"डोमेन" सम्बन्धी काही प्रश्न

मित्र हो,
1) डोमेन रजिस्ट्रेशन कसा करावा लागतो?
2) त्यासाठी पैसे कुठे आणि कसे भरावे लागतात?
3) त्या साईट ची विश्वसनीयता किती? (कारण नेट वर लुटण्याचे प्रकार फ़ार वाचले आहेत)
4) त्याची "व्हेलिडीटी" किती काळ असते?
5) रजिस्ट्रेशन "रिन्यू" नाही केल्यास डाटा चे काय होणार?
6) काही वस्तू नेट वरून (स्वतःच्या डोमेन नावाखाली) विकायच्या असल्यास त्याची प्रक्रिया काय?
7) एकूण किती खर्च येत असेल (अंदाजे)?
8) डोमेन आणि साईट वरच्या सामुग्री चे सम्पूर्ण हक्क कुणाचे रहातील ?

बरेच प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ह्यापैकी काही माहित असल्यास कळवावे किंवा दुवा द्यावा (मला ह्या क्षेत्रात काहीच ज्ञान नाही)…

ता.क.- बरेच शब्द इंग्रजी वापरले आहेत, मराठी लिहीण्याची प्रैक्टिस नसल्यामुळे उपक्रमावर लिहायला संकोच होतो, पण मुद्दे आणि चर्चा वाचायला उपक्रमावर नियमित फ़ेरी असते

लेखनविषय: दुवे:

Comments

अहो

मराठी लिहीण्याची प्रैक्टिस नसल्यामुळे उपक्रमावर लिहायला संकोच होतो,
अहो कशाला संकोचायचे?
आम्हाला तर फार छान वाटते वाचायला... असं वाटतं की लहानपणीचे छिंदवाड्याचे मित्रच परत भेटलेत. तेव्हा लिहा हो बिंधास!
आम्ही आहोत ना वाचायला.

अशीही सारखी तीच ती भंगार पुणेरी ऐकुआन जीव पार कट्टाळलाय बगा.

इडं त फकस्त आम्च्ये प्रकाशरावच चांग्ली भाषा बोलत्यात...
काय म्हंतु, बरुबर पाइंट काल्डा का न्हाई साहेब?
आता उरले आपले प्रश्न. तर त्याचे ज्ञान आमचे तुमचे सारखेच - द्या टाळी!

आपला
गुंडोपंत

डॅडी

गोडॅडी का कमडॅडी का कूलडॅडी
अशा काहीतरी नावाची एक साईट आहे तेथे डोमेन चे रजिस्ट्रेशन करता येते असे काहीतरी मागे कळले होते. त्याची व्हॅलिडिटी वार्षिकच असते बहुदा.

डोमेन व डाटाबेस सर्व्हर हे २ वेगळे प्रकार आहेत. डाटाबेस सर्व्हर चे पण पैसे भरावे लागतात.

वस्तू नेट वरून (स्वतःच्या डोमेन नावाखाली) विकायच्या असल्यास त्याची वेगळी यंत्रणा बसवून घ्यावी लागते. शिवाय सुर्क्षेच्या गोष्टी वेगळ्या असतीलच.

खर्चाची काहीच कल्पना नाही.
डोमेन आणि साईट वरच्या सामुग्री चे संपुर्ण हक्क जो पैसे भरेल अथवा ज्याचे नाव दिले असेल त्याचेच रहावेत. :)

वरील सर्वप्रकारच्या अर्धवट माहिती साठी : गुगलबाबाकी जय!

आपला
गुंडोपंत

 
^ वर