छायाचित्र टीका ६

नमस्कार मंडळी,
पुण्याहुन जवळ कवडी/कवडीपट नावाच्या गावात एक लहान पूल नदी ओलांडतो. येथे थंडीच्या दिवसात अनेक पक्षी येतात व येथेच राहाणारेदेखील बरेच पक्षी आहेत. पक्षीनिरीक्षणासाठी ही जागा अत्यंत उत्तम आहे. सकाळी पाचला घर सोडायचे आणि परत ९ वाजता यायचे असे मी बरेच वेळा करतो.
गेल्या शनिवारी इकडे टिपलेल्या एका पाकोळीचा हा फोटो.

wire-tailed swallow

Camera: Nikon D40
Lens: Sigma 70-300 DG macro Manual focus
Exposure: 0.002 sec (1/500)
Aperture: f/5.6
Focal Length: 300 mm
ISO Speed: 800
Exposure Bias: -1/3 EV
Exposure Program: Shutter priority
Metering Mode: Pattern
Focus Mode: MANUAL

ध्रुव
लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

सुंदर छायाचित्र. पक्षी नेहेमीप्रमाणे चित्राच्या मध्यभागी न घेता थोडा बाजूला घेतल्याने वेगळेपण जाणवते.
पक्ष्याचा उजवा डोळा अधिक स्पष्ट दिसला असता तर यात अजून उठाव आला असता. (इमेज प्रोसेसिंगने हे शक्य आहे का?)

----
"गोगोजी, आपका घागरा"
"उठाता हूं"

हो

उजवा डोळा दिसायला हवा होता. इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरुन हे कदाचीत शक्य होईलही. मला नाही करता येणार :(
-
ध्रुव

तरीही

चित्र उत्तम आहे यात वादच नाही. आणि त्यातही पक्ष्यांची चित्र काढणे विशेष अवघड असते.

----

आवडला

फोटो फारच सुंदर आला आहे. मधे न्यू यॉर्क राज्यात (अपस्टेट न्यू यॉर्कमधे) काही रंगीबेरंगी पक्षी दिसले. पण एका जागी थांबत नसल्याने फोटो काढता आला नाही. पण त्याच वेळेस खालील "मदर अँड चाईल्ड" चे छायाचित्र टिपता आले. जसे दिसले तसे पटकन टिपल्यामुळे त्यात काही त्रूटी असू शकतात याची कल्पना (खात्री) आहे.

सुंदर फोटो

पक्षी कॅमेर्‍यात टिपायचे म्हणजे फार संयम लागतो. एखाद्या वेळी पुण्यात भेटू आणि जाऊ एकत्र भटकायला.

पक्षी मान आत घेऊन बसलाय का? की असाच असतो?

डेप्थ ऑफ फोकस एकदम परफेक्ट आहे. मग पक्ष्याचे शेपूट शार्प का आलेले नाही?

फोटोतले बॅकग्राऊंड असेच होते का? की तुम्ही सॉफ्टवेअर वापरून बदलले आहे?

एक प्रश्नः याचे उत्तर नाही दिले तरी चालेल. तुमचा निर्णय वैयक्तिक आहे. तुमचे फक्त मत कळाले तरी चालेल.
फोटोमध्ये तीन ठिकाणी तुम्ही ध्रुव लिहिले आहे. फ्रेमवर लिहिलेले ध्रुव फोटोमध्ये लिहिलेल्या दोन् ध्रुवांपेक्षा दिसायलाही छान दिसते आणि पुरेसे वाटते. ज्या सॉफ्टवेअरचा वापर करून हा टेक्स्ट फोटोत टाकला आहे त्याच किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून ते काढूनही टाकता येइल. असे असेल तर कितीही वेळा आपणा कॉपिराईट प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरणार. मग स्वतःहून आपल्याच फोटोमध्ये डिस्ट्रॅक्टींग गोष्टी का टाकाव्या? या फोटोत फार डिस्ट्रॅक्शन होत नाहीये हे खरे. कदाचित कंपोझिशन उत्तम असल्याने असेल.

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

काही उत्तरे

पक्षी मान आत घेऊन बसलाय का? की असाच असतो?
पक्षी असाच दिसतो बर्‍याच वेळा म्हणजे पक्ष्याची मान बर्‍याच वेळा दिसतेच असे नाही.

डेप्थ ऑफ फोकस एकदम परफेक्ट आहे. मग पक्ष्याचे शेपूट शार्प का आलेले नाही?
अरेच्चा, हे माझ्या लक्षातच आले नव्हते. आत्ता कळत नाहीये की हे असे कसे झाले. फोटोचे ऍपर्चर मुळे असे झाले असावे का? मलाही कळत नाहीये.

फोटोतले बॅकग्राऊंड असेच होते का? की तुम्ही सॉफ्टवेअर वापरून बदलले आहे
फोटोमध्ये फोटोची लांबी रुंदी करणे, चौकट टाकणे व माझे नाव टाकणे हे सोडले तर कुठलाच बदल नाहीये. मी तिन (वेगवेगळ्या)वेळा याच पक्ष्याचा फोटो काढले आहेत, आणि गंमत म्हणजे सर्व फोटो वेगवेगळ्या रंगात आहेत. हे बघा...

फोटोमध्ये तीन ठिकाणी तुम्ही ध्रुव लिहिले आहे. फ्रेमवर लिहिलेले ध्रुव फोटोमध्ये लिहिलेल्या दोन् ध्रुवांपेक्षा दिसायलाही छान दिसते आणि पुरेसे वाटते. ज्या सॉफ्टवेअरचा वापर करून हा टेक्स्ट फोटोत टाकला आहे त्याच किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून ते काढूनही टाकता येइल. असे असेल तर कितीही वेळा आपणा कॉपिराईट प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरणार. मग स्वतःहून आपल्याच फोटोमध्ये डिस्ट्रॅक्टींग गोष्टी का टाकाव्या? या फोटोत फार डिस्ट्रॅक्शन होत नाहीये हे खरे.
तुम्ही म्हणता हे खरे आहे. पण हल्ली कमी धुर्त चोर, जास्त आहेत. त्यामुळे मी शक्यतो असा प्रयत्न करतो की लोक हा फोटो घेउन क्रॉप करुन वापरु नये. तुम्ही म्हणलात तसे एखाद्या फोटोशॉप तरबेज माणसाला फोटोतुन टेक्स्ट काढायला जराही वेळ लागणार नाही.
पुढच्या वेळेला फक्त फ्रेममध्ये टाकेन नाव. (हा सल्ला जास्त पटला) व गरजेनुसार वॉटरमार्क टाकेन नावाचा.

-
ध्रुव

क्रॉप

व गरजेनुसार वॉटरमार्क टाकेन नावाचा.

वॉटरमार्क हा चांगला पर्याय आहे.

फोटोमध्ये फोटोची लांबी रुंदी करणे,

असे असेल तर कदाचित मूळ फोटोमध्ये पक्षी अजून उजवीकडे होता का? त्यामुळे शेपूट शार्प आले नसावे. तसा फार फरक पडत नाहीये. पण जवळपास एकाच प्रतलात असूनही त्याच प्रतलातील काही भाग शार्प आणि काही भाग पुसट का आला असावा हे कळत नाही.

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

वा

वर लावलेल्या मुख्य फोटोपेक्षा मला या प्रतिसादातील पहिला फोटो आवडला.
पाकोळी टिपणे अवघडच!! छान आहे.
--लिखाळ.

पाकोळीचा फोटो

मस्त आला आहे.

ध्रुव व अभिजित दोघेही नक्की भेटुन असे अनेक फोटो काढा व इथे टाका.

सुरेखच

फोटु सुरेखच!
का कोण जाणे पार्श्वभूमी (संपूर्ण सफेद) कृत्रिम वाटत आहे. त्यापेक्षा तिसरे चित्र (वरील प्रतिसादातील दुसरे) खुपच नैसर्गिक वाटले आणि मला अधिक आवडले

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वर

वर टाकलेल्या चित्रांपैकी तिसरे चित्र फिल्म एस एल आर चे आहे आधीची दोन डिजीटल आहेत.

-
ध्रुव

 
^ वर