उड उड रे, उश उड रे

उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला

माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते ! राजस्थानी गीत असे :

उड उड रे, उड उड रे, उड उड रे म्हारा काला रे कागला !!
कद म्हारा पियुजी घर आवे,कद म्हारा पियुजी घर आवे !
आवे रे आवे, उड उड रे, उड उड रे !!
खीर खांडरो जींमण जीमाऊं, सोनानी चोच मढाऊं, म्हारा कागा,
जद म्हारा पियुजी घर आवे !!
पगल्याने थारे, बांधुरे घुंगरा,गलेमे हार पैराऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आंगलियामे थारे अंगुठी कराऊं, चांदीका पांख लगाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
जो तू उडैने सगून बतावे,थारो जनम जनम गुन गाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आवे रे आवे, जद म्हारा पियुजी घर आवे !!

कद--केंव्हा, जद-- जेंव्हा,खीर खांडरो-- साखरेची खीर, जीमण जीमाऊं --जेवूं घालीन. पाख--पंख

आता तुमच्याही मनांत गुंजी घालावयाला सुरवात केली असेल श्री. ज्ञानेश्वरांच्या विराणीने

पैल तोहे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे !
उड उड रे काऊ,तुझे सोन्याने मढवीन पाऊं !
पाहुणे पंढरीराऊ, घरा कै येती !!
दही भाताची उंडी, लावीन तुझे तोंडी !
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी !!
दुधे भरूनी वाटी,लावीन तुझे ओठी !
सत्य सांगे गोठी विठू येईल कारे !!
अंबिया डहाळी, फ़ळे चुंबी रसाळी !
आजिचीरे काळी शकून सांगे !!
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे !
भेटती पंढरीराणे शकून सांगे !!

दोनही रचनांमध्ये काय साम्य आहे पहा .कुठे मारवाडमधील पतीची वाट पाहणारी गृहिणी आणि कुठे महाराष्ट्रातील विठूची वाट पहाणारा भक्त ? एक भेटीची आर्तता सोडली तर दोघांमध्ये कुठलीही समान गोष्ट शोधूनही सापडणार नाही. पण नाही तरी कसे म्हणावे ? दोघांनाही शकून विचारण्यासाठी एकच पक्षी सापडला-- काळा कावळा ! दोघेही त्याला "लाडिगोडी" करण्यास सारखेच तत्पर. दोघेही त्याला नुसते खावावयास गोड पदार्थ करून थांबावयास तयार नाहीत तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी त्याला मढवावयास सज्ज ! कावळ्याने झाडावर येऊन नुसते कोकायचे नाही तर परत उडून जावयाचे आहे. एकच धावा; उड ऊड रे, उड उड रे ! जणु दोघांनीही शेजारी शेजारी बसूनच धावा केला.
हे तर शक्यच नाही.स्थळ-काळात प्रचंड अंतर. मग काय चमत्कार आहे हा ?
लोक्गीत-विराणीच्या निर्मितीच्या काळाच्या फ़ार फ़ार मागे जा. आदीम काळात हिंदुस्तानभर,सर्वत्र,जनमानसात एक धृढ भावना रुजलेली होती. कावळा ओरडत उडाला तर प्रियकर घरी येणार. या समुजतीला स्थळ, काळ,भाषा कशाकशाचे बंधन नव्हते. शोध घेतला तर इतर भाषांमध्ये अशा रचना सापडणार नाहित कां ?
जरा शोधाना !

समित्पाणी

Comments

खरंच की

सांस्कृतिक देवाण घेवाण ! यातुनच हे साम्य येत असणार! लोकगीत ही त्याकाळात प्रभावी साधन होती.
प्रकाश घाटपांडे

उत्तम

दोन्ही रचनांतले साम्य विलक्षण आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

साम्य

दोन्ही रचनांतले साम्य विलक्षण आहे.

अगदी!

कालच उपक्रमी मित्राबरोबर बोलताना आम्हाला तीन, ब्लॉग/आंतरजालावर लेख/फोटो/इमेल असे आढळले की त्या लेखनकर्त्याच्या बागेत पक्ष्याने घरटे केले आहे, छोटी पिल्ले आहेत असे.. जसे पक्ष्यांच्या विणीचा हंगाम, सुगीचा हंगाम, निसर्ग, तसे सैनिकाने / व्यापार्‍याने घर सोडून मोहीमेवर/ व्यापाराला जाणे ह्या समान धाग्यावर् आधारीत अनेक रचना वेगवेगळ्या भाषेत असणारच.

आता खरी गंमत व नजर की तसे विलक्षण साम्य शोधणे. :-)

धन्यवाद शरदजी.

माये नि माये

माये नि माये मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा,
जोगन हो गयी तेरी दुलारी मन जोगी संग लागा

मधील 'जोगी' श्याम होता हा असे देव कोहलींनी एका मुलाखतीत सांगितल्याचे स्मरते, पुढील ओळी फिल्मी आहेत हाही खुलासा त्यांनी लगोलग केला होता. याची प्रेरणाही इथेच (संत मीराबाई?) असावी का?

सुरेख

सुरेख टिपले आहे साम्य!
तुमच्या निरिक्षणाला दाद द्यायला हवी.

पुर्वी भारतात उत्तम प्रतीचे वैचारिक दळणवळण होते.
हे प्रवाह वेगवेगळ्या आश्रमांद्वारे, गुरु, बाबा, महाराजांद्वारे आपापले तत्वज्ञान घेवून वहात होते.
१२-१३ व्या शतकापासून बंगाल पासून राजस्थान आणि काश्मिर ते कन्याकुमारी असा भक्ती मार्गाचा महापूर उसळला.
मला आता नक्क्की आठवत नाही पण बंगाल मधल्या एका तत्ववेत्यांनी १५ व्य शतकाआधी भक्तीरसाचे अतिशय सुंदर विवेचन करणारा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला होता, त्याचा अभ्यास महाराष्ट्रात देहुला पण झाला होता. (शिवाय त्यावर प्रतिवाद करणारा ग्रंथही लिहिला गेला होता. (एका पुस्तकात अनपेक्षितपणे या ग्रंथाचा संदर्भ/गोषवारा वाचायला मिळाला होता तेंव्हा कळले हे!)
)
म्हणजेच दळणवळण पक्के होते.
आणि या दळणवळणाचे साधन संस्कृत मधून होते.
या उदाहरणाने मला असे म्हणायचे आहे की,

अशा अर्थाचे संस्कृत काव्य कोणते आहे, असा शोध घेणे महत्वाचे ठरावे.

आपला
गुंडोपंत

तिखट कान

पण गोडवा नेमका टिपलात. दोन्ही गाण्यांमधले साम्य विलक्षण आहे.

कावळा कधी अभद्र वाटतो, पिंडाला शिवताना भाव खातो - पण रोजचा तो गरीब, आणि साधासुधा असतो.

आपल्या कौटुंबिक कथांमध्ये पाहुणा येण्याची वर्दी देण्याचे काम त्या कावळ्याला दिलेले आहे, या चित्रात घरगुती आपुलकी आहे.

लोकगीत?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांनी दिलेल्या दोन्ही गीतांत खूपच साम्य आहे.घराजवळच्या झाडावर कावळा ओरडून उडाला की पाहुणा येतो हा काकरवसंकेत भारतभर असेल. पण या दोन गीतांतील साम्याला तेव्हढे कारण पुरेसे वाटत नाही. तेव्हा दोन्ही गीतांचा मूळस्रोत एकच असावा आणि तो संस्कृत भाषेतील असावा असे श्री. गुंडोपंत यांच्याप्रमाणे मलाही वाटले. पण पुनर्विचार करता ते पटेना.कारण अशा प्रकारे कावळ्याची विनवणी करणारी रचना संस्कृत भाषेत असावी हे संभवत नाही. कारण संस्कृतभाषेची ती प्रकृती नाही असे मला वाटते.
...मग या दोन गीतांत एवढे साम्य कसे?
राजस्थानी गीत पुन:पुन्हा वाचले.त्याचा ढंग लोकगीताचा वाटतो पण ते तसे लोकगीत नसावे.एखाद्या आधुनिक गीतकाराने ते लोकगीताच्या धर्तीवर रचले असावे." थारो जनम जनम गुन गाऊं" ,''आंगलियामे थारे अंगुठी कराऊं, चांदीका पांख लगाऊं,''इ. ओळींवरून हे लक्षात येते.(”आधी बीज एकले ” हा कवी शांताराम यांनी लिहिलेला अभंग तुकारामाचा वाटतो. गदिमांची काही गीते लोकगीते वाटतात.)
या राजस्थानी गीतकाराने "पैल तो गे काऊ कोकताहे..” या गीत ऐकले. त्याला आवडले. त्याला मराठीचे काही ज्ञानही असावे.त्या आधारे त्याने हे र्राजस्थानी लोकगीत(?) रचले असावे . अन्यथा एवढी साम्यस्थळे संभवत नाहीत

 
^ वर