या गोष्टीचा प्रचार करणे म्हणजे प्रचार आलाच की?
या दोन शब्दांचा नक्की अर्थ काय?
दोन शब्दांमधील नेमका फरक काय?
उदाहरणासहीत स्पष्ट केलेत तर बरे होइल.

रम्या

लेखनविषय: दुवे:

Comments

माझ्या मते

उदा: भारतातून सिद्धार्थ लंकेत धर्मप्रसारासाठी गेला होता. त्याचे उद्दिष्ट लोकांना धर्मात आणणे असे होते. त्याने त्यासाठी तिथे जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार केला. म्हणजे नेमकं काय् केलं? धर्माची उद्दिष्टे, वैशिष्टे लोकांना सांगितली. मग् त्यातून ज्यांना पटली त्यांनी धर्म स्विकारला आणि धर्माचा प्रसार झाला. जेव्हा आपण प्रसार म्हणतो तेव्हा त्यात प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे. म्हणजेच जी निदर्शक गोष्ट आहे ती घडते. उदा: धर्म-स्विकार हे धर्म प्रसाराचे लक्षण किंवा निदर्शक गोष्ट आहे.

जपानमध्ये जाऊन क्रिकेट्चा प्रचार केल्यावर लोक जर क्रिकेट खेळू लागले तर खेळाचा प्रसार झाला. अन्यथा प्रचारात दम नव्हता वा लोकांना खेळ पटला नाही.

निवडणुकीत नेते काहीतरी मुद्दे/मते घेऊन प्रचार करतात. लोक ज्याची मते पटतील त्याला मते टाकतात.

तेव्हा प्रचार केला म्हणजे प्रसार होतोच असे नाही. प्रचाराचे यशापयश प्रसारात प्रवर्तित होते.

आपला
प्रचारक आभ्या

म्हणजे..

म्हणजे प्रचार ही करण्याची गोष्ट आहे तर प्रचार ही होण्याची गोष्ट आहे.
प्रचार करणे हे आपल्या हातात असते तर प्रसार हा प्रचारावर अवलंबून असतो.
म्हणजे "मी प्रसार केला' हा वाक्य प्रयोग चूक म्हणावा का?

धन्यवाद
रम्या

सिद्धार्थ लंकेत?

्प्रचार आणि प्रसाराची मिमांसा ठिक आहे पण सिद्धार्थ कधी गेला लंकेत?? :)

लंकेत बौद्धधर्माचा प्रसार अशोकपुत्र महिंद्राने केला, प्रचार कदाचित यापूर्वीच काही बौद्ध भिख्खूंद्वारे केला गेला असावा परंतु महिंद्रचे वलय त्यांना नसावे त्यामुळे खरा प्रसार महिंद्रनेच केला.

बरोबर आहे तुमचं

ऐतिहासिक चूक. क्षमा असावी.

आपला
अडाणी आभ्या

आण़खी एक फरक

रोगाचा प्रचार कोणी करीत नाही. पण त्याचा प्रसार होतो.

रम्या

रम्या,

प्रसार हा आपोआप होतो, प्रचार हा जाणूबबुजून केला जातो.

प्रसार म्हणजे प्रादुर्भाव, लागण, काही ठिकाणी बाधा या अर्थानेही तो शब्द येतो.

(विष्णुशास्त्री चिपळूणकर) बापू

सहमत..

प्रसार हा आपोआप होतो, प्रचार हा जाणूबबुजून केला जातो.

बाप्याशी सहमत..

तात्या.

.

प्रसार आपोआप कसा होतो? साथीचा रोग जरी असला तरे त्याचा प्रसार कोणत्यातरी मध्यस्थामार्फत होतो.
प्रचार जाणूनबुजून केला जातो हे खरं आहे.

अभिजित

अर्थ/मूळ

प्रसारच्या 'मुळा'शी 'सृजनातले 'सृ' आहे ज्याचा संबंध नवे बनण्याशी/विकसनाशी आहे. तर प्रचाराच्या मुळाशी वि'चारा' चेच मूळ (?) आहे. ( या धातूंच्या मुळाशी जावे ही जाणकारांना विनंती. तो इथे फारसा खोलात शिरू शकत नाही.)

यामुळे प्रचाराचा अर्थ फक्त विचार/मत पसतरवणे तर प्रसाराचा अर्थ त्या विचारांचे कृतींमध्ये रुपांतरण होणे असा वाटतो. म्हणूनच प्रचार करता येतो पण प्रसार व्हावा लागतो.

(अवांतर: निवडणूकांत कृतीशीलता अपेक्षित नसल्याने प्रसारापेक्षा प्रचारावरच भर दिसतो.)

~ तो ~

आयच्यान!

प्रसारच्या 'मुळा'शी 'सृजनातले 'सृ' आहे ज्याचा संबंध नवे बनण्याशी/विकसनाशी आहे. तर प्रचाराच्या मुळाशी वि'चारा' चेच मूळ (?) आहे. ( या धातूंच्या मुळाशी जावे ही जाणकारांना विनंती. तो इथे फारसा खोलात शिरू शकत नाही.)

आयच्यान! एक शब्दही समजला नाही! जरा साधंसोपं लिहित जावा की राव!

तात्या.

ता क - 'आयच्यान' ही शिवी नसून 'आईची आन (शपथ)' चे ग्रामिण मराठीकरण आहे. एखाद्याला चुकून ही शिवी वाटू शकेल म्हणून हा खुलासा..

अक्षरशः बरोबर

प्रसारच्या 'मुळा'शी 'सृजनातले 'सृ' आहे ज्याचा संबंध नवे बनण्याशी/विकसनाशी आहे.

सही.

अभिजित

पण..

पण एक प्रश्न बाजूलाच राहीला की राव !
"मी प्रसार केला" हा वाक्य प्रयोग चूक म्हणावा का?

वरील चर्चेवरुन तर असंच वाटतं की "एखाद्याने प्रचार केला आणि प्रसारास कारणीभूत ठरला" असाच वाक्य प्रयोग योग्य वाटतो.
"एखाद्याने एखाद्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार केला" हे चूकच म्हणावे लागेल !!!

रम्या

नाही

"मी प्रसार केला" हा वाक्य प्रयोग चूक म्हणावा का?
तसे वाटत नाही.
मी प्रसार करण्याचा प्रयत्न, 'प्रचार करणे' या मार्गाने करून त्याला यश आले तर झालेला प्रसार माझ्या मुळेच झाला असे होईल. त्यामुळे 'मी प्रसार केला' हे वाक्य बरोबर आहे असे वाटते.
-- लिखाळ.

बरोबर

बरोबर आहे लिखाळ.

 
^ वर