चित्रपट संगीतातील रागदारी

चित्रपट संगीतातील रागदारी

देवसाहेबांच्या लेखाववरून [तेरी प्यारी प्यारी ..... ] आठवले ते संगीतकार शंकर-जयकिशन!
आणि त्यांचा आवडता राग -- भैरवी. या माणसाने [ जोडीचा उल्लेख एकवचनीच करावा एवढे ते एकरुप होते] भैरवीच्या एवढ्या छटा दाखवल्या की मोठ मोठे गायकही आश्चर्य करीत.' बसन्त-बहार' मधील 'मै पिया तेरी..... ' साठी बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासिया त्यातील हरकती ऐकून चाट पडले होते. त्यांच्या भैरवीतील गाण्यांची यादी इथे देत नाही.[मागितल्यास ती पण देऊ.] पण , एका भैरवीत विविध आविष्कार ,ना ना तऱ्हेचे मूडस्, त्यांनी टिपले की अचंबित व्हावे. दु:खी गाणी, आनंदी गाणी, उडत्या चालीची गाणी........' चाहे कोई मुझे जंगली कहे' हे गाणे सुद्धा भैरवीच्या अंगानेच आहे.
या माणसाने भैरवीइतके प्रेम दुसऱ्या कोणत्याच रागावर केले नसेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान..

केशवा,

उतारा माहितीपूर्ण लिहिला आहेस. अजूनही असे काही लिही, मला वाचायला आवडेल..

तात्या.

 
^ वर