षडाष्टक योग
षडाष्टक योग,
अनेक मित्र मैत्रिणींनी षडाष्टक योगाबद्दल आमच्याकडे विचारणा केली. ज्योतिषी षडाष्टक योग आहे असे सांगतात, पण म्हणजे नेमके काय ते सांगत नाहीत असे त्यांचे म्हणणे दिसले.
त्यामुळे षडाष्टकाबद्दल लिहीत आहोत.
कोणतेही दोन ग्रह एकमेकांपासून १५०/२१० अंश अंतरावर असता, षडाष्टक योग होतो.
षड म्हणजे सहा आणि अष्ट म्हणजे आठ. एक ग्रह दुसर्यापासून सहाव्या स्थानात असेल तर दुसरा पहिल्यापासून आठव्या स्थानात येतो. हा झाला षडाष्टक योग.
हा अशुभ योगात गणला जातो. षडाष्टक असणे हे भाग्याचे लक्षण नव्हे.
षडाष्टक योगात राशी व राशीस्वामी यांच्यामध्ये तत्वगुण साम्य नसते. त्यामुळे हा योग ज्योतिषात अत्यंत अशुभ मानला गेला आहे.
षडाष्टक योगात षडाष्टक करणार्या दोन ग्रहांची राशी, नक्षत्र, भावस्थिती व ग्रहबल पहावे लागते. हा योग मुख्यत्वे अपयश, शत्रुत्व, शरीराला पीडा देणारा व काबाडकष्ट देणारा आहे.
हा योग कुंडलीत नसावा, म्हणजे नसलेला चांगला.
मंगळाच्या अष्टमात शनी असता होणारा षडाष्टक योग फारच वाईट असतो.
रवि, चंद्र, गुरू ह्यात षडाष्टक योग असणारा माणूस संपत्ती, वैभव व अधिकार मिळवील ही आशा करणे निरर्थक आहे.
लग्न, रवि आणि चंद्र यांच्या षष्ठस्थानी शनी असता त्या मनुष्यास हजारो वैरी असतील. त्याच्या कोणत्याही प्रयत्नात अनेक अडथळे येतील.
रवि-चंद्र यांच्या अष्टमात शनी असता तो आयुष्य विघातक योग होतो.
कुंडलीत पुष्कळसे षडाष्टक योग झाले असता त्या कुंडलीचा दर्जा कमी होतो व ती कुचकामी ठरते.
आपला,
(ज्योतिर्विद) धोंडोपंत
Comments
सर्कीटराव
सर्कीटराव,
क्रांतीवृत्त ३६० अंशाचे आहे.
१२ राशी म्हणजे प्रत्येक रास ३० अंशाची.
एका राशीत सव्वादोन नक्षत्रे म्हणजे एक नक्षत्र १३ अंश २० कला.
प्रत्येक नक्षत्रात ४ चरण म्हणजे एक चरण ३ अंश २० कला.
अशी राशीचक्राची मांडणी आहे.
६ आणि ८ मिळून १४ होतात हा आपला प्रश्न्. त्याचे उत्तर हे की,
प्रथम स्थानात मेषेचा मंगळ असेल आणि षष्ठात शनी असेल तर पहिल्या ग्रहापासून दुसरा ग्रह हा ६ व्या स्थानात असतो. म्हणजे मेष लग्नाला कन्या राशीत शनी षष्ठात असेल तर ही ६ स्थाने होतात.(ज्या स्थानात पहिला ग्रह असेल ते स्थान अर्थातच धरले जाते. आपण जसे इथपासून तिथपर्यंतचे अंतर म्हणतो तेव्हा दोन्ही स्थानांचे बिंदू विचारात घेतो. नाहीतर गणना शक्य नाही.)
आता शनीपासून मंगळ बघितल्यास तो ८ व्या स्थानात येतो. हा झाला षडाष्टक योग.
आपला,
(सुक्ष्मदर्शी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
षडाष्टक
मालतिनन्दन्
श्री. धोंडोपंत, नमस्कार
षडाष्टकाबाबत आपण दिलेले स्पष्टिकरण अतिशय उद्बोधक आहे. या शास्त्राचा अभ्यास करतांना शास्त्रगत नियम नीट लक्षांत घेतले तरच शास्त्र समजते. अन्य गणिती पद्धति इथे जशाच्या तशा उपयोगी पडतीलच असें नाही. षडाष्टकाप्रमाणे अन्य ग्रह योग जसें, केंद्रयोग, लाभ योग, नव-पंचम योग इत्यादि योग पाहातांना स्वस्थानापासून पुढील स्थान मोजावयाचे असते हा प्राथमिक नियम या शास्त्रावर सरधोपट, एकांगी आणि तिरकस टीका करणार्यांनी ध्यानात घ्यावयास हवा. असो.
आपला या शास्त्रातील व्यासंग चांगला आहे.
शुभं भवतु.
अरुण वडुलेकर
मी सांगू?
मिलिंद,
ज्ञानी लोकांनी केलेले खुलासे तुमच्या पचनी पडले नाहीत.
पण मला वाटते की माझ्यासारखा अल्पज्ञानी माणूस मात्र तुम्हाला समजेल अशा रीतीने सांगू शकेल म्हणून लिहिण्याचे धाडस करत आहे. ज्ञानी लोकांनी चुका दुरुस्त कराव्यात ही विनंती.
खालील गोष्टी गृहीत धरायच्या (म्ह. खर्या की खोट्या, शास्त्रीय की अशास्त्रीय, बरोबर की चूक, ही चिकित्सा करायची नाही) -
१. पुढील सर्व माहिती पृथ्वीवरून पाहणार्याच्या सापेक्ष आहे.
२. जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी आपल्या जन्मस्थानावरून दिसणारी आकाशातली ग्रहस्थिती किंवा तिचे चित्ररूप.
३.आकाशात दिसणारे बहुतेक प्रकाशित बिंदू (तारे) परस्परसापेक्ष (एकमेकांपासून) त्याच ठिकाणी (एका अर्थाने स्थिर) असतात, फक्त या सगळ्यांनी मिळून बनलेले हे आकाश अहोरात्र आपल्याभोवती फिरत असते. या फिक्स्ड वस्तूंना तारे म्हणायचे. जे प्रकाशित बिंदू या बाकीच्या फिक्सस्ड पार्श्वभूमीवर स्थिर न राहता तिच्यावरून ठोकळ मानाने पूर्वेकडून पश्चिमेकडे भ्रमण करीत असतात त्यांना ग्रह म्हणायचे. म्हणून सूर्य, चंद्र, मंगळ, इ. सगळे ग्रह आहेत ( म्हणजे समजायचे). राहू केतू सध्या बाजूला ठेवूया, कारण ते अस्तित्वात नसतांनाही ग्रहांपैकी मानले जातात.
४. आकाशाचे १२ भाग केलेले आहेत त्यांना राशी म्हणतात. १२ च्या ऐवजी २७ * ४ = १०८ भाग केले की त्यांना चरण म्हणतात. २७ भाग केले की त्यांना नक्षत्रे म्हणतात. हे सगळे आकाशाचे भाग झाले. प्रत्येक राशीचे ३० अंश असतात हे सध्या लक्षात ठेवा.
५. पत्रिका मांडण्यासाठी एक प्रारंभस्थान (ओरिजिन) हवे असते. आकाशाचे चक्र सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असल्यामुळे आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर कुठली तरी रास तिच्या कितव्यातरी अंशाला असते, ही गोष्ट प्रारंभस्थान म्हणून धरण्यात येते. समजा पूर्व क्षितिजावरून धनु रास वर (पश्चिमेकडे) सरकत चालली आहे, ती २० अंश सरकल्याक्षणी तुमचा जन्म झाला.
असे असल्यास ते तुमच्या पत्रिकेचे ओरिजिन झाले. दुसर्या शब्दात धनु ही तुमची लग्नराशी ठरली.
६. आता ३६० अंशांचे चक्र मांडायचे तर पूर्व क्षितिजापासून ३०-३० अंशांचे १२ भाग पाडूया. याला स्थाने म्हणायचे. पहिल्या ३० अंशांच्या भागाला प्रथमस्थान, पुढच्याला द्वितीयस्थान, अशी ही बारा स्थाने डिफाइन झाली. तुमच्या पत्रिकेत हीच बारा स्थाने दाखवलेली असतात मग ती आयताकारात असोत अथवा गोलात असोत.
७. आता सोपी गोष्ट उरली. प्रत्येक ग्रह कुठल्यातरी राशीत कितव्यातरी अंशावर असणार. म्हणजे तो पत्रिकेत कुठल्यातरी स्थानावर असणार, तो त्या त्या ठिकाणी दाखवून द्यायचा, की पत्रिका मांडून झाली.
वरील गोष्टींसाठी पूर्वी (मी ७६ सालचे आठवतोय) बरीच किचकट आकडेमोड करावी लागत असे, ते काम आता सोपे झाले आहे.
पत्रिका सूक्ष्म म्हणजे सर्व अंश-कला-विकला (डिग्री-मिनिट-सेकंड्स) इतक्या बारकाईनेसुद्धा मांडता येते किंवा अगदी स्थूल मानाने म्हणजे फक्त स्थान व त्या त्या स्थानावरील ग्रह अशी ठोकळपणेही माडता येते. सोयीसाठी स्थूल मानाने पहाण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे.
एखादी पत्रिका हातात आली की त्या व्यक्तीचे वय, जन्म कोणत्या महिन्यात, दिवसा की रात्री, किती वाजता, जन्मतिथी कोणती, हे सगळे सहज सांगता येते. पण ती व्यक्ती पुरुष की स्त्री, जिवंत की मृत हे सांगता येत नाही. (म्हणजे मला येत नाही, ज्ञानी लोकांचे ज्ञान कुठवर पोचते ते मी कसे सांगणार?)
चला, या बेसिक गोष्टी स्पष्ट झाल्या असतील तर पुढे रस (असल्यास) घ्यायला तुम्ही मोकळे.
- दिगम्भा
उत्तर खाली
दिले आहे.
- दिगम्भा
पंत
सासूबाईंचं स्थान सहावे की आठवे? दोन्ही वाईट आहेत म्हणून विचारले हो.
(जावई)बापू
हाहाहा
बापूशेठ,
चांगला प्रश्न विचारलात. सासू म्हटली की ती त्रिकस्थानात असायला हवी जी अत्यंत वाईट समजली जातात. म्हणजे ६,८,१२.
पण ज्योतिषशास्त्रात सासू दहाव्या स्थानावरून पहातात. सप्तमाचे चतुर्थ म्हणजे दहावे. सप्तमावरून पत्नी किंवा पती (स्त्रियांच्या कुंडलीत). त्याचे मात्रृस्थान म्हणजे सप्तमावरून चवथे.म्हणजे आपल्या कुंडलीतील दहावे.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
भविश्य् सागने
माजी पत्रीका
१.११.रवि,गुरु,शुक्र्,
२.१२.बुध
३.१.राहु
४.२.
५.३
६.४
७.५
८.६ चन्द्र
९.७ केतु
१०.८.शनि,मगल,हर्शल
११.९
१२.१०
चांद्ररास - सौररास
मिलिंद,
तुमच्या विनोदी प्रतिसादाला गंभीर प्रतिप्रतिसाद देऊन थोडा रसभंग करतो आहे खरा, पण काही ज्ञानकणांसाठी तो तुम्ही सहन कराल असा विश्वास मनात बाळगून लिहितो आहे.
उदाहरणादाखल ओमकार् यांचा विदा घेतलेला आहे.
त्यांची (पत्रिकेच्या १ल्या स्थानातली) लग्नरास ११वी म्हणजे कुंभ आहे.
चंद्र ज्या राशीत असतो ती जन्मरास किंवा आपली भारतीय पद्धतीप्रमाणे रास. यांची रास ६वी म्हणजे कन्या आहे. हिलाच चांद्ररास असेही म्हणतात.
सूर्य ज्या राशीत असतो ती सौररास किंवा पाश्चात्य रास. यांची सौररास कुंभ आहे. योगायोगाने येथे सौररास व लग्नरास एकच आली आहे. एरवी या तिन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
आपण मानतो ती कालगणना सौरपद्धतीची असल्याने तारखेवरून पाश्चात्य/सौर रास कळू शकते. चांद्ररास / जन्मरास पत्रिका मांडल्याशिवाय किंवा जन्मवेळचे पंचांग पाहिल्याशिवाय कळू शकत नाही. तिथीचा संबंध असू शकेल पण ठाम माहिती नसल्यामुळे मी येथे सांगत नाही.
बाकी पत्रिकेवरून मी दिलेल्या गोष्टी कशा ओळखता येतात याचे प्रात्यक्षिक दाखवणार होतो पण या क्षणी वेळ कमी पडतो आहे व ते तुम्हीदेखील करू शकाल असे वाटते.
[उदाहरणः
प्रेषक ओमकार् (शुक्र, 04/13/2007 - 13:56)
माजी पत्रीका
१.११.रवि,गुरु,शुक्र्,
२.१२.बुध
३.१.राहु
४.२.
५.३
६.४
७.५
८.६ चन्द्र
९.७ केतु
१०.८.शनि,मगल,हर्शल
११.९
१२.१०]
राहू-केतू हे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले ग्रह नाहीत ते (बहुधा) दोन ग्रहांच्या कक्षांचे छेदबिंदू आहेत. पंत अधिक स्पष्टीकरण करू शकतील. ते अर्थात् एकमेकांच्या व्यासविरुद्ध स्थानी/राशींत असतात हे उघड आहे.
युरेनसला मराठीत हर्षल म्हणतात. हर्षल, नेपच्यून, प्लूटो हे इतक्या कमी वेगाने राशीभ्रमण करतात की बहुतेक समकालीनांच्या पत्रिकांत ते एकाच राशीत असतात. प्लूटोबद्दल तर तो व्यक्तींपेक्षा अधिक राष्ट्रांवर परिणाम करतो असे काहीतरी वाचले/ऐकले आहे.
- दिगम्भा
अवांतरः हर्षल
युरेनसला इतरत्रही पूर्वी हर्षलच म्हणायचे कारण त्याचा शोध सर विल्यम हर्षल यांनी लावल्याने त्याला त्यांचे नाव द्यावे असे बर्याच शास्त्रज्ञांचे मत होते. पुढे ते बदलून युरेनस असे करण्यात आले. मराठीत मात्र त्याला अजूनही बरेचदा हर्षल असे म्हटले जाते ते का कोणास ठाऊक?