तर्कक्रीडा:६४ उडीदपापड आणि मूगपापड
उडीद पापड आणि मूग पापड
..........’अपलम पापड’ या कुटिरोद्योगाविषयी आपण वाचले असेल.इथे पापड लाटण्याचे काम प्राधान्याने महिलांना मिळते.हे काम सकाळी दहापासून एक वाजे पर्यंत आणि दुपारी दोन वाजल्या पासून पाच वाजेपर्यंत असे दिवशी सहा तास असते.
.........एकदा उडीद पापड आणि मूग पापड लाटण्याचे काम एका श्रमिक महिलामंडळाला मिळाले.सोमवारी दुपारी येऊन त्यांनी दोन्ही प्रकारच्या पापडांचे पीठ भिजवून मळून ठेवले.मुगाचे पीठ उडीदपिठाच्या निमपट होते.(उडीदपीठ 2क्ष किलो तर मूगपीठ क्ष किलो).
.......मंगळवारी सकाळी दहा वाजता श्रमिक महिला आल्या.त्यानी उडीद पापड लाटायला घेतले.दुपारी एक वाजे पर्यंत सर्वजणी तेच काम करीत होत्या.
.......दोन वाजता त्या स्त्रियांनी दोन समान गट केले.(संख्या सम होती.) एक गट उडीद पापड लाटू लागला तर दुसरा मूग पापड.याप्रमाणे सायं.पाच वाजे पर्यंत उडीद पापड लाटण्याचे काम पूर्ण झाले.मूग पापडांचे काही पीठ राहिले.बुधवारी सकाळी तीन महिला आल्या. त्यांनी एका दिवसात (सायं. पाच वाजे पर्यंत) ते काम संपविले.
तर मंगळवारी सकाळी कामाला आलेल्या महिलांची एकूण संख्या किती?
सर्वजणी सारख्याच वेगाने काम करतात,दोन्ही प्रकारच्या पापडांसाठी सारखाच वेळ लागतो,(समान पापड समान वेळ अशा आदर्श अटी गृहीत धराव्या.
****************************************************************************************
(बीजगणिती समीकरणे मांडून प्रश्न सोडवता येईल. पण श्रमिक महिलांना बीजगणित समजण्याची शक्यता कमी. म्हणून साधा तोंडी हिशोब करावा.तो कसा केला ते व्य. नि. ने कळवावे.)
****************************************************************************************
Comments
उत्तर्.......
उत्त्तर् व्य नि मधून पाठवले आहे.
विद्याधर
पहिले उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"उडीदपापड मूगपापड" हे कोडे केवळ मौखिक युक्तिवादाने सोडवण्यात श्री. विद्याधर३१ हे यशस्वी झाले आहेत. त्यांनी केलेला युक्तिवाद अगदी योग्य आहे. मात्र तो संक्षिप्त आहे. आणखी थोडा विस्तार असता तर अधिक चांगले झाले असते. श्री विद्याधर३१ यांच्या या उत्तरामुळे अंकगणिती विचाराच्या सामर्थ्याची प्रचीती येते.
आणखी उत्तरे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय तसेच श्री. विसुनाना यांची व्य. नि. उत्तरे आली. दोघांचे मौखिक युक्तिवाद भिन्न आहेत. पण दोन्ही उत्तरे अचूक आहेत.
अंकगणिती रीत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक यांनी हे कोडे अंकगणिती पद्धतीने सोडवून बरोबर उत्तर काढले आहे. त्यांची रीत जवळ जवळ तोंडीच आहे.लेखी आकडेमोड केलेली नाही.
तोंडी उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. शरद यांनी या कोड्याचे तोंडी उत्तर कळवले आहे. त्यांची रीत अगदी थोडक्यात असून उत्तर अचूक आहे.
संक्षिप्त युक्तिवाद
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तो यांनी व्य. नि. ने पाठविलेले उत्तर सर्वांत लहान असले तरी परिपूर्ण आहे.आकलन सुलभतेसाठी आणखी दोन विधाने असती तर बरे झाले असते.
तीन रीती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी यांनी हे कोडे सोडविण्याच्या तीन भिन्न रीती कळविल्या आहेत. त्या सर्व तर्काला पटणार्या आहेत. उत्तर अचूक आहे.
पापड कोडे --उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रथमपासूनच दोन समान गट आहेत असे मानू.सकाळच्या पाळीत हे दोन गट आणि दुपारच्या पाळीत एक गट असे एकूण तीन गट एका पाळीत उडीद पापड लाटून संपवतात.समजा उडीद पीठ ३० किलो. म्हणून एक गट एका पाळीत १० किलो पीठ लाटतो.
म्हणून एका गटाने दुपारच्या पाळीत १० किलो मूग पीठ लाटले. म्ह.५ किलो राहिले.( कारण एकूण मूग पीठ ३०/२=१५ किलो.)
....बुधवारी सकाळी अर्धा गट आला असता तर हे ५ किलो पीठ एक पाळीत संपले असते. पण दोन पाळ्या(सबंध दिवस) लागल्या. म्हणजे बुधवारी पावच गट आला होता.
....आता ३ जणी म्हणजे पावगट .म्ह. पूर्ण गट १२ जणींचा. म्ह.एकूण महिला=२ गट=२४ जणी.
अंकगणिताचे सामर्थ्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पापड लाटण्याचे कोडे तोंडी सोडवावे असे लिहिले तेव्हा वाटले होते की हे कदाचित् अवघड जाईल. पण अनेकांनी केवळ चार पाच विधानांत कोडे मोडीत काढले. श्री. वाचक्नवी यांनी तर चार भिन्न रीती कळविल्या.त्यावरून अंकगणिती विचाराचे सामर्थ्य प्रत्ययास आले.अर्थात अंकगणिताचे क्षेत्र मर्यादित आहे.अनेक कोड्यांसाठी बीजगणिती समीकरणे मांडणे अपरिहार्य असते.अंकगणिती युक्तिवाद हा माझा विशेष आवडीचा विषय आहे. ज्यांना रस असेल त्यांनी पुढील प्रश्न अंकगणिती रीतीने तोंडी सोडवावा:
..........
काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने आणखी १५ मजूर घेतले.आतां सर्व मजुरांनी दिवशी १० तास राबून ते काम वेळेत (५० दिवसांत) पूर्ण केले.
......तर त्या कामावर प्रारंभी किती मजूर होते?
(प्रत्येक मजुराचा काम करण्याचा वेग सारखाच असतो असे मानावे.)
फार सोपे
व्यनि ची गरज नव्हती पण उत्तर तसे पाठवले आहे. --वाचक्नवी