छायाचित्र टीका २६
मला फोटोग्राफीमधलं काहीही कळत नाही, पण शिकावं असं वाटतं.. हे काही मी काढलेले फोटो.. काय चांगलं, काय वाईट, अजुन काय करता येईल ई. मार्गदर्शन करा मला!
Camera: Canon PowerShot A720 IS
Exposure: 0.005 sec (1/200)
Aperture: f/8
Focal Length: 11.5 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: 0/3 EV
Flash: Flash did not fire
या फोटोत फोकस काही बरोबर झाला नाहीये असं वाटतंय.. आणि ती काळी फ्रेम करायचा मी फोटोशॉप मधे खूप ट्राय केला, झेपलं नाही म्हणून पेंट मधेच केलीये. :)
मला या फोटोची इन्फो काही मिळाली नाही..फ्लीकर मधे शेजारी दिसते खरं, पण इथे नाही दिसली..
Camera: Canon PowerShot A720 IS
Exposure: 0.002 sec (1/500)
Aperture: f/8
Focal Length: 34.8 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: 0/3 EV
Flash: Flash fired, red-eye reduction
१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...१०% पेक्षा जास्त रोमन वापरणार् नाही...
Comments
छान चित्रे
छान चित्रे. पहिल्या चित्रात चमकणारी वाळू आणि पाणी मस्त टिपले आहे.
क्षितीज रेषा मात्र बरीच वाकडी आलेली आहे. अश्या चित्रांमध्ये ती चित्राच्या खालच्या कडेला समांतर अपेक्षीत असते. डाविकडचा वरचा कोपरा (सूर्य तळपत असल्याने) वॉश्डटा आउट झाल्या सारखा वाटतो..तो कमी करुन पाणी आणखी घ्यायला हवे होते. चित्राचा टोन आवडला.
फुलाच्या पहिल्या चित्रात बाजुची कोमेजलेली कळी मला अनावश्यक वाटली तसेच पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट करायला हवी होती. दुसर्या चित्रात फुलावर आलेलं गवताचं पातं हातानं बाजुला करुन चित्र टिपायला हवं होतं. सुर्य थोडासा ढगाखाली लपल्यावर हे चित्र काढले असते तर अजुन खुलले असते.
चौकट टाकणे :
ह्यासाठी फोटोशॉप मध्ये कॅनव्हस साईज हे फिचर मी वापरतो. चित्राचा कॅनव्हस साईज हव्या तो रंगाने हवा तितका वाढवला की पाहिजे ती चौकट काढता येते.
व्हीडीओ डेमोन्स्ट्रेशन
पुढील चित्रकारीला शुभेच्छा!
सहमत
सगळ्या मुद्यांशी सहमत..
२ आणि ३
चित्रे आवडली.
कोलबेर, दुसर्या चित्रात डावीकडेच्या वाळलेल्या कळीमुळेच मलातरी मजा येते आहे. ती काढून टाकली तर चित्र एकदम सपाट , नेहमीसारखे(ऑर्डिनरी) होऊन जाईल.
तिसर्या चित्रात मध्ये आलेले पान काढून टाकावयास हवे होते. सूर्यप्रकाशामुळे चित्राला एकदमच झळाळी मिळालेली आहे, ती आवडली.
सौरभदा-
===============
Tell the truth and then run.
-Proverb
कळी
सौरभदा, कळी ची प्लेसमेंट चुकली आहे (असे वाटते). कळी चुकुन फ्रेममध्ये आल्यासारखी वाटते. म्हणून ती मला तितकी रुचली नाही. त्यापेक्षा फुलावर थोडा टाइट क्लोज अप घेतला असता (मॅक्रो वापरुन) तर फुलाच्या वेगळेपणामुळे चित्राचा ऑर्डिनरी पणा टळला असता.
-कोलबेर
फ़ोटोशॉप
शरद
आपल्या चित्राला चौकट टाकून कर्व्जमध्ये थोडा चाळा केल्यावर चित्र असे दिसते.
कोलबेर यांच्या मुद्द्यांशी सहमत
एक वेगळी कल्पना कशी आवडते, बघा.
आता सुकून गेलेले फूल आलेच आहे, तर त्याचा फायदा घ्यावा. उजवीकडची रिकामी भिंत जास्तीतजास्त कातरून टाकायची. चित्र "उभे" होईल. वाळलेली काडी वायव्येच्या १/३ बिंदूवर येईल, फुलाचा मध्य आग्नेयेच्या १/३ बिंदूवर येईल (आदमासे...).
चित्र वेगळीच "तत्त्वज्ञानी" कथा सांगून जाईल.
थँक्स..!
सर्वांना धन्यवाद!! ती कळी मी मुद्दाम घेतली होती, कारण ऑफ व्हाईट भिंतीच्या बॅकग्राऊंडवर पांढरं फुल तितकं छान नाही दिसणार असं वाटलं मला.. परत नुस्त्या फुलाचा फोटो घेऊन् बघते.. ते फुल सारखंच उमलतं माझ्या घरासमोर.. :)
थँक्स शरद,तुम्ही फोटोशॉप मधे केलेले बदल आवडले मला.. मला खूप इच्छा आहे ते शिकायची, तुमची लेखमाला उपयोगी पडेल..
असो.. धन्यवाद सगळ्यांना.. हा खूप मस्त उपक्रम आहे.. फोटोंबद्दल थोडंतरी कळू लागले तुमच्यामुळे!
वा!
भाग्यश्री,
सगळे फोटु आवडले. त्यातही लाटांच्या फेसाळत्या भेटीवर मी जाम फिदा आहे. मस्त टिपली आहे. जिवंत चित्र!
भूमातेच्या.. चरणतला तुज धुता.. मी नित्य पाहिला होता!
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
अप्रतिम
पहिला फोटो मस्त आहे. सुर्याच्या जवळचा भाग थोडा ब्लोन आऊट आहे. पण मला खर तर तसाच आवडला.
लाटा, घर, घराचं कुंपण.... मस्तच...
क्षितीजरेषा सरळ असण्याबद्दल कोलबेर यांच्याशी सहमत. ती सरळ करण्यासाठी हे बघ
बाकी दोन फोटो छान आहेत पण खूप भावले नाहीत. कदाचित काळ्या पार्श्वभुमीवर छान दिसले असते.
-
ध्रुव