पुंज लॉईड खरेदीसाठी योग्य

लोकहो,

पुंज लॉईड हा शेअर आत्ता बाजारात खरेदीसाठी योग्य दिसतोय. हा समभाग रु २ च्या दर्शनी मूल्याचा झाला आहे.

सध्या बाजारात त्याची किंमत रु १६०/- आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.

याचा स्टॉप लॉस रु १४२ आणि उद्दिष्ट रु २२० आहे. कालावधी साधारण तीन महीने.

घाटकोपरचा एक मोठा दलाल (सुज्ञांच्या लक्षात आले असेल) यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतो आहे अशी बाजारात वदंता आहे.

आपला,
(खबर्‍या) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

पुंज लॉईड

पुंज लॉईड चे प्राईस पर अर्निंग (पी/ई) गुणोत्तर हे मार्च २००६ च्या आकड्यांनुसार १६४.२६ इतके होते. अद्याप मार्च २००७ चे निकाल आलेले नाहीत. मात्र पी/ई या निकषांवर हा शेअर सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी खरेच योग्य आहे का?*


याचा स्टॉप लॉस रु १४२ आणि उद्दिष्ट रु २२० आहे. कालावधी साधारण तीन महीने.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तीन महिने हा अतिशय लहान कालावधी वाटत नाही का? दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये स्टॉप लॉस कसा काय गृहित धरता?


घाटकोपरचा एक मोठा दलाल (सुज्ञांच्या लक्षात आले असेल) यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतो आहे अशी बाजारात वदंता आहे.

ह्या बातमीमुळे कंपनीच्या मुलभूत कामगिरीवर काय फरक पडतो?

*अवांतरः बेंजामिन ग्रॅहम व वॉरन बुफे यांच्या मूलभूत विश्लेषणातील एक अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे हे गुणोत्तर आहे. बेंजामिन ग्रॅहमने तर पी/ई हे गुणोत्तर जर २० पेक्षा जास्त असेल तर सामान्य गुंतवणूकदारांनी त्या शेअरकडे सरळ दुर्लक्ष करावे असे म्हटले आहे. मात्र भारतीय बाजारात हे तत्त्व पाळणे अतिशय अवघड आहे.

आज ५% वाढला

लोकहो,

आम्ही खरेदीसाठी सुचवलेला पुंज लॉईड आज ५% वाढला. ज्यांनी खरेदी केली असेल त्यांनी स्टॉप लॉस १४८ वर न्यावा.

"मार्केट इज मास सेंटिंमेंट" असे वाक्य आहे. ज्यांना बाजारात पैसा कमवायचा आहे त्यांनी हे सेंटिमेंट कुठे जाताय ते पहावे आणि प्रवाहात सामिल व्हावे.

काठावर बसून बोंबलणारे आम्ही आयुष्यात खूप पाहिले. आम्ही जेव्हा या बाजारात नवीन होतो तेव्हा, पी.ई. रेशिओ, इ.पी.एस, रिटर्न ऑन नेट वर्थ, डाऊ थिअरी अशा अनेक गोष्टींनी भारून गेलो होतो.

पण गेल्या २० वर्षात आम्ही जे काही शिकलो त्यावरून हे कळून चुकले की या गोष्टींचा आणि पैसा मिळवण्याचा काही संबंध नाही. त्याचप्रमाणे वॉरन बफे, बेंजामिन ग्रॅहॅम, या थोर व्यक्तिंची वाक्ये मुखोद्वत करून आपले पोट भरत नाही.

नवशिक्यांना यात खूप आकर्षण असणे स्वाभाविक आहे. पण कंपनी रिपोर्टमध्ये जी प्रॉफिट ची फिगर दाखवली जाते ती आधी बोर्डरूममध्ये ठरलेली असते आणि त्यानुसार अकाऊंट्स लिहीले जातात ही गोष्ट त्यांना कळत नाही. ते बिचारे ते रिपोर्ट खरे आहेत असे समजून् त्याचा अभ्यास करण्यात हयात घालवतात.

पण् तसे करून पैसा मिळत नाही . पायात प्लॅस्टिकच्या चपला घालून शेअरबाजारावर लेक्चर देणारे आम्ही याची देही याची डोळा पाहिले आहेत.

त्यामुळे ज्यांना पैसा मिळवायचा आहे त्यांनी प्रवाहात सामील व्हावे. जसा बाईला नांदवायला दादला लागतो तसा बाजारात अमूकएक शेअर "चालवणारा" कोणीतरी लागतो हे सत्य या पंडितांना ठाऊक नसते.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

परंतु

आम्ही खरेदीसाठी सुचवलेला पुंज लॉईड आज ५% वाढला. ज्यांनी खरेदी केली असेल त्यांनी स्टॉप लॉस १४८ वर न्यावा.


तुम्ही हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुचवला आहे. ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांनी रोज शेअरचा भाव पाहणे कितपत योग्य आहे? तुमच्या मते दीर्घकालीन म्हणजे किती दिवस/महिने/वर्षं?

"मार्केट इज मास सेंटिंमेंट" असे वाक्य आहे. ज्यांना बाजारात पैसा कमवायचा आहे त्यांनी हे सेंटिमेंट कुठे जाताय ते पहावे आणि प्रवाहात सामिल व्हावे.

माझ्या माहितीप्रमाणे बाजारात ज्यांना पैसा कमवायचा आहे त्यांनी सेन्टिमेन्टच्या विरुद्ध वागावे.

काठावर बसून बोंबलणारे आम्ही आयुष्यात खूप पाहिले. आम्ही जेव्हा या बाजारात नवीन होतो तेव्हा, पी.ई. रेशिओ, इ.पी.एस, रिटर्न ऑन नेट वर्थ, डाऊ थिअरी अशा अनेक गोष्टींनी भारून गेलो होतो.

पण गेल्या २० वर्षात आम्ही जे काही शिकलो त्यावरून हे कळून चुकले की या गोष्टींचा आणि पैसा मिळवण्याचा काही संबंध नाही. त्याचप्रमाणे वॉरन बफे, बेंजामिन ग्रॅहॅम, या थोर व्यक्तिंची वाक्ये मुखोद्वत करून आपले पोट भरत नाही.

बहुधा वॉरन बफे व इतरांनी या गोष्टी वापरून पैसा मिळवलाच नाही असा तुमचा दावा आहे का? केवळ दुसरा माणूस शेअर घेतोय म्हणून आपण घेण्यापेक्षा ही पद्धत जास्त शास्त्रशुद्ध नाही का?

नवशिक्यांना यात खूप आकर्षण असणे स्वाभाविक आहे. पण कंपनी रिपोर्टमध्ये जी प्रॉफिट ची फिगर दाखवली जाते ती आधी बोर्डरूममध्ये ठरलेली असते आणि त्यानुसार अकाऊंट्स लिहीले जातात ही गोष्ट त्यांना कळत नाही. ते बिचारे ते रिपोर्ट खरे आहेत असे समजून् त्याचा अभ्यास करण्यात हयात घालवतात.


पुंज लॉईड ही कंपनी बीएसई च्या "ए" गटात आहे. त्यांना सेबीच्या नियमांप्रमाणे व कंपनी कायद्याप्रमाणे खरे रिझल्टस जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत जर ते असे रिझल्टस मॅनिप्युलेट करुन खोटारडे प्रॉफिट्स दाखवत असतील् तर त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा दर्जा काय् असेल?
मागील काही महिन्यांपूर्वी असे खोटारडे रिझल्ट्स जाहीर केल्यामुळे अटलांटा या कन्स्ट्रक्शन कंपनीवर सेबीने आणलेली बंधने तुम्हाला माहिती असतीलच. त्यांचा शेअर त्या आठवड्यात किती रुपयांनी पडला हेही मुखोद्गत असेल.

एन्रॉन व वर्ल्डकॉम या असाच मॅनिप्युलेशन्स करणार्‍या कंपन्यांच्या दिवाळखोरीपासून काही शिकणार नाही का?

पण् तसे करून पैसा मिळत नाही . पायात प्लॅस्टिकच्या चपला घालून शेअरबाजारावर लेक्चर देणारे आम्ही याची देही याची डोळा पाहिले आहेत.

त्यामुळे ज्यांना पैसा मिळवायचा आहे त्यांनी प्रवाहात सामील व्हावे. जसा बाईला नांदवायला दादला लागतो तसा बाजारात अमूकएक शेअर "चालवणारा" कोणीतरी लागतो हे सत्य या पंडितांना ठाऊक नसते.

१९९२ मध्ये हर्षद मेहता यांनी "चालवलेल्या" हिमाचल फ्युचरिस्टिक टेलिकम्युनिकेशन्स्" चा शेयर आज किती रुपयांना उपलब्ध आहे? गेल्या दहा वर्षातील दलालांनी चालवलेल्या अशा शेअर्सचे रिटर्न्स किती आहेत?

माझे मत

बाजारात नवशिक्यांना किती उत्पन्न झाले आणि २० वर्षे अनुभवी लोकांना, ह्याबद्दलची आकडेवारी उपलब्ध असेल, तर ह्या वादाचा निकाल लागू शकेल असे वाटते.

अशी आकडेवारी भारतात उपलब्ध असणे अशक्य नसले तरी अवघड आहे. सेबी किंवा बीएसई/एनएसई च्या वतीने असे सर्वेक्षण केल्याचे ऐकिवात नाही मात्र म्युच्युअल फंड कंपन्या व पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणार्‍या कंपन्या (त्यांना सोयीस्कर) असे सर्वेक्षण करुन् काही आकडेवारी प्रसिद्ध करतात.

मुळात भारतीय बाजारावर नियंत्रणे कमी असल्याने आम्ही तिकडे डोकावत नाही.
भारतीय बाजारावर नियंत्रणे कमी आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. हर्षद मेहता-केतन पारेख वगैरे प्रकरणांपासून भारतीय बाजारावर बरीच नियंत्रणे आली आहेत दलालांच्या हालचालीवर नियमितपणे लक्षही ठेवले जाते. विशेषतः सी दामोदरन हे सेबीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी बाजाराचा बराचसा कारभार सुरळीतपणे व शिस्तबद्ध रीतीने ठेवला आहे.


परंतु ह्या चर्चेतून पोर्टफोलियो डायव्हर्सिफिकेशन ह्याविषयी आम्हाला धोंडोपंत आणि योगेश यांचेकडून (आणि इतर तज्ञांकडून) माहिती हवी आहे. आम्ही ८० टक्के दीर्घकालीन (३ वर्षांचा कालावधी) आणि २०% अल्पकालीन (३ महिन्यांचा कालावधी) असे विभाजन केले आहे. अर्थात हे भारतीय बाजारात नाही. तसेच ३० टक्के बाँड्स, ६० टक्के स्टॉक्स (२० स्टॉक्स, ४० म्युचुअल फंड्स्), आणि १० टक्के करन्सी मार्केट असे विभाजन आहे.

मी या विषयातला तज्ज्ञ नक्कीच नाही. धोंडोपंत असल्यास माहिती नाही. मात्र आपली धोका स्वीकारण्याची क्षमता व आपले वय यावर पोर्टफोलिओचे डायव्हर्सिफिकेशन साधारणपणे केले जाते.

ह्याविषयी गेली तीन वर्षे तरी आम्ही समाधानी आहोत.

भारतीय बाजारात सर्वसाधारण गुंतवणूकदार कसे विभाजन करतो, ह्याविषयी आम्हाला माहिती हवी आहे.

भारतीय बाजारात अद्यापही सामान्य लोक शेअरबाजारात थेट गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात. गेल्या काही वर्षात शेअरबाजारात् थेट गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण वाढत असले तरीही सर्वसाधारण गुंतवणूकदाराचा या विषयाबाबतचा अभ्यास. यात पुरेसे लक्ष घालण्यासाठी हव्या असणार्‍या वेळेचा अभाव यामुळे त्यांनी शेअरबाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करणेच हितावह आहे.

भारतीय बाजारातील समभागांची एकूण किंमत ८०० बिलियन डॉलर्स आहे, जी एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे भारतीय बाजाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तितकासा प्रभाव नाही. त्यामुळे अर्थविषयक निर्णय घेताना बाजाराचा तितकासा विचार देखील केल्या जात नाही.
सहमत. मात्र अनेकदा (मुख्यत्वे इंग्रजी) वृत्तपत्रांमार्फत बाजारात होणार्‍या लहानसहान घडामोडींचा अगदी आभाळ कोसळले असा बाऊ केला जातो. अपरिपक्व प्रसारमाध्यमांमुळे सरकार-बदल होतानाही "बघा आता यांचं गव्हर्मेंट आलं आणि बाजार अमुकतमुक अंकांनी कोसळला... अर्थव्यवस्थेची वाट लागणार" असा चुकीचा संदेश दिला जातो.


परदेशातून होणारी गुंतवणूक देखील इतर बाजारांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विशेष परिणाम भारतीय बाजारावर होत नाही.

असहमत. जगात कुठेही खुट्ट झाले तरी भारतीय शेअरबाजारात त्याचे पडसाद उमटतात इतका तो संवेदनशील झाला आहे.

इतर बाजारांमध्ये आणि भारतीय बाजारामध्ये असा फरक असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत कसा फरक पडला आहे, हे आम्हाला धोंडोपंतांच्या अनुभवी लेखणीतून जाणवते. तर योगेशजींचे मुद्दे अधिक जागतिक वाटतात. भारतातला छोटा गुंतवणुकदार कसा विचार करतो, हे ह्यातून कळत नाही.

सहमत. भारतीय बाजारात नव्हेच तर जगातील कुठल्याही बाजारात मानसिकता ही नेहमीच प्रभावी ठरत आली आहे. गेल्या ५-६ वर्षांतील तेजीमध्ये काहीही विचार न करता गुंतवणूक करणार्‍या लोकांनाही भारतीय बाजारात अतिशय उत्तम परतावा (रिटर्न्स्) मिळाला आहे. मात्र केवळ मानसिकतेवर आधारित गुंतवणूक दीर्घकालासाठी करणे धोकादायकच आहे.

चू.भू.दे.घे.

होय.

तुम्ही केलेले विश्लेषण हे आऊटपरफॉर्मिंग बेंचमार्क इंडेक्स या तत्त्वावर केले आहे. मला अभिप्रेत असलेला उत्तम परतावा चा अर्थ समाधानकारक व महागाईदरापेक्षा जास्त असाच कृपया घ्यावा.

चारपाच वर्षांपूर्वी बँकांतील मुदत ठेवींवर असणारे ६-७ टक्के व्याज. बाँड्स वर मिळणारा ८-१० टक्के परतावा यामुळे महागाईदराला हरवणे हे अतिशय अवघड झाले होते.

मात्र या योजनांच्या तुलनेत या कालावधीत बाजाराने अतिशय समाधानकारक परतावा दिला आहे.

उदा. नेहमीच अतिशय कमी परतावा देणार्‍या व नेहमीच हेटाळणीचा विषय ठरणार्‍या एलआयसी म्युच्युअल फंडांने (यांनी अनेकदा ऋण परतावा दिला आहे) देखील वार्षिक २७ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. (जो अर्थातच सेन्सेक्स व निफ्टीपेक्षा खूपच कमी आहे). यावरुनही बाजारातील तेजीचा कल स्पष्ट व्हावा.

शेय्र्बाजार् आनि नफा तोता

नमस्कार् मन्दलि,

वरिल् चर्चा वाचुन खुप करमनुक झालि. आपन कि ति कत्त्र मराथि आहोत हे अगदि सि ध्द कर्तोय. अहो, हि चोराचि दुनिया आहे. आपला हात मारा आनि घरि परता. माझि एक् साधि आनि सरल् थिअरि आहे. मार्केत वर गेले कि आपलि माति सोन्याच्या भावात विका अन् मारकेत् खालि गेले कि सोने मातिच्या भावात खरेदि करा. बघा नफा किति मिलतो ते. हे माझे अल्पमति चे सान्गने. बस्. चर्चा नको पैसे कम्वा.

दि लि प दाबके.

नाहीतर सोन्यासारख्या प्रतिसादाची माती होते!

दि लि प दाबके साहेब,
प्रतिसाद देण्याआधी तो वाचता येतो आहे का,
हे पण पहावे. नाहीतर सोन्यासारख्या प्रतिसादाची माती होते!

हे माझे पण अल्पमति सांगणे!
गुंडोपंत

 
^ वर