भारतीय आणि मांसाहार

महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या चरित्राचे लेखन् चालू आहे. त्यांनी १९३५ साली दिलेल्या व्याख्यानांमधे 'भक्ष्याभक्ष्य'चा ऊहापोह केला आहे. त्यात एके ठिकाणी ते असे म्हणतात कि त्यावेळच्या एका नेत्याया मते भारतीय लोक दुबळे आहेत, त्यंच्यात संघशक्ती नाही, कारण ते मांस खात नाहीत. तेव्हा अशी संघशक्ती निर्माण करण्यासाठी भारतीयांनी मांसभक्षण सुरू करावे असा त्यांचा आग्रह होता. हे पुढारी कोण होते? कुणी सांगू शकेल? शाकाहार-मांसाहार यासंबंधीचे वाद यावर अधिक प्रकाश हवा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

त्रोटक चर्चाविषय

महामहोपाध्याय पां. वा. काणे कोण? त्यांची व्याख्याने कशाबद्दल होती? ज्या नेत्याने भारतीय लोक दुबळे आहेत, त्यंच्यात संघशक्ती नाही, कारण ते मांस खात नाहीत हे विधान केले ते कशासंदर्भात केले? याबाबत काहीच माहिती नसल्याने चर्चेत भाग घेता येत नाही. क्षमस्व!

काणे

पांडुरंग वामन काणे.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माहित नाही

पुढारी कोण माहित नाही बॉ..(वाइल्ड गेस - उद्योगपती टाटा?) ..पण त्यांचे मत पटले!

जवागल श्रीनाथने एकदा शोएब अख्तरला 'इतका वेगवान चेंडू तू कसा काय टाकू शकतोस? मला का ते जमत नाही?' असे विचारले असता शोएबने त्याला,' आधी बैलाचे मांस खायला सुरु कर' असे सांगीतले होते.

किस्सा

हाच किस्सा मी श्रीनाथ आणि अक्रम यांच्याबद्दल ऐकला आहे.

अवांतरः चांगदेव पाटलानेही एका स्वगतात असेच म्हटले आहे की हिंदूंची पीछेहाट होण्याचे कारण ते बीफ खात नाहीत. याचई खंत वाटून त्याने शेख मास्तरांना बीफ बनवायला सांगितले आणि नंतर चापून खाल्ले. :)

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आता

२००८ सालात बरेच भारतीय बीफ खातात. मीही खाल्ले आहे. याचा अर्थ आता भारतीय अधिक शक्तिशाली झाले आहेत असा घ्यायचा का?

ता. क. चिकन खाल्ले तर ५०% शक्तीशाली होता येईल काय?

----

होय कदाचित

आपल्या प्रश्नाचे उत्तर होय कदाचित असेच द्यावे लागेल. मला असे ही वाटते आहे की हल्ली भारतीय जास्त मांसाहारी होऊ लागल्यानेच भारत महासत्ता बनणार आहे असे म्हणतात की काय? तुमचे काय मत?
शाकाहार - विकसनशील देश
मांसाहार - जागतिक महासत्ता

हम्म

मांसाहार केल्याने शारिरिक ताकद वाढते हे कदाचित समजू शकतो पण संघशक्ती कशी वाढेल हे कळत नाही. तसे असेल तर महासत्ता बनण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे म्याकडोनाल्ड मध्ये रोज जेवायला जाणे. उलट अमेरिकेत Obesity सर्वात जास्त आहे.
तसेच आफ्रिकेतील गरीब देश मांसाहारी असूनही गरीबच आहेत.

----

५० टक्के कसे?

बैल केवढा/कोंबडी केवढी?
कोंबडीची शक्ती बैलाच्या ५० टक्के असते का? :)

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माफ करा.

किती कोंबड्या खाणार ते दिले नसल्याने वरील प्रतिसाद फाऊल धरावा.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अंडे

कोंबडीत अंडे देण्याची क्षमता आहे तर बैलात? अंड्यातुन परत मांसाहाराची निर्मिती आहेच. तात्विकदृष्ट्या कोंबडीच जास्त शक्तिशाली.

उलट

प्रश्न बरोबरच आहे, ५०% हे गणीत फाउल धरावे. याला काही आधार नाही. (थोडेफार वर्तक ष्टाईल आहे :) )

----

शंका ?

१९३५ सालच्या भारतात आजचा पाकिस्तान आणि बांगलादेशही समाविष्ट होता. साहजिकच मुस्लिमांचे एकूण् लोकसंख्येतील् प्रमाण ४०% च्या आसपास असावे, जे नि:संशय मांसाहारी होते. त्याखेरीज हिंदू आणि अन्य धर्मियांतदेखील मांसाहारी होतेच. तेव्हा भारतीय मांस खात नाहीत म्हणजे नक्की काय?

की भारतीय म्हणजे हिंदू हेच अभिप्रेत होते? ज्यांच्यात ही तथाकथित संघशक्ती(?) नव्हती?

हिंदूंमध्येही "शुद्ध शाकाहारींची" संख्या किती?

(शंकेखोर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भारतीय

काणे यांनी श्रोतृसमूहाला उद्देशून भारतीय हा शब्द वापरला असावा.

काणे यांच्याविषयी आदर राखूनही समजावून देण्यासाठी खालील उदाहरण देत आहे. मात्र काणे - आझमी - ठाकरे अशी तुलना नाही.

१. अबू असीम आझमी 'हम मुसलमान यह करेंगे' असे म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ सर्वच मुसलमान तसे करतील किंवा समोर बसलेत तेवढेच मुसलमान असा नाही.
२. बाळासाहेब ठाकरेही 'हिंदूंनो तुम्ही हे करा' असे म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ सर्वच हिंदू तसे करतील किंवा समोर बसलेत तेवढेच हिंदू असा नाही.

श्रीराम जयराम जयजय राम
बुद्धम शरणम गच्छामि
ला इलाह इल्लला मोहम्मदुर रसूल अल्लाह.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एक दुवा

सेन्सस इंडिया या लोकसंख्यामोजणीच्या स्थळावर काही माहिती मिळाली नाही मात्र येथे काही माहिती मिळाली.

दुवा १

दुवा २

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मांसाहारी भारतीय

भारतात १९३५ आणि त्याच्या आधीच्या शतकात केवळ ब्राह्मण आणि जैन वगैरे अल्पसंख्य लोक वगळता बहुतेक सर्व हिंदू अधिकृतपणे (!) मांसाहार करत होते. आता तर सर्व जातीपातींचे हिंदू मांसाहार करतात. अगदी पूर्वीच्या काळी ब्राह्मणही मांसभक्षण करत होते त्यामुळे मांसाहार भारताला त्याज्य नाही.

काही दुवे -

प्रा. डॉ. दादेगावकर,

हे काही दुवे आपल्याला उपयुक्त ठरतील असे वाटते -
१. हिंदू आणि मांसाहार
२. हिंदू आणि गाय
३. 'तो' नेता सावरकर असावेत असे वाटले. पण सावरकरांनी गायीला संरक्षित करावे अशा आशयाचे लिखाण केले आहे असे दिसते.

त्याहीपुढे शोधले असता तो हिंदू नेता अथवा धर्माधिकारी स्वामी विवेकानंद तर नसावेत असे वाटले -

हा दुवा पहा.
के.एस. सुंदरम ऐय्यर आपल्या आठवणीत सांगतात:

I at once expressed my loathing for the taking of fish or flesh as food. The Swami said in reply that the ancient Brahmins of India were accustomed to take meal and even beef and were called upon to kill cows and other animals in yajnas or for giving madhuparka to guests. He also held that the introduction and spread of Buddhism led to the gradual discontinuance of flesh as food, though the Hindu shastras (scriptures) had always expressed a theoretical preference for those who avoided the use of flesh-foods, and that the disfavour into which flesh had fallen was one of the chief causes of the gradual decline of the national strength, and the final overthrow of the national independence of the united ancient Hindu races and states of India. He informed me, at the same time, that in recent years Bengalis had, as a community, begun to use freely animal food of several kinds and that they generally got a Brahmin to sprinkle a little water consecrated by the utterance of a few mantras over a whole flock of sheep and then, without any further qualms of religious conscience, proceeded to hand, draw, and quarter them. The Swami's opinion, at least as expressed in conversation with me, was that the Hindus must freely take to the use of animal food if India was to at all cope with the rest of the world in the present race for power and predominance among the world's communities, whether within the British empire, or beyond its limits.

रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त

रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त

मांसाहार

पद्माकरसेठ,
मांसाहारात आता वर्गीकरण केले पाहिजे असे वाटते, जसे मासे,मटन ( बोकड्याचे ) कोंबडे, अंडी, असा एक वर्ग.
आणि बडे का ( गाय, बैल, म्हैस, इत्यादी ) खाणारे दुसर्‍या वर्गात टाकले पाहिजे. आता जे दुसर्‍या वर्गातले ते अशा खाण्याने माणसे संतापी बनतात असे कोणी तरी म्हटल्याचे वाचले आहे. पण अशा आहारामुळे संघशक्ती निर्माण झाल्याचे शास्त्रीय / आध्यात्मिक माहिती नाही.

थोडे अवांतर

शाकाहार-मांसाहार यातील चांगले काय आणि वाईट काय ह्या संदर्भात खालील प्रतिसाद नाही पण एक नैसर्गीक माहीती:

हत्ती हा शाकाहारी असतो. बुद्धीमान प्राणी आहे, शक्तीमान प्राणी आहे जो वाघ-सिंहाशी टक्कर देऊ शकतो. शिवाय तो दिर्घायुषीपण आहे.
तेच मला वाटते गेंड्यासंदर्भात.

रामकृष्ण आणि मला वाटते विवेकानंदपण बाकी मांसाहारी नसतील पण मासे खायचे.
दुसर्‍या टोकाचे उदाहरण म्हणजे हिटलर हा शाकाहारी होता...

जाता जाता एक जुना विनोद:

एका रेल्वेत एक हडकुळा दाक्षिणात्यचढतो आणि त्याला त्याची ट्रंक काही केल्या पेलवत वरती लगेज रॅकवर ठेवता येत नसते. बाजूला असलेला एक सरदार त्याला म्हणतो, "ओय मद्रास के पापे, सिर्फ डालभात खाते हो, ताकद कैसी आयेगी? कुछ मुर्ग खाओ, रोटी बिटी खाओ और ताकद कमाओ.." असे म्हणत म्हणत तो एक झटक्यात ती ट्रंक वर ठेवतो. डब्यातले सर्व फिदीफिदी हसतात. तो दाक्षिणात्य काही बोलत नाही.

थोड्यावेळाने गाडीने वेग घेतल्यावर तो दाक्षिणात्य उठतो आणि चेन ओढायचा नुसता प्रयत्न करतो/तसे दाखवतो. परत सरदार उठतो आणि म्हणत, "सिर्फ डालभात खाते हो, ताकद कैसी आयेगी? कुछ मुर्ग खाओ, रोटी बिटी खाओ और ताकद कमाओ.." तो चेन ओढतो. टिसी विचारत येतो की कोणी चेन ओढली? सरदार म्हणतो "मी!" त्याला ५०० रुपयाचा दंड होतो. गाडी परत चालू होते, तो दाक्षिणात्य या वेळेस शांतपणे म्हणतो, "डालभात खाओ और अक्कल कमाओ!"

थोडक्यात काय खाता या पेक्षा किती खाता आणि आहारा बरोबरच तनाला आणि मनाला व्यायाम करायला लावताय का ते महत्वाचे!

You are what you eat! :)

:)))

You are what you eat! :)

:))))))))
आता पालेभाज्या खाल्यावर नाकासमोर मुळं लटकल्यासारखे वाटणार / कोंबडी रिचवल्यावर डोक्यावरचा तुरा तपासायला हात जाणारसे वाटते :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

मी पाहिलेला

खराखुरा मांसाहारी एकच. मॅन व्हर्सेस वाईल्ड मालिकेचा नायक एडवर्ड मायकल. माझी सर्व भारतीय मांसाहार प्रेमींना नम्र विनंती आहे की मांसाहार करताना त्यांनी खुल्या दिलाने मांसाहार करावा. एडवर्ड मायकल सारखा, वाळवी-गोमेपासून, कुत्रा आणि झेब्र्यापर्यंत. केवळ निवडक गोष्टी खाऊ नयेत. खाण्याच्या बाबतीत सर्व प्राण्यांवर सारखेच प्रेम करावे.

सहमत..

टग्यारावांशी सहमत... :)

आपला,
(निवडक मांसाहारी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हे म्हणजे

हे म्हणजे शाकाहारी लोकांना कारल्यापासून गवतापर्यंत, (व्हाया वड, पिंपळ ते काँग्रेस गवत) हे सर्व खावे असे म्हणण्यासारखे आहे.
ज्याची चव आवडते ते सर्व आम्ही खाऊच. टगेराव म्हणतात त्याप्रमाणे काळजी नसावी. :)

----

२ अनुभव

मी १ वर्ष जव्हार-मोखाडा भागात होते. त्यावेळी १) जव्हार मधील एका पट्ट्यात कुठलेही पाखरु दिसत नव्हते. बरोबरचा शिक्षक म्हणाला, इथे कावळा आणि साळुंखी सोडून सर्व बारीक सारीक पक्षी खातात. तिथे एक चखोट नावाचे साधन असते. त्याला चिकट गोंद लावलेली असते. ते चखोट झाडाच्या सर्वात वर भल्या पहाटे लावतात. पाखरे उडून दमल्यावर झाडाच्या शेंड्यावर येऊन बसतात आणि त्यांचे पंख ह्या चखोट चिकटतात. मग ते त्या चखोटापासून दूर व्हायचा दिवसभर निष्फळ प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यु होते. तसे मी बरेच शिकारीचे भीषण प्रकार ऐकले होते. हा तसाच एक. २) एका पाड्यावर एका घरात बरीच पक्ष्यांची पंख फुटलेली पिल्ले एका दोराला थोड्या थोड्या अंतरावर बांधली होती. मग कळले की घरातील लहान मुलांसाठी हे खेळणे आहे. ती पिल्ले १-२ फूट वर उडतात. ते पाहून मुलांना मजा वाटते. ही ४-५ वर्षाची मुले त्या पाखरांना हाताळतात, चोमाळतात. मग त्या पक्ष्यांचे पंख, पाय वै. मोडतात. काही वेळाने मग ती जखमी पिल्ले मारून चुलीवर चढवली जातात.

^ वर