उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भारत / हिन्दुस्थान देशाचे इन्डिया असे नामकरन कसे झाले ?
कल्याण खराडे
July 17, 2008 - 8:30 pm
भारत / हिन्दुस्थान देशाचे इन्डिया असे नामकरन कसे झाले ?
सध्या Bombay चे मुम्बई झाले उद्या कुणी India चे भारत / हिन्दुस्थान नामकरण होईल का ?
दुवे:
Comments
भारत हे नामकरण घटनेत १९५० मध्ये झालेले आहे
भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमात राज्यांच्या संघटनेच्या देशाचे नाव, "इंडिया, म्हणजेच भारत" असे झालेले आहे.
भविष्यात होईल अशी वाट बघण्याची तुम्हा आम्हाला गरज नाही - आताच हे नाव आपण वापरण्यास घ्यावे. कायदेशीर मानले जाईल.
उत्तरे
कल्याणराव,
तुम्ही दिलेला चर्चा विषय आहे - भारत / हिन्दुस्थान देशाचे इन्डिया असे नामकरन कसे झाले ?
नंतर तुम्ही विचारता - India चे भारत / हिन्दुस्थान नामकरण होईल का ?
नक्की कोणती चर्चा तुम्हाला अपेक्षित् आहे?
सिंधू - इंडस - इंडिया ही व्युत्पत्ती सर्वमान्य आहे.
भारत हे नाव कसे पडले याबाबत सविस्तर चर्चा अन्यत्र सुरू आहे.
आणि इंडियाचे भारत १९५० सालीच झाले हे धनंजयरावांनी स्पष्ट केलेच आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
इंडिया, बॉम्बे, इ.
इसवी सनाच्या दुसर्या शतकापासून इंडिया जगाला माहीत होता. इंडियाकडे पश्चिमेकडून येण्याचा जलमार्गमात्र माहीत नव्हता तो वास्को द गामाने दाखवला आणि इंडियाचा नव्याने शोध लावला(२० मे १४९८). इथले लोक या देशाची हिंदुस्थान, हिन्द, हिन्ददेश, भारत, भरतखंड, भारतवर्ष इत्यादी नावे वापरत. फार प्राचीन नाव अजनाभवर्ष(अज म्हणजे ब्रह्मदेवाच्या नाभिप्रदेशी वसलेला भूखंड). त्यानंतरचे कार्मुकसंस्थान म्हणजे धनुष्याचा आकाराचा प्रदेश हे नाव. या द्वीपकल्पाला कूर्मसंस्थान असेही म्हणत. पुराणात कासवाच्या एका अवाढव्य आकृतीत देशाचे सर्व भाग बसवून दाखवले आहेत, म्हणून हे नाव. आणखी एक नाव कुमारीद्वीप. हे नाव जावा, सुमात्रा, कंबोज या देशांनी ठेवलेले.
१९५० साली ठेवलेले राष्ट्राचे अधिकृत नाव इंडिया अर्थात् भारत. पाकिस्तान आणि इतर अरब देश आपल्या देशाला हिन्दोस्ंतॉ म्हणतात. तर काही देश Inde आणि काही Inte. ही सर्व नावे ज्याच्या त्याच्या दृष्टीने अधिकृत, म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. लहान मुलाचे नाव दुसरे ठेवतात, तसेच आपल्या देशाचे दुसर्या लोकांनी ठेवलेले नाव तितकेच अधिकृत. आपण नाही निप्पॉनला जपान, डॉइच्लॅन्डला जर्मनी आणि झोन्ग्गुओला चीन म्हणत. तसेच.
आता बॉम्बेबद्दल. पोर्तुगीजांच्या ताब्यात कुलाबा, छोटा कुलाबा, गिरगांव, माझगांव, वरळी, मोचें(माटुंगे) आणि माहीम ही सात बेटे होती. त्या बेटांच्या समूहाला ते बॉम बहिया म्हणजे चांगला उपसागर किंवा चांगले बंदर म्हणत. या शब्दाचा इंग्रजी उच्चार बॉम्बे. पोर्तुगालचा राजा सहावा ऍफ़ोन्सोच्या कॅथरीन नावाच्या बहिणीचे लग्न जेव्हा इंग्लंडचा राजा दुसर्या चार्ल्सशी झाले(२१ मे १६६२), तेव्हा हुंड्यादाखल ही बॉम्बे नावाची बेटे इंग्रजांना देण्याचा करार झाला(२३ जून १६६१). प्रत्यक्षात बॉम्बे इंग्रजांच्या ताब्यात १४ जानेवारी १६६५ ला आले.
मुंबई नाव कसे पडले याच्या अनेक कथा आहेत. १.गुजराथचा सुलतान मुबारक शाह याच्या ताब्यात(इसवी सन १३१७-२०) ही बेटे असताना त्यांना मुंबई नाव पडले. २. मुम्बारख नावाच्या असुराच्या नावावरून मुंबई नाव पडले असे मुंबादेवी पुराणात म्हटले आहे(?). ३. मुंगा नावाच्या ज्या कोळ्याने (मुंबा)देवीचे देऊळ बांधले त्याच्या नावावरून मुंबई आले. ४. मुंबादेवी ऊर्फ मुंबाईचे देऊळ ज्या गावात होते त्या गावाला लोक मुंबाई आणि पुढे मुंबई म्हणू लागले.
अंबाबाईची जाऊन आलो म्हणणारे लोक प्रत्यक्षात कोल्हापूरला जातात, तसेच वैष्णोदेवीला जाणारे जम्मू-काश्मीरला. तसे मुंबाईला गेले असे म्हणता म्हणता गावाचे नाव मुंबई पडले. या शहराला मुंबै, मुंबापुरी, म्हमय, म्हमई, आणि बंबई ही नावे देखील आहेत. सर्वच नावे म्हणणार्याच्या दृष्टीने अधिकृत.
थोडक्यात काय, इंग्रजांनी हिन्दुस्थानचे इंडिया आणि मुंबईचे बॉम्बे केले असे म्हणणे शुद्ध अडाणीपणाचे! --वाचक्नवी
प्रचलित नाव
तुमचा प्रश्न नीट कळला नाही. तुमचा रोख आजकाल भारतात सर्वजण इंडिया असं म्हणत असतात ह्या प्रवाहाकडे आहे, की मुळातच बाहेरील लोक भारताला इंडिया का म्हणायला लागले ह्याकडे आहे?
तुमच्या पहिल्या वाक्यावरुन तुम्ही प्रचलित नावाबद्दल बोलताहात असं वाटतय. तर हा ओघ खरोखरच मनाला बोचणारा आहे. विषेशतः "चक दे इंडिया" सारख्या चित्रपटात एकदाही भारत हा शब्द कबीर खान ह्या व्यक्तिच्या तोंडून येत नाही ह्याची खंत वाटते. कदाचित भारत हा संस्कृतोद्भव शब्द आहे म्हणून काही धर्मियांना तो परका वाटत असेल व हिन्दुस्तान हा शब्दही केवळ हिंदूंचा देश दर्शवतो म्हणूनही काहींना चुकिचा वाटत असेल. पण एकंदरच असं वाटतं की भारत ह्या नावाचा संबंध इथल्या परंपरेशी व संस्कृतीशी आहे, जी नव्या पिढीतल्या अनेकांना परकी झाली आहे. म्हणूनही कदाचित हा शब्द कमी वापरात येताना दिसतो.
मी काही महिन्यांपूर्वीच पुण्याला येऊन स्थायिक झालो (अनेक वर्षांपूर्वी मी अमेरिकेला स्थलांतर केले होते.) मी माझ्या मित्रांना सांगतो की मी आधी भारतातून अमेरिकेला स्थलांतर केले, व आता अमेरिकेतून इंडियाला स्थलांतर केले आहे!
अनेक नावे
एकाच देशाला अनेक नावे असू शकतात हे ध्यानात घेतले की असे प्रश्न पडत नाहीत. जर्मनीला जर्मनी, डॉइच्लॅन्ड, शार्मण्यदेश अशी अनेक नावे आहेत. खुद्द अमेरिकेला य़ू.एस., यूएस्ए, स्टेट्स, अमेरिका, संयुक्त संस्थाने अशी अनेक नावे आहेत. इन्डिया अर्थात् भारत या देशाला का असू नयेत?
आपल्या माहितीसाठी:-इन्डिया हा शब्ददेखील संस्कृतोद्भवच आहे. --वाचक्नवी
अवांतर - अधिकृत नाव
एकाच देशाला अनेक नावे असू शकतात हे ध्यानात घेतले की असे प्रश्न पडत नाहीत
यावरून् काही काळापूर्वी घडलेला एक किस्सा आठवला.
माझ्या एका ब्रिटिश सहकार्याला मी विचारले की , बाबा तुमच्या देशाचे खरे नाव काय? आम्ही कधी इंग्लंड म्हणतो, कधी ब्रिटन तर कधी ग्रेट ब्रिटन तसेच युकेदेखिल!!
तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या पासपोर्टावर देशाचे नाव लिहिले आहे - युनायटेट किन्गडम ऑफ ग्रेट ब्रिटन ऍन्ड नॉर्थन आयर्लन्ड. ते माझ्या देशाचे अधिकृत नाव.
भारताच्या पासपोर्टावर देशाचे नाव असते - रिपब्लिक ऑफ इन्डिया. ते भारताचे अधिकृत नाव. बाकी भारत, इन्डिया आणि हिन्दुस्तान ही तर वापरात आहेतच!
(अधिकृत) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आम्ही तर..
आम्ही तर इंग्लन्डला विलायतदेखील म्हणतो. ब्रिटन किंवा ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लन्ड, वेल्स आणि स्कॉटलन्ड. युनायटेड किंग्डम म्हणजे ग्रेट ब्रिटन + उत्तरी आयर्लन्ड. ब्रिटिश बेटे= ग्रेट ब्रिटन + पूर्ण आयर्लन्ड. ग्रेटर ब्रिटन(अनधिकृत नाव) म्हणजे ब्रिटिश साम्राज्य.
उत्तर आणि उत्तरी या शब्दांच्या अर्थांमध्ये फरक आहे. उत्तर अमेरिका, उत्तर कोरिया, उत्तर व्हिएटनाम हे स्वतंत्र देश किंवा खंड आहेत. तसेच दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ़्रिका वगैरे. परंतु उत्तर आयर्लन्ड नावाचा स्वतंत्र देश किंवा प्रदेश नाही. म्हणून उत्तरी आयर्लन्ड. आपल्याकडे पश्चिम बंगाल आहे पण दक्षिण भारत नाही. म्हणून साउथ इन्डियन म्हणणे योग्य नाही. सदर्न इंडियन किंवा दक्षिणी भारतीय हे उचित. आपण पूर्वी तमिळ ब्राह्मणांना दक्षिणी ब्राह्मण आणि तेलंगणातल्या ब्राह्मणांना तेलंगी ब्राह्मण म्हणत असू ते उगीच नाही. काशीचे ब्राह्मण अजूनही मराठी ब्राह्मणांना दक्षिणी ब्राह्मण म्हणतात तेही बरोबर आहे. ---वाचक्नवी
मुद्दा निट कळला नाही
आपला मुद्दा निट कळला नाही, पण या चर्चे तुन बरीच चांगली माहिती मिळाली
वाचक्नवी
इन्डिया हा शब्ददेखील संस्कृतोद्भवच आहे - हे वाक्य जरा स-संदर्भ स्पष्ट करु शकाल ?
आपला
आर्य
इन्डिया
मुद्दा एवढाच की ब्रिटिशांनी किंवा अन्य कोणी हिंदुस्थान/भारतचे इन्डिया किंवा मुंबईचे बॉम्बे केले नाही. हे दोन्ही इंग्रजी भासणारे शब्द अगोदरपासूनच अस्तित्वात होते.
सिन्धु-हिन्दु-इन्डस्-इन्डिया. अशा प्रकारे इन्डिया हा शब्द सिन्धु या संस्कृत शब्दापासून छोटे छोटे बदल होत तयार झाला. ज्या काळी हा शब्द झाला त्याकाळी हिंदुस्थान हे राष्ट्रनाम नव्हते.
महाराष्ट्रात छशाट नावाचे एक रेल्वे स्टेशन आहे. उद्या लोक म्हणतील की छशाट इतके चांगले नाव असणार्या स्टेशनाला पूर्वी कोल्हापूर का म्हणत होते? छशाटचे कोल्हापूर हे नामकरण कसे झाले? तशातलीच गत.-वाचक्नवी