उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अनधिकृत स्मशानभूमी?
धोंडोपंत
April 8, 2007 - 4:13 pm
अहो ऐकावे ते नवलचं.
आमच्या रत्नांग्रीच्या शेजारी पोमेंडीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत स्मशानभूमी होत आहे. त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.
आजपर्यंत अनधिकृत इमारती, कार्यालये, मदिरालये ऐकून होतो. पण अनधिकृत स्मशानभूमी म्हणजे.....
खरं म्हणजे पोमेंडीकर या जागेवर होळीचा उत्सव साजरा करतात. देवीची सहाणदेखील त्या ठिकाणी आहे. पण हे सर्व असूनही अनधिकृत स्मशानभूमीचे काम जोरात सुरू आहे.
आपला,
(चकित) धोंडोपंत
दुवे:
Comments
पंत.............
स्मशानभूमी कोणत्या धर्माची आहे ते तर आधी सांगा .शेवटी माणूस मेला तरी त्याला जात आणि धर्म चिकटून असतो.
आपला
कॉ.विकि