छायाचित्र टीका १९

लास वेगस येथिल हॉटेल पॅरीस समोरील आयफेल टॉवरची प्रतिकृती.

कॅमेरा : कॅनन डिजीटल रेबेल ३५०ड
ऍपर्चर : १४
शटर : ३ सेकंद
आयएससो : ४००

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

वा सुंदर!
सेपिया मोड मधे हा फोटो काढावं हे कधी सुचलंच नाहि :) (तुम्ही फोटो काढतेवेळी सेपियात काढला आहे की नंतर संस्करण केले आहे?)

मी याच टॉवरचं काढलेलं प्रकाशचित्र पहा..

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

उत्तम रचना

कंपोझिशन लाजवाब. कृष्णधवल फोटोचा उत्तम वापर.

(अनेक वेगवेगळे शटर टायमिंगचे प्रयोग केलेत का? कॅमेर्‍यातील प्रकाशमापक-संगणक नेमके योग्य गणित देणार नाही, असे वाटते.)

उभा?

फोटो बघीतल्याक्षणी वाटलं की हा उभा का नाही काढला? हा उभा अजून आवडला असता.

बाकी रंगसंगती सुरेख.

-
ध्रुव

नाही

नाही, असाच चांगला वाटतो. उभा ऋशिकेषने ने येथे दिला आहेच. त्यामध्ये इतर इमारती येतात अन या वास्तूची मजा कमी होते. हे माझे वैयक्तिक मत.





बरोबर

ऋशिकेषने दिलेला फोटो दुरुन घेतलेला आहे असे वाटते. हा फोटो टॉवरच्या खाली उभे राहुन काढला आहे. त्यामुळे हा उभा काढला असता कदाचित उजव्या बाजुची इमारत आली नसती असे वाटते. कदाचित ती इमारत घ्यायची असेल चित्रात.

-
ध्रुव

सुंदर फोटो

कृष्ण धवल रंगसंगतीमुळे स्वप्नदर्शी चित्राचा परीणाम छान साधला आहे. आय्. एस्. ओ. ४०० मुळे थोडा नॉइस आला आहे. आय्. एस्. ओ. कमी करता आला असता का?

महेश हतोळकर

आय्. एस्. ओ. ४०० मुळे आठवले...

ऍपर्चर : १४
शटर : ३ सेकंद
असे का? काही खास कारण.

-
ध्रुव

छान्

चित्र छान् आले आहे. फोटो उभा घेण्याऐवजी असा घेणे म्हणजे खास कोलबेर ट्च आहे असे वाटते. (मध्यंतरी कमानीचे छायाचित्र असेच् होते.) त्यामुळे परिणाम मस्त साधला गेला आहे. असेच रंगीत चित्र सुद्धा बघायला आवडेल.
आपला
- (आस्वादक) सूर्य.

कोलबेर टच

तो कोन, तो रंग एक वेगळाच परिणाम साधलाय.

कोलबेर टच सहीच.

फोटो आवडला.

धन्यवाद!

आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांचा आभारी आहे.

धनंजय :
होय,वेगवेगळे शटरस्पीड्स् वापरुन बघीतले.

ध्रुव :
उभा घेण्याचे मनात आले होते पण कंपोज करताना आडवेच जास्त आवडले ( कदाचीत मनोर्‍याच्या मोठ्या बेसमूळे)
हा मनोरा ही मूळ आयफेल टॉवरची प्रतिकृती आहे त्यामूळे तरीही त्यातील भव्यता (किंवा तसा आभास) चित्रात येणे जरुरी होते.

महेश हतोळकर :
४०० आयएसओ म्हणजे फार जास्त नसावा. चित्रात मलातरी नॉइज दिसत नाही आहे.. बाकिच्यांना पण नॉइज दिसतो आहे का?

हृषीकेश चाणक्य सूर्य सहज :

धन्यवाद!

-कोलबेर

४०० आयएसओ

माझी प्रतीक्रिया मी पूर्ण मागे घेतो. हा माझ्या मॉनिटर चा दोष होता. योगायोगाने दुसर्‍या मशीनवर फोटो बघीतल्यावर कळले.
क्षमस्व
महेश हतोळकर

आठवण

नुकतेच पाहण्यात आलेले हे छायाचित्र आठवले.

 
^ वर