मांगिरबाबा

मांगिरबाबा म्हणजे काय?

लोकसत्तामधे एका ठिकाणी याबाबत उल्लेख वाचला
http://loksatta.com/daily/20080828/vishesh.htm
तो असा:
" रस्त्यावरून सहज जाताना, ओढ्यावरच्या जुन्या पुलापाशी, एखाद्या किल्ल्याबाहेर, जुन्या वाड्याबाहेर,जिथे जुने बांधकाम असेल त्या ठिकाणी मांगरबाबाचे ठाणे आढळते. कोण आहेत हे मांगिरबाबा? जुन्या काळी, विशेषत। पेशवाईत वाडा- महाल बांधताना अडचणी आल्या, केलेले बांधकाम ढासळू लागले तर अस्पृष्य समजल्या गेलेल्या समाजातील माणसांचा बळी दिला जात असे.बळी दिल्यावर क्षोभ उसळू नये म्हणून शेंदूर लावून उभा केलेला देव म्हणजे मांगिरबाबा."

बहुधा याच मांगिरबाबाचा उल्लेख गेल्यावर्षीच्या 'एकलव्य" सिनेमातही होता. राजवाड्याच्या पायर्‍यांवर असलेली मूर्ती आपल्या आजोबाची असल्याचे संजय दत्त सांगतो (त्यात मांगिरबाबासाठी कोणता शब्द वापरला होता ते आठवत नाही)

या मांगिरबाबाबद्दल कुणी आणखी काही माहिती देऊ शकेल काय?
अशी मांगिरबाबाची ठाणी कुणी पाहिली आहेत काय?

आणखी एकः
मुंजाबाबा/ मुंजा म्हणजे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

मांगीरबाबा

जुन्या काळी, विशेषत। पेशवाईत वाडा- महाल बांधताना अडचणी आल्या, केलेले बांधकाम ढासळू लागले तर अस्पृष्य समजल्या गेलेल्या समाजातील माणसांचा बळी दिला जात असे.बळी दिल्यावर क्षोभ उसळू नये म्हणून शेंदूर लावून उभा केलेला देव म्हणजे मांगिरबाबा."

मला वाटतं नरबळी देण्याची पद्धत, तीही विशेष करून एखादे बांधकाम उभं करत असता त्याचा पाया भरतेवेळी देण्याची पद्धत होती. अशाच प्रकारे सवाष्ण किंवा ओल्या बाळंतिणीचा बळीही दिला जाई का? असा एक मराठी चित्रपट असल्याचे आठवते. त्यात नदीवर धरण/पूल/ बांध बांधायचा असतो आणि तो उभा राहत नसतो. तो उभा करण्यासाठी शेवटी पाटलाची सून आपला बळी देते. (बापरे! काय भयंकर अंधश्रद्धाळू प्रकार) कोणाला आठवतो का हा चित्रपट?

मांगीरबाबा म्हणजे काय ते माहित नव्हते. आज कळून आले.

मुंजा म्हणजे ज्याची मुंज झाली आहे परंतु सोडमुंज झालेली नाही, लग्न झालेले नाही आणि हे सर्व व्हायच्या आधीच ज्याला मृत्यू आला तो मुक्ती न मिळाल्याने मुंजा बनतो. मुंजा हा पिंपळावर राहतो असे मानले जाते. रात्री अपरात्री पिंपळाच्या झाडाजवळून जाणार्‍या पांथस्थांना हा छळतो, तरी बायका त्याचे मुख्य लक्ष्य असतात. मुंजाला शांत करण्यासाठी पिंपळाच्या खोडाला दोरा बांधला जातो आणि पिंपळासभोवती पार.

अवांतरः उपक्रमावर पारावरचा मुंजा म्हणून एक सदस्य होते. हल्ली दिसत नाहीत. त्यांनी पार सोडला असावा. :)

धन्यवाद

लहानपणी भुताखेतांच्या गोष्टींमधे मुंजाचा उल्लेख वाचला होता. नक्की अर्थ माहीत नव्हता

यशवंतराव

श्री. म. माटे यांच्या "उपेक्षितांचे अंतरंग" या पुस्तकातील एका गोष्टीत दिलेल्या माहितीप्रमाणे जुन्या काळी वाडे, महाल, किल्ले इत्यादींचे बांधकाम सारखे ढासळू लागले की नरबळी देत असत व त्याच्या स्मरणार्थ त्या वाड्यात, महालात वा किल्ल्यात एक कोनाडा ठेवीत असत. (बहुधा रात्रीच्या वेळेस त्यांत एखादा दिवा ठेवीत असावेत). त्या कोनाड्याला यशवंतराव म्हणत असत. ऐतिहासिक जुन्या बांधकामांत असे कित्येक "यशवंतराव" आढळतात.

मांगिरबाबाची ठाणी

असे एक ठाणे पुण्यात वाकडेवाडीला आहे.
पुणे मुंबई महामार्गावर यामाहाच्या शोरुमसमोर

भयंकर

बापरे! भयंकर वाटले.
वाडा का ढासळतो या कारण मीमांसे ऐवजी माणूसच बळी द्यायचा?
आणि मग त्याच वाड्यात रहायला पण जायचे....?

आपला
गुंडोपंत

माणूस?

त्याकाळी बिचार्‍या अस्पृश्य समजल्या जाणार्‍या माणसांना माणसाचा दर्जा नव्हता. स्त्रियांनाही तो नव्हता.

ढोल, गंवार, शुद्र, पशु, नारी
ये सब ताडन के अधिकारी

हे माहित आहे ना? :-)

 
^ वर