छायाचित्र टीका - २९

आधिच्या छायाचित्र परिक्षणाबद्दल सर्वांना धन्यवाद.
आज दुसरा फोटो टाकत आहे.
IMG_1598

सांगा कसा वाटतो ते!
मला वाटलेली त्रुटी:
शटर स्पीड खूप जास्त होता. आजून थोडा कमी चालला असता. चित्र खूपच स्थीर वाटते आहे. विशेषतः उडणार्‍या फवार्‍यामूळे. पण हा पुतळ्याचा फोटो असल्यामुळे कदाचित चालून जाईल.
एक्स्पोजर जरा वाढवलेले आहे कारण मुर्तीच्या पांढर्‍या रंगामूळे आजूबाजूचा गडद हिरवा रंग खूपच काळावाटत होता. (पण हे फोटो काढतानाच केले आहे. फोटो काढल्यावर काहीच बदल केला नाही.)
EXIF:
Camera: Canon EOS Digital Rebel XTi
Exposure: 0.002 sec (1/500)
Aperture: f/18
Focal Length: 55 mm
ISO Speed: 320
Exposure Bias: 0/3 EV
Flash: Flash did not fire

लेखनविषय: दुवे:

Comments

ठिक वाटले.

ठिक वाटले. अजून जवळून चालले असते.
समोरचा हिरवळीचा बराचसा परिसर अनावश्यक वाटला. जवळून घेतल्यावर रंगीत फुलेही छान दिसली असती .
खरं तर ती फुलं टाळाता आली असती तर अजून छान कारण ती फुलझाडं सिमेट्री घालवतात असे वाटले.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सहमत पण

सहमत पण ती फुले टाळता आली असती असे वाटत नाही.





जवळून उभा

जर कारंजेही दाखवायचे आहे तर जवळून उभा काढता आला असता.
पण फुले टाळता येणे दुरापास्त दिसते.

कृष्णधवल

ऋषिकेश यांच्याशी सहमत.

श्री. महेश हातोळकर म्हणतात की चित्र मूर्तीचे आहे. म्हणून काही बदल सुचवतो.
१. अवांतर गुंतागुंतीचे आकार, क्षितिजरेषा वगैरे टाळाव्यात - मूर्तीवरून लक्ष विचलित होते
२. मूर्ती बहुतांशी सफेत आहे - तिच्यात छाया-वैविध्याने (शेडिंगने) आकार तयार होत आहेत. तिच्यात रंगवैविध्याने (कलर कॉन्ट्रास्टने) आकार तयार होत नाही. त्यामुळे चित्रात अवांतर तपशिलांत रंगवैविध्य असले, तर लक्ष विचलित होते. रंग टाळता येणार नसतील, तरी चित्र कृष्णधवल करून त्यांचा परिणाम टाळला जाऊ शकतो.

B&W1
सूचित बदल -१

मागचा कारंजाचा फवारा (माझ्यासाठी तरी) रोचक नाही. म्हणून हा आणखी एक फरक.

b&w2
सूचित बदल -२

कदाचित श्री. महेश हातोळकर यांना ती मूर्ती तिच्या रम्य परिसरात दाखवायची आहे. असे असल्यास माझ्या सूचवण्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.असे असल्यास त्यांनी भिंग वाईड अँगलमध्ये घेऊन मूर्तीच्या अगदी जवळ जाऊन चित्र काढायला हवे होते.

अप्रतिम!

छायाचित्रण कलेतले काडीचेही ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचे मत...
अप्रतिम छायाचित्र!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर