या दशकातील साहीत्य.
या दशकातील साहीत्य.
मराठी साहित्य क्षेत्राकडे नजर टाकली तर या दशकातील महत्वाची म्हणावी अशी किंवा यूगांतराची भान प्रकट होइल अशी कोणतीही घटना दिसत नाही.कवितेपासून तर समीक्षेपर्यंत लेखन विचारात घेतले तरी झटकन लक्ष वेधले जावे, असे लेखन दिसत नाही .या दशकातील नव्या जाणिवा वैचारिक प्रगल्भता असणारे मराठी साहित्य अपवादानेच दिसते आहे.खरे तर ही मरगळीची सुरुवात नव्वदीपासुनच झाली.असे मानायला हरकत नाही.पुस्तक प्रदर्शनात गेलो तर भरपुर पुस्तके दिसतात.लिहिणा-यांची संख्या वाढलेली आहे,पण तेही मागील साहित्यावरुनच किंवा त्या आधारावर लेखन केलेले दिसते.हीच अस्वस्थ करणारी बाब आहे. नव्वद ते आज पर्यंत चा काळ मला तरी मरगळीचा काळ,अस्वस्थ करणारा काळ आहे.असे वाटते.
या पूर्वीच्या काळाचा विचार केला तर वाडःमयीन चळवळी आणि त्याच्यातून एक समरुद्ध् वाडःमय प्रवाह निश्चित होत असे,
वाडःमयीन व्यक्तिमत्व, वाडःमयीन चिकीत्सा,त्यांनी घडविलेला लेखक,वाडःमयीन वाद अशा घटनांनी तो काळ बहरलेला होता.प्रत्येक दशकात एक मुल्य विचार निर्माण झाल्याचे दिसते.मागील दशकात आणि या दशकात मात्र सर्वच साहित्यप्रकारात सामसूम दिसून येते. अपवाद आहेत .मनोगत,माझे शब्द, मायबोली,आणि आता उपक्रम या वरील लेखांचे कोणी संपादन केल्याचे मला तरी आठ्वत नाही.कारण वरील संकेतस्थळावर दर्जेदार लेखक आहेत.पण साहित्यिक म्हणून त्यांची नोंद कोणत्या प्रसिद्ध् किंवा रविवारच्या पुरवणीत लेखन करणा-या कोणी लेखक, समीक्षक,किंवा संपादकाने केल्याचे मला स्मरत नाही.
सांगायला काही हरकत नाही.मराठी प्राध्यापकांच्या एका उद्बबोधन वर्गात आम्ही मराठी संकेतस्थळाविषयी आणि मनोगतावरील लेखकांविषयी त्यांच्या लेखनाबद्द्ल बोललो तेव्हा परीक्षक म्हणुन आलेल्या दोन मराठवाड्यातील,आणि साहित्य सहवास मुंबइहुन आलेल्या एका मराठीच्या अभ्यासकाच्या भुवया उंचावलेल्या आम्ही पाहील्या आहेत.
सांगण्याचा मुद्दा असा की,या दशकाचे साहित्यभान म्हणुन् मी या संकेतस्थळांवरील् भाषाविषयक लेखांकडे पहातो.
तरीही या दशकातील मराठी साहित्याचा विचार करु लागलो की लक्षात येते की,साठ पासून् ते दोन हजार पर्यंत चे बलवान झालेले साहित्य प्रवाह आजही आहेत. पण त्या प्रवाहाचा वेग कमी झालेला दिसतो.सपाट जमिनीवर विखूरलेले पाणी त्या प्रमाणे,साहित्य प्रकाराचे झाले आहे.लेखकांची संख्या वाढली पण असे पुस्तकच नाही की ते कधी वाचु अन् कधी संपवु असे वाटावे,आणि वाचल्यानंतर जे प्रदीर्घ काळ मनात रूजत राहील असं पुस्तक कोणतं ? या प्रश्नाचेन उत्तर देता येइल अशी स्थिती नाही .या दशकात सहा वर्षाच्या काळातील उत्तम लेखक कोणता हे सांगता येणार नाही.या काळातील आवर्जून् नोंद घेणारी साहित्यक्रुती कोणती हे सांगता येणार नाही.(बारोमास सोडून् द्या)मागील काही दशकातील् लेखक आहेत,पण आता त्यांचे लेखन ही उतार वयाला लागलेले दिसून् येते.त्यांची जागा घेणारे नवे लेखक अवतीभोवती दिसत नाही.ज्यांनी काही अपेक्षा निर्माण केल्या ते लेखक कवी,एका पुस्तकातच संपून् गेल्याचे दिसते.
हे दशक संगणकाचे ,विज्ञानाचे ,असले तरी त्या संबधी चे लेखन दिसत नाही.या काळातील महत्वाचे प्रश्न किंवा विचार कोणता यांची चर्चा दिसत नाही.साहित्य संमेलनाच्या आगे मागे झालेले वाद जे वर्तमानपत्रात येऊन त्याची चर्चा झाली म्हणजे ते वाडःमयीन वाद.पुरवण्यांमधुन केले जाणारे पुस्तक परिक्षण म्हणजे समिक्षा झाली आहे.संपादकीय किंवा विशेष् लेख हे वैचारिक् लेख् झाले आहेत.
आता प्रश्न् आहे की हे असे का ? याचा विचार केला तर लक्षात येते की ,प्रसिद्बीसाठी माध्यम उपलब्द्ग झाल्यामूळे चिंतन मंथनाचा अभाव ,विश्लेषण करण्याचा अभाव. आता त्याची गरज साहित्यिकांना वाटत नाही. मजकूर मिळावा म्हणून् धावणारे दैनिकेही त्याचा आग्रह धरत नाही.अंतर्मुखतेचा अभाव,वैचारिकतेचा अभाव,वैचारिक संकोचता,साहित्य विचारासाठी लागणारी तयारी ,तात्विक् बैठक या अभावामुळे मराठी साहित्यस्रुष्टीला अवकळा प्राप्त झालेली दिसून् येते.
ती दुर करण्यासाठी ,ते सर्व अभाव दुर केले पाहीजेत. पण सांगणार कोण ,आणि सांगीतले तरी माझ्या सारख्या विद्यार्थापुरते मराठी शिकवणा-या प्राध्यापकाचे ऐकणार कोण ?
(व्याकरणाच्या सर्व चूका मला मान्य आहेत.)
Comments
उत्सुकता
प्राध्यापक महाशय,
आपण् चर्चेसाठी चांगला विषय घेतला आहे.
आपण विचारता की या दशकातला (९० पासून पुढचा) साहित्यिक कोण? आपला वरील लेख वाचून हा प्रश्न मलाही पडला. त्याची आपण दिलेली कारणे संयुक्तिक वाटतात.
यावर मत मांडण्या इतका माझा आवाका नाही. इतर उपक्रमी काय म्हणतात ते ऐकण्यास उत्सुक आहे.
--लिखाळ.
चांगला विषय...
प्राध्यापकांनी हा चांगला विषय मांडलेला आहे. मला वाटते पुर्वी जे लेखन केले जायचे ते त्या त्या परिस्थितीनुसार केले जायचे. उदा.धावयाचे झाल्यास दलित साहित्य हे होय .
दर्जेदार साहित्य,नाटक लिहिण्यासाठी जशी सामाजिक परिस्थिती तेव्हा होती आता तशी नाही आहे. त्यामूळे लिहीणार काय. परिस्थितीनुसार साहित्य लिहिले जाते. वाचकांना नेहमीच खळबळजनक हवे असते आणि त्याप्रमाणे लेखन व्हावे असे वाटते.
साहित्याचे कालखंड किती व कोणते? हे आपण सांगावे हि विनंती
आपला
कॉ.विकि
साहित्य - सरले चिन्तन उरली चिंता
मोहन पाठक
या शतकातच काय, पण ८० सालानंतर आहे तो आनंदच आहे.
सो कॉल्ड
मोठे कवी म्हातारचळ लागलेले किंवा प्रतिभा आटली तरी
हपापलेले आहेत.
नावं घ्यायची तर मराठीची लाज जाईल.
साहित्यसंमेलनांच्या बातम्या बारकाईने वाचा, एकेक् मजेदार किस्से क्ळ्तात.
कोण किती पितो, कोण कसा झिंगतो, कोणाला किती मानधन आणि कोण फाईव्ह स्टार मध्ये उररलाय
यांच्या टुकार असल्या तरी कविताग्रेट ... कारण हे कवीच ग्रेट !
या शतकले मिल्टन शेक्स्पिअरच.
असो. तेव्हा आपला मुद्दा एकदम रास्त.
प्राध्यापक मंडळींना काही कळते का?
बिरुटेसाहेब, तुमचा सन्माननीय अपवाद सोडल्यास, मुळात प्राध्यापक मंडळींना काही कळते का, ह्याबाबत माझ्या मनात शंका आहे. मराठीचा प्राध्यापक काय झालो आता आपल्याला अधिकारवाणी आली, असा एकूण आव. तीच ती पुस्तके, तीच ती छापील वाक्ये, तेच ते निष्कर्ष. ह्या लोकांना एवढे महत्त्व देण्याची गरज नाही. नाइलाज म्हणून ही मंडळी ह्या क्षेत्रात आहेत.
एकंदर गेल्या दोन दशकांत मराठीतच कशाला इतर भारतीय भाषांतही काही नवे आणि चांगले लिखाण झाले काय? मुळातच समकालीनांना असे निःपक्षपाती ठरवता येते काय? त्यांनी ठरवलेच तर त्यांच्या मताला किंमत असते काय? असो. काळच ठरवले.
तसेच जे पुस्तक संपू नये असे वाटते, त्याला समीक्षक, अभ्यासक नाकस समजतात. दि. पु. चित्रे आणि त्यांच्या प्रभावळीतील कविवर्यांच्या कविता वाचवत नाही. म्हणजे झोप येते आणि कळतही नाही. (जेम्स जॉइसचे 'यूलायसीज' मी झोप येत नसली की वाचत असे.)
तूर्तास एवढेच.
चित्तरंजन
आभारी.
चित्तरंजन जी,
बिरुटेसाहेब, तुमचा सन्माननीय अपवाद सोडल्यास, मुळात प्राध्यापक मंडळींना काही कळते का,हा स्वतंत्र चर्चेचा विषय,किंवा वादाचा मुद्दा असेल.पण अपवादात आपण माझी नोंद केली.त्याबद्दल मी आपला आभारी आहे.