१४ एप्रिलच्या निमित्ताने हा लेख.
१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल पण रि.पा.इ.ऐक्याच काय. ऐक्य कधीही होणार नाही असे वाटते.रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर,नामदेव ढसाळ, खोब्रागडे ,इत्यादी नेते कधी एकत्र येणार. केव्हा संघटीत होणार.प्रत्येक जण निरनिराळ्या पक्षांना चिकटून बसलाय. आंबेडकरी तरूण ही वेगवेगळ्या पक्षात सामिल होतोय.नविन तयार झालेला पक्ष निवडणूकीत जास्त जागा कमावतोय आणि हे नेते आपाआपसात लढून एक ,दोन जागांवर समाधान मानत आहेत. कधी सुचणार यांना शहाणपण . हे नेते बाबासाहेबांना दलितांपुरताच मर्यादित ठेवतात. स्मारक,पुतळे बांधून काय होणार आहे. समाजातील सर्व घटकात बाबासाहेबांचे विचार पोहचण्यासाठी काय केले पाहीजे यासाठी ही नेतेमंडळी विचार करताना दिसत नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी आंबेडकरी चळवळ आवश्यक आहे हे ते विसरले कि काय. प्रत्येक नेत्याने आपाआपसातील मीपणा सोडून जयंती निमित्ताने मोठया मनाने एकत्र यावे ही इच्छा.
आपण नेहमी म्हणतो मराठी माणूस जाईल तेथे भांडतो एकमेकांचे पाय खेचतो हे सुत्र रि.पा.इ.नेते नित्यनेमाने पाळतात. बसपा सारखा उ.भारतातील पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्यास उत्सुक आहे. आज ना उधा या नेत्यांच्या भांडणामूळे बसपा. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नाव उमटवेल या जरतर च्या गोष्टी असल्यातरी या सर्वाला कारणीभूत कोण असणार आहे. तेव्हा याचे भान या नेत्यांनी ठेवावे असे वाटते.
आपला
कॉ.विकि
Comments
शू...... काय हे ?
हे काय बोलताय ?
तुम्ही सुध्दा 'त्यांच्या'तील दिसता. तुम्हाला सुध्दा मनुवादाचा 'विटाळ' झालेला दिसतोय. हे खरं आहे की बाबासाहेबांच्या विचाराला इतर नेत्यांनी तिलांजली दिली आहे. मात्र आजही एक पक्ष खर्या अर्थाने बाबासाहेबांच्या मार्गावर चालतो आहे. तो म्हणजे रि. पा. ई. ( अबक गट). तब्बल सहा जिल्हे आणि तेरा तालुक्यातील आमच्या गटाचा मीच संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे. केवळ मलाच तेवढे बाबासाहेब कळलेले आहेत. म्हणून सांगतो की इतरांनी आपापला अभिमान बाजूला ठेवून माझ्या गटात सामिल व्हायला पाहिजे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण होईल. इतरांना दलितांना दलित ठेवायचे आहे, मला मात्र त्यांना राज्यकर्ते बनवायचे आहे. कुठल्याही परिस्थीतीत मी 'जातीयवादी' गटांशी हातमिळवणी करीत नाही. मागे आमच्या 'जाती'वर झालेल्या अन्यायाच्या विरुध्द सर्वात आधी मीच आवाज उठवला होता. पेपरातून संपुर्ण महाराष्ट्र पेटवून देण्याची घोषणा मीच केली होती. इतर कुणी करतं का असं.
पण ह्या मनुवादी महाराष्ट्रात मात्र आमची प्रगती लोकांना पहावत नाही. त्यांना शिक्षण, संस्कार , व्यवसाय, रोजगार , भारतीय नागरिकाचे सामाजिक सांस्कृतीकरण अश्या विनाकामच्या टवाळक्या करण्यावर जोर द्यावासा वाटतो. काहीही अक्कल नाही इतरांना. आमचा तरूण आदीकाळापासून कमीच शिकतोय. आणि आजही शिकला तरी त्याला आदराची सामाजिक जाणिव द्यावी , ही का राजकारण्यांची कामे आहेत? आम्ही यासाठी का निवडून दिले जातो? भलतेच काही?
तुम्हाला सांगतो आपल्या आंबेडकरी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे 'मनुवाद' जो पर्यंत हा मनुवाद आणि त्याला जपणारी ब्राम्हणी संस्कृती येथे आहे तो पर्यंत आम्ही इतर कुठलाही मुद्दा महत्वाचा माननारच नाही. आमचा समाज थोडा सैलावला आणि थोडा आपल्या वैयक्तीक प्रगतीस लागला रे की मग आम्ही पुन्हा रान पेटवनार. बाबासाहेबांवर अगाढ श्रध्दा ठेवणार्या आमच्या युवकांची माथी भडकवून त्यांना रस्त्यावर आणनार. त्यांच्या हातून दंगल घडवून नंतर आम्हीच ती आवरणार आणि समस्त दलित समाजाचे एकमेव कर्तृत्ववान नेते असल्याच्या आवेशात मिरवणार. कारण? कारण... केवळ मला आणि मलाच बाबासाहेब समजलेले आहेत. बाबासाहेबांच्या तत्वांपर्यंत जाण्याचा मार्ग केवळ माझ्या कडूनच जातो. त्यामुळे तुम्हाला खरे बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर माझ्याच हातून तुम्हाला शीलाचे पाणी घ्यावे लागेल. तेव्हाच तुमचे खरे शुध्दीकरण होईल.
म्हणून सांगतो बंधुंनो माझ्या गटात सामिल व्हा. आज जरी मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात जास्त रस घेत असलो आणि अकोल्याची खासदारकी गमावून बसलो असेल किंवा सोलापूरहून माझी खासदारकी मिळवून मंत्रीपदासाठी मोठ्याने डरकाळ्या दिल्या तरीही. जो पर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातील बुध्दमय भारत निर्माण होत नाही तो पर्यंत मला चैन नाही आणि मी तुम्हालाही चैन पडू देणार नाही.
जय भीम
नीलकांत
नीलकांतजी
तुम्ही वस्तुस्थिती चे योग्य वर्णन केलेले आहे.
आपला
कॉ.विकि
छान्
नीलकांत काय लिहिल आहे छान तुमच हे लिखाण पुर्ण वाचेपर्यंत मी श्वास घेतला नसेल.
वाचुन झाल्यावर मन आणि डोक दोन्ही सुन्न झाल होत.
नीलकांत
अतिशय योग्य शब्दात रिपब्लिकन राजकारणाच्या सद्य परिस्थितीची जाणीव करुन दिली आहेस.
(रिपब्लिकन) योगेश
(आमचे राष्ट्रीय नेते: नीलकांतजी )
आवडले
नीलकांत आपले हे 'सटायर' सद्य परीस्थितीवर नेमके बोट ठेवणारे आहे.
आवडले
नीलकांत आपले हे 'सटायर' सद्य परीस्थितीवर नेमके बोट ठेवणारे आहे.
धन्यवाद
अनेकांनी दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मी वर लिहीलेले आहे ते बघतो आहे आणि मला मनापासून त्याची खंत आहे. आंबेडकरी विचाराचा नवा तरूण आपलं जीवन समृध्द करू पाहतो आहे समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत आपली बौध्दीक कुवत सिध्द करू पाहतो आहे. पण त्याच वेळी आंबेडकरी जनतेची मते ही नेहमीच गठठा मते रहावीत आणि आपले कसे भले होईल यात ही नेते मंडळी रममाण आहेत.
या परिस्थीती बद्दल मनापासून वाईट वाटते.
नीलकांत