फ़ोटोशॉपचे उपयोग

फोटॊशॉप ----
फोटोशॉप[फ़ो.प] ही वर्षानुवर्षे विकसित होत असलेलि एक प्रणाली आहे. जगभर लाखो लोक तीचा उपयोग करत असतात.जाहिरात क्षेत्रात ती अनिवार्य आहे. आपण फ़क्त वैयक्तिक वापरापुरताच विचार करणार आहोत.आपण फ़ोटो लहानपणापासून काढत आलो आहोत,अगदी बन्नी सारखा साधा कॅमेरा घेऊन.पण त्यावेळीही आपण त्याच्या मर्यादा जाणत असतो.मनांत ठरवत असतो की जमेल तेंव्हा हॅसल्बाल्ड नाही तरी कॅनन-मिनोल्टाचा slr घ्यायचाच.सुदैवाने आजच्या सुबत्तेच्या काळांत, १५,०००च्या आंत,चांगला डिजिटल कॅमेरा मिळतो.फ़िल्म कॅमेरा घेणार असाल तर वापरलेला घ्या.हल्ली throw-away price मध्ये मिळतात.मोबाईल मधील कॅमेर्‌यातही उत्तम फ़ोटो काढता येतात.मेख येथेच आहे.फ़ोटो हातांत येतो तेंव्हा लक्षात येते कीं हे जे काही आपल्या हातांत आहे ते काही आपल्या त्या वेळच्या इच्छेप्रमाणे नाही.हा काळा चेहरा, डोक्यातून उगवलेली फ़ांदी, डाव्या कोपऱ्यात आलेला कोणाचातरी खांदा, हे आपल्या लक्षातच आले नाही. आतां परत फ़ोटो काढणे शक्य नसते.एक्स्पोजर चुकणे,सर्व गोष्टी जागेवर नसणे इत्यादी होतच असते. फ़ोपमध्द्ये ह्या चुका दुरुस्त करता येतात. काय काय करता येते? बरेच काही.
१] शेकडो प्रकारचे ब्रश,सोळा लाख रंग,चुका दुरुस्त करवयाला अगणित undo,आकार बदलावयाची सोय,
२] चित्रातील हवा तेव्हढाच भाग निवडून फ़क्त तेव्हडाच दुरुस्त करणे,
३]चित्रातील रंग आपल्या मनाप्रमाणे बदलणे, पाहिजे तर फ़क्त आकाशाचा निळा रंग बदला [पानांचा हिरवा तसाच ठेऊन],
४]जुनी-पुराणी छायाचित्रे ,त्यांवरील डाग,सुरकुत्या काढून एकदम नव्या सारखी करणे,[ घरातील ज्येष्ठ नागरिक एकदम खुश होतात]
५]ग्रुप फ़ोटोमधील एक व्यक्ती निवडून त्याचा मोठा फ़ोटो करणे [enlargement] ,
६]फ़ोटोतील नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे व हव्या असलेल्या [बाहेरून आणून देखील] बसवणे[,नको असलेल्या गोष्टी म्हणजे सुटलेले पोट,पडलेले टक्कल, डॊळ्याखालचा काळा रंग, हे लक्षात आले असेलच!]
७]शाळा सोडल्यानंतर हातांत ब्रश धरला नसला तरी आतां चित्रकलेला सुरवात करणॆ, इत्यादि, इत्यादि.
आता सुरवातीच्या काही न विसरावयाच्या गोष्टी :
फ़ोपमध्द्ये छायाचित्र उघडा. contr+J दाबून चित्र नविन लेअरवर घ्या.पुढे काही गोंधळ झाला तरी मूळ चित्र शाबूत रहाते.विंडो--हिस्टरी हिस्टरी पॅलेट उघडा.आता तुम्हाला कितीही undo करून भूतकाळातील सफ़र करता येते. थोड्य़ा-थोड्या वेळाने केलेले काम save करा.
आज आपण एका सोप्या गोष्टीने सुरवात करूं. पुराण्या छायाचित्राचे नुतनीकरण. छायाचित्र एक ६५ वर्षांपूर्वी काढलेला फ़ोटो आहे.रंग पिवळा पडला आहे व काही डागही दिसतात. प्रथम image--mode--gray scale--ok टंका.पिवळा रंग नाहिसा होईल.आता फ़क्त डाग काढावयाचे आहेत.tool-box मधील brush टंका.२०-३० पिक्झलचा softब्रश निवडा. TOOL BOX मधील clone stamp tool निवडा.चित्रातील एका जागेचे पिक्झल [या पुढे रंग] पाहिजे त्या ठिकाणी नेणे [cloning] हे याचे काम.रबरी शिक्क्यासारखे एका ठिकाणचा भाग ते दुसरीकडे नेते.सुरवातीला ज्या ठिकाणचा रंग आपणाला दुसरीकडे न्यावयाचा आहे त्या ठिकाणी कर्सर नेऊन alt key टंका.
आपणाला केसावरील पांढरे डाग काळे करावयाचे आहेत.डागांच्या शेजारच्या काळ्या रंगापाशी कर्सर नेऊन alt key दाबा. हा झाला source point. आता पांढर्‍या जागांवर ब्रश ड्रॅग करा.डाग नाहिसा होईल.उजव्या टोकावरील डाग काढण्यास source point त्या जागे जवळचा निवडा.हाच नियम चेहर्‍यावरील व कपड्यावरील डाग काढून टाकण्याकरिता. चित्र नैसर्गिक दिसावे म्हणून sorce point सारखा बदलत रहावा . आतां चित्र असे दिसेल. फ़ोटोतील ६५ वर्षे आपण झटकून टाकली.
याच पध्दतीने डॊक्यांत उगवलेले झाड,डोळ्याखालची काळी वर्तुळे,आपण नाहिशी करुं शकता. आज एव्हडॆ पुरे.
शंका असल्यास विनासंकोच विचारा किंवा दूरध्वनी करा.माझ्याकडॆ भरपूर वेळ असतो.
समित्पाणी
http://farm4.static.flickr.com/3003/2592256896_32149a13f4_m.jpg

http://farm4.static.flickr.com/3099/2592256710_b4f5920aa1_m.jpg

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला लेख

फोटोशॉप मीही कॉम्पुटरवर टाकलेलं आहे पण अजून हवा तितका वापर होत नाही. तुमचा लेख वाचून या रविवारी एखादे जुने चित्र नवे करुन टाकतो.

शंका असल्यास तुम्हाला विचारतोच..माझ्याकडेही वेळ आणि शंका बर्‍याच असतात.

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

स्तुत्य उपक्रम

असे लेख लिहिण्याचा उपक्रम फारच स्तुत्य आहे. तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातील या बद्दल शंकाच नाही. थोड्याफार सरावाने या विषयावरची उत्तम लेखमाला बनवता येईल.

सुरेख

फोटोतील छिद्रे काढून टाकून फोटो खुलवला आहे.

टप्प्या-टप्प्याने वर्णन दिल्यामुळे छान गृहपाठ मिळाला.

(पण "सीपिया" [पिवळसर] रंग ठेवला असता तरी चालले असते - त्या रंगाच्या जुन्या फोटोंमध्ये आपल्या इतक्या आठवणी गुंतल्या असतात, की त्या रंगाचाच एका प्रकारचा गोडवा वाटतो. काहीकाही लोक मुद्दामून नवीन फोटोंमध्ये ती पिवळसर झाक पाडून घेतात.)

सोन


काहीकाही लोक मुद्दामून नवीन फोटोंमध्ये ती पिवळसर झाक पाडून घेतात.)


जुन ते सोन! जुन्या पोथ्या घरात असल्या कि विद्वत्ता मुल्य वाढते!!!!!
प्रकाश घाटपांडे

छानच

चला गुरुजी भेटले. आता त्यांनी दिलेला गृह पाठ करुन त्यांना प्रश्न विचारु या.
प्रकाश घाटपांडे

वा!

अतिशय सुंदर भाषेत लिहिलेला सहज सोपा लेख!..
लेख वाचुन दिलेला गृहपाठ करायची उर्मी निर्माण झाली. :)
फोटोशॉप मीही कॉम्पुटरवर टाकलेला आहे .. पण त्याची स्थीती या "सेपियन";) फोटोसारखी होण्याच्या आत वापरला पाहिजे ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वा!

फार् आवडला लेख्! फोटोशॉपचे उपयोग आणि उपयुक्तता नुसती ऐकून होते. आता जरा काहीतरी हात फिरवता येईल. मी पण त्या फोटोतले डाग घालवायचा प्रयत्न करून पाहीला.. पहील्या प्रयत्नात् फार् काही नाही जमलेले दिसत आहे.. परत् प्रयत्न करीन. पण लेख लिहील्याबद्दल खूप धन्यवाद!

ब्रशबद्दल्

शरद
काही शंकांचे निरसन --
१] ब्रश व पेंसिल हे दोन विकल्प आहेत. रेखिव रेघेकरिता पेन्सिल वापरावी. पण अशी गरज फ़ार कमी वेळॆला भासते.
२] ब्रशच्या संबंधात पिक्झल म्हणजे आकार.कमी पिक्झल-लहान ब्रश; जास्त पिक्झल-मोठा ब्रश. F5 कळ दाबली कीं तुमच्या समोर निरनिराळ्या प्रकारचे सॉफ़्ट-हार्ड, लहान-मोठे ब्रश असलेला तक्ता येतो. पाहिजे तो निवडा.
३] निवडलेल्या ब्रशचा व्यास बदलून तो लहान-मोठा करता येतो.
४] ब्रसमध्ये अनंत विकल्प आहेत. छायाचित्र दुरुस्त करावयास एवढे पुरतात. चित्र काढावयास जास्त लागतात.ते पुढे पाहू.
समित्पाणी

छान

छान लेख. प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिल्यावर आणखी चांगला कळेल.

----

छान माहिती

छान माहिती. फोटोशॉप असूनही वापरत नव्हतो. आता मात्र जरा जरा वापरणार आहे.
अजूनही असेच सोपे सोपे लेख टाकले तर लवकर शिकता येईल असे वाटते. तर कधी टाकता पुढचा लेख?

-
ध्रुव

 
^ वर