पुस्तक व्यवसायाचे उमदे पाऊल.

पुस्तक व्यवसायावर कॉर्पोरेट कव्हर

आजच्या म टा तील वार्ता पुस्तक प्रेमीना आनंदाची शुभ वार्ताच असेल.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3216241.cms

ही चळवळ फक्त पुण्यामुंबईसाठी मर्यादीत न राहता गावाकडे पोहोचली पाहिजे.

मराठीच्या सुदैवाने अनेक मराठी प्रेमी देश विदेशात आहेत आणि त्यानी आपापले व्यवसाय - नौकरी सांभाळत यात काही यथायोग्य आर्थिक योगदान देण्याचा विचार केला तर बर्‍याच गोष्टी साध्य होतील.

आजही खेड्यापाड्यातील विद्यार्थी, पालक, सुजाण नागरिक चांगल्या पुस्तकापासून वंचित आहे. त्यांच्यापर्यंत पूढचे पाऊल पोहोचले पाहिजे.

Comments

जूनीच

ही मटाची माहिती तर तशी जूनीच माहिती आहे.
फक्त मटा चे कोंबडे उशीरा आरवल्याने त्यांना आत्ताच दिवस सुरु झाला असे वाटते आहे!

पण आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे?
कोणत्या विषयावरची चर्चा करायची आहे हे निटसे कळले नाही.
आपला
गुंडोपंत

खेड्यापाड्यात कसे जायला हवे?

आपल्या पृच्छेबद्दल धन्यवाद.

महाराष्ट्रात आजही खेड्यापाड्यात मराठीशिवाय शिक्षणाला पर्याय नाही. त्यांचे सबलीकरण करण्यासाठी अवांतर वाचन आणि पुस्तकाचे पोहोचणे गरजेचे आहे.

आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे, त्यासाठी कसे कसे उपक्रम राबवता येतील अश्या स्वरुपाची चर्चा मला अपेक्षित आहे.

या साठी वाहुन घेण्याची आणि कदाचित थोडेफार अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. उदा. आपल्या वाढदिवसाला, स्वजनाच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण मराठी शाळांना काही पुस्तके देऊ शकतो काय?

त्याचबरोबर वाचन चळवळ आणि वेगवेगळी पुस्तके सर्वसामान्यापर्यंत कसे पोहोचतील असा विचार ही वार्ता वाचताना माझ्या मनात आला आणि मी हा प्रस्ताव निर्माण केला.

काही त्रुटी असतील तर त्या अगत्याने दूर कराव्यात.

 
^ वर