तर्कक्रीडा:६५: सोमो आणि पिमो
सुमो आणि पिमो : (1)
******************************************************************************
"या पाहा दोन पेट्या.त्यांवर क्रमांक आहेत. क्र.१, क्र.२."
"काय आहे या पेट्यांत?"
"प्रत्येक पेटीत एकच मोहोर आहे. ती सोन्याची (सोमो) असेल अथवा पितळेची (पिमो)."
"म्हणजे दोन्ही पेट्यांत सोमो असेल काय?"
"हो, शक्य आहे. तसेच दोहीत पिमो असणेही शक्य आहे.आता प्रत्येक पेटीवरील चिठ्ठीत (लेबल) काय लिहिले आहे ते वाचा."
" पेटी क्र.१: ..दोन्ही पेट्यांत सोमो आहेत. पेटी क्र.२: दोन्ही पेट्यांत सोमो आहेत.
म्हणजे दोन्ही विधाने अगदी सारखी आहेत. ती सत्य आहेत की असत्य?"
" क्र.१ मधे जर सोमो असेल तर त्या पेटीवरील विधान सत्य आहे. पण क्र. १ मधे जर पिमो असेल तर त्या पेटीवरील विधान असत्य आहे."
"पेटी क्र.२ विषयी काय?"
"क्र.१ च्या अगदी विरुद्ध. म्हणजे क्र.२ मधे जर पिमो असेल तर तिच्यावरील विधान सत्य. सोमो असेल तर असत्य."
"बरे. प्रश्न काय आहे?"
"सोन्याची मोहोर घेण्यासाठी तुम्ही कोणती पेटी उघडाल?"
"पेटी उघडल्यावर जी मोहोर मिळेल ती आम्ही घ्यायची ?"
"हो "
" मग थांबा. विचार करतो."
**************************************************************************************************
उत्तर कृपया व्य. नि. ने
Comments
कोडे आवडले.
कोडे सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ;)
निश्वित सुटेल
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
धन्यवाद!, प्रा.डॉ. बिरुटे. अवश्य प्रयत्न करावा. कोडे निश्चित सुटेल.
व्य. नि उत्तर्
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. धनंजय यांनी या कोड्याचे अचूक उत्तर कळविले आहे.आवश्यक तेव्हढा युक्तिवादही लिहिला आहे.
सोमो पिमो उत्तर क्र.२
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सोन्याची मोहोर कोणत्या पेटीत आहे ते श्री. दिगम्भा यांनी अचूक ओळखले आहे.
उत्तर क्र.३
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक यांनी या कोड्याचे उत्तर पाठवले आहे. ते बरोबर आहे.युक्तिवाद मात्र थोडा लांबला आहे. पण अचूक उत्तर महत्त्वाचे.
उत्तर क्र.४
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सोन्याची मोहोर कोणत्या पेटीत असेल ते राधिका यांनी योग्य तर्काने अचूकपणे शोधून काढले आहे.
अभिनंदन!
उत्तर क्र. ५ आणि ६
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी तसेच श्री.चतुरंग यांनी उत्तरे पाठविली आहेत. दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.
सोमो-पिमो (१):उत्तर(१)
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा यांनी या कोड्याचे उत्तर पाठवलेच होते. पण नंतर त्यांचा एक निरोप आला तो असा:
............
निरोपाचा मजकूर
प्रेषक: दिगम्भा
प्रति: यनावाला
विषय: माझ्या मुलाचे उत्तर
दिनांक: रवि, 06/22/2008 - 17:42
माझा मुलगा माझ्यापेक्षा हुशार निघाला.
त्याचा युक्तिवाद फक्त पेटी क्र. २ पुरताच.
क्र. २ मध्ये पिमो असणे व तीवरील विधान सत्य असणे हे तर्कविसंगत आहे, म्हणून क्र. २ मध्ये सोमो, तीच उघडावी.
वर म्हणतो "यात कोडे ते काय?"
(म्हणजे क्र. १ मध्ये काय याचा विचारच नको, काहीही असो.
तरुण पोरं! त्यांचे विचार असेच असणार)
मी उगीचच लांबचा मार्ग घेतला असे दिसते.
- दिगम्भा
*******************************************************************
मागे एक संख्याकोडे प्रियाली आणि त्यांची कन्या या दोघांनी सोडवले होते त्याची या निमित्ताने आठवण झाली.
........यनावाला.
****************************************************************
सोमो आणि पिमो (१) उत्तर २
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री. धनंजय यांनी पाठविलेले उत्तर असे:
..........
क्र २ मध्ये पि मो असती तर त्याच्यावरची चिठ्ठी एकाच वेळी खरी आणि खोटी - अशक्य.
त्यामुळे क्र२ मध्ये सोमो आहे.
म्हणजे क्र२-चिठ्ठीवरील विधान खोटे, क्र १ मध्ये पिमो.
ताळा : क्र१ मध्ये पिमो असल्यामुळे त्यावरील विधान खोटे - ताळा जमला.
क्र २ ची पेटी उघडून त्यातली सोमो घ्यावी.
....धनंजय
*********************************************************
हे वरील उत्तर(१) प्रमाणेच आहे.
मर्म लक्षात आले तर कोडे किती सोपे असते हे यावरून दिसून येते.
****************************************************