जेट चे घुमजाव आणि भारतीय उद्योग

जगभरात सुरू असलेला आर्थिक मंदीचे थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि भारतीय बाजारपेठांवर अवलंबून असणार्‍या कंपन्यावर दिसू लागले आहेत. भारतात खासगी विमानसेवा देणार्‍या कंपन्यांना या मंदीचा फटका बसला आहे. यातूनच नोकरकपातीचा निर्णय जेट एअरवेजने घेतला होता. राजकीय दबावाने हा निर्णय मागे घ्यावा लागला. कंपनी नफ्यात असताना आणि वाढत असताना जशी नोकरभरती केली जाते तसेच अडचणीच्या वेळी नोकरकपात करणे आवश्यक असते.
जर राजकीय हस्तक्षेप अश्या निर्णयात होऊ लागला तर भारतातील उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील का?
या एकूणच प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते?

Comments

जेट नवनिर्माण संघटना

एकूणच प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते?

वाईट वाटते. 'राज'कीय दबाव आणून उद्योग धंद्यांना आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी नाचवणे अयोग्य वाटते. जेटने केलेली कपात जर कायदेशीर असेल तर त्यात राजकारण्यांना हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही.

सहमत आहे

तोट्यातील कंपनी इतके पांढरे हत्ती (किंवा उंदिर, मांजर) कसे पोसणार हे देखील कळत नाही.

एयर इंडीया, इंडीयन एयरलाइन्सला विचारले पाहीजे

>तोट्यातील कंपनी इतके पांढरे हत्ती (किंवा उंदिर, मांजर) कसे पोसणार हे देखील कळत नाही.

वर्षानुवर्षे तोट्यात चालू आहेत कित्येक सरकारी उपक्रम.

असे ऐकले आहे की लोकसभेत विरोधकांनी अजुन धारेवर घरु नये म्हणुन प्रफुल्ल पटेल नरेश गोयल यांना म्हणाले की आता घ्या लोकांना कामावर मग बघु.

सहमत

सहमत. पण याच सोबत, राजकारणी आणि खासगी उद्योगधंदे हे वेगळे तोलण्यासारखे आहेत का? हा सुद्धा प्रश्न येतोच. या सगळ्यात सामान्य माणूस नक्की कुठे असतो हे ही कळत नाही. पडद्या मागचे राजकारण आणि पैसा यांचे नाते आपण वेगळे समजायचे का?

राजकारणी आणि उद्योगधंदे

राजकारणी आणि उद्योगधंदे हे निश्चितच वेगळे तोलण्यासारखे आहेत. राजकारण्यांना विविध व्यासपीठांवर जनतेला उत्तर द्यावे लागते.

'खाजगी' कंपन्यांना केवळ त्यांचे मालक (आणि समभागधारक) यांना उत्तर द्यावे लागते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संबंध

श्री गोयल आणि खासदार विजय मल्ल्या नुकतेच एकत्र आले आहेत या बद्दल काय मत आहे? तसेच खासदार धुत हे देखील बहुतेक एक उद्योगपती आहेत आणि खासदार राहुल बजाज सुद्धा.

सहमत आहे

जेटने केलेली कपात जर कायदेशीर असेल तर त्यात राजकारण्यांना हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही.

सहमत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर