ज्योतिषांचे थडगे बांधण्या अगोदर्

सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेल्या चाचणीच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. दूर्दैवाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने टाळले आहे. कदाचित हा उद्दामपणा त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणी पारदर्शकतेचा एक भाग असावा. समितीच्या कोषस्थळावर त्यांच्या इ-वार्ता या मुखपत्राच्या १२ व्या आवृत्तिमध्ये असे म्हटले आहे की ७०% ते ९०% भाकिते बरोबर आल्यास आणखी मोठ्या सॅम्पल सह चाचणी घेण्यात येईल.

याचा अर्थ असा की, प्राथमिक चाचणी मध्ये भाकिते बरोबर आल्यास खुंटा हलवून बळकट करण्यासाठी नवी चाचणी; पण प्राथमिक चाचणीचे निष्कर्ष नकारात्मक आल्यास खुंटा हलवून बळकट करण्याची कोणतीही गरज समितीला वाटत नाही. प्राथमिक चाचणीचे नकारात्मक निष्कर्ष ज्योतिषांचे थडगे बांधायला आवश्यक आणि पुरेसे आहेत का?

दूसरा मुद्दा: ज्योतिषां कडून वापरल्या जाणा-या तंत्राचा आहे. हॅकसॉ वापरून जसा वृक्ष छाटता येत नाही कारण (ते वेळ आणी श्रम पाहता) व्यवहार्य ठरत नाही आणी वृक्ष कापायची यांत्रिक करवत हॅकसॉच्या जागी उपयोगी नाही. तसेच ज्योतिषा कडून वापरली जाणारी काही तंत्रे अंतिम एकत्रित निष्कर्षात एकामेकांना घातक ठरू शकतात. प्रत्येक तंत्राचे स्वतंत्र निष्कर्ष आणी त्यांचे यशापयश ही संशोधक मंडळी जाहीर करणार का?

टीपः नवीन ब्रिटिश कायद्याचा रोख लक्षात घेउन ही चर्चा "मनोरंजन" या सदरात वर्ग केली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अर्धवट माहीती

समितीच्या कोषस्थळावर त्यांच्या इ-वार्ता या मुखपत्राच्या १२ व्या आवृत्तिमध्ये असे म्हटले आहे की ७०% ते ९०% भाकिते बरोबर आल्यास आणखी मोठ्या सॅम्पल सह चाचणी घेण्यात येईल.
याचा अर्थ असा की, प्राथमिक चाचणी मध्ये भाकिते बरोबर आल्यास खुंटा हलवून बळकट करण्यासाठी नवी चाचणी; पण प्राथमिक चाचणीचे निष्कर्ष नकारात्मक आल्यास खुंटा हलवून बळकट करण्याची कोणतीही गरज समितीला वाटत नाही. प्राथमिक चाचणीचे नकारात्मक निष्कर्ष ज्योतिषांचे थडगे बांधायला आवश्यक आणि पुरेसे आहेत का?

पुढची माहीती का नाही वाचलीत? ९०% पेक्षा जास्त भाकीते बरोबर आली तर ज्योतीषशास्त्र मानण्यात येईल. येथे प्राथमिक चाचणीचे "सकारात्मक" निष्कर्ष पुरेसे वाटत नाहित का?

पुढची माहीती का नाही वाचलीत?

वाचली होती!

मुद्दा समांतर मापदंडाचा आणि एका चाचणीत कोणताही निष्कर्ष काढणे हा आहे आणि ते अयोग्यच आहे.

मग

मुद्दा समांतर मापदंडाचा आणि एका चाचणीत कोणताही निष्कर्ष काढणे हा आहे आणि ते अयोग्यच आहे.

हा मुद्दा आहे तर तो चर्चाप्रस्तावातच का मांडला नाही. अपूर्ण माहितीच्या आधारे सोयीस्कर अर्थ काढून केलेल्या युक्तिवादातील त्रुटी निदर्शनास आणल्यावर याची जाणीव का व्हावी?

"हा मुद्दा आहे तर..."

तर तो चर्चाप्रस्तावातच का मांडला नाही.

विज्ञाननिष्ठांच्या आकलन क्षमतेविषयी मी माफक अपेक्षा ठेवली होती. चूक झाली. मान्य आहे.

तरी पण मी काढलेला अर्थ सोयिस्कर नाही तो सरळ आहे. मा़झ्या युक्तिवादात त्रुटी आहे की नाही या पेक्षा चाचणीतील त्रुटी जास्त महत्त्वाच्या आहेत.

सोयीस्कर

९०% पेक्षा जास्त भाकीते बरोबर आली तर ज्योतीषशास्त्र मानण्यात येईल.

हे वाक्य वाचूनही त्याचा उल्लेख न करता तुम्ही जर काही विधाने करत असाल तर तो सोयीस्कर अर्थ काढण्याचा प्रयत्नच होय.

मा़झ्या युक्तिवादात त्रुटी आहे की नाही या पेक्षा चाचणीतील त्रुटी जास्त महत्त्वाच्या आहेत.

खरे आहे. पण याचा इन्वर्स "चाचणीतील त्रुटी जास्त महत्त्वाच्या आहेत" म्हणून "तुमच्या युक्तिवादातील त्रुटी चालतील" खरा नाही.

विज्ञाननिष्ठांच्या आकलन क्षमतेविषयी मी माफक अपेक्षा ठेवली होती. चूक झाली. मान्य आहे.

पूर्वग्रह न ठेवलेले चर्चेच्या दृष्टीने चांगले. इतरांच्या आकलनक्षमतेची काळजी करण्याची आवश्यकताही नाही

चाचणी प्रतिसाद

१) अनेक ज्योतिषांनी चाचणीच्या पद्धती विषयी नाराजी दर्शवली आहे
२) काहींनी सांगितले कि आम्ही ताज्या रंगीत फोटोवरुन नव्वद टक्क्या पर्यंत अचूक सांगु शकतो
३) काहींनि सांगितले कि आम्हाला व्यक्ति समोर पाहिजे ; कृष्णमुर्ती पद्धतीत जन्मवेळेची अचुकता मह्त्वाची; आम्ही ती प्रश्न विचारुन अनुमानित करतो.
४) काहींनि सांगितले कि आम्हाला आईवडीलांची पण जन्म विदा हवा आहे. नुस्त्या कुंडल्यांवरुन आम्ही सांगत नाही. सोबत आईवडिलांची पत्रिका पहावि लागते.
५) हस्तरेषा वाले म्हणाले आम्हाला यात वाव नाही का?
६) आमच गणिता प्रमाणे अचुक शास्त्र आहे तुमच्या आवाहनानिमित्त भोंदु ज्योतिषांचे पितळ उघडे पडेल. या भोंदु ज्योतिषांमुळे आमचे शास्त्र बदनाम झाले आहे.
७) चला तुमच्या आवाहनामुळे आम्हाला ज्योतिषाचे कोर्सेस केलेले ज्ञान तपासता येईल. वापरल् नाही तर गंज चढतो.

वरिल प्रतिसादांपैकी बहुतेक प्रतिसाद हे विदर्भ मराठवाड्यातील ज्योतिषांचे आहेत. पुण्या मुंबईकडील फारच कमी प्रतिसाद आहेत.
ही चाचणी ज्योतिषाचा निकाल लावणार असे भय लोकांना वाटते. पण वैज्ञानिक दृष्ट्या निष्कर्षांना पुष्टीमिळण्यासाठी अनेकानी ह्या चाचण्या घेतल्या पाहिजेत. ही चाचणी केवळ प्रायमा फेसी आहे. सुप्रिम कोर्टाचा निकाल नव्हे.
प्रकाश घाटपांडे

धंदा तो धंदा

पुण्या मुंबईकडील फारच कमी प्रतिसाद आहेत.

धंद्यात मुरलेले असल्या गोष्टींनी कचरत नाहीत. त्यांना त्यांच्या धंद्याचे चांगले भविष्य माहीत आहे. तुम्ही आम जनतेला कितीही सप्रमाण सिद्ध केले तरी पुण्या-मुंबईतील ज्योतिषांना माहीत आहे की माणसे दुसर्‍या दिवशी सकाळी वर्तमान पत्र उघडून "आजचे राशी भविष्य" बघणार, महीन्याच्या सुरवातीला कालनिर्णय उलटे करून महीन्याचे राशीभविष्य पहाणार, त्रासलेले आपल्याकडे कुंडली दाखवायला येणार, सांख्यिकीच्या तत्वानुसार काही फरक पडणार नाही... मग कशाला विरोध करायचा - त्यापेक्षा धंदा चालू ठेवू :-)

बाकी काही प्रश्न मला उत्सुकतेपोटी पडतात, उत्तरे मिळाली तर आवडेल
अर्थात माहीती असल्यास घाटपांडे उत्तर देतील याची खात्री आहे, पण माहीती आहे का ते माहीत नाही :-) हे प्रश्न कदाचीत खोचक असतील पण विरोध म्हणून विचारलेले नाहीत

  1. आजपर्यंत अंधश्रद्ध निर्मूलन समितीमुळे किती प्रमाणात अंधश्रद्धा निर्मुलन झालेले असू शकेल असे वाटते?
  2. अनिस ने कधी कालनिर्णय सारख्या अथवा दिवाळी अंकात येणार्‍या भविष्यांविरूद्ध आवाज उठवलेला आहे का?
  3. राजकारण्यांनी बाबा-बुवाबाजीच्या मागे जाऊ नये म्हणून अनिस कधी आवाहन करते का?

ही चाचणी केवळ प्रायमा फेसी आहे. सुप्रिम कोर्टाचा निकाल नव्हे.

दाभोळकरांनी भा.इ.सं.मं. पुणे येथिल सभेत आव तर आपण सरन्यायाधिश असल्याचा आणला होता. प्रा. कुंट्यानी आपली तटस्थता मांडायचा जेवढा प्रयत्न केला तेवढा पण दाभोळकरांनी केला नाही.

आव आणल्याने

दाभोळकरांनी भा.इ.सं.मं. पुणे येथिल सभेत आव तर आपण सरन्यायाधिश असल्याचा आणला होता.

इतरांनी कोणता तरी आव आणला आहे असे सर्वांना वाटू शकते. कदाचित तो पाहणार्‍याचा पूर्वग्रह, दृष्टिदोष असू शकतो. आणि जरी काही काळासाठी मानले आव आणला होता तरीही नुसता आव आणल्याने दाभोळकर सरन्यायाधीश होतात काय? काहीही! :)

एक् गोष्ट्

पंचतंत्रातल्या वाघाचे कातडे पांघरणा‍-या गाढवाच्या गोष्टीची आठवण करून दिलीत...आभारी आहे.

या अपेक्षांमध्ये चूक् काय्?

१) अनेक ज्योतिषांनी चाचणीच्या पद्धती विषयी नाराजी दर्शवली आहे
२) काहींनी सांगितले कि आम्ही ताज्या रंगीत फोटोवरुन नव्वद टक्क्या पर्यंत अचूक सांगु शकतो
३) काहींनि सांगितले कि आम्हाला व्यक्ति समोर पाहिजे ; कृष्णमुर्ती पद्धतीत जन्मवेळेची अचुकता मह्त्वाची; आम्ही ती प्रश्न विचारुन अनुमानित करतो.
४) काहींनि सांगितले कि आम्हाला आईवडीलांची पण जन्म विदा हवा आहे. नुस्त्या कुंडल्यांवरुन आम्ही सांगत नाही. सोबत आईवडिलांची पत्रिका पहावि लागते.
५) हस्तरेषा वाले म्हणाले आम्हाला यात वाव नाही का?
६) आमच गणिता प्रमाणे अचुक शास्त्र आहे तुमच्या आवाहनानिमित्त भोंदु ज्योतिषांचे पितळ उघडे पडेल. या भोंदु ज्योतिषांमुळे आमचे शास्त्र बदनाम झाले आहे.
७) चला तुमच्या आवाहनामुळे आम्हाला ज्योतिषाचे कोर्सेस केलेले ज्ञान तपासता येईल. वापरल् नाही तर गंज चढतो.

लवचिकतेचे स्वागत आहे

टीपः नवीन ब्रिटिश कायद्याचा रोख लक्षात घेउन ही चर्चा "मनोरंजन" या सदरात वर्ग केली आहे.

वा@ अश्या लवचिकतेचे (फ्लेक्जिबिलिटी) स्वागत आहे! वादे वादे जायते तत्त्वबोधः ।

चुक नव्हे पण ..

अपेक्षा करण्यात चुक नाही पण ज्योतिषातील सर्वांना सामावुन घेणारी चाचणी तयार करणे अशक्य.
१) ज्योतिषात प्रमाणीकरण नाही
२) काही ज्योतिषी याला शास्त्र न म्हणता विद्या म्हणतात
३) भारतीय ज्योतिष हे वेदांग, धर्म या गोष्टीशी निगडीत
बघा अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ताने

प्रकाश घाटपांडे

मग् त्या फंदात पडू नका

पण ज्योतिषातील सर्वांना सामावुन घेणारी चाचणी तयार करणे अशक्य.

मग् त्या फंदात पडू नका

फंद


मग् त्या फंदात पडू नका

म्हणजे आमच्या श्रद्धेची चिकित्सा कराल तर खबरदार? आम्ही स्वत:ही चिकित्सा करणार नाही व तुम्हालाही करु देणार नाही असे म्हणणारे सनातनी लोकांसारख ना? सुदैवाने ज्योतिषात तसा विचार करणारे सगळे लोक नाहीत. ज्योतिषांची इच्छा असो वा नसो चिकित्सा ही होतच राहणार आहे.
प्रकाश घाटपांडे

"आम्ही स्वत:ही चिकित्सा करणार नाही"??????????

असे मी केव्हा आणि कुठे म्हटले? जे उच्चारले गेले नाही ते उच्चारले गेले असे भासवणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन का हो?

पण मग करा की...

"आम्ही स्वत:ही चिकित्सा करणार नाही"??????????असे मी केव्हा आणि कुठे म्हटले?

पण मग चिकीत्सा करा आणि जगाला दाखवा. एखाद्या गोष्टीची चिकीत्सा वेगवेगळ्या शास्त्रीय (वैज्ञानिक/गणिती) पद्धतीने करता येऊ शकते.

तुम्ही पण करा म्हणजे दोन चाचण्यांची तुलना करता येऊ शकेल.

असं करता येईल

१. ज्योतिषांनी ही चाचणी त्यांच्या पद्धतीने करावी आणि सोबत ज्योतिषविरोधक सहकारी घ्यावेत.

२. ज्या गोष्टींचे निर्णय लावायचे नाहीत त्या गोष्टींवर वाद घालण्याला मर्यादा असतात हे समजून घ्यावे. एक दिवस, दोन दिवस, काही दिवस ठीक वाटते परंतु गेल्या महिन्यापासून उपक्रमाला जो आखाडा बनवला आहे ते कृपया, बंद करून याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी आहेत याकडे लक्ष द्यावे.

प्रियाली शी सहमत

दोन्ही मुद्यांशी पुर्णपणे सहमत.
सोबत ज्योतिष विरोधक न घेता तटस्थ व्यक्ति घ्याव्यात.
प्रकाश घाटपांडे

सहमत पण...

ज्योतिषांनी ही चाचणी त्यांच्या पद्धतीने करावी आणि सोबत ज्योतिषविरोधक सहकारी घ्यावेत.

सहमत पण वास्तवीक ह्या बाबतीत मला "ग्रेट अमेरिकन फ्रेज" उच्चाराविशी वाटते : हू केअर्स!
ज्यांना ज्योतिष बघायचे नाही ते बघणार नाहीतच आणि ज्यांना कुठल्याही कारणाने का होईना बघण्याची हौस आहे ते पहात रहाणारच मग त्यांना कितीही सांगितले सप्रमाण सिद्ध केले तरी असे वाटते.

एक गोष्ट मात्र राहून राहून वाटते की अनिसच्या दृष्टीने हा मुद्दा खरेच इतका महत्वाचा आहे का? मला तरी देवळाच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लावून स्वतःच्या वेळेचा अपव्यय करणार्‍या तरूणांप्रमाणेच अनिस स्वतःची शक्ती नको तेथे खर्च करत आहे असे वाटते. त्याचा कॉस्ट/बेनिफीट रेशो पाहील्यास १ पेक्षा कमी येईल की जास्त?

परंतु गेल्या महिन्यापासून उपक्रमाला जो आखाडा बनवला आहे ते कृपया, बंद करून याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी आहेत याकडे लक्ष द्यावे.

याबाबतीत असे म्हणावेसे वाटते की पोटतिडकीने वाटणार्‍या विषयासाठी बर्‍याचदा अशा संकेतस्थळांवर आखाडा होतो. तो काही फक्त याच विषयात होत आहे असे म्हणणे पटत नाही :-)

चुकीच्या अपेक्षा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
२) काहींनी सांगितले कि आम्ही ताज्या रंगीत फोटोवरुन नव्वद टक्क्या पर्यंत अचूक सांगु शकतो
३) काहींनि सांगितले कि आम्हाला व्यक्ति समोर पाहिजे ; कृष्णमुर्ती पद्धतीत जन्मवेळेची अचूकता मह्त्वाची; आम्ही ती प्रश्न विचारुन अनुमानित करतो.

या अपेक्षांत काय चूक?
"

ही चाचणी कशासाठी आहे?"
"व्यक्तीची जन्मकुंडली पाहून ती व्यक्ती मतिमंद आहे की नाही हे सांगता येते का हे तपासण्यासाठी."
"ठीक. फ़ोटो पाहून व्यक्तीच्या मतिमंदत्वाचे निदान करता येते की नाही या करिता ही चाचणी आहे काय?"
"नाही. पण फ़ोटोवरून बर्‍यापैकी समजू शकेल असे वाटते."
"ते असूं दे. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.मुलाखत घेऊन मतिमंदत्व कळू शकते किंवा कसे याची ही चाचणी आहे काय?’"
"नाही. पण मुलाखत घेतली तर सहजच..."
"ते राहूं दे.’ या चाचणीसाठी ताजा रंगीत फ़ोटो मिळेल,, मुलाखत घ्यायला मिळेल" अशा अपेक्षा ठेवणे योग्य आहे काय?"
"छे ! मुळीच नाही. मूळ विषय काय आणि हे ज्योतिषी मागताहेत काय ? "
"अशा असंबद्ध मागण्या करणार्‍या ज्योतिषांविषयी काय सांगता येईल?"
" काय?"
"नाही लक्षात आले? बरं जाऊं दे.फ़ुटा आता."

 
^ वर