छायाचित्र टीका ७

पश्चिम इटलीच्या किनार्‍यावर चिंक्वे तेर्रे नावाची पाच खेडी आहेत. यातल्या एका खेड्यापर्यंत रेल्वेने जाऊन इतर पाच खेडी पायी बघता येतात. पाचही खेडी किनार्‍यावर, एका बाजूला दरी, खाली समुद्र आणि दुसर्‍या बाजूना डोंगर असा सुंदर मिलाफ आहे. हा प्रवास करताना एके ठिकाणी हे दृश्य दिसले. पठ्ठ्या इतक्या वेगात चालला होता की जेमतेम क्यामेरा काढून क्लिक करता आले. अर्थातच सुधारणेला भरपूर वाव आहे. चित्र मॅन्युअल क्यामेर्‍याने काढून मग स्क्यान केले आहे.

Cinque terre

Camera : Canon EOS 7
Focus mode : Auto
Lens : Canon 35-105mm

लेखनविषय: दुवे:

Comments

गलती से..

यातल्या एका खेड्यापर्यंत रेल्वेने जाऊन इतर पाच खेडी पायी बघता येतात.

पाच खेडी, एका खेड्यात गेल्यावर राहिली चार. गलती से मिष्टेक हो गया :-)

----

वाह

मस्त निळे आकाश होते की त्या दिवशी.

छायाचित्र.

वा ! सुरेख....

धवल वालावलकर

प्राथमिक रंगांची किमया

हा फोटो काही पुस्तकी नियम पाळतो, आणि योग्य तो पुस्तकी नियम तोडतो.

पाळलेला नियम : दोन ठळक प्राथमिक रंगांची संगती. (निळा आणि पिवळा)
(योग्यच) मोडलेला नियम : तृतीयांशांचा नियम. उगाच नियमासाठी नियम म्हणून जर कायाक-होडी तृतीयांशांवर ठेवली असती, तर चित्राचे बहुतेक क्षेत्र रिकामे राहिले असते.
अनपेक्षित आणि रसपोषक तपशील : पाण्यावर बारीक लाटा आहेत, त्या वायव्य-आग्नेय दिशेने आहेत. अशा प्रकारच्या कर्ण-रेषा चित्रसंगतीत असल्या तर चांगले असते. (पण या लाटा फोटोसाठी मुद्दामून तयार नाही करता येत :-) ...)
कथा-कथक तपशील : कायाक-होडीच्या पाठीमागे, ती जिथून गेली ती पाण्याची "ढवळलेली" रेषा स्पष्ट दिसते आहे. (इंग्रजीतला "वेक ऑफ द कायाक"). या रेषेत त्या प्रवासाच्या एकाकी आणि हर्षभारित प्रगतीची कथा आहे. ती मार्ग-रेषा नसती, तर निळेपणा कंटाळवाणा वाटू शकला असता.

(ऑटो आहे, माहीत आहे. पण ऑटो नसते तर... शटर स्पीड एक क्लिक अधिक/छिद्र एक क्लिक लहान चालले असते का? कायाकचा पिवळा रंग, माणसाची पाठ, हे तपशील मध्येच जळून सफेत झालेले दिसतात.)

छान

चित्र छानच ..रंगसंगतीसाठीच हे चित्र आहे..आणि ते प्रेक्षणीय आहे.

कथा-कथक तपशील : कायाक-होडीच्या पाठीमागे, ती जिथून गेली ती पाण्याची "ढवळलेली" रेषा स्पष्ट दिसते आहे. (इंग्रजीतला "वेक ऑफ द कायाक"). या रेषेत त्या प्रवासाच्या एकाकी आणि हर्षभारित प्रगतीची कथा आहे. ती मार्ग-रेषा नसती, तर निळेपणा कंटाळवाणा वाटू शकला असता.

धनंजयांनी केलेल्या विवेचनातील भाषा आवडली.. हेच लिहिणार होतो..पण इतकी छान भाषा वापरता आली नसती.

चित्रणाचे पाच नियम हे काही नियम नव्हेत तर सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने सांगितलेले संकेत आहेत. ते वापलेच पाहिजेत असे नव्हेच. जे चांगले दिसेल तेच चांगले.
वरील चित्रात तिरप्या रेषा हे मह्त्त्वाचे अंग आहे. आडव्या रेषा संथता दाखवतात तर तिरप्या रेषा गती/वेग. वरिल चित्रात तिरप्या रेषांनी कायाकला गती दिली आहेच पण लाटा आणि कायाक या रेषा एकमेकांना छेदतात याची मजा पण दिसते आहे.

--लिखाळ.

सहमत

चित्रणाचे पाच नियम हे काही नियम नव्हेत तर सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने सांगितलेले संकेत आहेत. ते वापलेच पाहिजेत असे नव्हेच. जे चांगले दिसेल तेच चांगले.

संपूर्ण सहमत आहे. असे नियम परिस्थितीनुसार वाकवता/मोडता यायला हरकत नसावी.

----

चित्र आवडले

धनंजय आणि लिखाळ दोघांशीही सहमत!
चित्रणाचे पाच नियम हे काही नियम नव्हेत तर सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने सांगितलेले संकेत आहेत. ते वापलेच पाहिजेत असे नव्हेच. जे चांगले दिसेल तेच चांगले.

धन्यवाद

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

----

रोचक

सुरेख विवेचन. सर्व मुद्यांवर सहमत आहे. ऑटो नसते तर सुचवल्याप्रमाणे कायाक आणि माणूस यांचे तपशील अधिक चांगले आले असते.

या रेषेत त्या प्रवासाच्या एकाकी आणि हर्षभारित प्रगतीची कथा आहे.
अगदी माझ्या मनातील वाक्य. हे चित्र बघताना माझ्या मनात हेच येते. अथांग सागर म्हणजे माणसाचे आयुष्य, त्यातल्या लाटा म्हणजे रोजचे प्रसंग. यातल्या काही आपल्या होडीला मदत करतात आणि काही विरोधी असतात. अशा परिस्थितीमध्ये आपला एकाकी प्रवास चालू असतो.
(हे फारच ताणलेले वाटले तर कल्पनेची भरारी म्हणून सोडून द्यावे.:) )

----

प्रपोर्शन -रॉयल ब्लू

मला फोटोतले काही ढीम्म कळत नाही पण निळा आणि पिवळा रंग मात्र मस्तच. फोटोत ती कायाक थोडीशी मोठी हवी होती तर चित्राला प्रपोर्शनेट (मराठी गंडलं) झाली असती असं वाटतं, अर्थातच मला ढीम कळत नसल्याने हे योग्य का अयोग्य कोण जाणे.

पण निळा रंग मात्र मस्त आहे. निळ्या रंगाच्या अनेकविध छटांना वेगवेगळी नावे असतात त्यापैकी हा रॉयल ब्लू असावा का?

बराच

रॉयल ब्लूच्या बराच जवळ जाणारा रंग आहे. कायक मोठी असती तर नक्कीच उठाव आला असता आणि तपशीलही चांगले दिसले असते.
(पण या प्रयत्नात कदाचित मी पाण्यात पडलो असतो :) )

----

धन्यवाद

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
----

निळे

पाणी खूपच निळे आले आहे आणि लाटा काहीशा दगडांच्या स्तरांसारख्या दिसतायत.
बाजूचे अवकाश आले असते तर कदाचित तुम्ही म्हणता तो एकाकीपणा दिसला नसता.

चित्र वेगळेपणामुळे आवडले.

धन्यवाद

खरेतर क्यामेरा काढून चित्र घ्यायला १०-१५ सेकंद लागले असतील त्यामुळे कसलाच विचार करायला वेळ नव्हता. चांगले आले यात लक फ्याक्टर आहे.
प्रतिक्रियेबद्दल आभार.

----

खूपच निळे

पाणी खूपच निळे आले आहे. म्हणजे मन तयारच नाही त्याला पाणी म्हणायला.
वाळवंटातल्या लाल मातीला डार्क निळा रंग देऊन त्यावर होडी ठेवल्यासारखे वाटले

अवांतर : या चित्रापुरते माफ कर रे बाबा, दुस-या एखाद्या प्रकाश चित्राला सुरेख म्हणेन !!!

आभार

प्रतिक्रियेबद्दल आभार. माफ करण्याचा प्रश्न नाही, सर्वांना सर्व आवडले तर त्यात गंमत काय राहिली?

----

पाणी

इथल्या बहुतेक (पश्चिमेकडील) समुद्रकिनार्‍यांचे विशेष म्हणजे स्वच्छ, नितळ पाणी. चित्रात पाण्याखालचे वल्हे दिसते आहे, पण बरेचदा कित्येक फूट खालचा तळही स्पष्ट दिसतो.

----

वा!

मला हे चित्र पचंड आवडले...

हे पाहताना मला पु.लंनी हंगेरीच्या बाल्टन लेक मधील वर्णन केलेल्या नाविकाची आठवण झाली. अश्या ह्या दुर्दिनी (ढगाळ) दिवशी देखील त्या नाविकाने होडी लेक मधे नेण्याचे काम इमाने इतबारे केले होते असे काहिसे वाक्य आहे. वरील चित्र "दुर्दिनी" घेतलेले नसले तरी त्याची ती चिमुकली नाव आणि वरील राजेंद्रची नाव एकच असावी असे वाटून गेले.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

धन्यु

धन्यु :) खरे तर चित्रावरची तुझी आधीची कमेंट वाचूनच मी चित्र टाकायचे धाडस केले.
----

चित्राची

चित्राची रंगसंगती छान आहे. निळ्यावर पिवळा कायमच छान दिसतो.

पण फोटोतील माणसाची पाठ व चित्राचा डावा भाग थोडा जास्त एक्स्पोज झाल्यासारखा वाटत आहे. एक स्टॉप खाली एक्स्पोजर ठेवले असता कदाचित चित्र जास्त शार्प आले असते असे वाटत आहे. खर सांगायच तर चित्र बघीतल्या बघीतल्या फक्त निळा रंगच दिसत असल्यमुळे चित्र फारसे आवडले नाही.(वैयक्तिक मत)

-
ध्रुव

निळा

धन्यवाद. धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे फोटो थोडा ओव्हरएक्स्पोझ आहे.
काल मी दुसर्‍या एका संगणकावर हेच चित्र पाहिले, तेव्हा निळ्याऐवजी रंग बर्‍यापैकी जांभळा दिसत होता. आणि तो मलाही आवडला नाही. पण यावरून काही लोकांना निळा का आवडला नाही हे कदाचित कळू शकते. कारण वेगवेगळ्या मॉनिटरवर हा निळा वेगवेगळा दिसतो आहे.
कदाचित थोडा फिकट निळा असता तरी चालले असते.

----

महत्वाचे!

मॉनिटर कॅलिब्रटेड असणे फार महत्वाचे आहे असे वाटते.
अन्यथा रंग भलतेच दिसतात.
इतकेच काय नुसते सेटींग 'वॉर्म कलर्स/कूल' वर असले तरी रंग बदलतातच.

या संदर्भात गुगलबाबा अधिक माहिती देईलच...
याशिवाय आपल्या सगळ्यांनाही एकच रंग वेगवेगळ्या छटांमध्ये दिसतात...
म्हणज मला दिसत असलेला निळा हा तुम्हाला दिसत असलेला निळा नसू शकतो!

आपला
गुंडोपंत

 
^ वर