उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका - ३०
आरागॉर्न
October 11, 2008 - 8:20 am
दक्षिण इटलीमध्ये सिसिलीच्या एका डोंगरावर चढून जात होतो. मध्ये धाप लागली म्हणून थांबलो आणि बाजूला पाहिले तर साहेब टक लावून माझ्याकडे बघत होते. जवळजवळ ३० सेकंद आम्ही एकमेकांकडे पहात होतो. :) मग क्यामेरा काढून पटकन फोटू काढला.
मांजरांच्या चेहेर्यावर भाव असू शकतात का? असले तर इथे कोणता भाव (बहीण?) आहे असा विचार बरेचदा मनात येतो. कंटाळा की माइल्ड क्युरिऑसिटी?
दुवे:
Comments
तत्परता
चित्र घेण्यातली तत्परता आवडली. पण न फोकस झालेला भाग थोडा विरस करतोय असं वाटत.
हम्म
असे वाटण्याची शक्यता आहे पण इलाज नव्हता. वेळ मिळाला की क्रॉप करून बघतो. कदाचित सुधारणा होण्याची शक्यता आहे.
----
होय क्रॉप करावे
आणि प्रतिसादात चिकटवावे. मला फ्लिकरचा "मोठ्या आकारातला फोटो"चा दुवा सापडला नाही - मीच प्रयोग करणार होतो.
मांजरीच्या चेहर्यापुढे एक गवताचा तुरा येत आहे (तो ऑट-ऑफ-फोकस आहे, हे चांगले आहे, तरी...), त्यामुळे क्रॉप करताच येईल असे सांगता येत नाही.
क्रॉप
क्रॉप केल्यावर असा दिसतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे गवताचा तुरा येतोच त्यामुळे क्रॉपिंगने उद्दिष्ट साध्य होते की नाही याबद्दल शंका आहे.
मोठ्या आकारातील मूळ फोटू इथे
----
कॅक्टस ब्युटी
नशीब! ते छोटं मांजर होतं.. विचार करा मार्जार कुलातूतील बिग कॅट अचानक दिसली/ला असती/ता तर ;)
बाकी हिरव्या गार अरण्यातही निवडुंग बघून बरे वाटले
ती "कॅक्टस ब्युटी" तुमच्याकडे काहिश्या दयेने+रागाने+संशयाने बघतंय असं वाटलं ;)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
:)
बिग कॅट दिसली असती तर फोटू सोडाच, फोटोग्राफरही दिसला नसता :)
ती "कॅक्टस ब्युटी" तुमच्याकडे काहिश्या दयेने+रागाने+संशयाने बघतंय असं वाटलं ;)
दया : काय वेड्यासारखे काहीतरी गळ्यात लटकवून फिरतोय?
राग : आणि इथे कशाला आलाय कडमडायला?
संशय : काही करण्याच्या आत धूम ठोकावी का?
----
अवांतर
माझे माऊ पण दिसायला असेच आहे. पांढर्या रंगावर काळे, केशरी पट्टे, ठिबके, ठप्पे ही जगभरच्या मांजराची खासीयत म्हणता येईल.
अवांतर प्रतिसादाबद्दल राग मानू नये कारण छायाचित्रण कलेतील मला ओ की ठो कळत नाही :) लिहिणार तरी काय... मी बरेच वर्ष एकच कॅमेरा वापरत आहे तो म्हणजे कोडॅक क्रोमा. फोटो चांगले येतात त्याने पण रोल भरण्यासाठी जी कसरत करावी लागते त्याला तोड नाही. त्यापेक्षा फोटो काढणे टाळलेले बरे असे मी स्वत:ला समजावते.
_________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।
काळे-हिरवे मांजर
माझ्या एका आवडत्या अनुदिनीतील मांजर काळे-हिरवे आहे :)
राग येण्याचा प्रश्न नाही. माझ्या दृष्टीने मांजर हा विषय कधीच अवांतर होऊ शकत नाही. :)
----
मांजराचे भाव
फोटो झूम करण्याचा कंटाळा तर नाही ना केला? झूम करून लावा म्हणजे भाव का बहिण ते दिसतील.
- राजीव
झूम
कंटाळा नाही, वेळ नाही मिळाला. :)
---
मांजराच्या चेहर्यावरील भाव
'द स्टोरी ऑफ वेब्स्टर' या कथेत वुडहाऊसने मांजराच्या चेहर्यावरील भावाचे आणि त्यानंतरच्या प्रसंगांचे झकास वर्णन केले आहे. वरील मांजर फारच 'नॉर्मल' वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अरे वा!
हे पुस्तक वाचले नव्हते. आता वाचायलाच हवे. :)
----
आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
----