गूढलेखन

गूढलेखन
इंग्रजीतील क्रिप्टोग्रॅम नावाचा प्रकार आपण कदाचित्‍ जाणत असाल.गूगलवर शोध घेतल्यास याचा सादप्रतिसादात्मक(इंटर ऍक्टिव्ह) खेळही आढळेल.एखादे सुवचन,म्हण,कविता, इ.परिचित लेखन घेऊन त्यातील प्रत्येक अक्षरासाठी अन्य अक्षर योजून जे लेखन होते त्याला मूळलेखनाचा गूढावतार म्हणतात. या गूढलेखनावरून मूळ लेखन शोधून काढणे ही समस्या असते.
मराठी गूढलेखनासाठी खालील नियम आहेत:
** मूळलेखनातील स्वर तसेच ठेवावे.म्हणजे त्यातील काने,मात्रा,ऋकार गूढलेखनात तसेच राहातील.
** प्रत्येक व्यंजनाच्या जागी अन्य व्यंजन योजावे. (एकास एक संगती)क्ष,ज्ञ ही साधी व्यंजने मानावी. त्यांच्या जागी कोणतेही व्यंजन योजता येईल.
** मूळलेखनातील अनुस्वार तसेच ठेवावे. मात्र परसवर्ण (न, म, इ.) असल्यास त्या व्यंजनाच्या स्थानी अन्य व्यंजन घालावे.
** मूळलेखनातील रफ़ार म्हणजे र हे व्यंजन होय. ते बदलावे म्हणजे गूढावतारात तिथे रफ़ार दिसणार नाही.
उदाहरण:--मूळशब्द: कार्यक्रम.
व्यंजनबदल: क-->ब; र-->ल, य-->प, म-->द
गूढावतार:-- बाल्पब्लद
*****************************************************************
वरील नियमांनुसार पुढील गूढलेखन आहे.त्यावरून मूळलेखन शोधावे.प्रत्येक लेखनासाठी एकास एक संगती भिन्न असू शकेल.मूळलेखनाच्या स्रोताचा संदर्भ दिला आहे. तसेच सुलभतेसाठी एक शोधसूत्र (क्ल्यू) आहे.(क्रिप्टोग्रॅम खेळात मूळ लेखनात कोणते अक्षर किती वेळा आले आहे ते देतात.ते इथे टाळले आहे.)
**(१) पाटमा सेईपा अंजब रादले. ( म्हण. टारी= किल्ली या अर्थाचा शब्द)
**(२) मुन्दाबीणा पांबा लोयाव माढ. (म्हण. शो्धसूत्र : बोमे=मस्तक,शीर )
**(३) रटा भल्प ले भल्प धाहे धकाधे. (मनाचे श्लोक. धारट= पाचवा अवतार)
**(४) नुनंचणि नया फबो नुळख हाम्प माखी भबो.(मराठी श्लोक...नबम=रस्ता)
**(५) मोन्दा मामपीना बाळी. (म्हण. शोधसूत्र: ळदन =विष )
.........................................................................................................
कृपया उत्तर व्य.नि. ने

लेखनविषय: दुवे:

Comments

पहिले सुटले

बाकी मना बिनाचे श्लोक, मराठी श्लोक कधी येतच नव्हते त्यामुळे तिथे मारामार आहे. :(

मराठी श्लोक येत नाहीत म्हणता म्हणता चौथे सुटले. ;-)

नेहमी खरे बोला

'सत्यं वद' आचरा, म्हणजे मनाचे श्लोकही सुटतील. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कृपया

असा पेपर फोडू नये. ;-) ह. घेणे

तिसरे सुटले. म्हणजे मला श्लोक माहित आहेत पण म्हणी नाही असे सिद्ध झाले. :((

असं म्हणता म्हणता आता फक्त पाचवी म्हण राहिली आहे. चार सुटले....

आणि आता सगळे सुटले. व्य. नि. पाठवला आहे.

व्यनि

उत्तर दिले आहे.

( टारी= किल्ली या अर्थाचा शब्द ) असे क्लू नसते तरी चालले असते.

पाचव्या क्लूमध्ये गोंधळ झाला आहे असे वाटले. उत्तर समजले पण क्लू मधूनही नवी माहिती मिळाली. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुस्तकांमध्ये

द.पां.खांबेटे यांच्या हेरगिरीवरील काही पुस्तकांमध्ये अशी गूढवाक्ये वाचल्याचे पुसटसे आठवते. अशा गूढलेखनाचा/क्लूचा सुरेख वापर 'द विन्ची कोड'मध्येही केला होता. मराठीत अजून कोणत्या पुस्तकांमध्ये असे गूढलेखन आहे का?

गूढ लेखन म्हणता येईल रामदासांचे शिवाजीमहाराजांना पत्रही काहीजणांच्या मते मिथक प्रसिद्ध आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखी एक पद्धत

ओळखायच्या गोष्टी चिरपरिचित असल्याने असेल कदाचित, पण नुसते ट-टा-टा-ट्-टा-टा करून सुद्धा सहज उत्तरे मिळाली. दिलेल्या क्लूवरून केवळ ती पडताळून पाहणे शिल्ल्क राहिले.

+१

असेच म्हणतो, पण खेळ आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आणखी एक म्हण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चाईब मस मुदाकी बाथीमस उदाकी.
हा कोणत्या म्हणीचा गूढावतार आहे?
(उत्तर प्रतिसादात लिहावे.)

आजच

तूप कढवलं. ;-) घरातल्यांना त्याशिवाय जेवण जात नाही. :-)

आमच्याकडेपण ..

बरे झाले! आता कुणी उपाशी राहणार नाही.--वाचक्‍नवी

उत्तर प्रतिसादात

वैद्यकाप्रमाणे ही म्हण 'बाथीमस'ऐवजी 'बंमस' शब्द घालून लागू पडते. ;)
उत्तर प्रतिसादात -
उम्मस द्रमिडागाम ??? :):)

वैद्यक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" या म्हणीत श्री. विसुनाना किंचित् बदल करतातः
"खाईन तर तुपाशी नंतर उपाशी"
वैद्यकाच्या दृष्टीने हा बदल योग्यच आहे.
.....
त्यांनी ''उत्तर प्रतिसादात " चे गूढरूप लिहिले आहे
उम्मस द्रमिडागाम ??? :):)

यात थोडी चूक आहे.ती कोणती?

र हे व्यंजन

सर्व व्यंजने बदलायची ठरवल्यावर उम्ममधला स=र
द्रमिडागाम मधील द्र मधला र =र च राहिला आहे :)

र=न हे चांगले समीकरण आहे

उम्मन द्नमिडागाम बरोबर वाटले असते.

द्समिडागाम

द् सायलेंट ?!! ;)

उत्तर कौशल्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांनी उत्तर उघड न करता मोठ्या खुबीने दिले.
श्री. वाचक्नवी यांनी सुद्धा प्रियाली यांच्या उत्तराचा कौशल्याने उपयोग केला.
धन्यवाद!

गूढलेखनातील चूक

मराठी असे आमुची मायबोली
क्र. (५) मधे ळदन= विष च्या जागी ळदब= विष असे हवे.
श्री. आजानुकर्ण,श्री.धनंजय, राधिका आणि प्रियाली यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली. धन्यवाद!

व्यनि. उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इंग्रजीतील क्रिप्टोग्रॅमच्या धर्तीवर मराठीत गूढलेखन करण्याचा हा प्रयत्न आहे.याचे नियम मीच लिहिले आहेत.मराठी गूढलेखन माझ्या वाचनात आलेले नाही.
पुढील सात सदस्यांनी सर्व मूळलेखन अचूक ओळखले आहे.:
...

सर्वश्री. आजानुकर्ण, वाचक्नवी, धनंजय,नवीन,नंदन.
तसेच राधिका आणि प्रियाली.

आणखी उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मुक्तसुनीत, श्री.विसुनाना आणि श्री.अमित कुलकर्णी यांनी गूढलेखनावरून मूळ लेखन अचूक ओळखले आहे.

सुसंगति सदा...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री नंदन यांनी गूढलेखनाचे अचूक उत्तर पाठविले आहे. त्या निरोपात ते लिहितातः
चौथ्या उत्तरावरून आठवले. या आर्येतील संदघ्रि ह्या शब्दाचा अर्थ सांगू शकाल का? संदघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो ह्या भागाचा काही संदर्भ लागत नाही त्यामुळे.

आभारी आहे,
नंदन

..........
मूळ श्लोक असा :

सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळीं दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवच्चरित्रीं जडो|
.....
अंघ्‍रि या शब्दाचा अर्थ पाय.म्ह.सदंघ्रिकमळी= सज्जनांच्या पदकमलाच्या ठायीं.
ही ईश्वराला उद्देशून केलेली प्रार्थना आहे.
अर्थः
(हे ईश्वरा मला) चांगली संगती मिळो.(माझ्या) कानावर सज्जनांचे बोलणे पडूं दे.(माझ्या) बुद्धीतील दोष झडून जाऊ दे.(मला) विषयसुख कधी प्रिय वाटू नये.
(हे ईश्वरा माझे) मन सज्जनांच्या पदकमलांपाशीं दडून राहो. (मी) ते (दुसरीकडे) वळविण्याचा प्रयत्न केला तरी हट्टाने ते तिथेच अडून राहूं दे.(तुझी) ताटातूट झाली तर ते दु:खी होवो.(माझे) मन तुझ्या लीलाचरित्राशी जडून राहो.

पृथ्वी वृत्तात असलेली ही रचना मोरोपंतांची आहे.

धन्यवाद

कोडे आणि वरील पंक्ती दोन्ही उत्तम.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार्

तपशीलवार स्पष्टीकरणाबद्दल मनःपूर्वक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कूटलेखन

गुढलेखन च्या ऐवजी कूटलेखन हा शब्द अधिक योग्य वाटतो. बिनतारी विभागात सायफर हा एक उपविभाग आहे. त्यात मोर्स कोड चे सायफरिंग ( एन्क्रिप्शन) केले जाते. पाठवणार्‍या बिनतारी यंत्रचालकाला काय पाठवतो आहे हे समजत नाही. ते घेणार्‍या यंत्रचालकाला ही ते समजत नाही. जेव्हा त्याचे डिसायफरिंग केले जाते त्यावेळीच ते समजते. सायफर कोड हे नेहमी बदलले जातात. त्याचे डिसायफरिंग हे फक्त विशिष्ट अधिकार्‍याला माहित असते.
मुळात मोर्स हाच एक कोड असल्याने तो मर्यादित वर्तुळातच समजतो. आमचे कडे ज्याकाळात दळवळवण यंत्रणा ही सुलभ नव्हती त्याकाळात टेलीफोन वरुन् ट्रंक कॉल्स बुक करावे लागायचे व लाईन मिळेपर्यंत तासंतास जायचे. मुंबई मटका हा मुंबईत फुटल्यानंतर सुद्धा तो नागपुर पुणे कोल्हापुर इ . ठिकाणी जायला वेळ लागायचा . त्यामुळे तेथील बुकी हे बुकिंग चालुच ठेवायचे. त्याकाळात् आमचे यंत्र चालक आकडा फुटल्यावर तो आकडा बिनतारि यंत्रावर वाजवुन इतर यंत्रचालक सहकार्‍यांना कळवायचे. ते लगेच बाहेर जाउन तो आकडा लावायचे. काही काळाने बुकी लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी बुकिंग बंद केले.
प्रकाश घाटपांडे

कूटलेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री. प्रकश घाटपांडे यांनी सुचवलेला कूटलेखन हा शब्दही तसा समर्पक आहे.कोड(मोर्सचे) चा अर्थ सांकेतिक लेखन असा होतो.क्रिप्टोगॅम या इंग्रजी शब्दाचा अर्थ गूढलेखन असा होतो.

त्रिकुटे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खाली पाच त्रिकुटे(उदा.:तन,मन,धन. ब्रह्मा, विष्णू,महेश इ.) गूढरूपात लिहिली आहेत.सर्वांसाठी व्यंजनबदल पद्धती एकच आहे.त्यावरून मूळ त्रिकुटे ओळखावी. तसेच या पद्धतीत :"मरावे परी कीर्तिरूपे उरावे'' या सूक्तीचा गूढावतार लिहावा.
....
त्रिकुटे:

** च्भश्ल,णृब्दू,धाबाथ.
**चब्ब्भ,शह,बण.
**भाब,धिब्ब,टष.
** लंला,दणुडा,चशच्भबी.
**अड्ड,भस्ब्श,डिभाशा.

संपादन
येथे भस्ब्श हा शब्द भच्ब्श असा हवा.
(श्री.धनंजय यांनी ही चूक निदर्शनाला आणून दिली.)

ब्शिटुके आमि चूट्बी गिजिगी

तशोतश आजे?

व्यनि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी सर्व त्रिकुटे अचूक ओळखली.तसेच दिलेल्या सूक्तीचे त्यांनी केलेले गूढलेखनही अचूक आहे.माझ्या एका शब्दातील चूक त्यांनी दाखवून दिली. तदनुसार संपादन केले आहे.

व्यनि उत्तरः२, व्यनि उत्तरः३

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री.विसुनाना यांना गूढलेखनाचे नेमके मर्म उमगले आहे.त्यांनी पाठविलेली सर्व त्रिकुटे तसेच सूक्तीचे गूढलेखन अचूक आहे.

व्यनि उत्तरः ४

मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
सर्व पाचही त्रिकुटे शोधण्यात तसेच दिलेल्या सूक्ताचे गूढस्वरूप लिहिण्यात श्री. वाचक्नवी यशस्वी झाले आहेत.

व्यनि. उत्तरः५

मराठी असे आमुची मायबोली ***********************************
....
प्रियाली यांनी सर्व त्रिकुटे अचूक शोधली आहेत.तसेच "मरावे परी कीर्तिरूपे उरावे" चे गूढलेखनही योग्यप्रकारे केले आहे.

व्यनि. उत्तरः ६

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत यांनी त्रिकुटांचे अचूक उत्तर पाठविले आहे ते पुढील प्रमाणे:
....................................................

च्भश्ल,णृब्दू,धाबाथ. : स्वर्ग, मृत्यू, पाताळ
**चब्ब्भ,शह,बण : सत्त्व, रज , तम
**भाब,धिब्ब,टष : वात , पित्त, कफ
** लंला,दणुडा,चशच्भबी : गंगा, यमुना, सरस्वती
**अड्ड,भच्ब्श,डिभाशा : अन्न, वस्त्र, निवारा

मरावे परी कीर्तिरूपे उरावे : णशाभे धशी टीश्बीशूधे उशाभे.
............................................................

 
^ वर