छायाचित्र टीका ११ - शेंदरी रानफूल

हे एका रानफुलाचे चित्र. टाहो सरोवर, कॅलिफोर्नियाजवळ काढले -

शेंदरी रानफूल आणि गवत
शेंदरी रानफूल आणि गवत

कॅमेरा : ऑलिंपस ई-५५०
फोकल लेंग्थ : ४३ मिमि (म्हणजे ३५ मिमि कॅमेराची ८६ मिमि)
एफ-स्टॉप : १/५.६
एक्स्पोझर : १/१०० सेकंद
आय एस ओ : १००

(या फुलाचे नाव माहीत नाही.)

लेखनविषय: दुवे:

Comments

आकर्षक

वेगळेच फुल आहे. विशिष्ठ कोनातील दोन्ही फुले आणि हिरवा तुरा ही ऍरेंजमेंट मस्तच झाली आहे.
खालचा आणि वरचा काही अनावश्यक भाग कापून टाकला तर चित्र आणखीन उठावदार होईल.
तसेच टेलेस्कोपिक लेन्स वापरुन फुल-तुरा ही रचना पार्श्वभुमीपासुन आणखीन आयसोलेट करायला हवी होती असे वाटते.

कातरलेले चित्र - कॅलिफोर्निया आल्पाइन लिली

कोलबेर यांच्याशी चित्र कातरण्याबद्दल पूर्णपणे सहमत :

कातरलेले चित्र

कॅलिफोर्निया आल्पाइन लिली
कॅलिफोर्निया आल्पाइन लिली

मला पहिलेच का नाही सुचले :-(

फारच छान

वा! काय सुंदर दिसते आहे आता.
नावंही शोधले वाटतं? :)

सुरेख

सुंदर आहे. फुलांचे रंग तजेलदार दिसत आहेत, प्रकाश छान परावर्तित होतो आहे.

सुंदर आहे

मी दुपारी वाचले होते की फुलाचे नाव माहित नाही तेव्हा लिली असावे असेच वाटले होते. नेहमी दिसणार्‍या लिलीपेक्षा आकाराने अंमळ लहान आहे आणि पानेही नजरेत न आल्याने जरा संदेह होता.

कातरलेले

कातरलेले झकास दिसत आहे.
चित्रात उजवीकडे पानांवरुन परावर्तित होणारा प्रकाश लक्ष वेधुन घेत आहे.तो थोडा अजून काळा करता येईल का? पण एकंदरीतच बोकेह छान आला आहे.

-
ध्रुव

मस्त

कातरल्यावर आणखी आवडले. १/३ चा नियम इथे किती खुलुन दिसतो याचा प्रत्यय येतो. आणि मागे असणारे कणीस मध्यभागाला भेदून जाते त्यामुळे आणखी रंगत येते.

----

मस्त

फुल छान आहे.
त्याच्या अँगल मुळे खुपच आकर्षक दिसते आहे.
मध्ये आलेला तुरा खरं तर जास्त खुलवतोय असे वाटते.

आणि कातरल्यावर अगदी प्रमाणात आले आहे.

आवडले!

आपला
गुंडोपंत

+१

कातरल्यावर जास्त आवडले!

असेच म्हणतो

कातरल्यावर जास्त आवडले!

 
^ वर