उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद
गणा मास्तर
August 7, 2008 - 8:19 am
गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा. 'गूगल अर्थ'वरपण हे प्रदेश लाल रेघेने दाखवले आहेत. ह्याचा अर्थ होतो काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतात नाहीत.
आपण याबाबतीत काय करु शकतो? काय केले पाहिजे. केवळ राज्यकर्त्यांना शिव्याशाप देउन चालेल का?
निदान गूगल कंपनीकडे निषेध नोंदवता येइल का? जाणकारांनी आपले मत मांडावे.
दुवे:
Comments
नकाशा
नकाशात हा भाग भारतात दाखवल्याने तिथे भारतीय नोटा चालतील?
काही माहीती?
नकाशात हा भाग भारतात दाखवल्याने तिथे भारतीय नोटा चालतील?
तिथे भारतीय नोटा चालत नाहीत अशी काही खात्रीलायक माहीती आपल्याकडे आहे का?
आझाद काश्मिर
आझाद काश्मिर, अक्साई चीनचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेशाचा काही भाग जोपर्यंत निर्विवादरित्या भारताच्या सैन्याच्या ताब्यात येत नाही तोवर भारतीय गूगलचे काहीही वाकडे करू शकत नाहीत.
चीन आणि पाकिस्तानशी युद्ध करून हे भाग जिंकून घेणे ज्यावेळी भारताला शक्य होईल त्यावेळी गूगल आपोआपच या तुटक रेषा एकसंध करेल.
आज ते शक्य नाही हे स्पष्ट आहे आणि भविष्यात कधी ती वेळ येईल काय? याचे उत्तर काळच ठरवेल.