छा टी - पाकोळी

नमस्कार मंडळी,

आज सकाळी पुण्यात ओकायामा गार्डन - अर्थात पु. ल. देशपांडे बागेत गेलो होतो. तिथे पाण्याच्या जवळ या पाकोळीचा फोटो मिळाला. बघा आणि सांगा कसा वाटतो ते.

Camera: Nikon D40
Exposure: 0.006 sec (1/160)
Aperture: f/5.6
Focal Length: 300 mm
फोटो जसा कॅमेर्‍यातुन आला तसाच्या तसा देत आहे. फोटोवर कुठल्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. कृपया फोटो जालावर चढवू नये ही विनंती

मोठ्या चित्रासाठी येथे बघा
ज्या मंडळींना फोटो आवडला नसेल त्यांनी नक्की सांगा व काय काय सुधारणा हव्यात तेही सांगा.

धन्यवाद,
ध्रुव

लेखनविषय: दुवे:

Comments

सही

एकदम मस्त आलय छायाचित्र!
त्यात त्या पावसाच्या थेंबांमुळे तर अजुनच खुलुन उठलयं !

ह्या पक्षाचे इंग्रजी नाव wire tailed swallow असे आहे आणि मराठीतुन त्याला बहुतेक भिंगरी असे नाव आहे!
जे काही असेल ते असो पण फोटो बाकी एक नंबर!

-भालचंद्र

फार, फार सुंदर !

मला छायाचित्रणातले काहीही कळत नाही , पण फोटो पाहिला आणि कुठेतरी ठोका चुकला बुवा ! फारच सुंदर !
(डॅस्क्टॉप ची इमेज म्हणून वापरतोय ! :-) )

मोठ्या आकाराचे चित्र सुंदर

फार आवडले.

का कोणास ठाऊक, छोटे चित्र फोकसमध्ये नाही, डोळा पाणीदार दिसत नाही, असे काहीसे वाटते. माझ्या स्क्रीनचा दोष असावा.

वा!वा!

सुरेख! त्या पक्ष्याच्या पिसांना काय म्हणायचे माहित नाही पण ते दोन केसासारखे लांब जे काही आहे त्यावरही पावसाने नक्षी निर्माण केली आहे. पक्ष्याचा रंगही फारच सुंदर, बहुधा मिडनाईट ब्लू असावा (चू. भू. दे. घे) निसर्गाची किमयाही अफाट असते - पांढर्‍या शुभ्र शर्टावर घातलेल्या निळ्या कोटावरची लाल टोपी लाजवाब!

सुरेख

खुपच सुरेख आला आहे.
काही लोकांनी झाडे लावल्यावर जगण्याची खात्रीच असते त्यांना ग्रीन फिंगर्स असे म्हणत.
तसे ध्रुव ला कॅमेर्‍याच्या बटनाची खात्रीच आहे. त्यामुळे ध्रुवला कॅम फिंगर असे नाव द्यायला हरकत नाही!

असो,
चित्र आवडले. फक्त कदाचित अँगल जरा बदलला असता (म्हणजे सुमारे २० अंश पक्ष्याच्या डोक्याच्या बाजूकडून )
तर अजून मजा आली असती. शेपटीला न्याय मिळालाच असता पण डोके व डोळेही जास्त चांगले टिपले गेले असते असे वाटते.

बाकी पाऊस आणि खांबांमुळे मस्त वाटते आहे बघायला!

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

सर्वांना धन्यवाद.
धन्यवाद गुंडोपंत तुमचे नामकरण आवडले ;) पक्षाच्या २० अंश डावीकडे पाण्यात उतरावे लागले असते. :) याच पक्ष्याचा अजून एक फोटो काढला ह बघा...

-
ध्रुव

वा..पाकोळी, भिंगरी आणि पांगळी

पाकोळी (?) ओरडताना चित्र टिपले आहे.. मस्त रे !!
पाकोळी, भिंगरी आणि पांगळी अशी नावे स्वॅलो, मार्टीन आणि स्विफ्ट यांना आहेत .(क्रमाची खात्री नाही.)
--लिखाळ.

सुंदर

फारच सुंदर आला आहे चित्र. पावसाचे थेंब छान उमटले आहेत? पण मग पावसात असा फोटो काढलाच कसा?





पावसात

पावसात कॅमेरा नेण्याचे धाडस... पावसाचा जोर जास्त नव्हत म्हणून हे जमले.

-
ध्रुव

मस्त फोटो

फोटो सुरेख आहे. मला पक्ष्यासोबत ते बांबूसुद्धा आवडले. पण या पक्ष्याला पाकोळी म्हणतात हे माहित नव्हते. आमच्याइथे वटवाघुळासारख्या दिसणार्‍या करड्या रंगाच्या छोट्या पक्ष्याला पाकोळी म्हणातात.

राधिका

झ्याक

फोटु झ्याक, शेपटीवरचे थेंब, बांबु खूप आवडले
बाकी राधिकाशी सहमत.. अम्हिहि त्या करड्या पक्षाला पाकोळी म्हणायचो

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पाकोळी

हा पक्षी पण पाकोळी कुटुंबातलाच. याला मराठीत तारवाली म्हणतात.

-
ध्रुव

झकास..

ध्रुव,खूपच छान चित्र. आवडलं.
मधला बांबू छान फोकस मध्ये आला आहे. बाकी थोडं अजून शार्प हवं होतं. नेचर फोटोग्राफीवाल्यांना तो डोळ्यातला ठिपका फार काटेकोर लागतो.
वरच्या तुलनेत खालचं चित्र जास्त ड्रॅमॅटिक आहे.फारसं बघायला मिळत नाही. ते जास्त आवडलं असतं मात्र पार्श्वभूमीमुळे थोडं लक्ष विचलित होतंय.

बाकी लेन्स कुठली आहे?

-सौरभदा
======================

When I read about the evils of drinking, I gave up reading.

धन्यवाद

आवर्जुन मत देण्यार्‍या सगळ्यांचे आभार.
सौरभदा,
तु म्हणलास तसं चित्र अजूनही थोडं शार्प हवे होते. मी सिग्मा कंपनीची ७०-३०० लेन्स् वापरली. ही लेन्स् माझ्या कॅमेर्‍यावर ऑटोफोकस होत नाही.

-
ध्रुव

अप्रतिम

अगदी अप्रतिम चित्र. फोकस सुरेख अहेच, शिवाय बांबूंमुळे चित्राला एक सुंदर लय आली आहे. पार्श्वभूमीतील रंगामुळे आणखी उठाव आला आहे. आणि पक्ष्याच्या पाठीवरचे थेंब किती सुरेख!
तुझ्या कारागिरीला सलाम!
----

छान

ध्रुव,
चित्र छान आहे. पक्षी अजून मोठा असता तर अजून चांगले वाटले असते.
डेप्थ ऑफ फिलड उत्तम साधले आहे.
पु चि शु. (पुढील चित्रास शुभेच्छा :)
-- लिखाळ.

असेच म्हणतो

छान चित्र.

 
^ वर