उत्पादन - संशोधन

आपल्यापैकी बहुतेक जण कोणत्यातरी उत्पादनाशी प्रत्यक्षरीत्या अथवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असतील. हे सांगायचा मुद्दा असा की आपण भारतीय / अनिवासी भारतीय आपली बुद्धी अनेकदा कोणा अभारतीय संस्थेच्या उप्तादनाच्या संशोधनासाठी खर्च करतो. आपल्यामध्ये नवे उत्पादन बनवण्याची क्षमता आहे पण आपण स्वतः ते बनवत नाही. यासाठी कदाचित वेगवेगळ्या मर्यादा असतील. पण उपक्रमासारख्या व्यासपीठाने आपल्यासारख्या समविचारी मराठीजनांना एकत्र आणलं आहे. याचाच फायदा घेउन आपण सुद्धा एखादे उप्तादन बनवलं तर? ॐकार ने गमभन बनवून तर हे सिद्धच केलं आहे की आपल्याला असे काही करणे मुळीच अशक्य नाही. तर, ज्यांना असे काही नवे करण्याची इच्छा, उर्मी आहे त्या सर्वांसाठी हा समुदाय आहे. आपली संकल्पना काही असु देत. एखादे शेतीचे औजार, स्वयंपाक घरातले एखादे उपकरण की एखादा महासंगणक, थोडक्यात आपले आयुष्य सोपे करणारे कोणतेही तंत्रज्ञान. आपल्याकडे जर अशा काही संकल्पना असतील तर त्या येथे जरूर मांडा. आपण सर्व मिळून त्यावर चर्चा करू, शक्याशक्यता तपासू. जर शक्य असेल तर एकत्र येउन एखादा खराखुरा उपक्रम राबवू. चला तर मग. मांडा आपल्या कल्पना. शेवटी गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडुन खाल्ली काय?

 
^ वर