उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका २२
गणा मास्तर
August 7, 2008 - 1:40 am
मी हौसेखातर छायाचित्र काढतो. कॅनन् एस्३आय एस् कॅमेरा वापरतो.
तांत्रिक बाबी फारशा माहिती नाहीत. तंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी काही दुवे माहित असतील तर द्यावेत.
माझी काही छायाचित्र खाली दिली आहेत.
kharutai |
jahaj |
ghar ratnagiritale |
दुवे:
Comments
खेड्यामधले घर् कौलारू
शरद
सुरेख ! विशेषत: घर कौलारू. सुरवातच असेल तर जास्तच .अभिनंदन कारण छायाचित्रातील महत्वाचा भाग,
"काय टिपावयाचे "त्याची जाण स्वभावत: तुम्हाला आहे. खार आणि जहाज बरोबर मध्यभागी न घेता थोडेसे
कडेला घेतले गेले तर अधीक चांगले दिसेल. मुख्य गोष्टीच्या , ज्या बाजूला तोंड असेल त्या बाजूला नेहमी जास्त जागा
सोडावी. चित्र बघतांना आपली नजर त्याप्रमाणॆ फ़िरत रहाते व त्यामुळे चित्र [नकळत] उठावदार वाटते.
शरद
सहमत
शरदरावांच्या प्रतिसादाशी सहमत.
फोटो छान आहेत.
--लिखाळ.
छान
जहाज मधे काही पटकन समजतं नाही पण खारुताई व घर कौलारु छानच. कृष्णधवल असले तरी ते सकाळचे उन धुर व धुके मिश्रीत वातावरण जाणवतेय.
सुंदर
मला सगळेच फोटो आवडले. सुरुवार म्हणून तर चांगलेच आहेत.
तंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी बरेच दुवे मिळतील. पण ते आंग्ल भाषेतले असतील. आपल्यातल्या कोणी आपल्याला नक्की काय शिकायचे आहे ते ठरवून एखादी चर्चा सुरु केल्यास मराठीमध्ये बरीच माहिती येथे संकलीत होईल. येथे या विषयातले तज्ञ आहेत. ते नक्कीच मार्गदर्शन करतील.
काय शिकायचे आहे
फोकस,अपार्चर्,शटर् स्पीड् म्हणजे काय आणि त्याचा फोटोग्राफीत कसा उपयोग करावा?
फोटोग्राफीची सर्वसाधारण पथ्ये कोणती?
फोटोग्राफी
या बाबत लेखमाला लिहावी अशी मी शरदारावांना विनंती केली आहे.त्यांनी विविध प्रकारचे कॅमेरे हे गेली वीस वर्षे हाताळलेले आहेत. लवकरच ही उपयुक्त लेखमाला उपक्रमावर् बघायला मिळेल अशी खात्री आहे.
प्रकाश घाटपांडे
उत्तम
या लेखमालेची वाट पाहतो आहे.
--लिखाळ.
वाह!
तीनही फोटो सुरेख. कौलारू घर तर लाजवाब!
हेच
फोटो मस्त आले आहेत.
मात्र वेगवेगळे दिले असते तर सगळ्यांना न्याय मिळाला असता.
खारूताई सुंदर आहे. अगदी डिस्ने पोझ आहे तीची! डोळ्यातली चमक आल्याने चित्र अगदी जिवंत आहे.
जहाज बरे आहे.
मात्र घर फारच छान आले आहे. प्रकाशाचा आणि धुक्यातल्या किरणांचा वापर सुरेख जमला आहे.
आपला
गुंडोपंत
+१
अगदी हेच म्हणायचे आहे.
खार भारी आली आहे. म्हणजे फोकस वगैरे तर मस्तच आहे.
जहाज बरे आले आहे. जहाजाचे चित्र आकाश निळे असते अथवा पाण्याचा रंग चांगला टिपता आला असता तर आणखी छान दिसले असते असे वाटते. जहाजाचा फोटो दुपारी काढला आहे का?
घर मस्तच आले आहे. कृष्णधवल नसते तर कदाचित योग्य न्याय मिळाला नसता असे वाटते.
-
ध्रुव
खार आणि घराचा सोपा, सुरेख
खार फारच छान : फोकस, खारीची "पोझ". लुकलुकणारा डोळा...
घरही फस्क्लास : कृष्णधवल रंगसंगती कधी वापरावी, याबद्दल हे पाठ्यपुस्तकात उदाहरण द्यावे. रंगीत चित्र असते, तर हिरवळीमुळे कोवळ्या उन्हांची फाकणारी किरणे इतकी स्पष्ट दिसली नसती.
जहाज ठीक नाही : फोटोच्या मांडणीचे ठोकताळे क्वचितच मोडावे - मोडले तर चित्र साधारण बिघडते. (१) जहाज मध्यात घेतले आहे - चौकटीतमधली ही सर्वात कंटाळवाणी जागा आहे. (२) रंगीत फोटोत दोनच रंग असले, तर ते दोन्ही [सामान्यपणे] एकमेकांचा परिपोष करणारे हवेत. रंगचक्र आणि चक्राधारित रंगसंगती हे दुवे विकीवर बघावेत, इतरत्र बघावेत. ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे झेंड्याच्या लाल रंगाला साजेसा निळाशार असायला हवा होता. दुपारी निळा रंग नीट दिसण्यासाठी, (अ) जनरल किरणांची भगभग कमी करण्यासाठी कॅमेर्यावर करडी काच (न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर) वापरावी आणि (ब) परावर्तित किरणांची भगभग कमी करण्यासाठी पोलरायझर वापरावा.
जहाजाबद्दल चांगली गोष्ट - (ही सध्या हरवते आहे.) जहाजाचे वेगवेगळे भाग आणि दोर यांच्यामुळे निगेटिव्ह स्पेसचे अनेक त्रिकोण-विविधाकारी तुकडे बनत आहेत. जहाजावर झूम करून फक्त जहाज आणि नांगराचा दोर फोटोच्या चौकटीत राहू दिले असते, तर बहार आली असती. फोटो कृष्णधवल चालला असता.
धन्यवाद
शरदराव, चाणक्य, प्रियाली, ध्रुव, धनंजय धन्यवाद.
शरदरावांच्या लेखमालेतुन बरेच काही शिकता येइल.
ध्रुव जहाजाचा फोटो साधारण् ५ वाजता काढला आहे.
धनंजय सविस्तर प्रतिक्रियेबद्दल् धन्यवाद.
मासिक अथवा पुस्तके.
मागच्या पंधरवाड्यात प्रवासात एक इंग्रजी मासिक की जे छायाचित्रण या विषयालाच वाहिलेले आहे असे वाचण्यात आले होते.
त्यावरून माझ्या मनात अशी कल्यना आली आहे की अश्या स्वरुपाचे मराठीत मासिक काढायला हवे.
पिडीएफ च्या स्वरुपात जर काढता आले, पृष्ठ मर्यादा ८ पानाची असेल तर २५०/३०० अथवा कमी खर्च लागू शकतो.
कृपया यावर विचार करावा.
चांगली कल्पना
द्वारकानाथ काकांची कल्पना चांगली आहे.
पिडीएफ असेल तर संग्राह्य बनेल.
अजून काही....
थोडा उशिराच प्रतिसाद देत आहे.
खारीचे चित्र खालच्या बाजूने साधारण एक दिड सेमी क्रॉप केले तर चांगले दिसेल
घराचे चित्र परिपूर्ण आले आहे
जहाज मात्र आवडले नाही . सूर्य आकाशात बराच वर आहे नि जहाज बॅकलिट झाले आहे. शिवाय एस् ३ आय एस् ला एवढी मोठी झूम रेंज असताना ती वापरायला हवी होती.
=सौरभदा
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे. खारुटी छानच (खालच्या पेक्षा वरुन अर्धा इंच क्रॉप केली तर?) गलबताच्या चित्रात आकाश निरस आले आहे. घराच्या चित्रातील किरणांनी चित्राचे सौंदर्य वाढवले आहे.
सुंदर्
चित्रे छान आली आहेत. मला घराचे सर्वात जास्त आवडले. (ते कुठेतरी बघितल्यासारखे वाटते आहे. बहुतेक तुमच्या ऑर्कुट प्रोफाइलला भेट दिली असेन. तिथे आहे का ते?)
- सूर्य
धन्यवाद
क्रॉप वगैरे सगळे शिकायचे आहे.
सुर्य हिच चित्रे मिसळपाववर टाकली होती.