छायाचित्र टीका १० - भुलेश्वर

राम राम,

मध्यंतरी भुलेश्वर येथे जाण्याचा योग आला. तिथे काढलेल्या अनेक चित्रांपैकी हे एक.

एक्सिफः
कॅमेरा - निकॉन ड४०
लेन्स् - १८ - ५५
फ्लॅश - नाही
सद्ध्या इतकेच आठवत आहे. मूळ फोटो जालावर चढवताना एक्सिफ काढले होते. जरूर पडल्यास घरी संगणकावर मूळ फोटो बघेन व सांगेन.

भुलेश्वरबद्दल थोडी माहिती
पुण्याहुन ६० किमी अंतरावर सोलपुर रोडवर, यवतच्या अलीकडे भुलेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम १३व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वीतीय आहे. लढाईच्या काळात बर्‍याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली पण तरीही ज्या काही मुर्ती आहेत त्या विशेष बघण्यासरख्या आहेत. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. येथील खास बात अशी की शंकराच्या पिंडीखाली खोबणीमध्ये जर प्रसाद ठेवला असेल तर तो खाल्यासारखा आवाज येतो व नंतर गायब होतो. बहुदा साप, उंदीर काहीतरी असेल, पण हे वर्षानुवर्षे असेच होत आहे.
भुलेश्वर हेच ठिकाण दौलतमंगल अथवा मंगलगड अश्या नावाने सुध्दा प्रसिध्द आहे. पण आता गड अथवा किल्ला म्हणावे अश्या कोणत्याही खुणा उरल्या नाहीत.
मंदिरात असलेल्या अनेक मुर्तींपैकी खास मुर्ती म्हणजे, येथे स्त्री वेषातील गणेशाची मुर्ती आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

वा! मस्त कंपोजिशन. प्रकाशाचा वापर खूप छान केला आहे.
मुर्तीच्या कमरेखालचा भाग थोडासा आणखी शार्प असायला हवा होता असे वाटते. सुंदर चित्र.

या बाई कोण?

म्हणजे हे कोरीव काम विशेष आहे की अनेक शिल्पांतील एक आहे. ही स्त्री अप्सरा असल्यास मला त्यात विशेष इंटरेश्ट आहे, तेव्हा या बाईंबद्दल काही अधिक सांगणे शक्य आहे का?

फोटो आणि शिल्प दोन्ही अतिशय सुरेख आहेत.

अप्सरा

अप्सरा आहेत का ते माहित नाही पण मंदिरात सर्व बाजूंना अशीच शिल्पे आहेत. हे बघा अजूनही काही चित्रे...
पुजार्‍यांना विचारले असता त्यांनीही काही विशेष माहिती दिली नाही.

-
ध्रुव

ऑसम

ऑसम बूझम...

------------------------------------------------------
१३व्या शतकात भारतातील सुश्रुत विद्यालयाचे स्नातक काय निष्णात होते!!!

छान

चित्र आणि शिल्प दोन्ही छान आहे. प्रकाश किंचीत जास्त हवा होता असे वाटते आहे.

- सूर्य.

प्रकाश

प्रकाश कमी होता कारण दिवे गेले होते. आधी माहित नव्हते की इतका अंधर असतो त्यमुले स्टँडही नेला नव्हता. त्यामुळे हातात धरुन् अजून जास्त वेळ पडदा उघडला असता तर हातांची थरथर आली असती. त्यामुळे थोडा कमी प्रकाशीत झाला/केला आहे. पण खरं सांगायच तर या चित्राच्या डिटेल्स जास्त न दिसल्यमुळेच मला आवडला.

-
ध्रुव

सहमत

मुर्तीच्या चेहर्‍यावर अगदी कमीत कमी आवश्यक प्रकाश आहे त्यामूळे काहिसे 'लो-की पोर्ट्रेट' मस्त जमले आहे.

पर्फेक्ट

पर्फेक्टली हेच म्हणायचे आहे!

ध्रुव खरच मस्त जमले आहे हे चित्र. आवडले.
त्यातही कृष्ण-धवल चित्रे मला (उगाचच) जास्त आवडतात.

मंदिर फार इंटरेस्टींग वाटते आहे.
या मंदिराचे असे एक खास फोटो सेशन का करत नाही?

असा तुझ्या लेन्स मधून मंदिराचा सिलेक्टिव टुर करायला आवडेल...
-
गुंडोपंत

छान

भुलेश्वरला गेले होते त्याची आठवण आली.
खूपच छान फोटो.

अप्सरा का काय माहिती नाही, पण मागे उजवीकडे पदराचा उडणारा शेव आहे, की पंखांप्रमाणे काही आहे, की केस आहेत हे कळले नाही.

ते

चित्रात त्या शिल्पाच्या डाव्या (फोटोत आपल्या उजव्या) बाजुला जे आहे ती उजवीकडची भंगलेली मुर्ती आहे.
-
ध्रुव

उत्तम कंपोझिशन

चौकोनात बाईच्या कण्याचा कमनीय बाक सुंदर रीतीने बसला आहे. कृष्णधवल (किंवा जवळजवळ कृष्णधवल) रंगसंगतीचा उत्तम उपयोग आहे.

(इथे शिल्पकाराच्या उत्तम कंपोझिशनलाही दाद दिली पाहिजे. मंदिराचे चित्र बघता या अप्सरेची नैसर्गिक भासणारी शरीरयष्टी -अहो या तीन ठिकाणी लचकलेली अंगयष्टी नैसर्गिक नसली तरी सुंदर खासच आहे!- चौकोनांत भरायची कल्पना शिल्पकाराचीच आहे.)

खालचा दृष्टीकोन घेऊन डोक्याकडचा भाग थोडा अंधारात ठेवल्यामुळे मूळ लेखातले शिल्प अगदी भव्य आहे असा भ्रम होतो आहे. हेसुद्धा छानच.

(मांड्यांच्या फोकसबाबत कोलबेर यांच्याशी सहमत.)

माहिती

भुलेश्वरबद्दल थोडी माहिती ही अगदीच थोडी वाटली.

  • लढाई कोणती व कुणाकुणाची झाली होती?
  • कोण तो मुर्ख राजा की ज्याने इतके चांगले कलाविष्कार उध्वस्त करून टाकले?
  • किल्ला लयाला का गेला?
  • सद्य स्थिती काय आहे?
  • पुरातत्व खाते कोणता गलथानपणा करत आहेत?
  • मंदिराची मालकी कुणाकडे आहे?
  • त्यांच्या कडे कशी आली/येत गेली?
  • अजून माहिती देता येईल का?

किंवा अजून चित्रे डकवून एक उत्तम उत्कंठावर्धक 'चित्रलेख'ही होवू शकेल असे वाटते.

आपला
गुंडोपंत

काही उत्तरे

>>लढाई कोणती व कुणाकुणाची झाली होती?

औरंगजेब मराठेशाही संपवण्याच्या उद्देश्याने जेव्हा संभाजीराजांवर ५ लाखापेक्षा जास्त सैन्य घेउन आला होता तो लढाईचा काळ. गड किंवा मंदिर राजा रामदेवरायाने १३व्या शतकात बांधले होते.

>>कोण तो मुर्ख राजा की ज्याने इतके चांगले कलाविष्कार उध्वस्त करून टाकले?

तोच तो हलकट औरंग्या, ज्याने महाराष्ट्रातली शक्य तितकी देवळे त्या काळात् पाडली अन् हो वेरुळचे अद्वितिय कैलास लेणे पण उद्ध्वस्त् केले.
स्पेसिफिकली भुलेश्वरचे देउळ मोगल सरदार् मुल्ला नसिरौद्दीनने उध्वस्त केले होते असे गुरवाकडुन् कळाले.

>>किल्ला लयाला का गेला?

नक्की माहित् नाही पण् बहुदा रामदेवरायने राज्य् सोडल्यावर तसे झाले असावे.

अजुन् माहिती हवी असल्यास् तिथल्या गुरवाचा दुरभाष देउ शकतो व्यनीने.

बांधकाम

गड किंवा मंदिर राजा रामदेवरायाने १३व्या शतकात बांधले होते.

नुकताच मी गेल्या शनिवारी सासवड येथे असलेल्या दोन पांडवकालीन मंदिरांना भेट देऊन आलो. तिथल्या गुरवाकडून मिळाले माहिती अशी आहे की, पांडवांनी अज्ञातवासाला जायच्या आधी कर्‍हा नदिच्या काठी सासवड परिसरामध्ये ५ मंदिरे एका दिवसात बांधली. त्या ५ मधील ३ मंदिरे (सिद्धेश्वर, संगमेश्वर, वटेश्वर) सासवड गावातच आहेत. १ मंदिर म्हणजे भुलेश्वर व शेवटचे मंदिर म्हणजे जेजुरीजवळचे पांडेश्वर. पांडेश्वरबद्दल योग्य माहिती मिळाली नाही. वेळेअभावी सिद्धेश्वर नाही बघता आले. लवकरच बघेन व अजून काही माहिती मिळाली तर कळवेन.

-
ध्रुव

सुंदर

सुंदर शिल्प आणि चित्रही. इतके सुंदर शिल्प भग्न झालेले पाहून वाइट वाटले.

----

उत्तम

चित्रासाठी उत्तम निवड.
फार छान मूर्ती ! आणि सुंदर रचना (कंपोज) ! अभिनंदन !!
थोडे खालून फोटो घ्यायची कल्प्ना छान. तसेच मूर्तीची नजर आणि तिचे इतर भाग यांची फोटोतील मांडणी उत्तम.
फक्त प्रकाशित भागातील तपशील नीट दिसत नाहियेत. एक्स्पोजर थोडे वेगळे झाले असावे. किंवा माझ्या संगणक पडद्याचा दोष असावा.
--लिखाळ.

 
^ वर