किती जगणार

मराठी भाषा किती जगणार. येथे आपण हल्ली संस्कृत भाषेवर चाललेल्या चर्चा, वाद - प्रतिवाद पाहतो आहोतच. पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

मराठी बद्दल अनास्था

येथेच बघा. मराठी बद्दल अनास्था. जे लोक मराठी आमची भाषा, बाकीच्या मृत म्हणतात. त्यांना मराठी भाषे बद्दल लिहावेसे सुद्धा वाटत नाही. उगाच इतर चर्चांमध्ये खोडसाळ प्रतिसाद लिहिण्यात स्वतःला धन्य मानत आहेत. हिच अवस्था राहिली तर मराठी फार जगेल असे वाटत नाही. :)





माझं मत..

माझं मत -

मराठी भाषा किती जगणार.

भरपूर जगणार..! हां, काळानुरूप तिच्यात बदल नक्कीच होत जातील, जसे ज्ञानेश्वरांची मराठी आपण आज बोलत नाही.

एखादी भाषा जिवंत आहे किंवा मृत आहे, याबद्दलचे माझे जे काही ढोबळ निकष आहेत (जे मी या चर्चेत मांडले आहेत,) ते निकष मराठी भाषेच्या संदर्भात अगदी चोख उतरतात असे मला दिसते आणि म्हणूनच मराठी ही एक जिवंत व चैतन्यपूर्ण भाषा आहे असे माझे मत मी येथे नोंदवतो..

पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

साक्षात ज्ञानेश्वर माउलींनी "अमृतातेही पैजा जिंके.." अश्या शब्दात जिचा गौरव केला आहे अशी ही शिवरायांची, तुमचीआमची मायमराठी कधी मृत होईल असे मला वाटत नाही...

धन्यवाद,

आपला,
(आंतरजालावर मराठी भाषा टिकवण्याचा प्रयत्न करणारा एक मराठी भाषिक) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बहुधा

बहुधा १००-२०० वर्षात ही परिस्थिती येईल कदाचित :)

----

हेच तर म्हणतोय मी

हेच तर म्हणतोय मी आणि त्याची चुणुक दिसते आहेच. भाषांतर केले की धर्मांतर एकदम सोपे ना :)





त्यासाठी

बहुधा १००-२०० वर्षात ही परिस्थिती येईल कदाचित :)

१००-२०० वर्षे थांबायची गरज वाटेल असे वाटत नाही. मित्र मराठी शाळांचे व ग्राम मंगल अश्या सारख्या संस्थांनी धोक्याचा लाल बावटा आधीच दाखवला आहे.

मी जव्हार मोखाडा भागात होते तिथल्या मुलांना तर प्रमाण मराठीपण इंग्लिश इतकीच परकी भाषा वाटते.

महाराष्ट्र सरकार पापुमनिची अभ्यासक्रमाबद्दल अनास्था हेच मराठी आणि संस्कृतच्या दूरवस्थेचे मूळ कारण असावे. आजही दहावीत मराठी प्रथम भाषामध्ये अनुत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण भरपूर आहे.

_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

कशावरुन असे वाटते ?

मराठी भाषा किती जगणार. येथे आपण हल्ली संस्कृत भाषेवर चाललेल्या चर्चा, वाद - प्रतिवाद पाहतो आहोतच. पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते.

कशावरुन असे वाटते, कोणती लक्षणे मराठी भाषेच्या बाबतीत दिसत आहेत ?
त्यावर आपले, इतरांचेही विवेचन वाचायला आवडेल.

मला तरी वाटत नाही

मराठी भाषा लवकर मरेल असे मला तरी वाटत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

सहमत आहे. आज आहे तशी नसेल. अनेक इंग्रजी शब्द आलेले असतील.
प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.

आज आहे तशी नसेल. अनेक इंग्रजी शब्द आलेले असतील.

अगदी योग्य बोललात. माझा अनुभव आहे की कोणालाही तुम्ही अठ्याण्णव, दोनशे सात, एकोणऐशी, पाचशे त्रेपन्न, दोन चारशे पाच चौर्‍याण्णव अडुसष्ट इ. प्रकारे दू.क्र. सांगा. १० तील ९ मराठी माणसे म्हणतात आकडे इंग्लिश मधून सांगा. आम्हाला मराठी बोलता येते पण संख्यावाचन कळत नाही.

_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

त्यांत विशेष काय?

काळाच्या ओघांत कितीतरी भाषा मृत झाल्या असतील.

मराठी किती काळ जगणार.....

काळाच्या ओघांत कितीतरी भाषा मृत झाल्या असतील.
अधिकृत आकडेवारी माहिती नाही, पण भारतात म्हणे १६५० भाषा बोलल्या जातात त्यापैकी निम्म्या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
आणि मराठी बोलणा-यांची संख्या जवळपास नऊ कोटी आहे. आता प्रश्न आहे, मराठी किती काळ जगणार....

भाषेच्या एकंदर घडणीमधे व्याकरण आणि शब्दसंग्रह हे मुख्य घटक असतात मराठी भाषेचा शद्बसंग्रह समीश्र स्वरुपाचा आहे. प्रत्येक भाषेचा अन्य भाषेशी वा भाषांशी निरनिराळ्या कारणांनी संबध येतो. त्याच्या परिणामातून भाषेच्या शब्दभांडारात सतत भर पडत जाते. मराठी भाषेचा इतिहासाचा मागोवा घेतल्यास म्हणजे मराठीच्या उद्गमकालापासून तिचा अन्य भाषांशी संबध आलेला आहे हे कळते. कन्नडसारख्या द्रविड भाषा, फारशी, अरबी-तुर्की,पोर्तुगीज, इंग्रजी इ. भाषा यामुळे मराठीच्या शब्दसंग्रहामधे वेळोवेळी भर पडत गेली. हिंदी, गुजराथी, तसेच आर्यभाषेतून अनेक शब्दांबरोबर स्वतःच्या लवचिक वृत्तीमुळे कालाच्या ओघात सामाजिक, राजकीय,आंतरजालीय युगातील आणि इत्यादी,इत्यादी कारणांमुळे नव-नवे शब्द स्वीकारत,शुद्ध शब्द,प्रमाणभाषेचा ब्रेकर पार करत मराठी भाषेची दमदार वाटचाल चालू आहे. तिच्या स्वतःच्या अशा वैशिष्ट्यांमुळे माय मराठीला उदंड आयुष्य आहे असे वाटते. मराठी भाषेतील शब्दसंग्रहाबरोबर मराठीचे भाषेचे आदान प्रदान जेव्हा थांबेल, तेव्हा मृत भाषेच्या थडग्याशेजारी आणखी एका भाषेचे थडगे उभारावे लागेल हेही नम्रपणे सांगावेसे वाटते.

अवांतर : वादासाठी उपप्रतिदासापेक्षा माहिती देणा-या प्रतिसादाचे आम्ही स्वागत करु !!! :)

-दिलीप बिरुटे
(समजूतदार )

मला काही खास वाटत नाही

हल्ली संस्कृत भाषेवर चाललेल्या चर्चा, वाद - प्रतिवाद पाहतो आहोतच. पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

भारताची आंग्लाळलेली पिढी आजही मराठी कुचकामी आहे असंच म्हणते. उद्यावर थांबायची गरज नाही.

मराठी मरेलही भविष्यात. अनेक भाषा मरतात. मी जिवंत असेपर्यंत मरणार नाही बहुतेक. नंतर मेली तर मला त्यात खास वाटत नाही.

- राजीव

ह्या साठी अन्तर्जालावर मराठी वाढवावी लागेल...

बरेच जणांशी सहमत आहे कि मराठी वर पण एकेकाळी अशी परिस्थिति येऊ शकते. मी आपलेच उदाहरण घेतो, आम्हीं मध्यप्रदेशात रहातो, मी मला आवड असल्यामुळे मराठीची पुस्तकं वाचतो किंवा अन्तर्जालावर मराठी पाहतो, वाचतो... पण माझ्या १४ वर्ष च्या मुलाला मराठी मध्ये आजिबात "इंटरेस्ट" नाही... मी काही प्रयत्न केले, पण मित्रवर्ग हिन्दी, बाहेरचे वातावरण हिन्दी, शाळेत हिन्दी मिक्स अंग्रेजी, घरी राहतोच किती वेळ, आणि राहिला तरी मग घरी टीवी आहे ना... तर त्याला मराठी कशी येणार? अर्थात पुढली पिढी विनामराठीच रहाणार... आज अन्तर्जालावर तामिळ चे वेबपेजेस व ब्लॉग हिन्दीपेक्षा बरेच जास्त आहेत, असे कां? तर मराठी ला अन्तर्जालावर प्रस्थापित केले तर पुढच्या पिढी ला ते उपयोगी पडणार नाही का? ह्यावर पण विचार व्हायला हवा आणि नेट वर मराठी चे पेजेस, ब्लॉग, पुस्तके, वर्तमान पत्र इत्यादी जास्तीत-जास्त टाकावीत. मराठी ला आधीच एक फायदा "देवनागरी" लिपि होण्याचा आहेच...
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर