छायाचित्र टीका १७

Harishchandra
Harishchandra

हरिश्चंद्र गडावरुन दिसणारे विलोभनिय द्रुश्य!
हा फोटो स्टिच केलेला आहे. ४ वेगवेगळे फोटो एकत्र करुन तयार केलेला हा फोटो आहे.
आपल्याला कसा वाटतो ते जरुर कळवा!

Comments

मस्तच

निसर्गदृष्य नेहमीच मस्त वाटते. आपल्याला पॅनोरमा म्हणायचे आहे का? ४ चित्रांवरून एक कसे बनवले या बद्दल माहिती वाचायला आवडेल.

पॅनोरमा

.. तसे ह्याला पॅनोरमाही म्हणता येइन ...
.. ४/५ चित्रे जोडुन एक् चित्र तयार करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

काही कॅमेरे तसा पर्याय उपलब्ध करुन देतात. सदरहु फोटो अश्याच एका कॅमेर्‍यातुन काढलाय : कॅनन पॉवरशॉट ए ४००!
काही संचेतने (softwares) सुद्धा उपलब्ध आहेत जसे की ह्युजीन.

त्यामुळे ही चिकटवा-चिकटवी वाटते तितकी अवघड खासच नाही.:)

विलोभनीय दृष्य

मस्तच!! सुरेखच आहे.

पॅनोरमा चित्रे इतर नामवंत छायाचित्रकारांनी टाकावी. वरुण, धनंजय ऐकताय ना...

सिम्प्ली ब्युटिफुल

सिम्प्ली ब्युटिफुल !! हे कोकण कड्यावरुन् काढले आहे का ?

- सूर्य

सुरेख

चित्र खरोखरच सुरेख जोडले आहे.
कुठला कॅमेरा आणि कुठले सॉफ्टवेअर वापरले आहे? फोटोअ कसा काढावा? काही अजून माहिती द्याल का?

-
ध्रुव

धन्यवाद

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

हे छायाचित्र हरिश्चंद्र गडावर जाताना तोलारखिंड चढून गेल्यावर ़काढलेले आहे.
खालील नकाशामध्ये जो लाल-पिवळा ठिपका दिसत आहे त्या डोंगराचा हा फोटो आहे.

हरिश्चंद्र
हरिश्चंद्राचा नकाशा

कॅननच्या "पॉवरशॉट" ह्या श्रेणीमधिल सर्व (?) कॅमेरे 'स्टिच मोड' मध्ये फोटो काढू शकतात. मग कॅननच्याच zoom browser संचेतन वापरुन फोटो सहज चिकटविताही येतात. हे संचेतन कॅननच्या कॅमेर्यांबरोबर (फुकट) मिळते. मी हा फोटो Canon Powershot A400 ह्या कॅमेर्याने काढले आहेत (स्वस्तात मस्त !!).

अर्थातच आपल्याकडे कॅनन नसेन तरीही हे शिवणकाम सहज शक्य आहे. गूगलवर चक्कर मारुन अनेक उपयोगी संचेतने सापडु शकतीन. फोटो काढण्यासाठी मात्र काही गोष्टी जरुर ध्यानात ठेवाव्यात. दोन शेजारच्या फोटोमध्ये पुष्कळ overlap असू द्यावा. आणि कॅमेरा आडवा फिरवतना तो जमिनीला (किम्बहुना आपल्या विषयाला) समांतर राहिन ह्याची खात्री करा, नाहीतर फोटो हुकतो. :)

सर्वांचे परत एकदा आभार!

नकाशा

नकाशामुळे जागा लक्षात आली. क्षणभर वाटुनगेले अरेच्चा अरे हेच ते :)

कॅननच्या "पॉवरशॉट" ह्या श्रेणीमधिल सर्व (?) कॅमेरे 'स्टिच मोड' मध्ये फोटो काढू शकतात
हे माहित नव्हते. माझ्याकडे कॅननचा पॉवरशॉट एस डी ४५० ह कॅमेरा आहे. बघायला पाहिजे परत एकदा. तुम्ही म्हणल्याप्रमाणेच असेल तर इतर कुठलाही कॅमेरा, स्टँडवर ठेउन फिरवून काढलेले फोटोही चिकटवता येतील असे वाटते.

बाकी तुमचा हुकलेला फोटोही जाम आवडला. :)

-
ध्रुव

मस्त

पॅनारोमसाठी केलेली दृश्य निवड अगदी योग्य आहे.
माझ्यामते पेनॉरोमा चित्रांची खरी मजा मोठी प्रिंट काढून भिंतीवरच दिसते. संगणकाचा पडदा तितका न्याय देऊ शकत नाही.

सुंदर!

कॅमेरा आणखी खाली घेऊन डाव्या बाजूचे ते निष्पर्ण झुडूप पूर्णपणे आकाशाच्या पार्श्वभूमीत घेता आले असते का...

फारच सुंदर पॅनोरामा!

मस्त

जुन्या आठवणी जाग्या केल्या तुमच्या फोटोनी.

मस्त

वा! पॅनोरामा आवडला. अशीच चित्र भविष्यातही बघायला मिळतील अशी आशा आहे. :)

----

आभार!

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

कॅमेरा आणखी खाली घेऊन डाव्या बाजूचे ते निष्पर्ण झुडूप पूर्णपणे आकाशाच्या पार्श्वभूमीत घेता आले असते का...

कदाचित हो! पण उजवीकडुन येणार्या ढगांना पकडण्याच्या नादात ते लक्षात नाही आले!

सुरेख

आपण दिलेला फोटो फारच छान आहे.
असे जोडकाम मी कधी केले नाही पुर्वी पण पाहिले होते.
नाशिकला गंगातीरी होणार्‍या कुंभमेळ्याचे भव्य स्वरूप दाखवणारे फोटो नाशिकच्या काही प्रसिद्ध स्टुडिओज मध्ये लावलेले आहेत. सगळे एकाच ठिकाणावरून काढलेले आहेत.
मी असे ४ वेगवेगळे (म्हणजे ४८ वर्षांचा फरक!) पाहिल्याचे आठवते. पुर्वीच्या मेळ्यात कमी लोक आहेत हे जाणवते. (पण हा फोटो नक्की कधी काढला यावरही हे अवलंबून असणार).
आता स्टुडियोचे नाव आठवत नाहीये, नक्की कुठे पाहिले आहेत तेही आठवत नाहीये.
पण त्यांनी ३ फोटो एका खाली एक लावले आहेत/होते एका भिंतीवर आणि एक चौथा रंगित वेगळ्या भिंतीवर होता.
(हे नाव आठवत होतो म्हणून प्रतिसाद द्यायला वेळ झाला, शेवटी आठवलेच नाही.)

त्याकाळात असे जोडकाम करणे फार कुशलतेचे आणि वेळ खावू होते. कारण बहुतेक वेळा ब्रश घेवून 'टच अप' करावे लागत असणार असे वाटते.

पण आपल्या फोटोत पाहुन हा फोटो कुठे जोडलेला असेल अशी शंकाही येत नाही.
आपला
गुंडोपंत

स्मरण

धन्यवाद गुंडोपंत!

बरी आठवण करुन दिलीत. ह्याच डोंगराचा, हा फोटो काढण्याच्या आधी एक वर्ष, उन्हाळ्यात असाच एक फोटो काढला होता!

ह्यातील जोडकाम तितकेसे शिताफीचे नाही! आणि जागा सुध्दा मला अचुक पकडता आली नाही :(

उन्हाळ्यातील हरिश्चंद्र
उन्हाळ्यातील हरिश्चंद्र
 
^ वर