छायाचित्र टीका ९

इथे अनेक चांगले छायाचित्रकार असताना मी माझे छायाचित्र टटीकेसाठी इथे ठेवण्याचे धाडस करत आहे. मला जाणकारांकडुन काहीतरी मार्गदर्शन होइल असा स्वार्थ त्यात आहे :).

आय. टी. क्षेत्रात असल्याने आम्हाला मागच्या वर्षी पल्याडला जायची संधी आली होती. तिथे रोझ गार्डन बरीच सुंदर असतात. तर न्युयॉर्क मधल्या टॅरिटाउन या गावातल्या रोझ गार्डन मधला हा फोटो आहे.

तर मंडळी हातचे काही राखुन न ठेवता बिनधास्त टीका करा. काय आवडले तसेच आवडले नाही ते जरुर सांगा.

Rose

Nikon D40
Lens: 18-55mm F/3.5-5.6 G
Focal Length: 55mm
Digital Vari-Program: Close Up
1/125 sec - F/8
Exposure Comp.: 0 EV
Sensitivity: ISO 200
White Balance: Auto
AF Mode: AF-A

आपला
- सूर्य

लेखनविषय: दुवे:

Comments

चित्र छान आहे.

चित्र आवडले. फोकस अजून शार्प जमला असता क असा विचार करतोय.
डेप्थ ऑफ फिल्ड (चित्राची खोली) मस्त साधली आहे.
आपण फोटो काढताना तुमचा व गुलाबाच्यामधला कोन (अँगल) बदलला असता तर कदाचित एकच गुलाब चित्रात घेता आला असता. मागचा गुलाब थोडेसे लक्ष वेधत आहे व त्यमुळे या गुलाबाला योग्य न्याय मिळत नाहीये असे वाटले.
अजून एक म्हणजे, मिटरींग कुठले आहे? (स्पॉट, सेंटर वेटेड किंवा मेट्रिक्स - एक्सिफ मध्ये कळेल)
अवांतरः aminus3.com ही टेक्स्ट का टाकली आहे. हे कळले नाही.
-
ध्रुव

गुलाब

आपण फोटो काढताना तुमचा व गुलाबाच्यामधला कोन (अँगल) बदलला असता तर कदाचित एकच गुलाब चित्रात घेता आला असता. मागचा गुलाब थोडेसे लक्ष वेधत आहे व त्यमुळे या गुलाबाला योग्य न्याय मिळत नाहीये असे वाटले.

फोटो बघताना अगदी असंच वाटतं..सहमत आहे..

थोडं डावीकडे सरकून दोन्ही फुले एकाच वेळी फोकसमध्ये घेतली असती तर अजून उठावदार आला असता. दोन्ही गुलाबांमध्ये आकार रंग वगैरे मध्ये फार फरक नसताना एकच का निवडला? काही खास कारण ? ;-)

अभिजित...
माम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|
- इति इंदरजित चढ्ढा

कारण

असे काहीच नाही. एक गुलाब अशी बरीच चित्रे घेतली. त्यानंतर एक चित्र असे घेतले. परंतु आता माझ्या ल़क्षात येत आहे की मागच्या गुलाबामुळे कदाचित समोरच्या गुलाबाला योग्य न्याय मिळत नसेल.

धन्यवाद.
सूर्य.

मिटरींग

अजुन फोटोग्राफीत मी मोंटेसरीतच आहे त्यामुळे मिटरींग म्हणजे काय् हे गुगलावे लागले. परंतु शूटींग डेटा बघितला असता मिटरींग मल्टी पॅटर्न आहे असे दिसते आहे.

- सूर्य.

मी पण...

मी पण माँटेसरीतच आहे, (काल नाही का आपण एक चॉकलेट भांडून खाल्लं?? :)) असो,
मिटरीगबद्दल माहिती येथे वाचा... जालावर अजूनही आहे.

दुवा १

दुवा २

-
ध्रुव

ऑर्ब्ज

ही काही टीका नाही कारण टीका करण्यासाठी काहीतरी कळावे लागते ;-)

पण प्रश्न असा की या चित्रात ऑर्ब्ज (गुलाबांसभोवती दिसणारे गोलाकार) का आले असावेत?

ऑर्ब्ज

चित्रात डाव्या बाजुला वरच्या गुलाबाच्या भोवती दिसणारे गोलाकार बहुतेक मागील बाजुचे प्रकाशस्त्रोत डिफोकस केल्यामुळे आले असावेत असे मला वाटते.

अवांतरः चित्र सुर्याने काढले असल्याने त्यांचा प्रकाश परवर्तित झाला असेल (हं घ्या)
-
ध्रुव

प्रियालीताई

ध्रुव ने उत्तर दिलेच आहे. झाडांमधुन येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपांचे ऑर्ब्ज तयार झाले आहेत. आपल्याला चित्र आवडले का ? आपल्या दृष्टीने काय सुधारणा पाहीजे होती ?

>>>चित्र सुर्याने काढले असल्याने त्यांचा प्रकाश परावर्तित झाला असेल (हं घ्या)
हाहाहाहाहा....

- सूर्य.

गुलाबाची टपोरी फुले

आणि त्यांचे रंग अतिशय मनमोहक आहेत.

आपल्याला चित्र आवडले का ?

चित्र सुरेख आहेच.

आपल्या दृष्टीने काय सुधारणा पाहीजे होती ?

चुकीच्या माणसाला विचारलेत बॉ! तरी ते ऑर्ब्ज कसे टाळावेत याबद्दल कोणा तज्ज्ञाची टीप आवडेल.

मला

मला खरं तर कधी कधी असे ऑर्ब्ज मुद्दाम आणायला आवडले असते. पण दर वेळेला ते आणणेही जमत नाही. व दरवेळी ते आणणे चांगलेही दिसत नाही.

-
ध्रुव

माझे मत

ध्रुव/अभिजित यांच्याशी सहमत. दोन्ही गुलाब फोकसमध्ये आले असते तर आणखी उठाव आला असता. बरेचदा फुलांवर काही पाण्याचे थेंब असले तर चान दिसतात; अर्थात इथे तसे करणे शक्य होते की नाही कल्पना नाही.

----

सुंदर

गुलाबाचे चित्र सुंदर खेचले आहे, इतकेच कळते !!!
पुढील चित्रांच्या प्रतिक्षेत !!!

आय. टी. क्षेत्रात असल्याने आम्हाला मागच्या वर्षी पल्याडला जायची संधी आली होती.

पल्याडचे काही माहितीपुर्णही लेखन येऊ द्या !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर रंग

मला हे चित्र आवडले ते दोन गोष्टींमुळे
१) गुलाब अनेक रंगांत मिळतात पण हा रंग माझा सर्वात आवडता गुलाबाचा रंग आहे.. अगदी लाल चुटुक गुलाबापेक्षाही (अर्थात लाल गुलाब कोणी दिला तर जास्त आवडत ;) )
२) दुसरा डोकावणारा गुलाब लई झ्याक! हळुच धाकट्या बहीणीने ताईच्याआडून डोकावावं असं ते फूल डोकावतंय

मस्त!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

चित्र आवडले

दोन्ही गुलाब जवळ असल्याने (तरीही एकाच प्रतलात नसल्याने) फोकस थोडासा चुकला आहे. पाठीमागचा गुलाब (शक्य असल्यास) हाताने थोडा पुढा आणुन पहिल्या गुलाबाच्या प्रतलात आणला असता तर फोकसींगची समस्या दूर झाली असती. गुलाबाचा रंग मात्र खूपच मोहक आहे.

देशी गुलाब ?

शरद
१] फ़ोकस अजून शार्प करता येईल कां ,--एकाच गुलाबाचा फ़ोटो---
डेप्थ ऑफ़ फ़िल्ड [येथे गुलाबाची पुढी ल व मागील पाकळी रेखीव येणे] हे कॅमेर्‍याचे अंतर व ऍपर्चरवर अवलंबून असते.अंतर
कमी--डेप्थ् कमी अपर्चर् जास्त्--डेप्थ् --कमी. येथे अंतर् कमी--साधारणतः १०-१२ इंच् व् अपर्चर् ८ यांनी दोन्ही पाकळ्या
रेखिव् येणे अवघड् आहे. त्यारितां अंतर वाढवून [२४ इंच] व अपर्चर २२-३२ ठेवून फ़ोटो काढावा व मग मोठा करावा.
एकाच गुलाबाचा फ़ोटो असा दिसला असता
समित्पाणी

गुलाब

शरद
च्या .. फ़ोटो लोड झालाच नाही कीं

वा!

वा...
पण जमतंय की क्लोनींग...
जरा फिनिश केलं तर कळायचंही नाही...

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

- सूर्य.

 
^ वर