लोड शेडींग >>
महराष्ट्रातील लोडशेडींग ने आता कहर केला आहे. पुणे, नाशीक, नागपूर,औरंगाबाद या श्रीमंत भावडांना आता अंधाराची जाणीव होऊ लागली आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ वगैरे दरिद्रि भावडांअचे तर विज आली की डोळे दिपून् जात आहेत. या सर्व भावंडा पैकी थोरली मुंबई,हिला अन्य कुटुंबात् दत्तक गेल्या मुळे त्याला आपल्या मुळ् घरातील अंधाराशी देणे घेणे काही नाहि. या गरीब बिचारया भावंडान्ना आपली बहीण बरे झाले आपल्यात नाही याचे मनोमन सुख वाटते. मुंबाताईला महराष्ट्रातील अंधार दिसू शकत नाही .. कारण तिथे विजेचा सूर्य कधीच मावळत नाही. वीज कंगालमहाराष्ट्राला विजेसाठी हापापलेली मुंबईच मदत करू शकते..प्रश्न सामोपचाराने सुटला नाही तर .. उद्रेक दूर् नाही हे निश्चित !
प्रश्न्.
१ मुंबईची वीजेची भुक् गेल्या ५ वर्षांत दरवर्शी कशी कशी वाढत् गेली असावी ?
२ ही वाढीव भुक कशी भागवल्या गेली ?
३ केवळ मुंबई करीता पुरवठा करणार्या कंपन्यांनी वाढीव मागणी पोसण्या करीता नवीन जनीत्रे लावलीअत् काय ?
४ विदर्भ,महराष्ट्रातील वीज शीरजोरपणाने पळवल्याशिवाय् हे शक्य आहे का?
५.दिल्ली, कलकत्ता येथे अनेक दशके लोडशेडींग आहे.
६.मुंबईचे चोचले महाराष्ट्राने किती दिवस पुरवावे ?
७.मुंबई चे १ तासाचे लोडशेडींग संपूर्ण महाराष्ट्रातील किती तासाचे लोड्शेडीग कमी करु शकेल ?
Comments
नका विचारु साहेब.
वीज भारनियमन विचारुच नका, फारच भयंकर अवस्था आहे.
सकाळी सहाला वीज जाते दहाला येते. पुन्हा सायंकाळी चारला जाते आठला येते. दिवसभरात तिला वाट्टेल तेव्हा येते-जाते. मध्यरात्रीही येणे-जाणे चालूच असते. पाऊस नसल्यामुळे उकाडा, पंख्याशिवाय झोप येत नाही. वीजेच्या अशा येण्या-जाण्याने झोपेचे फार खोबरे झाले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडले आहे. :(
१)मुंबईला खाजगी कंपण्या वाढीव दराने वीज पुरवठा करतात आणि त्या मुंबई शहराची गरज भागवू शकतात म्हणे.
मुंबई चे १ तासाचे लोडशेडींग संपूर्ण महाराष्ट्रातील किती तासाचे लोड्शेडीग कमी करु शकेल ?
मुंबईचे एक तास वीजभारनियमन केले तर अंदाजपंचे म्हणतो. सकाळी अर्धा तास आणि सायंकाळी अर्धा तासच वीज भारनियमन करावे लागेल. ( किमान शहरात तरी )
अवांतर : आमचा एक उपक्रमी मित्र म्हणतो. आमच्या देशात एक मिनिट वीज जात नाही, मागे कधी गेली होती आठवत नाही. असं वर्णन केल्यावर वाइट वाटतं :(
-दिलीप बिरुटे
खरंय
मुंबईतही बर्याच भागात वर्षावर्षात वीज जात नाहि आहे. हे जर न्याय्य नसलं तरी सत्य आहे. मी अमेरिकेहून परतल्यापासून (गेल्या ४-५ महिन्यात) आमच्या घरी एकदाही वीज गेलेली नाहि.
मुंबईतही वीज जाणे हा सोहळा असतो. लोक गच्च्यांवर जमतात. आपल्या संकुलात कोण राहतं हेही याच निमित्ताने कळतं... :)
बाकी इतर महाराष्ट्रासाठी मुंबईनेही झळ सोसावी ही मागणी न्याय्य आहे असे मला वाटते. (मला एकट्याला वाटून उपेग न्हाई! सरकारला (पर्यायाने बहूमताला) जेव्हा वाटेल तेव्हा खरं :) )
याशिवाय मुंबईकरांनी(ही) वीज वाचवणे / कमी वापर करणे गरजेचे आहे. आम्ही (आमच्या संकुलातील ८०% घरांनी) गेल्या वर्षीच घरातील पारंपारिक ट्युब बदलल्या आहेत. कवी विजेवरचे ट्युबसारखा प्रकाश देणारे बल्ब आणि सौर दिवे (हे फार महाग नाहित.. आणि उत्तम प्रकाश देतात. पावसाळ्यात ढग असताना अगदी छान नाहि चालत पण बाकी ८ महिने उ त्त म!) घरात आणले आहेत.
पंखा(पंखे) मात्र दुर्दैवाने २४ तास चालू असतो (असतात).
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
नक्की...
मुंबईसाठी भारनियमन हवेच आहे शिवाय आमच्या पुण्यात देखील ते सुरु झाले, हे एक बरे झाले. ( भारनियमन परवडलं पण दिवसात दहा बारा वेळा व्होल्टेज कमी जास्त होण्याचा प्रकार भीषण आहे) पुण्यापासून जवळच जेजुरीच्या पुढे, वाल्हे नावाचे माझे गाव आहे तेथे विजेची परिस्थिती भयंकर आहे. सकाळी बाराला गेलेली वीज रात्री बाराला येते. तब्बल बारा तास म्हणजे झालं काय?
बाकी मुंबईतल्या लोकांना पंख्यांसाठी तरी सूट द्यावी! मागे एकदा उन्हाळ्यात मुंबईला गेलो तेव्हा गाडीतल्या एसीचा जेवढा वापर झाला तेवढा पूर्ण, गाडी घेतल्यापासूनही झाला नसेल्. ;)
---------------
" Outside a dog, a book is man's best friend, but inside a dog, its too dark to read."
भारनियमन आणि इंधनाचा तुटवडा.
सध्या ग्रामीण आणि निम्नशहरी दर्जाच्या ठिकाणी भारनियमनाने कहर केला आहे. पुणे आणि मुंबई सोडली तर ६ ते १२ तासासाठी भारनियमन चालू आहे.
कदाचित यामूळे शहर आणि खेडी यातील विषमता वाढण्याचा धोका अजूनही वाढलेला आहे.
त्याच बरोबर डिझेल च्या तुटवड्यामूळे अनेक ठिकाणी मालवाहतूक करणार्या गाड्या अडकून पडल्याच्याही वार्ता कानी येत आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन आणि पर्यायी विजेचा विचार व्हावा.
त्याचबरोबर विज आणि इंधन काटकसरीचा विचार व्हावा.