परप्रांतीयांचे हक्क्

स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक असल्याने कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे.
पण मुंबईत आल्यावर एकाद्या परप्रांतीयाला जास्तच हक्क आणि फायदे
मिळतात असे दिसून येते.

१. एक परप्रांतीय म्हणून त्यांना कुठल्या हि रस्त्यावर धंदा करण्यास मिळतो.
२. एक परप्रांतीय म्हणून त्यांना कुठल्या हि ठिकाणी राहण्यासाठी सोय उपलब्ध होते.
३. कधी मुंबईतली हिरवळ काढून तर कधी खाडीवर झोपड्या बांधून त्यांच्या राहण्याची
सोय केली जाते.
४.मोकळ्या रस्त्याची जागा हि त्यांना धंद्यासाठी उपलब्ध करून दिली जाते.
५.त्या जागेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सोय केली जाते.
५.रेल्वेतल्या नोकऱ्याही त्यांच्या सोयीसाठी राखून ठेवल्या जातात.
६.परप्रांतीयासाठी मुंबईचा, मराठी भाषेचा,मराठी संस्कुतीचा आदर नाही केला तरी
सूट आहे. त्यांच्या सोयीसाठी मराठी माणसाने हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलण्याची
सोय उपलब्ध आहे.
७.त्यांच्या पोटासाठी मुंबईवर लोकसंख्येचा भार उचलण्याची जवाबदारी दिली जाते.
८.त्यांचे पदार्थ कसे खपतील आणि त्याची आपल्याला कशी सवय होईल हि जवाबदारी
इथले भुमिपुत्र घेतात.
९.परप्रांतीयांच्या दादागिरी विषयी कोण बोललं तर मुंबईतच त्यांचे फोटो जाळण्यात येतात.
१०. या सगळ्या गोष्टी कायद्यात बसत नाही हे कोणाला कळल्यावर त्याला भरपूर पैसे देऊन या सगळ्या गोष्टी पुन्हा चालू ठेवण्यात येतात.

याउलट
माझा मित्र चेन्नईला नोकरीसाठी गेला असता दुकानदाराला राई देण्यासाठी समुद्रावरची वाळू आणून दाखवावी लागली का तर त्यांना हिंदीसुधा समजत नाही. कायदा आणि सुव्यवस्था मुंबईत जितकी परप्रांतीयांच्या बाजूने आहे तितकीच मराठी माणसांच्या बाजूने आणि मराठी भाषेची गळचेपी करणाऱ्यांच्या विरोधात आहे का? संजय निरुपमची गाडी तोडणाऱ्या विरुध कारवाई होते. आई बहिणी वरून शिव्या दिल्या तर त्यांच्या कानफटात मारा हे म्हणणाऱ्या राजसाहेब ठाकरें विरुध कारवाईची मागणी होते. हाच कायदा मराठी माणसासाठी इतर राज्यात आढळतो का? बेळगावामध्ये बेळगावचे महापौर विजय मोरे यांना विधान सभेसमोर मारहाण केली व काळा रंग फासला. हे करणाऱ्या कन्नड गुंडा विरुध कारवाई होते का ? असे कितीतरी प्रकारचे फायदे परप्रांतीयांना मुंबईत आल्यावर मिळतात.यावरून मुंबईत
मराठी माणसाचे काही स्थान आहे की नाही हा प्रश्न पडतो ?

या बाबत काय तुम्हाला काय् वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

नुसती चर्चा नको

केशव
अहो, आपण मराठी माणसे नुसती चर्चाच करतो. प्रत्यक्श क्रुती शिवाय हे प्रश्न सुटणार आहेत का?

जबाबदार मराठी माणूस

याला कोठेही परप्रांतीय जबाबदार नाहीत.
मराठी माणूसच जबाबदार आहे.

ज्या न्यूनगंडग्रस्त समूहाला आपली भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरण्याची देखील लाज वाटते त्यांच्याबद्दल काय बोलावे?

मग आता करायच काय.

हा प्रश्न आताच एवढा गंभीर बनलाय तर काही वर्षाने काय होईल . यावर उपाय काय. मोर्चा,दंगल,जाळपोळ याने काय साद्य होणार आहे. तरि आपण संकेतस्थळावर निषेध व्यक्त करत असतोच.गिरण्या बंद पडल्या नसत्यातर मराठी माणसाची मुंबईत टक्केवारी घटली नसती. बर्‍याच अंशी या सर्व गोष्टींस मराठी माणूस ,मराठी राज्यकर्ते जबाबदार आहेत. बहुतेक सर्व उधोगधंदे परप्रांतीच्या हातात आहेत. आर्थिक नाड्या तिकडे आहेत.
आपला
कॉ.विकि

परप्रान्तियाना प्रतिसाद् देउ नका

परप्नान्तियनकडुन काहि सामान घेउ नका. त्याच्याशि मरथितुन बोलायचा प्रयत्न करा.जेथे जेथे मराथि माणसाला सहकार्य करता येइल तेवडे करा. कुथे नोकरिचि सन्धि असल्यास नमरथि माणसाला प्रथम सान्गा. धन्द्यचि सन्धि असेल् तर् मरथि माणसाला प्राढन्य द्या

 
^ वर