उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टिका-५
ऋषिकेश
June 6, 2008 - 7:53 pm
या चित्रात सुधारणेला बराच वाव तर आहेच पण यात कोणते सुधार आवश्यक आहेत याचबरोबर हे सुधार-संस्करण कसे करावे यावर उहापोह अपेक्षित आहे.
वरील सुर्यास्ताच्यावेळचे चित्र मी बसमधुन जाताना मोबाईलमधील कॅमेराने काढले आहे (२ मेगापिक्सल्स). अशावेळी माझ्यासारख्या नवख्याला चित्र काढणे कठीण असते. त्यात कॅमेरा नसल्यास मोबाईल वर येणारे फोटो बर्याचदा निरुपयोगी होतात.
१) अशी चित्रे संस्करीत करून कितपत चांगली करता येतील?
२) त्याकरता कोणते तंत्र वापरावे? त्यासाठी कोणता सॉफ्टवेअर तुम्ही वापरता?
४) सजावट कशी करावी.. उदा. चौकटी वगैरे
३) हे चित्र आपल्या संगणकावर उतरवा आणि आपण दिलेल्या टप्प्याने सुधारून पुन्हा चढवा त्यामुळे बघणार्याला कल्पना येईल (प्रत्येक टप्पा दाखवता आला तर अतिउत्तम)
-ऋषिकेश
दुवे:
Comments
पार्श्वभुमी
छायाचित्राची पार्श्वभुमी:
मी गांधीगरला असताना असाच ऑफीसातून घरी येत होतो. समोर सूर्यास्ताचे रंग आकाशात होते, पण सूर्य दिसेना.. अणि बसने वळण घेतलं तेव्हा पाहिलं तर सूर्य ढगामागे आहे.. आणि ढगाला सुंदर चंदेरी किनार आली आहे.. आणि कुकरमधून वाफ बाहेर यावी तसा प्रकाश ढगाच्या एका कोपर्यातुनच बाहेर येत होता. हे पाहून राहवले नाहि म्हणून फोटु काढला :)
मला ती किनार आणि बाहेर फेकला जाणारा प्रकाश टिपायचा होता. आता कॅमेराची प्रत आणि उपलब्ध वेळ यामुळे तो असा आला. आता हा सुधारता येईल का?
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
फोटो..
मोबाईल कॅमेराच्या मानाने छानच आलाय.. कुकरची वाफ आवडली!! :)
फोटो कसा बदलता येईल वगैरे बद्दल सॉरी.. मला काहीच कल्पना नाही कसं करता येईल.. पण फोटो आवडला!
बरोबर
मोबाईल फोनच्या कॅमेराच्या मानाने खरच चांगला आला आहे फोटो. शिवाय असे फोटो काढायचे क्षण अचानक येतात तेव्हा जर कॅमेरा असेल तरच..
ढगांच्या लोभस आकाराचे, सुर्यप्रकाशाच्या लपाछपीचे असे बरेच क्षण छायाचित्रा ऐवजी स्मृतीचित्रात साठवले जातात. :-)
आता जो जसा आलाय फोटो त्यावर काय संस्कार करायचे ते कोलबेर, धनंजय, ध्रुव अशी मातब्बर लोक सांगतीलच..
असाच एकदा आकाशात ससा पळत असताना दिसला पण गाडीतुन उतरुन फोटो घेई पर्यंत ससा अगदी "तसा" दिसत नव्हता. :-(
एकदा काळे ढग भरुन आलेल्या नभात एक छोटी वाट दिसली जी स्वच्छ प्रकाश असलेल्या निळ्या आकाशात नेत होती.
सहजा, फोटो सुरेख
आपण पहिला फोटो आमच्या गच्चीवरुन घेतल्यासारखा वाटतो. पाहा सारखेपणा :) फक्त ससा दिसत नाही.
पण ढगांना पाहुन फोटो काढण्याचा वेडेपणा सुचतोच कसा आपल्याला :)
छायाचित्र : भ्रमनध्वनी दोन मेगा पिक्सल च्या साह्याने !!!
अतिशय सुंदर फोटु
काय सांगता काय सर! चित्राची क्लॅरिटी पाहून खरेच वाटेना.. अतिशय सुंदर फोटु आला आहे
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे