छायाचित्र टीका - ३२

माझा कॅमेरा - कोडॅक क्रोमा
रोल - कोडॅक गोल्ड
स्थळ - उत्तन, भाईंदर

लेखनविषय: दुवे:

Comments

वारली

वा सुरेख वारली पेंटिग्ज..
जरा क्लोजअप् असता तर अधिक आवडले असते. घरापुढील वाफा/गवत इतके आले नसते तरी चालले असते. :)
एक फोटू म्हणून ठिक वाटला.. मात्र् वारली चित्रे असल्याने आवडला.. :)

(वारली चित्रांचा चाहता) ऋषिकेश

असेच

म्हणतो. फोटो छान आहे पण क्लोजअपने आणखी मजा आली असती.

----

आपण म्हणता ते खरे आहे.

जरा क्लोजअप् असता तर अधिक आवडले असते.

पण कोडॅक क्रोमा झुम लेन्सवाला कॅमेरा नाही. जास्ती पुढे गेले असते तर चित्र कदाचित् धूसर आले असते. असे १-२ वेळा झाले आहे आणि हा कॅमेरा डिजीटल नसल्याने रोल धुतल्यावरच चुका / अपेक्षित सुधारणा कळतात.

__________________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

स्कॅन

हा स्कॅन केलेला फोटो असावा कदाचित. क्रॉप करुन पहा. म्हणजे नको असलेला भाग काढता येईल.





उत्तम प्रकाशचित्र

वारली चित्रकलेचा उत्तम नमुना. आजूबाजूच्या हिरवाईमुळे खूप जिवंत वाटते.

कदाचित आणखी लांबून बाजूच्या बावेचाही पूर्ण समावेश होणारे तिरकस प्रकाशचित्र जास्त आकर्षक वाटले असते.

वेळ

चित्राचा विषय चांगला आहे पण चित्र काढण्याची वेळ चुकली असे वाटते. सकाळच्या/पहाटेच्या कोवळ्या उन्हात तिरपी किरणे दिसत असताना एका कोनातुन हे चित्र काढले तर खूपच खुलुन दिसेल. पुन्हा इथे जाणे शक्य असेल तर नक्की प्रयोग करुन पाहा.

आहे तसे आवडले

बाव अर्धवट कातरला गेला आहे, तो कमी-जास्त केला असता तर चालला असता.

माझ्या दृष्टीने हे घराचे चित्र आहे.

भित्तिचित्राचा फोटो काढायचा असता तर झूम, दिवसाची वेगळी वेळ, वगैरेंबद्दल सहमत.

 
^ वर