उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका - ३१
ध्रुव
October 14, 2008 - 8:57 am
नमस्कार मंडळी,
आज सकाळी कवडी (पुण्याजवळ) येथे गेलो होतो. सुर्योदयाचे फोतो व काही पक्ष्यांचे फोटो काढले. हा फोटो कसा वाटतो ते सांगा. फोटो आवडला नसला तर का नाही आवडला हेही सांगा.
कळावे,
ध्रुव
एक्सिफः
Camera: Nikon D40
Exposure: 0.002 sec (1/500)
Aperture: f/5.3
Focal Length: 155 mm
Metering Mode: Pattern
दुवे:
Comments
माझे मत
फोटोचा विषय चांगला आहे. पण फोटो तांत्रिक दृष्ट्या चुकल्या सारखा वाटतो.
कल्पना चांगली आहे
चांगले मुद्दे :
सूर्य/आकाश सोडून बाकी सर्व वस्तू सिल्हुएट (काळ्या आकृती) आहेत.
फोअरग्राउंड मध्ये धूसर गवत घेतले आहे. एक वेगळाच दृष्टिकोन. (सूर्यास साष्टांग नमस्कार.)
क्षितिजरेषा १/३ वर घेऊन उत्तम केले आहे.
माडाच्या झावळ्या आणि विजेचा खांब यांची चौकटीतील मांडणी फारच छान.
सुचवायचे बदल :
सगळ्यात जवळची गवताची पाती हाताने दाबून खाली बसवायला हवी होती. ऑट-ऑफ-फोकस असली, तरीही ती फोटोमध्ये धूसर उभ्या रेषांच्या स्वरूपात येत आहेत.
सूर्य मध्यात न घेता थोडा एका बाजीला घ्यायला हवा होता. नरळाचे झाड आणि विजेचा खांबही जर १/३, १/३ वर हवा होता, तर ते बसल्या जागेवरून शक्य नाही. पंधरावीस फूट उजवीकडे, किंवा डावीकडे जाऊन साष्टांग नमस्कार घालायला हवा होता.
आताही उजवीकडची किंवा डावीकडची पट्टी कातरून काही सुधारणा करता येईल का असे बघावे. कदाचित विजेच्या खांबाची आहुती द्यावी लागेल. (माडाची आहुती देऊ नये.)
आय एस ओ आकडा थोडा कमी, एक्स्पोझर वेळ थोडा लांब, असेही चालले असते, असे वाटते.
सुंदर चित्र
फोटो आवडला, फारच सुंदर !!!
छान फोटो
फोटो छान आहे..प्रत्येकाचा बघण्याचा द्रुष्टीकोन वेगवेगळा असल्याने प्रतिक्रिया विविध प्रकारच्या येणारचं..पण तुमचा प्रयत्न चांगला आहे.
सहमत आहे
मला हे चित्र आवडले. गवताच्या मागे लपलेल्या वाघाच्या डोळ्यातून सूर्यास्त पाहत आहोत असे वाटले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चित्र आवडले
आजानुकर्णांची कल्पना देखील. :-)
आंबेमोहोर काय?
शेतात कोणते भात लावले होते? ;)
अवांतर(?) -
फोटो मस्स्स्त आहे. मला तरी जाम आवडला. :)
चित्र आवडले
चित्र आवडले ध्रुव! सकाळचे वॉर्म कलर्स छान आले आहेत. गवताची सगळ्यात पुढची १-२ पाती हाताने दाबायला हवी होती ह्या धनंजयच्या मताशी सहमत. तसेच थोडा काँट्रास्ट देखिल कमी वाटला. काँट्रास्ट थोडा वाढवुन पुन्हा देत आहे.
सर्वांचे आभार
गवताच्या पात्याबद्दल सगळ्यांनी सांगीतले की पगवत बाजुला करायला हवे होते. पण, मला खरतर गवत फोटोमध्येच हवे होते.
आज परत कवडीला गेलो होतो. आजही त्याच वेळेला तिथेच उभा राहुन हा फोटो घेतला. काही सुधारणा आहे का?
Exposure: 0.003 sec (1/320)
Aperture: f/18
Focal Length: 220 mm
आधीची लेन्स वेगळी होती आजची वेगळी आहे. आधी ५५-२०० निकॉन ही लेन्स् वापरली होती व १५५ मिमि फोकल लेंन्थला फोटो घेतला होता. आज जरा अजून टाईट (;)) काँपोसिशन ठेवले आहे. आज सिग्मा ७०-३०० या लेन्सने फोटो घेतला आहे, २२० मिमि फोकल लेंन्थला.
कोलबेर यांच्या म्हणण्याप्रमाणे, आधी च्या चित्रात सुधार केला असता तर अजून छान दिसले असते हे आता जाणवते.
-
ध्रुव
मस्त
हे मस्त आहे जास्त. :) कुठे आहे हे कवडी?
मस्त!
दुसरे चित्र अधिकच आवडले. विशेष म्हणजे सूर्याच्या खालच्या बाजूला ढगांमुळे डाग पडल्यासारखे वाटत आहेत. जरासा कापल्यासारखा वाटत आहे. या सुंदर छायाचित्राबद्दल धन्यवाद.
सौरभदा-
कवडी
हे बघा
कवडी सोलापुर रस्त्यावर हडपसर नंतर जेथे चारपदरी रस्ता सुरु होतो तेथे १.५ किमी डाव्याबाजुला आत आहे. सापडायला अत्यंत सोपे व पटकन जाऊन येण्यासाठी मस्त ठिकाण आहे.
-
ध्रुव
धन्यवाद
तुझ्या फोटो मुळे एकदा जाऊन यावे असे वाटतेच.