छायाचित्र टीका - २८

नमस्कार मंडळी,

exif

Camera - Nikon D40
Aperture - f5.6
Shutter Speed - 1/160
Focal Length - 300mm
Metering - Spot
© Dhruva Mulay ;)

खडकवासला धरणाजवळच्या रानात हा चतुर दिसला. याला चतुरच म्हणतात ना की आणखी काही....
या छायाचित्रामध्ये काय काय बदल हवे होते हे जरूर सांगा.

ध्रुव

लेखनविषय: दुवे:

Comments

फोकस

फोकस थोडा गंडला आहे असं वाटत नाही का? अर्थात हा किडा स्थिर नसतो हे ही खरे आहे.

फोकस...

हा माझ्या लेन्स मुळे झालेला प्रकार आहे. DoF फारच कमी आहे (यालाच DoF म्हणतात ना?) जर चतुराचे पंख फोकसमध्ये असतील तर शेपटी नाहि :(. तसेच चतुर फारच जवळ होता त्यामुळे लेन्स ला असलेल्या मॅक्रो सेटींगचा वापर केला आहे.

-
ध्रुव

चतुर

याला पुस्तकी भाषेत चतुरच म्हणतात. आम्ही लहानपणी घोडा म्हणायचो

झाडाची फांदी अर्धी फोकसमध्ये आणि अर्धी फोकसबाहेर कशी? किडा फारच जवळ होता बहुतेक. फांदी पूर्ण ब्लर किंवा पूर्ण शार्प असती तर फोटो अधिक चांगला आला असता. चित्र पाहताना डोळ्याला हेच खटकतंय बहुतेक.

शेपटी फोकस मध्ये नसती तरी चालले असते पण किड्याचे डोके फांदी मागे गेल्यामुळे चित्राचा विषय तितका ठळकपणे मांडला जात नाहीये.

अजून एकः काळी किनार अधिक चांगली दिसली असती.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

फोकस

वरच्या प्रतिसादामध्ये सांगितल्याप्रमाणे, डेप्थ कमी आहे व चित्र मॅक्रो मोड (लेन्स्चे मॅक्रो कॅमेर्‍याचे नाही) मध्ये काढले असल्यामुळे असे झाले असावे. फांदीसाठीही असेच झाले असावे असे वाटते. माझ्याकडच्या इतर एका छायाचित्रामध्ये चतुराची शेपटी फोकसमध्ये आहे पण पंख, फांदी आणि तोंड नाही. चतुराचे सौंदर्य त्याच्या पंखामधुन जास्त जाणवते असे मला वाटल्याने हा फोटो निवडला.

चतुराचे तोंड फांदीच्या मागे गेले आहे, ही सर्वस्वी माझी चूक आहे. चतुराचा फोटो पटकन काढावा लागल्यामुळे, मी शक्यतो न हलता आणि त्याला सावध न करता छायाचित्र घेतले.

काळी चौकट टाकावी असे मनात होते, पण सद्ध्या फोटोशॉपमध्ये नुकतेच सावली असलेली चौकट कधी टाकावी हे शिकल्याने तसा एक प्रयत्न करून बघीतला.

-
ध्रुव

मॅक्रो

चित्र मॅक्रो मोड (लेन्स्चे मॅक्रो कॅमेर्‍याचे नाही) मध्ये काढले असल्यामुळे

हा प्रकार माझ्या लक्षात आला नव्हता. लेन्स मॅक्रो न वापरता फक्त कॅमेर्‍यातील मॅक्रो मोड मध्ये हा फोटो काढला असता तर कसा आला असता याबद्दल औत्सुक्य आहे. माझ्या कॅमेर्‍यात असले प्रयोग करता येणार नाहीत. :-(

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

मॅक्रो

माझ्या सिग्मा कंपनीच्या लेन्सला मॅक्रो सोयीसाठी एक छोटी कळ आहे. येथेयेथे बघा, छोटे किडे, फुले यांचे जवळुन फोटो काढण्यासाठी, २००-३०० मिमि फोकल लेंथला मॅक्रो कळ हालवुन अत्यंत जवळच्या वस्तु (95cm पर्यंत) फोकस करु शकतो. ही झाली लेन्स् मधील सोय.
माझ्या कॅमेर्‍याला अजुनही एक सोय आहे आणि ती म्हणजे मॅक्रो मोड. हा मोड वापरुन मी या लेन्स् ने अजून छायाचित्रे घेतली नाहीयेत. ही सोय वापरता येईल का याबद्दल साशंक आहे. लेन्स मॅन्युअल फोकस असल्याने असेल कदाचित.

-
ध्रुव

ऍपर्चर

ऍपर्चर छोटे करुन बघीतलेत का? ५.६ हे ह्या चित्रासाठी थोडे जास्त खुले वाटते.

शटर स्पीड १/१६०? तुमच्या ठोकताळ्या प्रमाणे तो कमीत कमी १/३०० हवा ना? :-)

शटर स्पिड

ठोकताळ्याप्रमाणे ३०० पेक्षा शटर स्पिड जास्त हवा हे खर आहे. पण १६० च्या वर गेल्यावर, छायाचित्र काळे होत होते. मी शटर प्रायोरीटी वापरत होतो. ऍपर्चर प्रायोरीटी वापरत असतो आणि ५.६ पे़क्षा जास्त म्हणजे ८ वगैरे ठेवले असते तर शटर फारच कमी ठेवावे लागले असते.

पुढच्या वेळेला ऍपर्चर जास्त ठेवुन स्टँड वापरेन.
-
ध्रुव

 
^ वर