अन्थरुण पाहुन पाय पसरावे का?

महाराश्ट्र टाइम्स, ९एप्रिल२००७ मधिल एक पत्र वाचले. 'क्शितीजा पलिकडे झेप घेण्याची जीद्द आसवी '. त्याचा शेवट ते [ श्री. नचिकेत गुरव ] छानच करतात, --- ' झेपावणा-या पाखराना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बान्धता येईल केव्हाही, क्शितीजापलीकडेही झेप घेण्यची जिद्द असावी.
पत्र वाचले. मान्डलेले विचार योग्य वाटले. मराठी मानसाने [ आणि माणसाने] स्वतःमध्ये बदल केला पाहीजे.आत्मसन्तुश्ट व्रुत्ती सोडुन मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. ति स्वप्ने खरी करण्याची जिद्द बाळगली पाहीजे.पाय पसरुन मग अन्थरुण घातले पाहीजे. Sky is the limit हि धारणा सोडुन Even the sky is not limit हि नवी धारणा जोपासली पाहीजे.

लेखनविषय: दुवे:

Comments

हलकेच घ्या

अन्थरुण पाहुन पाय पसरावे का?

अंथरुणात कोण आहे त्यावर हे अवलंबून आहे.

हलकेच घ्या.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लक्ष्य फक्त मराठी माणसंच का?

एक मुद्दा इथे मुद्दाम सांगावासा वाटतो.

माणसाची क्षितिजा पलीकडे पाहण्याची व्रूत्ती असावी हे निर्विवाद. पण त्यासाठी सरसकट फक्त मराठीजनांना लक्ष्य करणे म्हणजे जरा जास्तच होतं.
एखादा परप्रांतिय महाराष्ट्रात येतो तेव्हा तो खरोखरच परप्रांतात असतो. त्याच्या उपजिविके साठी जास्त कष्ट करण्याची त्याची प्रव्रुत्ती स्वभावीकच असते. पण याचा अर्थ मराठी माणूस अल्ससंतुष्टी असतो म्हणणे योग्य नाही.
मराठी माणूस सोडून बाकी सर्व भारतीय कष्टाळू, क्षितिजा पलिकडे पाहाण्याची व्रूत्ती असणारे असते तर महाराष्ट्र सोडून सर्व भारताचाच विकास झाला असता आणि आज जे
हजारो महाराष्ट्रीयन अमेरि़केत, लंडन मध्ये उच्चपदावर काम करत नसते.

रम्या

पंत

अंथरुणात कोण आहे त्यावर हे अवलंबून आहे.

पंत,

आपण कोणाच्या अंथरूणात आहोत यावरही ते अवलंबून आहे.

(चुळबुळ्या) बापू

हे काय?

केशवाच्या बर्‍याच चुका मुद्रणदोष आहेत. मुद्दाम शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करून 'वाचणारा समजून घेईल' अशा थाटात लिहिले असेल तर नक्कीच चूक आहे.

अंथरूण पाहून पाय पसरावेत हे बरोबर आहे. पण पाय आखडायचे की अंथरूण मोठं करण्यासाठी धडपडायचं ही मुद्याची गोष्ट आहे.

अंथरूण लांबवण्याच्या धडपडीत पाय् कधी उघडे पडले तर् तेवढी कळ सोसण्याची धमक/सहनशीलता ठेवावी.

आपला
(अंथरुणातला) आभ्या

 
^ वर