संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाला वाहिलेले संकेतस्थळ

नमस्कार!

प्रथम या संकेतस्थळाच्या निर्मात्यांचे या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याची इथे चर्चा व्हावी हे मराठी भाषेच्या दृष्टीने चांगली घटना आहे.
ऑगस्ट महिन्याच्या २३ तारखेला ज्ञानेश्वर जयंती दिवशी संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाला वाहिलेले संकेतस्थळ अमृतानुभव डॉट कॉम
याचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत आणि मा खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते डोंबिवली येथे झाले.
याच सोहळ्यात कवी हेमंत राजाराम यानी लिहिलेल्या अमृताचा अनुभव - ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले.
मराठी साहित्यरसिकाना विनंती की, त्यानी या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपल्या प्रतिक्रिया / सूचना नोंदवाव्यात.

कळावे

आपला

हेमंत राजाराम
hemantrajaram@amrutanubhav.com
http://www.amrutanubhav.com
९८९०६४४२४७

लेखनविषय: दुवे:

Comments

दुव्याबद्दल आभारी !!!

अमृतानुभव या मराठी संकेतस्थळाचा दुवा दिल्याबद्दल आभारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच

इतक्यातच म्हणजे अक्षरशः आठ दिवसांपुर्वी गो नी दांडेकर लिखित, पांच संत चरित्रे वाचली. त्यात ज्ञानेश्वरांच्या चरित्रात निवृत्तीनाथांच्या म्हणण्यानुसार अमृतानुभव कसे लिहिले गेले याचा उल्लेख आहे. त्याबरोबर अमृतानुभव वाचावेसे वाटले आणि इथे लगेच त्याच दुवा मिळाला.
आपल्या या स्थळाला पाहून आनंदित झालो.

मात्र अमृतानुभवाचे निरुपणही वाचायला मिळाले तर आवडेल.

तसेच याच स्थळावर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव तसेच त्या संदर्भातली पुस्तके, सिडी इत्यादीही विकत मिळावीत असे वाटले. किंवा तशी आपली इच्छा नसल्यास जालावर कुठे विकत मिळतात याचा उल्लेख/दुवा तरी असावा.

मला अजून काही माहिती मिळाल्यास मी नक्की देईन.

-निनाद

अमृतानुभव

श्री हेमंतराव,

संकेतस्थळ फारच आवडले. नेटके आणि प्रेक्षणीय झाले आहे. अजून बरेच काम बाकी आहे असे दिसते. (उदा. अमृतानुभवावरील लेख वगैरे सदरे)

संकेतस्थळ बुक्मार्क करुन ठेवले आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान -

संत वाङ्‌मयाला वाहिलेले हे स्थळ पाहून बरे वाटले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ इ. wikipedia, khapre.org इथे उपलब्ध आहेतच. हरिचिंतन इथेही हे ह्या सर्व साहित्याचे दुवे तसेच त्यावरच्या पुस्तकांचे दुवे आहेत. पण अजून तुकारामगाथा, एकनाथांचे वाङ्मय आणि अशा बर्‍याच संतांचे साहित्य (अर्थासहित) महाजालावर यायचे आहे.

एकोहम्

शुभेच्छा...

सुंदर संस्थळ. या संकेतस्थळाला माझ्या व्यक्तिगत व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर