ती येत आहे
हो! हो!! ती येत आहे. अरे हो, पण ती कोण? असे वैतागू नका!! ती म्हणजे कोणी तारका नाही हो. पण एखाद्या नव तारकेच्या आगमना इतकीच अनेक तरुण तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, ती आहे ...... यामाहा एफ - १६. यामाहा इंडिया लिमिटेडचे नवीन उत्पादन, नवीन मोटर सायकल, नवी यामाहा एफ झेड - १६.
एफ झेड- १६
गेल्या काही दशकांपासून यामाहाने जगभराप्रमाणेच भारतात सुद्धा शक्तिशाली मोटरसायकलच्या बाजारपेठेवर अनभिषिक्त राज्य केले आहे. आपल्या मोटर सायकलींचे चाहते निर्माण केले आहेत. एस्कॉर्टस इंडिया सोबत सामंजस्य करार करुन यामाहाने राजदूत यामाहा आरडी ३५० ही मोटर सायकल भारतीय दुचाकी बाजारात आणली आणि पाहता पाहता दुचाकीच्या बाजाराचे रूपच पालटून टाकले. यामाहाने आरडी ३५०, राजदूत आणि सर्वात लोकप्रिय अशा आर एक्स १०० या गाड्या भारतीय बाजारपेठेसाठी तयार केल्या आणि यशस्विरीत्या बाजारपेठ काबीज केली. स्पर्धेत कावासाकी, होंडा, सुझुकी यासारखे त्यांच्याच मायदेशातले स्पर्धक असून सुद्धा स्वतःची वेगळीच ओळख ठेवली होती. पण ९० च्या दशकात प्रदूषण प्रमाणीकरणाच्या लाटेत जवळपास सर्वच टू-स्ट्रोक मोटर सायकलींचा अस्त झाला. त्यामध्ये सुद्धा जाता जाता यामाहाने आर एक्स जी आणि आर एक्स १३५ हि दोन उत्पादने बाजारात आणली आणि ती सुद्धा लोकप्रिय सुद्धा झाली. पण त्यानंतर मात्र खास करुन पुर्ण पणे भारतीय व्यवस्थापनाच्या एस्कॉर्ट यामाहाने हाय खाल्ली. तेव्हा पासून आजवर बाजारात आलेली यामाहाची सर्व फोर स्ट्रोक वाहने बाजाराने नाकारली. एस्कॉर्ट यामाहाने कंपनीची उतरती कळाच सुरू झाली म्हणा ना!! तो पर्यंत फोर स्ट्रोक मोटरसायकलच्या बाजारात हिरो होंडा आणि बजाज यांनी धुमाकूळ घातला होता. आलिकडच्या काळात तर पल्सरने मोटरसायकल चालकांवर अशी काही जादू केली की मोटरसायकल म्हणजे पल्सर असे समीकरणच बनून गेले. पण यामाहाने हार नाही खाल्ली. शेवटी कोणतीही कंपनी धंदा करते ती फायदा मिळवण्यासाठीच. या दरम्यान एस्कॉर्ट यामाहाचे यामाहा इंडिया झाले अन यामाहाच्या भारतीय बाजारपेठेत एक नवा अध्याय सुरू झाला.
यामाहा इंडियाने नव्या दमाने कामाला सुरुवात केली. जगभर प्रसिद्ध असणार्या आपल्या काही वाहनांचा आणि भारतीय बाजारपेठेचा अभ्यास केला. नवे चांगले उत्पादन तर हवेच पण त्या सोबत वितरकांचे आणि सेवादात्यांचे विणलेले मोठे जाळे सुद्धा गरजेचे आहे हे यामाहा ने जाणले. यामाहाच्या लोकप्रिय मोटरसायकलींचा वंश भारतात वाढवायचा ठरवला. तो ही भारतीय बाजारपेठेला मान्य होईल असा.. अन मग आली , ० ते ६० की.मी प्रति तास वेग फक्त ३.२ सेकंदात गाठणारी यामाहा आर १५ ही नवी मोटर सायकल. यामाहा आर-१ ची हि भारतीय पिढी आहे. महागडी आहे. आता महाग आणि कमी इंधन क्षमता म्हटले मग आम्ही मोर्चा परत बजाजकडे :) पण आमचा मोर्चा तिकडे वळता वळता अचानक थांबला. का? अहो आम्ही तिची झलक पाहिली. अन आम्ही थबकलोच. तीच रूप-रंग आम्हाला तरी खूप आवडले. आर - १५ आमच्यासाठी नाही पण हि येणारी एफ - १६ मात्र आमच्यासाठीच आहे याची खात्री पटली.
एफ झेड - १६ हि मोटरसायकल बजाज पल्सर, होंडा युनिकॉर्न आणि सीबीझी एक्सट्रीम यांना टक्कर द्यायला येत आहे. खालच्या चित्रात या गाडीचे काही ठळक मुद्दे आहेत.
|
एफ झेड - १६ ची तांत्रिक माहिती खालील प्रमाणे :
|
या गाडीचे एकूणच सगळे काही प्रभावी आहे. गाडीचे एकूण वजन १४० की. ग्रॅ असेल आणि सर्वोच्च वेग ताशी १४० की. मी असेल. गाडीचा डॅश बोर्ड डिजीटल असेल.
यामाहा एफ झेड - १६ ची काही चित्रे:
मोटर सायकलच्या वेगवेगळ्या रंगसंगतीः
मी तरी गाडीची आतुरतेने वाट पाहतो आहे. यामाहाचे उत्पादन नेहमीच उठावदार असते. आता बघूयात येत्या शनिवारी. गोव्याच्या रस्त्यावर ती येत आहे. मी पुण्याच्या शोरूम मध्ये जाऊन येईनच. तुम्ही हि पाहा.
अवांतरः माहितीचा स्त्रोत - महाजाल. वर लिहिलेली माहिती तंतोतंत खरी आहे असा लेखकाचा दावा नाही. तसेच लेखकाचा यामाहा इंडिया कंपनी सोबत कोणताही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध नाही.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
Comments
धूम मचा दे
देखणा लेख आहे.
यामाहा एफ झेड - १६ ची चित्रदर्शी माहिती आवडली.
१३ लि. मध्ये किती किमी जाते ही गाडी? आणि किंमत किती आहे अदमासे? इतर मोटरसायकलींशी किंमतींच्या तुलनेत उतरणारी आहे का?
किंमत
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हि मोटरसायकल श्रेष्ठ श्रेणीत (Premium Segment) येते. त्यामुळे याची इंधनक्षमत नक्कीच बजाज पॅटिना ओर् एक्सीड सारखी असणार नाही. माझ्या अंदाजा प्रमाणे ४० च्या पुढे मागे ५ किमी अशी असेल. किंमत या श्रेणीतल्या इतर गाड्यांप्रमाणेच ७०००० रु च्या आसपास असेल. रस्त्यावर आल्यावरच नक्की काय ते कळेल.
यामाहा आर-१५ ला ऑइल कुल्ड इंजिन आहे. किंमत १ लाख. त्यामुळे आमच्या सारखे सर्वसामान्य पाहिजे असुन सुद्धा घेणार नाहीत. त्यांच्यासाठी हा पर्याय नक्कीच विचार करण्यासारख्या आहे. नुकतीच हि बातमी वाचल्याने आर-१५ नाहीच घ्यायची असे ठरवले.
क्या बात है
चांगली देखणी आहे.
मुख्य म्हणजे हेच, की काय किंमत असेल?
चाणक्यांनी लिहलेला लेख व शिर्षक "ती येत आहे" वाचून पटकन लक्षात येईना. कोण "नॅनो" आता [महाराष्ट्रात] येत आहे की "ममताताई"
नॅनो
नॅनो आधीच आली आहे नकळत. तुम्हा आम्हाला माहित नाही इतकेच.
पिंपरी
पिंपरीसाईडला नॅनो दिसते रस्त्यावर..मागे पाहिली होती. १ महिना झाला असेल.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
पिंपरी सातारा
नॅनोच्या सर्व खडतर चाचण्या सातार्याच्या घाटांमध्ये सुरु होत्या. मी सुद्धा पाहिली आहे नॅनो. टाटा मोटर्सच्या दारातुन चाचण्यांसाठी बाहेर जाताना.
अष्टावक्र ऋषी
मपल्या त ही यामा अष्टावक्र ऋषी वानी दिसतिया. लईच बेंडा आल्यागत उभी हाय.
प्रकाश घाटपांडे
मस्त!
लेख, शिर्षक आणि प्रतिमा सर्वच मस्त आणि माहीती पूर्ण आहे.
प्रियाली प्रमाणेच मी देखील "धूम मचादे" म्हणणार होतो, पण सध्या बच्चन कुटूंबियांच्या कलाविष्कारांवर "आमचा" बहीष्कार असल्याने ते टाळत आहे, नाहीतर तसेच "ये दोसती हम नही.." पण आठवले :-)
धन्यवाद
धन्यवाद. यामाहाची चांगली मोटर सायकल बाजारात यावी असे मला मनापासून वाटत होते आणि आता ती येणार आहे.
लुक
गाडीची तांत्रिक माहिती उत्तम असली तरी लुक थोडे गंडले आहेत असं वाटतं. हेडलाईट कोणीतरी धडक दिल्याने आत गेल्यासारखा वाटतो. पेट्रोलची टाकी खूप उंच वाटते. (हे एक अजून कळालेले नाही की आजकालच्यागाड्यांच्या टाक्या एवढ्या मोठ्या आणि उंच (पोट आल्यासारख्या ) का असतात?).
आर-१५ चे लुक या गाडीपेक्षा उत्तम वाटले. पण एका लाखात नॅनो घेईन. बाईक घेण्याइतका मी बाईकफ्रेक(बाईकवेडा) नाही.
आर १५
पल्सर १५० सीसी गाडीशी तुलना करता काय फायदे-तोटे आहेत हे जर लिहिलेत तर कोणती गाडी घ्यायची हे लगेच ठरवता येईल. ;-) पल्सर सध्या मनात भरली आहे..आणि दिसायलाही एफझेड पेक्षा चांगली वाटते. एफझेडमध्ये असं काय आहे की मी ती घ्यावी(इंटरव्ह्यू क्वेश्चन). तुमचा डिस्क्लेमर वाचला आहे. फक्त माहिती म्हणून विचारतो आहे. :-)
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
आवड आपली आपली
मोटर सायकल खरेदी ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. मला स्वतःला हिरो होंडाच्या मोटर सायकली कधीच आवडल्या नाहीत. तसेच बजाजच्या य एक मोटर सायकलींमध्ये फक्त पल्सरच आवडले. पहिल्या पीढीची पल्सर १५० चालवुन आत्ता पल्सर २०० चालवतो. तसे पहायला गेले तर हिरो होंडाच्या स्प्लेंडरची जी जागा होती ती पल्सरने घेतली असे म्हणता येईल.
मोटर सायकल घेताना तुम्हाला काय हवे आहे हे महत्वाचे आहे. मुळातच कोणतीही गाडी घेताना हा विचार महत्वाचा आहे. मला प्रति लिटर ४०-५० किमी धावणारी आणि शक्तिशाली मोटरसायकल हवी आहे जी एका स्पोर्ट्स बाईक सारखी असेल. पल्सरमध्ये आता हे सगळं आहे पण ती आता अतिसामान्य झाली आहे.
चांगला पिकअप हे यामाहाचे वैशिष्ठ आहे. जे मला हवे आहे. दोघे जण गाडीवर बसल्यावर नरड दाबल्या प्रमाणे (खास करुन बजाजच्या अव्हरेज बाईक्स आणि हिरो होंडाच्या सुद्धा) जर गाडीची अवस्था होत असेल तर मोटर सायकल घ्यावीच कशाला? :) थोडक्यात काय? मला जे हवे आहे ते मी घेणार. ज्याला जे आवडते ते त्याने घ्यावे. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. म्हणुन तर एवढे पर्याय आहेत.
बर
याचा अर्थ मी असा घेतो की पल्सर आणि त्याच कॅटेगरीतल्या यामाहा होंडाच्या इतर बाईकमध्ये तांत्रिकदृष्ट्या फार फरक नसतो. निवड अंतःप्रेरणेनुसार करावी. ;-)
अवांतरः तांत्रिकदृष्ट्या पल्सर आणि एफझेडमधे काय फरक आहे हे अजून समजले नाही. जेणेकरून मला लुक आवडले नाही तरे मी एफझेड विकत घ्यावी. कारण निव्वळ चांगली दिसते म्हणून कोणती बाईक घेऊ नये. मुख्य मुद्दाच आता अवांतरमध्ये टाकू. :-)
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
फरक - तुलना
विकत घेण्यासाठी तुलना करायची असल्यास त्या संबंधीत मासिके जसे ओव्हरड्राइव्ह, कार ऍण्ड बाईक इत्यादी , तसेच अनेक संकेतस्थळे आहेत. त्यावर सविस्तर अभ्यास केलेली परिक्षणे मिळतील.
ही गाडी अजुन रस्त्यावर यायची आहे. तसेच कंपनी कडुन तांत्रिक माहिती सुद्धा उपलब्ध नाही. (अवांतर वाचला आहेसच :) )
स्मॉल कार घेताना मारुती ८०० घ्यावी की स्कोडा फॅबिआ? दोन्ही हॅच बॅकच आहे. याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर तुला तुझा अर्थ सापडेल.
मस्त लेख...
चाणक्य, लेख एकदम देखणा झाला आहे. आवडला. असेच अजून लेख येऊ द्यात.
विशेषतः वेगवेगळ्या रंगांमधले दुचाकीचे फोटो खूप आवडले.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मला तरी ही गाडी आवडते.
आवाज ऐकलाच की धडधड वाढते.
-सौरभदा
==============
Artificial Intelligence is no match for Natural Stupidity.
धन्यवाद
हो, मला सुद्धा आवडते.
बुलेट
एकदा मित्राची बुलेट चालवली. तिचे गिअर उजव्या पायात आन ब्रेक डाव्या पायात असल्याने नेहमी घोटाळा व्हायचा. सवय सुझुकीची. हिरो होंडा किंवा यामा पण चालायची गिअरचा अनुक्रम फक्त वेगळा. पण इथे तर पायच बदलतोय. ब्रेक दाबायच्या ऐवजी गिअरच पडायचा. आता सुधारणा केलेली दिसते.
प्रकाश घाटपांडे
फूइऽऽ फूइऽऽ
फूइऽऽ फूइऽऽ
लेखातील चित्र बघून तोंडातून शिळ निघालीच ;)
ऋषिकेश
------------------
हेच म्हणतो
तोंडातून शीळ निघाली.
आपला,
(शीळवादक) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मस्त आहे गाडी !!!
मस्त, लेख आवड्ला.
सध्या पल्सर वापरत असल्यामुळे एफ झेड १६ खुणावते आहे. :)
अवांतर : मॉनीटरवर प्रतिसादाचा रकाना का लांबतो आहे ?
तिच्याबरोबर तिच्यावर बसलेलीपण येणार आहे का?
बाईक बघितल्यावर "सेक्सी" या पेक्षा वेगळा शब्दच आला नाही..
मी ही घेणारच्.
देखणा लेख
चित्रांमुळे देखणा झाला आहे लेख.
(अवांतर : आमच्या कॉलेजात यामाहा ही त्यातल्या त्यात थोडी उच्चभ्रू मुले वापरायची, मध्यमवर्गीय छानछौकी मुले कावासाकी बजाज वापरायची, आणि पैशांच्या बाबतीत काटकसरी मुले हिरोहोंडा वापरायची. माझी एक इतकी जुनी विजय सुपर स्कूटर होती, की त्यावरून मला कोणी लिफ्टही मागत नसत.)
:-))
वक्त वक्त की बात होती है.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
गाडी
विजय सुपर मस्त गाडी होती.
मी जाम म्हणजे जाम दामटली आहे.
चांगली ट्युन असेल तर इतकी मस्त पळते.
तशीच जूनी बजाज १५० पण!
फक्त पॉइंट गेला की स्टार्टींगचे वांदे व्हायचे.
राजदूत पण ६० च्या स्पीडला संथपणे मस्त धावायची, आजिबात आवाज नाही.
बा़की बुलेटला पर्याय नाही.
मी बुलेट वरून घरी येतांना धडकून आमच्या घराचेच कंपाऊंड पाडले होते!
त्या नंतर बरेच दिवस मला बुलेट बंदी होती ते आठवते.
-निनाद
धन्यवाद
सर, भटका आणि धनंजय. प्रतिसाद बद्दल धन्यवाद.
धनंजय, तुमचे अवांतर बरोबर आहे.
गाडीचे डिजाईन
गाडीचे डिजाइन(संरचना?) ठरवताना क्लच डाव्या हातात, गिअर शक्यतो डाव्या पायात, अक्सेलेटर उजव्या हातात..वगैरे गोष्टी कशा ठरवल्या जातात
ऑटो क्लच, ऑटो गिअर गाडी आणि सर्वसाधारण गाडी यात पर्फॉर्मन्स मध्ये काय आणि कशामुळे फरक पडतो.
हे जाणून घेण्याची इच्छा आहे.
तज्ञांकडून मायमराठीत एखादा लेख आला तर उत्तमच. किंवा काही दुवे दिलेत तरी चालेल.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
छान
छान प्रश्न आहेत. विषय मोठा आहे. जमलं तर लेख लिहायचा प्रयत्न करुच :)
एफ झेड १६ पाहून -
पुन्हा एकदा एकवीस वर्षांचा तरूण व्हावेसे वाटले. ( पण पैसा सध्या इतकाच असायला हवा! ;))
असो.
आता अजून पाच-सहा वर्षांनी पोराला घेऊन देईन..(किंवा तोपर्यंत दुसरी कुठली नवी असेल ती! थंड नि:श्वास!)
मला
तोवर सध्याच्या पगारात मला घेउन दिली तरी चालेल :)
सह्ही !!
बाईक्स पाहून आतून काही तरी होतं :-)
आर-१५ जास्त आवडली, सह्ही शेप आहे !
बाय द वे, स्प्लेंडर, पल्सर देखील आवडतात
(चालवता मात्र सायकल सुद्धा येत नाही !!)
झकास!
रंग मस्त आहेत!
मला मात्र वैयक्तिकरित्या क्रुझर प्रकार जास्त आवडतात.
योग्य तेव्ह्ढी दाढी वाढली आणि पैसे जमल्यास यामाहा विरागो किंवा अजून पैसे जमल्यास होंडा शॅडो
घेण्याची इच्छा आहे.
-निनाद
एक महिना
शनिवारी शोरुमला भेट दिली असता असे कळले की अजुन १ महिना तरी गाडी बाजारात येणार नाही. तसेच पुण्यात चाचणी गाड्या धावत आहेत.
शोरुममध्ये अशी माहिती देण्यात आली की आर १५ एका लिटर पेट्रोलमध्ये ४० कि.मी. पेक्षा जास्त धावते. खात्री करुन घेण्यासाठी अनुभव आलेल्या ग्राहकांचे दुरध्वनी क्रमांक देण्याची तयारी सुद्धा दाहवण्यात आली. :)
ती आली आहे...
मंडळी ती आली आहे. आजच वितरकाचा फोन आला होता. बघुन जा गाडी म्हणून :)
यामाहा एफ झी १६ बद्दल माहिती येथे पाहता येईल.
वितरकाने दिलेली माहिती:
शोरुम किंमत : रु. ६५००० /- फक्त
प्रति. लिटर धावण्याची क्षमता : ४० कि. मी पेक्षा अधिक. गाडी रस्त्यावर धावु लागली की नक्की काय ते कळेलच :)
हि पहा एफ झी - १६
एक लाखात कन्वर्टीबल
नॅनोचे नवे कन्वर्टीबल टू सीटर मॉडेल पाहिलेत का?
एक लाखात कन्वर्टीबल! आहात कुठे?
पासष्ट हजारात मोटरसायकल की एक लाखात कन्वर्टीबल ? - तुम्हीच ठरवा
हलकेच घ्या हे स्पष्ट करतो. :):);)
फोटो
नॅनोचा फोटो टाटा मोटर्सच्याच आवारातला वाटतो आहे. :)
माझा एक मित्र -
डिझाईन स्टुडिओमधे आहे. त्याने पाठवला आहे. :);)
हे सिंगल डोअर स्पोर्ट्स मॉडेल - तुमच्या आवडत्या पिवळ्या रंगात --
हलकेच घ्या!
:)
नशीबवान आहे कि तुमचा मित्र. भारतीय उत्पादनावर काम करायला मिळणे हे नक्कीच अभिमानाचे आहे.
भारतीय बनावटीच्या ? होन्डा अक्टिवा तसेच अक्सेस १२५
या मधिल सरस मोडेल (मायलेज बाबत) कोणते,या विशयी तज्ञाचे मार्गदर्शन हवे आहे.