गरज आणि सुविधा

नमस्कार मंडळी,
काहि दिवसांपुर्वी उत्पादन - संशोधन हा नवा समुदाय तयार झाला. समुदायाच्या पानावर माहिती मिळेलच. तरी सुद्धा येथे लिहायचे कारण म्हणजे आपल्या काही गरजा असतात. आपल्याला काही सुविधा हव्या असतात. त्या अनेकदा आपण बाजारात जे मिळते आहे त्यावर भागवतो अथवा समाधान मानुन घेतो. पण बाजारातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या गरजे प्रमाणे बनवलेल्या असतात?
आता आपण एक साधेच उदाहरण घेउ. आपल्याला इंटरनेट वरुन बरेच व्यवहार करता येतात. पण सर्वसामान्यांना त्याचा खरच फायदा होतो? आता नेटबँकिंगची सुविधा उपलब्ध आहे. जोवर ती पुर्णपणे इंग्रजी भाषेत आहे, तोवर सर्वसामान्य नागरीक ती वापरायचा विचार करेल? नाही. नक्कीच नाही. आता मला महानगर पालिकेचा मालमत्ता कर भरायचा आहे. तर त्या संबंधीत काही अशी सुविधा आहे का, जी वापरुन मला माझा कर नक्की किती आहे ते पाहता येईल आणि मग ऑनलाईन भरता देखील येईल? इतरांचे माहित नाही. पण पिंपरी-चिंचवड मनपाची अशी सुविधा आहे. (पिंपरी-चिंचवड मनपाची सुविधा).
आता हे झाले एक उदाहरण. आपल्याला असे आणखी काही हवे वाटते का? आपल्या मनात असे काही विचार/कल्पना येतात का? असल्यास येथे जरुर मांडा. बाजारातली उत्पादने वापरु नका असे म्हणणे अजिबात नाही. पण कदचित, आपण सगळे एकत्र येऊन त्यापेक्षा चांगले उत्पादन बनवु शकतो. असे एखादे उत्पादन जे आपले रोजचे थोडेसे काम हलके करेल.
हा धागा, अश्या कल्पना एकत्र मांडण्यासाठी तयार केला आहे. त्याचा जरुर फायदा घ्या. आपल्या कल्पना येथे मांडा. कदाचित काहींना त्या हास्यास्पद वाटतील. पण उद्या त्यातुन एखादे चांगले उत्पादन - संशोधन सर्वांसमोर येईल.

Comments

उत्तम कल्पना.

मुख्य म्हणजे कोणतीही गोष्ट विकण्यासाठी एक यंत्रणा लागते आणि तिचाही खर्च शेवटी ग्राहकाकडुनच वसुल केला जातो.

महाजाल हे प्रभावी माध्यम आहे आणि याचा योग्य तो वापर केला तर वितरण आणि जाहिरातीचा खर्चा आणि त्याप्रमाणात किंमती कमी होऊ शकतील असा माझा अंदाज आहे.

एखादी कल्पना मांडा

द्वारकानाथजी,
एखादी कल्पना मांडुन सुरुवात करायला काही हरकत नाही.

सुविधा?

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मिळकत कर किती भरावा लागेल हे दाखवणारी सुविधा. ह्या सुविधेसाठी जी माहिती भरावी लागेल ती फक्त बांधकामव्यवसायिकच भरू शकेल. सामान्य जनतेला ते शक्य नाही. आपले बिल पाहिले की कर किती भरायचा ही माहिती कुठलीही मेहनत न करता क्षणार्धात मिळते. --वाचक्‍नवी

पहिल्या बिलावर

गरजेची माहिती पहिल्या बिलात पाहता येउ शकते. तसेच कराची टक्केवारी बदलेली असु शकते. असो, हे एक उदाहरण म्हणून दिले होते.

एक फायदा

सुविधा अशी निर्माण व्हावी कि अनासक्त माणसाला देखील् नसलेली गरज उत्पन्न व्हावी.
प्रकाश घाटपांडे

एक माझी नसलेली कल्पना

मागे कुणीतरी दिलेल्या दुव्यातून आफ्रिकेतील दुष्काळी भागात पाणी आणण्याकरता जाणार्‍या लोकांकरता मिनि-रोडरोलर सारख्या दिसणार्‍या ड्रम्स चे चित्र पाहिले होते. या मागची कल्पना अशी की मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणणार्‍या लोकांच्या पाठीचे कणे अणि इतर स्नायू यांचे प्रचंड नुकसान होते. त्याऐवजी रोलिंग फ्रिक्शन वापरावे. ड्रम्स् मजबूत प्लस्टिकचे असून त्याच्या दोहो अंगाला अल्युमिनियमच्या मजबूत दिसणार्‍या पट्ट्या जोडल्या होत्या. आणि ड्रम्स् रोल करायचे.

आपल्या महाराष्ट्रात हे नक्की उपयोगी होईल. कुणी याबद्दलचे लेग्-वर्क करणार असेल तर मी या प्रकल्पाला हातभार लावायला तयार आहे.

उत्तम

उत्तम कल्पना आणि सुरुवात. आपण हि कल्पना विस्तृत स्वरुपात देऊ शकाल का? आपण हे महाराष्ट्रात तयार करता येईल का? यावर नक्कीच प्रयत्न करु शकतो.

अजुन एक छान कल्पना

मुंबईत नेढ्यात धागा ओवायला एक उपकरण दोन रुपयांत रस्त्यावर सर्वत्र मिळते. मुळात सुईचं नेढं अगदी लहान असतं. त्यात धागा ओवणे ही कसरतच. विशेषत: म्हातार्‍या शिंप्यांना तर ही कटकटच होऊन बसते. त्यांच्यासाठी हे उपकरण म्हणजे वरदानच.

एक पातळ स्टीलची चकती असते. तिला एक बारीक तार ><> ह्या आकारात लावलेली असते. ती चकती डाव्या हातात धरायची आणि हातात सुई घेऊन तिच्या अथवा शिवणयंत्रातील सुईच्या नेढ्यात ती बारीक तार घालायची. डाव्या हातातील चकतीने नेढ्याच्या पृष्ठभागावर २-३ वेळा ती तार दाबली की लगेच ती त्या भोकातून आत जाते. तार पुढे गेली की चित्रात दाखविल्याप्रमाणे त्यात सहज दोरा ओवता येतो.

कल्पना

नमस्कार,
कल्पना सांगितल्या बद्दल धन्यवाद... आपण या कल्पनांसाठी लवकरच वेगवेगळ्या चर्चा सुरु करु. धन्यवाद.

 
^ वर